सुवार्तिक कोण होतील?
सुमारे ४० वर्षांपूर्वी, वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेसच्या एका सभेत सदस्यांना, “सुवार्तिकवादाच्या आत्म्याचा उद्रेक होऊ देण्यास” व आपल्या कळपाला “सुवार्ता सांगत जा” असे शिकवण्यास आर्जवण्यात आले. पाच वर्षांनंतर जॉन ए. ओब्रायन या कॅथलिक पाळकांनी, नवे शिष्य आणण्याकरता “केवळ आपल्या घरी बसून न राहता” “त्यांच्याकडे जाण्याच्या” गरजेविषयी लिहिले. तसेच, जानेवारी १९९४ मध्ये, पोप जॉन पॉल दुसरे म्हणाले, ही “वेळ, शुभवर्तमानाबद्दल लाज वाटण्याची नव्हे तर उघडपणे प्रचार करण्याची आहे.”
खरे पाहता, सुवार्तिक होण्याकरता अधूनमधून येणारे हे बोलावणे बहिऱ्यांच्या कानी पडली आहेत. इलवार मरक्युरी नामक एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रकातील एका लेखाने म्हटले: “प्रमुख दक्षिण किनाऱ्यावरील कॅथलिक, यहोवाचे साक्षीदार ज्या पद्धतीने आपल्या विश्वासाबद्दल बोलण्याची सुरवात करतात ती पद्धत स्वीकारण्यास इतके उत्सुक नाहीत.” एका मनुष्याने म्हटले, की सुवार्तिकवाद हा काही “कॅथलिक मनोवृत्तीचा भाग नाही.” दुसऱ्या एकाने असा तर्क केला: “चर्चने आपली बढती करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे पण दार ठोठावण्याद्वारे नव्हे. कदाचित शाळा किंवा पत्रपेट्यांद्वारे केल्यास हे बरे राहील.” एका स्थानिक कॅथड्रलच्या एका धर्माधिकाऱ्यालाही पोपच्या अभिप्रायाचा खुलासा कसा करावा हे निश्चित माहीत नव्हते. ते म्हणाले, “आम्ही लोकांना, शुभवर्तमानाबद्दल त्यांना जी माहिती आहे त्याचे आचरण त्यांनी आपल्या जीवनात करण्याचे उत्तेजन देतो. त्याचा अर्थ दार ठोठावणे असा होतो यावर मला काहीही म्हणायचे नाही.” बातमी वृत्ताचा ठळक मथळा अगदी उचितपणे याचा सारांश देतो: “प्रचार करण्यासाठी पोपचे बोलावणे कॅथलिक ऐकणार नाहीत.”
सुवार्ता सांगण्यास ख्रिस्ती धर्मजगत अपयशी ठरत असले तरी, ५० लाखाहून अधिक यहोवाचे साक्षीदार, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा,” ही येशूची आज्ञा अनुसरत आहेत. (मत्तय २८:१९, २०; पडताळा प्रेषितांची कृत्ये ५:४२.) त्यांचे दारोदारचे प्रचार कार्य २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये पूर्ण केले जात आहे. त्यांचा संदेश सकारात्मक आहे, बायबलमधील भवितव्याबद्दलच्या अद्भुत अभिवचनांना ठळक मांडणारा आहे. पुढच्या वेळी ते तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांच्याशी बोलायला काही हरकत आहे का?