वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ८/१ पृ. १५-२०
  • ‘तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र जीवन, पवित्र मोल
  • कुटुंबात पवित्र आचरण
  • कुटुंबातील सत्य न मानणाऱ्‍या सदस्यांच्या संबंधाने पावित्र्य
  • आपण मंडळीत कशाप्रकारे पवित्र असू शकतो?
  • आपल्या शेजारपाजारात आपले पावित्र्यप्रदर्शित होते का?
  • कार्यस्थळी व शाळेत पावित्र्य
  • ‘तुम्ही पवित्र असावे कारण मी पवित्र आहे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “तुम्ही पवित्र असलं पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • ‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मी यहोवा तुमचा देव पवित्र आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ८/१ पृ. १५-२०

‘तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा’

“तर तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’”—१ पेत्र १:१५, १६.

१. पेत्राने ख्रिश्‍चनांना पवित्र असण्याविषयी आग्रह का केला?

प्रेषित पेत्राने वर उल्लेखिलेला उपदेश का दिला? कारण, प्रत्येक ख्रिश्‍चनाला आपले विचार व आपल्या कृती यहोवाच्या पावित्र्यानुरूप ठेवायच्या असल्यास, त्याने यांविषयी सांभाळून राहण्याची गरज आहे हे पेत्राने ओळखले होते. याच कारणास्तव वरील शब्द लिहिण्याआधी त्याने असे सांगितले: “तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून . . . आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका.”—१ पेत्र १:१३, १४.

२. सत्य शिकण्यापूर्वी आपल्या वासना अपवित्र का होत्या?

२ आपल्या पूर्वीच्या वासना अपवित्र होत्या. असे का बरे? कारण आपल्यातील अनेक जण ख्रिस्ती सत्य स्वीकारण्यापूर्वी, जगिक आचरणाचा मार्ग अनुसरीत होते. हेच मनात बाळगून, पेत्राने स्पष्टपणे पुढील शब्द लिहिले: “परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्‍ति, विषयवासना, मद्यासक्‍ति, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्‍यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.” अर्थात, पेत्राने आपल्या आधुनिक जगातील विशिष्ट अपवित्र कृत्यांचा उल्लेख केला नाही कारण त्या काळात ती अज्ञात होती.—१ पेत्र ४:३, ४.

३, ४. (अ) आपण अयोग्य वासनांना कशाप्रकारे तोंड देऊ शकतो? (ब) ख्रिश्‍चनांना भावनाशून्य व्हावे लागते का? स्पष्टीकरण द्या.

३ या वासना देहाला, ज्ञानेंद्रियांना व भावनांना आकर्षक वाटणाऱ्‍या आहेत हे तुमच्या लक्षात आले का? आपण यांचे वर्चस्व खपवून घेतो तेव्हा आपल्या कल्पना व आपली कृत्ये सहजासहजी अपवित्र बनतात. आपल्या कृत्यांवर, तर्कशक्‍तीचे नियंत्रण राखणे आवश्‍यक आहे हे यावरून स्पष्ट होते. पौलाने हा विचार अशाप्रकारे व्यक्‍त केला: “यास्तव बंधुनो, मी देवाच्या सर्व करुणांमुळे तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमच्या तर्कशक्‍तीनुसार पवित्र सेवा आहे.”—रोमकर १२:१, २, NW.

४ देवाला पवित्र यज्ञाचे समर्पण करण्यासाठी, आपण आपल्या भावनांना नव्हे तर आपल्या तर्कशक्‍तीला वर्चस्व करू देण्यास हवे. भावनांना आचरणावर नियंत्रण करू दिल्यामुळे कितीतरी जण अनैतिकतेत वाहवत गेले आहेत! याचा अर्थ आपण भावनांना दडपून टाकावे असा नव्हे; अन्यथा, आपण यहोवाच्या सेवेतील आनंद कसा व्यक्‍त करू शकू? तथापि, आपल्याला देहाच्या कर्मांऐवजी आत्म्याची फळे उत्पन्‍न करावयाची असल्यास, आपण आपल्या मनाचे नविनीकरण करून ख्रिस्ताच्या ठायी असलेली चित्तवृत्ती धारण केली पाहिजे.—गलतीकर ५:२२, २३; फिलिप्पैकर २:५.

पवित्र जीवन, पवित्र मोल

५. पेत्र हा पावित्र्याच्या गरजेसंबंधाने जागरुक का होता?

५ पेत्र ख्रिश्‍चन पावित्र्यासंबंधाने इतका जागरुक का होता? कारण आज्ञाधारक मानवजातीला सोडविण्यास किती पवित्र असे मोल देण्यात आले हे त्याला ठाऊक होते. त्याने लिहिले: “कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान्‌ रक्‍ताने ‘तुम्ही मुक्‍त झाला आहा.’” (१ पेत्र १:१८, १९) होय, लोकांना देवासोबत चांगला नातेसंबंध राखता यावा म्हणून पावित्र्याच्या उगमाने अर्थात यहोवा देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजेच ‘पवित्र पुरुषाला’ या पृथ्वीवर खंडणी अर्पण करण्यास पाठवले.—योहान ३:१६; ६:६९; निर्गम २८:३६; मत्तय २०:२८.

६. (अ) पवित्र आचरणाचा पाठलाग करणे आपल्यासाठी सोपे का नाही? (ब) आपले आचरण पवित्र राखण्यासाठी आपल्याला कशाची मदत मिळू शकते?

६ तथापि, सैतानाच्या भ्रष्ट जगात राहत असताना पवित्र जीवन व्यतीत करणे इतके सोपे नाही, याची जाणीव आपल्याला असण्यास हवी. त्याच्या व्यवस्थिकरणात कसेबसे जगण्याचा प्रयत्न करीत असलेल्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांना तो पाशात अडकविण्यास पाहतो. (इफिसकर ६:१२; १ तीमथ्य ६:९, १०) प्रापंचिक कार्य, कौटुंबिक विरोध, शाळेतील थट्टा तसेच समवयस्कांचा दबाव या सर्वांमुळे निर्माण होणारे तणाव लक्षात घेता, एखाद्या व्यक्‍तीला स्वतःचे पावित्र्य कायम राखावयाचे असल्यास त्यासाठी दृढ आध्यात्मिकता ही अत्यावश्‍यक बनते. याअर्थी, आपल्या व्यक्‍तिगत अभ्यासाच्या व ख्रिस्ती सभांमध्ये आपल्या नियमित उपस्थितीच्या अत्यावश्‍यक भूमिकेवर आणखी जोर देण्यात येतो. पौलाने तीमथ्यास सल्ला दिला: “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीती ह्‍यामध्ये दृढपणे राख.” (२ तीमथ्य १:१३) आपल्याला ही सुवचने, आपल्या राज्य सभागृहात व बायबलच्या आपल्या खासगी अभ्यासातही ऐकावयास मिळतात. आपण दररोज, अनेक वेगवेगळ्या प्रसंगांत आपल्या आचरणात पवित्र असावे याकरता ही सुवचने सहायक ठरू शकतात.

कुटुंबात पवित्र आचरण

७. पावित्र्याचा आपल्या कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम होण्यास हवा?

७ पेत्राने, लेवीय ११:४४ उद्धृत केले तेव्हा त्याने हॅगिऑस हा ग्रीक शब्द वापरला ज्यातून “पापापासून अलिप्त व यामुळे देवाला वाहिलेले म्हणजेच शुद्ध” असा बोध होतो. (डब्ल्यू. ई. व्हाईन यांचा नव्या करारातील शब्दांचे विवेचन मांडणारा शब्दकोष, इंग्रजी) याचा आपल्या ख्रिश्‍चन कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम होण्यास हवा? निश्‍चितच याचा असा अर्थ होतो की आपले कौटुंबिक जीवन प्रीतीवर आधारलेले असावे, कारण “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) आत्मत्यागी प्रेम हे, विवाह सोबत्यांमधील तसेच पालक व मुलांमधील नातेसंबंधांना सुरळीत ठेवण्यासाठी जणू वंगणाची भूमिका पार पाडते.—१ करिंथकर १३:४-८; इफिसकर ५:२८, २९, ३३; ६:४; कलस्सैकर ३:१८, २१.

८, ९. (अ) ख्रिस्ती कुटुंबात काही प्रसंगी कशी परिस्थिती उद्‌भवते? (ब) याबाबतीत बायबल कोणता सुज्ञ सल्ला देते?

८ ख्रिश्‍चन कुटुंबात अशा प्रकारची प्रीती आपोआपच व्यक्‍त होत राहील असे कदाचित आपल्याला वाटू शकेल. तथापि, काही ख्रिश्‍चन घरांमध्ये प्रीतीचे, असावयास हवे तितके नियंत्रण नसते हे कबूल करावेच लागते. राज्य सभागृहात कदाचित ही प्रीती व्यक्‍त होत असल्याचे भासू शकेल, पण घरगुती वातावरणात आपले पावित्र्य किती सहजपणे अवनत होऊ शकते. येथे मात्र आपली पत्नी अजूनही आपली ख्रिश्‍चन भगिनी आहे किंवा राज्य सभागृहात आपण ज्यास आदर देत होतो तो पती अद्यापही आपला तोच बांधव (कदाचित एक सेवा सेवक किंवा वडील) आहे, याचे आपल्याला अचानक विस्मरण होऊ शकते. जीव मेटाकुटीस येऊ शकतात व वितंडवाद उत्पन्‍न होण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर आपले जीवन नकळत दुटप्पी बनू शकते. असे झाल्यास, पती व पत्नी यांचा ख्रिस्तासमान नातेसंबंध संपून त्याऐवजी फक्‍त एकमेकांच्या विरोधात असलेले एक पुरुष व एक स्त्री हे उरतात. घरात पवित्र वातावरण असावयास हवे हे ते विसरून जातात. कदाचित त्यांचे बोलणे देखील जगातील लोकांच्या भाषेसारखे होऊ लागते; आणि मग एखादा दुखावणारा अविचारी टोमणा किती सहजपणे तोंडातून बाहेर पडू शकतो!—नीतिसूत्रे १२:१८; पडताळा प्रेषितांची कृत्ये १५:३७-३९.

९ तथापि, पौल सल्ला देतो: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण [ग्रीक, लोगोस सॅप्रॉस, “अशुद्ध भाषण,” त्याअर्थी अपवित्र] न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.” हे घरातील सर्व ऐकणाऱ्‍यांसाठी खरे आहे, अर्थात त्यात मुलेही आलीच.—इफिसकर ४:२९; याकोब ३:८-१०.

१०. पावित्र्याविषयीचा सल्ला मुलांना कशाप्रकारे लागू होतो?

१० पावित्र्याविषयीचे हे मार्गदर्शन ख्रिश्‍चन कुटुंबातील मुलांना देखील तितकेच लागू होते. त्यांचे, शाळेतून घरी आल्यावर आपल्या जगिक समवयस्कांच्या बंडखोर व अनादरयुक्‍त भाषाशैलीची नक्कल करू लागणे हे किती सहजपणे शक्य आहे! मुलांनो, यहोवाच्या संदेष्ट्याचा अपमान करणाऱ्‍या उद्धट मुलांसारखीच उर्मट व निंदक मुले आजही आढळतात; अशा मुलांच्या प्रवृत्तींकडे वाहवत जाऊ नका. (२ राजे २:२३, २४) तुमची भाषा ही, शालीन शब्द वापरण्याची पर्वा न करणाऱ्‍या अविचारी लोकांच्या असभ्य बाजारी भाषेने विटाळविली जाता कामा नये. ख्रिश्‍चन या नात्याने आपले भाषण हे पवित्र, इष्ट, उभारणीकारक, कृपायुक्‍त व “मिठाने रूचकर केल्यासारखे” असावे. यामुळे आपण इतर लोकांत वेगळे म्हणून उठून दिसावयास हवे.—कलस्सैकर ३:८-१०; ४:६.

कुटुंबातील सत्य न मानणाऱ्‍या सदस्यांच्या संबंधाने पावित्र्य

११. पवित्र असण्याचा अर्थ फाजील धार्मिक असणे असा का होत नाही?

११ आपण पावित्र्यास व्यवहारात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयास करतो तरीसुद्धा, वरचढ व फाजील धार्मिक असल्याचे भासवू नये; विशेषतः, सत्य न मानणाऱ्‍या कौटुंबिक सदस्यांशी व्यवहार करताना आपण असे करण्याचे टाळले पाहिजे. आपल्या ख्रिश्‍चन आचरणाने त्यांना कमीतकमी हे ओळखण्यास मदत करावी की आपण एका सकारात्मक तऱ्‍हेने वेगळे आहोत, व आपण येशूच्या दाखल्यातील चांगल्या शोमरोन्याप्रमाणेच प्रीती व दया कशाप्रकारे व्यक्‍त करावी हे जाणून आहोत.—लूक १०:३०-३७.

१२. ख्रिस्ती विवाह जोडीदार आपल्या सोबत्याच्या नजरेत सत्य आणखी आकर्षक कसे बनवू शकतात?

१२ पेत्राने ख्रिश्‍चन पत्नींना पुढील उपदेश लिहिला तेव्हा, सत्य न मानणाऱ्‍या आपल्या कौटुंबिक सदस्यांबद्दल उचित मनोवृत्ती राखण्याच्या महत्त्वावर जोर देत तो म्हणाला, “तसेच, स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” ख्रिश्‍चन पत्नीने (किंवा याबाबतीत ख्रिश्‍चन पतीने देखील), आपल्या आचरणास निर्मल, संवेदनाशील व आदरयुक्‍त राखले तर यामुळे सत्य न मानणाऱ्‍या जोडीदाराच्या नजरेत, सत्य अधिक आकर्षक बनेल. याचा अर्थ असा होतो की, सत्य न मानणाऱ्‍या विवाह सोबत्याला अनादरयुक्‍त किंवा बेपर्वाईची वागणूक मिळू नये यासाठी ईश्‍वरशासित कार्यहालचालींच्या आराखड्यात लवचिकता असावी.a—१ पेत्र ३:१, २.

१३. काहीवेळा, वडील व सेवा सेवक हे, सत्य न मानणाऱ्‍या पतींच्या मनात सत्याबद्दल कशाप्रकारे आवड निर्माण करू शकतात?

१३ काहीवेळा वडील व सेवा सेवक सत्य न मानणाऱ्‍या पतीसोबत मैत्रिपूर्ण परिचय करून घेण्याद्वारे मदत करू शकतात. असे केल्याने, साक्षीदार हे चार चौघांसारखेच असून, बायबलशिवाय इतर अनेक निरनिराळ्या विषयांबद्दल रसिकता बाळगणारे सभ्य लोक आहेत हे त्यास कळून येईल. उदाहरणार्थ, एका वडिलाने एका पतीच्या मासेमारीच्या छंदाविषयी कुतूहल व्यक्‍त केले. पाहता पाहता, त्यांची मैत्री झाली. कालांतराने तो पती एक बाप्तिस्मा घेतलेला बांधव झाला. दुसऱ्‍या एका उदाहरणात, सत्य न मानणारा पती गाणाऱ्‍या पक्षांचा छांदिष्ट होता. वडील खचून गेले नाहीत. एका वडिलाने या पक्षांबद्दल अभ्यास केला जेणेकरून पुढच्या वेळेस या सज्जनाशी गाठ पडली तेव्हा त्याच्या आवडत्या विषयावर संभाषण सुरू करणे त्यांना सहज शक्य झाले! यास्तव, पवित्र होण्याचा अर्थ आपण हेकेखोर अथवा एककली असावे असा होत नाही.—१ करिंथकर ९:२०-२३.

आपण मंडळीत कशाप्रकारे पवित्र असू शकतो?

१४. (अ) मंडळीस कमजोर करण्यासाठी सैतानाद्वारे वापरण्यात येणाऱ्‍या माध्यमांपैकी एक माध्यम कोणते आहे? (ब) आपण सैतानाच्या पाशाचा कशाप्रकारे प्रतिकार करू शकतो?

१४ दियाबल सैतान हा एक निंदक आहे, कारण दियाबल यासाठी वापरण्यात आलेल्या डायाबोलोस या ग्रीक शब्दाचा अर्थ “दोष लावणारा” किंवा “निंदक” असा होतो. निंदा ही त्याच्या विशेष कौशल्यांपैकी एक आहे व तो तिचा उपयोग मंडळीत करू पाहतो. हे साध्य करण्यासाठी चहाडी हे त्याचे आवडते माध्यम आहे. आपण या अपवित्र आचरणात सहभागी होण्यासाठी त्याच्याद्वारे स्वतःची फसगत होऊ देतो का? हे कशाप्रकारे होऊ शकते? चहाडी करण्याची सुरवात करण्याद्वारे, तिचा पुनरुच्चार करण्याद्वारे किंवा ती ऐकून घेण्याद्वारे हे होऊ शकेल. सुज्ञ नीतिसूत्र म्हणते: “कुटिल मनुष्य वैमनस्य पसरितो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्‍यांत फूट पाडितो.” (नीतिसूत्रे १६:२८) चहाडी व निंदा यांवर कोणता उपाय आहे? आपले भाषण नेहमी उत्प्रेरक आणि प्रीतीवर आधारित आहे याची आपण खात्री करावी. आपण आपल्या बांधवांच्या व्यक्‍तिमत्त्वातील कल्पित अवगुणांऐवजी त्यांचे सद्‌गुण पाहण्याचा प्रयत्न केल्यास आपले संभाषण सर्व प्रसंगी हर्षविणारे व आध्यात्मिक असेल. टीका करणे फार सोपे आहे हे लक्षात असू द्या. शिवाय, जो तुमच्याजवळ इतरांविषयी चहाडी करतो तो इतरांजवळ तुमच्याविषयी देखील चहाडी करू शकेल!—१ तीमथ्य ५:१३; तीत २:३.

१५. मंडळीतील सर्वांना पवित्र राखण्यास कोणते ख्रिस्तासमान गुण मदत करतील?

१५ मंडळी पवित्र राहावी याकरता, आपल्या सर्वांच्याठायी ख्रिस्ताचे मन असावे हे अगत्याचे आहे व प्रीती हा त्याचा आद्य गुणविशेष आहे हे आपल्याला माहीत आहे. याच धर्तीवर पौलाने कलस्सैकरांस ख्रिस्तासारखे करुणामय बनण्याविषयी उपदेश दिला: “तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करूणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा . . . , आपसात क्षमा करा; . . . पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” मग तो पुढे म्हणाला, “ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.” ही क्षमाशील मनोवृत्ती जोपासल्याने, आपण निश्‍चितच मंडळीचे पावित्र्य व ऐक्य कायम राखू शकतो.—कलस्सैकर ३:१२-१५.

आपल्या शेजारपाजारात आपले पावित्र्यप्रदर्शित होते का?

१६. आपली पवित्र उपासना आनंदी उपासना का असण्यास हवी?

१६ आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल काय? त्यांचे आपल्याबद्दलचे मत कसे आहे? आपण सत्याचा हर्ष प्रतिबिंबित करतो का, की त्याउलट ते एक ओझे आहे असे भासवितो? आपण यहोवाप्रमाणेच पवित्र असलो तर ते आपल्या भाषणातून व आपल्या आचरणातून दिसून येण्यास हवे. आपली पवित्र उपासना, आनंददायक उपासना आहे हे स्पष्ट होण्यास हवे. असे का बरे? कारण आपला देव यहोवा हा एक आनंदी देव आहे व त्याच्या उपासकांनीही आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. याच कारणाने, स्तोत्रकर्ता यहोवाच्या प्राचीन काळातील लोकांबद्दल म्हणू शकला: “ज्या लोकांचा देव परमेश्‍वर आहे ते धन्य!” आपण ही धन्यता अर्थात आनंद प्रतिबिंबित करतो का? आपली मुले देखील, राज्य सभागृहात व संमेलनांमध्ये यहोवाच्या लोकांच्या सहवासात असण्याबद्दल समाधान व्यक्‍त करतात का?—स्तोत्र ८९:१५, १६; १४४:१५ब.

१७. संतुलित पावित्र्य प्रदर्शित करण्यासाठी व्यवहार्य मार्गाने आपण काय करू शकतो?

१७ सहकार्याची मनोवृत्ती दाखवण्याद्वारे व शेजारधर्म पाळण्याद्वारे देखील आपण आपले संतुलित पावित्र्य प्रदर्शित करू शकतो. काही प्रसंगी, कदाचित सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी किंवा काही देशांमध्ये केले जाते त्याप्रमाणे, रस्ते व महामार्गांची सुधारणा करण्यासाठी, शेजाऱ्‍यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्‍यक असते. या अनुषंगाने, आपण आपली बाग, आपले अंगण किंवा इतर मालमत्तेची ज्याप्रकारे काळजी घेतो, यातूनही आपले पावित्र्य प्रदर्शित होऊ शकते. आपण केरकचरा जशाचा तसाच पडू दिला किंवा आपले अंगण घाणेरडे व अव्यवस्थित असून त्यात सर्वांना दिसतील अशी जुनीपुराणी मोडकी-तोडकी वाहने पडली असतील, तर आपण आपल्या शेजाऱ्‍यांचा आदर करत आहोत असे म्हणू शकू का?—प्रकटीकरण ११:१८.

कार्यस्थळी व शाळेत पावित्र्य

१८. (अ) आजच्या जगात ख्रिश्‍चन कशाप्रकारच्या कोंडीत सापडतात? (ब) आपण कशाप्रकारे जगापासून वेगळे असू शकतो?

१८ करिंथ या अपवित्र शहरातील ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हास लिहिले होते; तथापि ह्‍या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्तहरण करणारे व मूर्तिपूजक ह्‍यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हास जगातून निघून जावे लागेल.” (१ करिंथकर ५:९, १०) ज्या ख्रिश्‍चनांना, दररोज अनैतिक किंवा नैतिकतेविषयी बेपर्वा असलेल्या लोकांमध्ये वावरणे भाग पडते ते अशा कोंडीत सापडतात. लैंगिक विनयभंग, भ्रष्टाचार व अप्रामाणिकता यांस प्रोत्साहन देणाऱ्‍या किंवा यांकडे डोळेझाक करणाऱ्‍या संस्कृतींमध्ये तर विशेषतः, ही एक जटिल सत्वपरिक्षा आहे. अशा परिस्थितींत, आपल्या सभोवताली वावरणाऱ्‍या लोकांमध्ये, “चारचौघांसारखे” दिसण्याकरता आपले आदर्श खालच्या पातळीवर घसरता कामा नये. उलटपक्षी, आपल्या सहानुभूतीशील पण इतरांपेक्षा वेगळ्या अशा ख्रिस्ती आचरणामुळे विचारशील लोकांच्या, अर्थात स्वतःच्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरुक असणाऱ्‍या व सर्वसामान्यापेक्षा अधिक चांगल्याची अपेक्षा करत असणाऱ्‍या लोकांच्या नजरेत आपण उठून दिसण्यास हवे.—मत्तय ५:३; १ पेत्र ३:१६, १७.

१९. (अ) मुलांनो, तुम्हाला शाळेत कोणकोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागते? (ब) आपल्या मुलांना व त्यांच्या पवित्र आचरणाला आधार देण्यासाठी पालक काय करू शकतात?

१९ शाळेत जाणाऱ्‍या आपल्या मुलांसमोरही अशाचप्रकारच्या अनेक परिक्षा आहेत. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेला भेट देत असता का? तेथे कशाप्रकारचे वातावरण आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? शिक्षकांसोबत तुमचे चांगले संबंध आहेत का? हे प्रश्‍न महत्त्वपूर्ण का आहेत? कारण जगातील अनेक शहरी क्षेत्रात, शाळा या हिंसा, मादक पदार्थ व लैंगिकता यांचे माहेरघर बनल्या आहेत. पालकांचा सहानुभूतीशील आधार न मिळाल्यास तुमची मुले आपली सचोटी व आपल्या आचरणास पवित्र कसे राखू शकतील? यास्तव, पौलाने पालकांना अगदी योग्य सल्ला दिला: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” (कलस्सैकर ३:२१) मुलांना चिरडीस आणण्याचा एक प्रकार म्हणजे, त्यांच्या दैनंदिन समस्या व त्यांच्यावर ओढवणाऱ्‍या परीक्षा यांना समजून न घेणे. शाळेतील मोहांना तोंड देण्याची तयारी, घरातील आध्यात्मिक वातावरणातून सुरू होते.—अनुवाद ६:६-९; नीतिसूत्रे २२:६.

२०. पावित्र्य हे आपल्या सर्वांसाठी अनिवार्य का आहे?

२० शेवटी, पावित्र्य हे आपल्या सर्वांसाठी अनिवार्य का आहे? कारण ते सैतानी जगाच्या व विचारसरणीच्या आक्रमणापासून संरक्षण ठरते. ते, आजही एक आशीर्वाद आहे व भविष्यातही राहील. ते आपल्याला अशा जीवनाची हमी देते जे धार्मिकतेच्या नवीन जगात यथार्थ जीवन असेल. ते आपल्याला हेकड धर्मवेडे नव्हे तर संतुलित, मैत्रिपूर्ण, मनमिळावू ख्रिश्‍चन असण्यास मदत करते. थोडक्यात, ते आपल्याला ख्रिस्तासमान होण्यास मदत करते.—१ तीमथ्य ६:१९.

[तळटीपा]

a सत्य न मानणाऱ्‍या विवाह जोडीदारांसोबत व्यवहारचातुर्याने वागण्यासंबंधी आणखीन माहितीसाठी टेहळणी बुरुज (इंग्रजी) च्या ऑगस्ट १५, १९९० अंकातील, “तुमच्या विवाह जोडीदारास बेपर्वाईने वागवू नका!” पृष्ठे २०-२ व नोव्हेंबर १, १९८८ अंकातील, पृष्ठे २४-५, परिच्छेद २०-२ पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ पेत्राला, पावित्र्यासंबंधी ख्रिश्‍चनांना उपदेश देण्याची गरज का भासली?

◻ पवित्र जीवन जगणे सोपे का नाही?

◻ कुटुंबातील पावित्र्य वाढीस लावण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो?

◻ मंडळी पवित्र राहावी याकरता आपण कोणते अपवित्र आचरण टाळावे?

◻ आपण कार्यस्थळी व शाळेत कशाप्रकारे पवित्र राहू शकतो?

[१६, १७ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण देवाची सेवा करताना व इतर कार्ये करताना आनंदी असण्यास हवे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा