वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१५ पृ. १०-१४
  • सडेपण—अविचलित कार्याचे द्वार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सडेपण—अविचलित कार्याचे द्वार
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सडेपणाची शिफारस
  • सडे राहण्याची सक्‍ती नाही
  • सडेपणाच्या देणगीचा स्वीकार करणे
  • सडेपण, एका उद्देशास्तव
  • अविचलित कार्य
  • अखंड सडेपणाची कोणतीही शपथ नाही
  • अविवाहित, पण देवाच्या सेवेकरिता परिपूर्ण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सुज्ञ सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • एकटेपण, फलदायी जीवनी मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१५ पृ. १०-१४

सडेपण—अविचलित कार्याचे द्वार

‘प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी असा त्याचा अर्थ होतो.’ —१ करिंथकर ७:३५.

१. करिंथमधील ख्रिश्‍चनांबद्दल कोणती अस्वस्थ करणारी बातमी पौलाच्या कानी पडली?

प्रेषित पौलाला ग्रीस येथील करिंथच्या ख्रिस्ती बांधवांविषयी चिंता होती. त्याने, अनैतिकतेसाठी कुविख्यात असलेल्या त्या समृद्ध शहरात सुमारे पाच वर्षांपूर्वी एका मंडळीची स्थापना केली होती. आता, सा. यु. ५५ च्या सुमारास, इफिस, आशिया मायनरमध्ये असताना, त्याला करिंथमधून पक्षाभिमानी विभाजनांविषयी व अनैतिकतेच्या एका गंभीर प्रकरणाविषयी बातम्या मिळाल्या. शिवाय पौलाला करिंथमधील ख्रिश्‍चनांनी, लैंगिक संबंध, सडेपण, विवाह, विभक्‍तता आणि पुनर्विवाह याबाबींवर मार्गदर्शनाकरिता पाठवलेले पत्र मिळाले.

२. करिंथमध्ये व्यापलेल्या अनैतिकतेचा त्या शहरातील ख्रिश्‍चनांवर स्पष्टपणे कसा प्रभाव पडत होता?

२ घोर अनैतिकतेने पीडित असलेल्या करिंथचा स्थानीय मंडळीवर दोन प्रकारे प्रभाव पडत असल्याचे दिसून आले. काही ख्रिस्ती नैतिक हलगर्जीपणाच्या वातावरणाला वश झाले होते व अनैतिकता सहन करत होते. (१ करिंथकर ५:१; ६:१५-१७) इतरांनी, त्या शहरात सर्वव्यापी असलेल्या रतिसुखाविरुद्ध प्रतिक्रिया दाखवून, सर्व लैंगिक समागम, विवाहित जोडप्यांनी देखील वर्ज्य करावे अशी शिफारस करण्यापर्यंत मजल मारली असे दिसून येते.—१ करिंथकर ७:५.

३. पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या त्याच्या पहिल्या पत्रामध्ये सुरवातीला कोणत्या बाबी हाताळल्या?

३ करिंथकरांना पौलाने लिहिलेल्या लांबलचक पत्रात त्याने पहिल्यांदा ऐक्यभंगाच्या समस्येबद्दल सल्ला दिला. (१ करिंथकर, अध्याय १-४) त्याने, त्यांना लोकांचे अनुकरण करण्याचे टाळण्यास आर्जवले कारण त्यामुळे केवळ हानीकारक फुटी निर्माण होऊ शकतात. त्यांनी देवाचे “सहकारी” या नात्याने संयुक्‍त असण्यास हवे होते. मग, मंडळीला नैतिकरीत्या शुद्ध ठेवण्याबाबत त्याने त्यांना विशिष्ट सूचना दिल्या. (अध्याय ५, ६) त्यानंतर प्रेषिताने त्यांचे पत्र घेतले.

सडेपणाची शिफारस

४. “पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे” असे म्हणण्याचा पौलाचा काय अर्थ होता?

४ त्याने अशी सुरवात केली: “तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्याविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे.” (१ करिंथकर ७:१) येथे “स्त्रीला शिवू नये” या संज्ञेचा अर्थ, लैंगिक समाराधनेसाठी एखाद्या स्त्रीशी शारीरिक संपर्क टाळणे असा होतो. पौलाने आधीच जारकर्माचा धिक्कार केला असल्याकारणाने तो आता वैवाहिक व्यवस्थेतील लैंगिक संबंधाविषयी सांगत होता. यास्तव, पौल आता सडेपणाची शिफारस करीत होता. (१ करिंथकर ६:९, १६, १८; पडताळा उत्पत्ति २०:६; नीतिसूत्रे ६:२९.) आणखी पुढे त्याने लिहिले: “जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिला तर ते तुमच्यासाठी बरे.” (१ करिंथकर ७:८) पौल अविवाहित, कदाचित विधुर होता.—१ करिंथकर ९:५.

५, ६. (अ) पौल मठवासी जीवन-शैलीची शिफारस करीत नव्हता हे का स्पष्ट आहे? (ब) पौलाने सडेपणाची शिफारस का केली?

५ करिंथमधील ख्रिस्ती मंडळी बहुधा ग्रीक तत्त्वज्ञानाच्या संपर्कात आली असावी ज्यातील काही विशिष्ट मतप्रणालीच्या लोकांनी नितांत संन्यासवाद किंवा आत्मत्याग यांची प्रशंसा केली. याकारणास्तव ख्रिश्‍चनांनी सर्व लैंगिक समागम टाळणे “बरे” आहे असे करिंथकरांनी पौलाला विचारले असावे का? पौलाच्या उत्तराने ग्रीक तत्त्वज्ञान प्रतिबिंबित केले नाही. (कलस्सैकर २:८) कॅथलिक वेदान्ती यांच्याप्रमाणे त्याने कोठेही, मठातील किंवा कॉन्वेंटमधील ब्रम्हचारी तपस्वी जीवनाची शिफारस केली नाही, जणू काय अविवाहित व्यक्‍ती खासकरून पवित्र होत्या व त्यांच्या जीवन शैलीद्वारे व प्रार्थनांद्वारे स्वतःच्या तारणाला हातभार लावू शकत होत्या.

६ पौलाने “प्रस्तुतच्या अडचणीमुळे” सडेपणाची शिफारस केली. (१ करिंथकर ७:२६) ख्रिस्ती जण ज्यातून गुजरत होते अशा अडचणींचा तो कदाचित उल्लेख करत असावा ज्या विवाहाद्वारे आणखीनच वाढू शकतात. (१ करिंथकर ७:२८) अविवाहित ख्रिश्‍चनांना त्याचा सल्ला होता: “माझ्यासारखे राहिला तर ते तुमच्यासाठी बरे.” विधुरांना तो म्हणाला: “पत्नी पासून मुक्‍त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नको.” ख्रिस्ती विधवेस त्याने लिहिले: “जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल; आणि मलाहि देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.”—१ करिंथकर ७:८, २७, ४०.

सडे राहण्याची सक्‍ती नाही

७, ८. काय दाखवते, की पौल कोणत्याही ख्रिश्‍चनाला सडे राहण्याची गळ घालत नव्हता?

७ पौलाने हा सल्ला दिला तेव्हा यहोवाचा आत्मा त्याला मार्गदर्शित करत होता यात काहीच शंका नाही. सडेपणा व विवाह यांबद्दलची त्याची संपूर्ण प्रस्तुती संतुलन व नियंत्रण दाखवते. याला तो विश्‍वासूपणा अथवा अविश्‍वासूपणाची बाब बनवत नाही. उलट, तो स्वतंत्र निवडीचा प्रश्‍न आहे ज्यामध्ये अविवाहित राहू शकणाऱ्‍यांना सडेपणाची शिफारस केली जाते.

८ “पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे,” असे म्हटल्यानंतर लागलीच पौलाने पुढे म्हटले: “तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पति असावा.” (१ करिंथकर ७:१, २) अविवाहित व विधवांना ‘स्वतःसारखे’ राहण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याने लगेच पुढे असे म्हटले: “तथापि जर त्यांस संयम करिता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.” (१ करिंथकर ७:८, ९) पुन्हा एकदा विधुरांकरता त्याचा असा सल्ला होता: “पत्नी करण्यास पाहू नको. तथापि तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही.” (१ करिंथकर ७:२७, २८) हा संतुलित सल्ला निवड करण्याच्या स्वातंत्र्याला प्रतिबिंबित करतो.

९. येशू व पौलानुसार, कशाप्रकारे विवाह आणि सडेपण दोन्ही देवाकडील देणग्या आहेत?

९ विवाह आणि सडेपण देवाकडील देणग्या असल्याचे पौलाने दाखवले. “मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्‍याला दुसऱ्‍या प्रकारचे.” (१ करिंथकर ७:७) येशू जे म्हणाला होता तेच त्याच्या मनात होते यात कोणतीच शंका नाही. येशूने, विवाह व्यवस्था देवाकडून आहे हे सिद्ध केल्यानंतर राज्य हितांकरता स्वेच्छिक सडेपण ही एक विशिष्ट देणगी असल्याचे दाखवले: “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेहि नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारिता येते त्याने स्वीकारावे.”—मत्तय १९:४-६, ११, १२.

सडेपणाच्या देणगीचा स्वीकार करणे

१०. कशाप्रकारे एखादी व्यक्‍ती सडेपणाची देणगी ‘स्वीकारू’ शकते?

१० सडेपण एक “दान” आहे असे येशू व पौल या दोघांनीही सांगितले असले तरी ते ठराविक लोकांकडेच असणारे चमत्कारिक दान आहे असे त्यांच्यापैकी कोणी म्हणाले नाही. येशू म्हणाला, की ते दान ‘सर्वच जण स्वीकारू शकत नाहीत,’ व ज्यांना “स्वीकारिता येते” त्यांनी तसे अवश्‍य करावे, जसे येशू आणि पौलाने केले. “वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे,” असे पौलाने लिहिले हे खरे, पण ज्यांना “संयम करिता येत” नाही अशांबद्दल तो बोलत होता. (१ करिंथकर ७:९) पौलाने, आधीच्या लिखाणांमध्ये ख्रिस्ती लोक वासनेने जळण्याचे टाळू शकतात हे दाखवले. (गलतीकर ५:१६, २२-२४) आत्म्याच्या अनुषंगाने चालणे याचा अर्थ आपल्या प्रत्येक पावलास यहोवाच्या आत्म्याला मार्गदर्शन करू देणे असा होतो. तरुण ख्रिस्ती असे करू शकतात का? होय, यहोवाच्या वचनाचे त्यांनी जवळून अनुसरण केल्यास. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तरुण [अथवा तरुणी] आपला [आपले] वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.”—स्तोत्र ११९:९.

११. ‘आत्म्याप्रमाणे चालण्याचा’ काय अर्थ होतो?

११ यामध्ये अनेक टी. व्ही कार्यक्रम, चित्रपट, नियतकालिक लेख, पुस्तके व गीतांचे बोल याद्वारे प्रसारित होणाऱ्‍या अनुज्ञेयी कल्पनांविरुद्ध सावध राहणे समाविष्ट आहे. अशा कल्पना देह-केंद्रीत आहेत. सडेपण स्वीकारू इच्छिणाऱ्‍या एखाद्या तरुण ख्रिस्ती पुरुषाने अथवा स्त्रीने “देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे [चालावे]. कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात.” (तिरपे वळण आमचे.) (रोमकर ८:४, ५) आध्यात्मिक गोष्टी न्याय, शुद्ध, प्रशंसनीय, सद्‌गुणाच्या आहेत. आबालवृद्ध ख्रिश्‍चनांनी “त्यांचे मनन” केल्यास ते त्यांच्या फायद्याचे ठरेल.—फिलिप्पैकर ४:८, ९.

१२. सडेपणाची देणगी स्वीकारण्यामध्ये काय अधिककरून समाविष्ट आहे?

१२ सडेपणाची देणगी स्वीकारणे अधिककरून, एखाद्याने त्या ध्येयाचा निर्धार करण्याची व ते ध्येय प्राप्त करण्यास मदत मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करण्याची बाब आहे. (फिलिप्पैकर ४:६, ७) पौलाने लिहिले: ‘तो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे, आणि आपले कौमार्य तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरविले आहे, तो बरे करितो. लग्न करून जो आपले कौमार्य देतो तो बरे करितो; पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करितो.’—१ करिंथकर ७:३७, ३८.

सडेपण, एका उद्देशास्तव

१३, १४. (अ) प्रेषित पौलाने अविवाहित व विवाहित ख्रिश्‍चनांमध्ये कोणती तुलना केली? (ब) कशाप्रकारे केवळ सडा ख्रिस्ती, विवाहित असलेल्यांपेक्षा “अधिक बरे” करू शकतो?

१३ तसे पाहिल्यास, सडेपण प्रशंसनीय नाही. मग, कोणत्या अर्थाने ते “अधिक बरे” असू शकते? एखादी व्यक्‍ती त्यामुळे मिळणाऱ्‍या स्वातंत्र्याचा कसा उपयोग करते यावर ते सर्व अवलंबून असते. पौलाने लिहिले: “तुम्ही निश्‍चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करितो; परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे, अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करितो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करिते; परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करिते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हास फासात गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.”—१ करिंथकर ७:३२-३५.

१४ एखादा सडा ख्रिस्ती जो स्वार्थी ध्येय गाठण्याकरता त्याच्या अविवाहित अवस्थेचा वापर करतो तो विवाहित ख्रिश्‍चनांपेक्षा “अधिक बरे” करीत नाही. तो “स्वर्गाच्या राज्यासाठी” नव्हे तर व्यक्‍तिगत कारणांकरता सडा राहतो. (मत्तय १९:१२) अविवाहित पुरुषाने किंवा स्त्रीने “प्रभूच्या गोष्टींविषयीची” चिंता केली पाहिजे, “प्रभूला कसे संतोषवावे” याविषयी चिंता केली पाहिजे व ‘प्रभूची सेवा एकाग्रतेने करण्यासाठी नित्य हजर’ राहिले पाहिजे. याचाच अर्थ, अविभाज्य लक्ष देऊन यहोवा आणि येशू ख्रिस्त यांची सेवा करणे. असे केल्यानेच, अविवाहित ख्रिस्ती पुरुष व स्त्रिया विवाहित ख्रिश्‍चनांपेक्षा “अधिक बरे” करत असतात.

अविचलित कार्य

१५. १ करिंथकराच्या ७ व्या अध्यायातील पौलाच्या वादविवादाचे सार काय आहे?

१५ या अध्यायातील पौलाचा संपूर्ण वादविवाद हा आहे: विवाह कायदेशीर व विशिष्ट परिस्थितींमध्ये काहींकरता योग्य असला तरी, कमीतकमी विकर्षणांसह यहोवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍या ख्रिस्ती पुरुषाकरता अथवा स्त्रीकरता सडेपण निर्विवादपणे फायदेकारक आहे. विवाहित व्यक्‍तीचे मन “द्विधा” झालेले असते, पण अविवाहित ख्रिस्ती ‘प्रभूच्या गोष्टींवर’ लक्ष एकाग्र करण्यास स्वतंत्र आहे.

१६, १७. कशाप्रकारे एक सडी ख्रिस्ती व्यक्‍ती ‘प्रभूच्या गोष्टींवर’ अधिक लक्ष एकाग्र करू शकते?

१६ प्रभूच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर विवाहित लोकांपेक्षा अविवाहित ख्रिस्ती अधिक स्वतंत्रपणे लक्ष देऊ शकतो? दुसऱ्‍या संदर्भात येशू ‘देवाच्या गोष्टींबद्दल’—एक ख्रिस्ती कैसराला देऊ शकत नाही अशा गोष्टींबद्दल बोलला. (मत्तय २२:२१) या गोष्टी एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीचे जीवन, उपासना व सेवा यांजशी निश्‍चितच संबंधित आहेत.—मत्तय ४:१०; रोमकर १४:८; २ करिंथकर २:१७; ३:५, ६; ४:१.

१७ अविवाहित व्यक्‍ती यहोवाच्या सेवेत वेळ खर्च करण्यात सामान्यपणे अधिक स्वतंत्र असतात ज्यामुळे त्यांच्या आध्यात्मिकतेला व त्यांच्या संपूर्ण सेवेला लाभ होऊ शकतो. ते व्यक्‍तिगत अभ्यास आणि मनन याकरता जास्त वेळ खर्च करू शकतात. बहुतेकवेळा विवाहितांपेक्षा अविवाहित ख्रिस्ती बायबल वाचनाकरता आपल्या आराखड्यात सहजपणे वेळ देऊ शकतात. ते सभा व क्षेत्र सेवेची अधिक चांगली तयारी करू शकतात. हे सर्वकाही त्यांच्या “हितासाठी” आहे.—१ करिंथकर ७:३५.

१८. कशाप्रकारे अनेक सडे बांधव, “एकाग्रतेने” यहोवाची सेवा करण्याची त्यांची इच्छा असल्याचे दाखवू शकतात?

१८ सेवा-सेवक या नात्याने आधीपासूनच कार्य करत असलेले अनेक सडे बांधव यहोवाला असे म्हणण्यास स्वतंत्र आहेत: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८) गरज आहे तेथे जाऊन सेवा करण्यास स्वतंत्र असलेल्या अविवाहित सेवा-सेवकांसाठी व वडिलांसाठी राखलेल्या सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहण्याकरता ते अर्ज भरू शकतात. आपली मंडळी सोडू न शकणारे बांधवही, सेवा-सेवक किंवा वडील या नात्याने आपल्या बांधवांची सेवा करण्यास स्वतःला उपलब्ध करून देऊ शकतात.—फिलिप्पैकर २:२०-२३.

१९. अनेक अविवाहित बहिणींना आशीर्वाद कसा मिळाला आहे व कोणता एक मार्ग आहे ज्याद्वारे त्या मंडळीकरता आशीर्वाद ठरू शकतात?

१९ विचारविनिमय करण्यासाठी किंवा आपल्या खासगी गोष्टी सांगण्यासाठी पती नसलेल्या अविवाहित बहिणींनी ‘आपला भार यहोवावर टाकणे’ अधिक योग्य असू शकते. (स्तोत्र ५५:२२; १ करिंथकर ११:३) यहोवाबद्दलच्या प्रीतीठायी अविवाहित राहिलेल्या बहिणींकरता ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. कालांतराने त्यांनी विवाह केलाच, तर तो “केवळ प्रभूमध्ये,” अर्थात यहोवाला समर्पित असलेल्या व्यक्‍तीसोबतच असेल. (१ करिंथकर ७:३९) आपल्या मंडळीमध्ये अविवाहित बहिणी असल्याबद्दल वडीलजन कृतज्ञ आहेत; त्या बहुधा आजाऱ्‍यांना व वृद्धांना भेटी देतात व मदत करतात. यामुळे, समाविष्ट असलेल्या सर्वांना आनंद मिळतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

२०. अनेक ख्रिस्ती “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करत असल्याचे कसे प्रदर्शित करत आहेत?

२० अनेक तरुण ख्रिश्‍चनांनी त्यांच्या कारभारांची अशाप्रकारे व्यवस्था केली आहे जेणेकरून ते “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करू शकतात. (१ करिंथकर ७:३५) ते यहोवाची सेवा पूर्ण-वेळेचे पायनियर सेवक, मिशनरी किंवा वॉचटावर संस्थेच्या एखाद्या शाखा दप्तरात कार्य करून करत आहेत. किती आनंदी समूह आहे त्यांचा! त्यांचे अस्तित्व किती तजेला देणारे असते! ते यहोवाच्या आणि येशूच्या नजरेत तर “दहिंवरासारखे” आहेत.—स्तोत्र ११०:३.

अखंड सडेपणाची कोणतीही शपथ नाही

२१. (अ) पौलाने सडेपणाची शपथ घेण्यास उत्तेजन दिले नाही हे स्पष्ट का आहे? (ब) “उपवर” होणे असे त्याने म्हटले तेव्हा तो काय सूचित करत होता?

२१ ख्रिस्ती आपल्या जीवनामध्ये सडेपण स्वीकारून “बरे” करतात, हा पौलाच्या सल्ल्यातील मुख्य मुद्दा आहे. (१ करिंथकर ७:१, ८, २६, ३७) परंतु, तो त्यांना सडेपणाची शपथ घेण्यास निश्‍चितच सांगत नाही. उलट त्याने लिहिले: ‘जर कोणाला असे वाटते की, आपण आपल्या कौमार्याच्या अपमानास कारण होत आहोत, ते उपवर झाले आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे; तो पाप करीत नाही; त्यांनी लग्न करावे.’ (१ करिंथकर ७:३६) “उपवर” असा भाषांतरित केलेला एकच ग्रीक शब्द (हायपरऑकमॉस) याचा अक्षरशः अर्थ, “सर्वोच्च बिंदूच्या पलिकडे” असा होतो व लैंगिक वासनेची कमाल उधाण सरणे याला सूचित करतो. यास्तव, जे अनेक वर्षांपासून अविवाहित राहिले व ज्यांना कालांतराने विवाह करावासा वाटतो ते एखाद्या सहविश्‍वासूसोबत विवाह करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत.—२ करिंथकर ६:१४.

२२. एखाद्या ख्रिश्‍चनाने लहान वयात विवाह न करणे, सर्व बाजूंनी पाहिल्यास फायदेकारक का आहे?

२२ एखादा तरुण ख्रिस्ती विचलित न होता यहोवाची सेवा करण्यात जितकी वर्षे खर्च करतो ती सुज्ञ गुंतवणुकीप्रमाणे आहेत. ती वर्षे त्याला किंवा तिला व्यावहारिक सुज्ञता, अनुभव आणि मर्मदृष्टी प्राप्त करण्यास वाव देतात. (नीतिसूत्रे १:३, ४) राज्यासाठी सडी राहिलेली व्यक्‍ती नंतर, वैवाहिक जीवनाच्या व कदाचित पालकत्वाच्या जबाबदाऱ्‍या उचलण्याचा निर्णय घेते तेव्हा तसे करण्यास एका उत्तम स्थितीत असते.

२३. विवाह करण्याच्या योजना करणाऱ्‍यांच्या मनामध्ये कदाचित काय असू शकते, पण पुढील लेखांमध्ये कोणत्या प्रश्‍नांवर विचार केला जाईल?

२३ अविवाहित राहून यहोवाची पूर्ण वेळेची सेवा करण्यात अनेक वर्षे खर्च केलेले काही ख्रिश्‍चन, पूर्ण वेळेच्या कोणत्या ना कोणत्या सेवेत कायम राहता येईल असा उद्देश ठेवूनच काळजीपूर्वकतेने त्यांचा भावी सोबती निवडतात. हे निश्‍चितच अतिप्रशंसनीय आहे. काही जण तर त्यांच्या सेवेत व्यत्यय येऊ न देण्याच्या कल्पनेला दृष्टीसमोर ठेवून कदाचित विवाह करतील. परंतु, एक विवाहित ख्रिस्ती अविवाहित असताना जेवढ्या एकाग्रतेने यहोवाची सेवा करण्यास स्वतंत्र होता तशाचप्रकारचे स्वातंत्र्य त्याला किंवा तिला आताही आहे असे वाटले पाहिजे का? या प्रश्‍नावर पुढील लेखांत विचार केला जाईल.

उजळणीद्वारे

◻ प्रेषित पौलाला करिंथ मंडळीला पत्र लिहिण्याची गरज का वाटली?

◻ पौल मठवासी जीवनशैलीची शिफारस करत नव्हता हे आपल्याला का माहीत आहे?

◻ एक व्यक्‍ती सडेपण कसे स्वीकारू शकते?

◻ अविवाहित भगिनी त्यांच्या सडेपणातून लाभ कसा प्राप्त शकतात?

◻ सडे बांधव यहोवाची “एकाग्रतेने” सेवा करण्याच्या स्वातंत्र्याचा फायदा कसा घेऊ शकतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा