वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१५ पृ. ३-४
  • उपवास कालबाह्‍य झालेले आहेत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उपवास कालबाह्‍य झालेले आहेत का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मार्ग आणि विधी
  • उपवास धरल्याने आपण देवाच्या आणखी जवळ येतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देव उपवासाची अपेक्षा करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपासाविषयक प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपवासाविषयी प्रश्‍न
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१५ पृ. ३-४

उपवास कालबाह्‍य झालेले आहेत का?

“मी किशोरवयीन असल्यापासून दर सोमवारी उपवास करत आले आहे,” असे मृदुलाबेन नामक एक ७८ वर्षीय श्रीमंत भारतीय महिला म्हणते. उपवास हा तिच्या उपासनेचा एक भाग राहिला आहे, तो तिला, आपला विवाह सफल, मुले निरोगी तसेच आपल्या पतीचे संरक्षण यांची खात्री पटवून देणारा एक मार्ग आहे. आता, ती विधवा असली तरी, चांगले आरोग्य व तिच्या मुलांना समृद्धी मिळावी म्हणून आजवर सोमवारच्या दिवशी उपवास करते. तिच्याप्रमाणे, बहुतेक हिंदू महिला नियमित उपवास आपल्या जीवनाचा एक भाग बनवतात.

भारतातील मुंबईच्या एका उपनगरीत राहणारे प्रकाश नावाचे एक मध्यमवयीन व्यापारी असे म्हणतात, की ते दर वर्षी श्रावणाच्या सोमवारी उपवास करतात. हा महिना हिंदू दिनदर्शिकेत खास धार्मिक महत्त्व राखून आहे. प्रकाश स्पष्टीकरण देतात: “मी धार्मिक कारणांसाठी उपवास करण्यास सुरवात केली होती पण आता मला माझ्या आरोग्यासाठी हा उपवास करत राहण्याची अधिक प्रेरणा मिळते. श्रावण महिना पावसाळ्याच्या शेवटी येत असल्यामुळे, पावसाळ्यात होणाऱ्‍या विशिष्ट रोगांपासून मी माझ्या शरीराला स्वच्छ राखू शकतो.”

काहींना वाटते, की उपवास एखाद्याला शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या मदत करतात. उदाहरणार्थ, ग्रोलियर इंटरनॅशनल एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “उपवास करणे आरोग्यदायक असू शकते आणि ते काळजीपूर्वकरीत्या पाळले जातात तेव्हा अधिक जागरूकता आणि संवेदनशीलता प्राप्त होऊ शकते, असे अलीकडील वैज्ञानिक शोध सुचवतात.” ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटो दहा किंवा त्याहून अधिक दिवस उपवास करीत असे व गणितज्ज्ञ पायथागोरस आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याआधी उपवास करायला लावायचे असे म्हटले जाते.

काहींसाठी उपवास करणे म्हणजे विशिष्ट कालमर्यादेपर्यंत अन्‍न पाणी पूर्णपणे वर्ज्य करणे, तर इतर त्यांच्या उपवासात केवळ पेय प्राशन करतात. अनेकांच्या मते, काही आहार टाळणे अथवा एखाद्या विशिष्ट प्रकारचे अन्‍न वर्ज्य करणे म्हणजे उपवास करणे होय. पण, दीर्घ अनियंत्रित उपवास घातक ठरू शकतो. परुल शेथ नामक एक पत्रकार म्हणतात, की शरीराने कार्बोहायड्रेटचा साठा शोषल्यानंतर ते, स्नायू प्रथिनांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते व मग शरीरातील वसा (चरबी) शोषून घेते. वसाचे ग्लूकोजमध्ये रूपांतर केल्यामुळे कीटोने नामक विषारी पदार्थ तयार होतात. हे पदार्थ साठल्यानंतर मेंदूकडे सरकतात ज्यामुळे केंद्रीय तंत्रिका तंत्राला हानी पोहंचते. “अशा वेळी उपवास घातक ठरू शकतो. तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखे वाटेल, तुम्ही गोंधळून जाऊ शकता, व तुमची अवस्था अतिशय बिकट होऊ शकते. . . . [त्यामुळे] तुम्ही कोमात जाऊ शकता व कालांतराने तुमचा मृत्यूही घडू शकतो,” असे शेथ म्हणतात.

मार्ग आणि विधी

राजनैतिक अथवा सामाजिक ध्येयांकरता, उपवास या शक्‍तिशाली साधनाचा वापर करण्यात आला आहे. भारतातील मोहनदास क. गांधी हे ते शस्त्र चालवणारे सर्वात प्रसिद्ध पुरुष होते. कोट्यवधी लोक त्यांचा आदर करत असल्यामुळे भारताच्या हिंदू समाजावर जोरदार प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी उपवासाचा अवलंब केला. मजूर व गिरणीवाल्यांमधील औद्योगिक तंटा मिटवण्यासाठी गांधी यांनी केलेल्या उपोषणाच्या परिणामाचे वर्णन देताना ते म्हणाले: “याचा शेवटचा परिणाम असा झाला की सर्वांमध्ये सदिच्छेचे वातावरण निर्माण झाले. हे गिरणीवाल्यांच्या अंतःकरणास भिडले . . . मी फक्‍त तीन दिवसांसाठी उपोषण केल्यावर संप मागे घेण्यात आला.” दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती, नेल्सन मंडेला यांनी राजकीय कैदी या नात्याने घालवलेल्या वर्षांमध्ये पाच दिवसांच्या अन्‍न सत्याग्रहात भाग घेतला.

परंतु, बहुतेकांनी धार्मिक कारणांसाठी उपवासाचे व्रत घेतले आहे. उपवास, हिंदू शास्त्रातला प्रमुख विधी आहे. विशिष्ट दिवशी “पूर्ण उपवास धरला जातो . . . पाणीही प्राशन केले जात नाही. सौख्य, समृद्धता व पापक्षालनार्थ . . . पुरुष आणि स्त्रिया कडक उपवास पाळतात,” असे भारतीय उपवास व सण (इंग्रजी), नामक पुस्तक म्हणते.

जैन धर्मांतही मोठ्या प्रमाणात उपवास पाळले जातात. संडे टाईम्स ऑफ इंडिया रिव्ह्यू असा अहवाल देते: “मुंबईतील एका जैन मुनीने [ऋषि] २०१ दिवसांसाठी, दिवसातून केवळ दोन ग्लास उकळलेले पाणी प्राशन केले. त्यांचे ३३ किलो [७३ पौंड] वजन घटले.” काही तर मृत्यूच्या क्षणापर्यंत उपवास पाळतात, यामुळे त्यांना मोक्ष मिळेल असे त्यांचे ठाम मत असते.

सामान्यपणे इस्लाम धर्म आचरणाऱ्‍या प्रौढ पुरुषांना रमजानच्या महिन्यात उपवासाचे व्रत घ्यावे लागते. या संपूर्ण महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्‍न किंवा पाणी वर्ज्य केले जाते. या कालावधीत जर कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर त्याने उपवासाचे दिवस भरून काढले पाहिजेत. लेंट, ईस्टरच्या आधीचा ४० दिवसांचा समय, ख्रिस्ती धर्मजगतातील काहींसाठी उपवासाचा असतो व बहुतेक धार्मिक वर्ग इतर विशिष्ट दिवशी उपवास पाळतात.

उपवास निश्‍चितच नाहीसा झालेला नाही. तो इतक्या धर्मांमध्ये अंतर्भूत असल्यामुळे आपण कदाचित विचारू, की देव उपवासाची अपेक्षा करतो का? असे काही प्रसंग आहेत का, की जेव्हा ख्रिश्‍चन उपवास करण्याचा निर्णय घेऊ शकतात? हे लाभदायक ठरू शकते का? पुढील लेख या प्रश्‍नांची चर्चा करील.

[३ पानांवरील चित्रं]

जीवाला मोक्ष प्राप्त करण्यासाठी उपवास हा एक मार्ग आहे असे जैन धर्मात मानले जाते

[४ पानांवरील चित्रं]

मोहनदास क. गांधी यांनी उपवास या शक्‍तिशाली शस्त्राचा, राजनैतिक अथवा सामाजिक ध्येयांकरता वापर केला

[४ पानांवरील चित्रं]

इस्लाम धर्मात रमजान महिन्यात उपवासाचे व्रत घ्यावेच लागते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा