वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१५ पृ. ३०
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • “आपल्या उपस्थितीचे चिन्ह काय?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “ह्‍या गोष्टी केव्हा होतील ते आम्हास सांगा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • भूकंप, बायबल भविष्यवाणी आणि तुम्ही
    सावध राहा!—२००२
  • चिन्ह केवळ गतकालीन इतिहास नव्हे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१५ पृ. ३०

वाचकांचे प्रश्‍न

माझ्या माहितीप्रमाणे “टोटे” (तेव्हा) हा ग्रीक शब्द, पुढे काय होणार याचा परिचय करून देण्यासाठी उपयोगात आणतात. असे असताना, मत्तय २४:९ या वचनात, “तेव्हा [“टोटे”] तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील,” असे म्हटलेले आहे व दुसरीकडे पाहता लूक २१:१२ येथील समान वृत्तान्तात, “परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील,” असे म्हटलेले आहे. हा विरोधाभास का आहे?

पुढे काय होणार अर्थातच क्रमानुसार पुढच्या घटनेचा परिचय करून देण्यासाठी टोटे या शब्दाचा उपयोग करता येतो हे बरोबर आहे. तथापि, बायबलमध्ये या शब्दाचा केवळ याच अर्थाने उपयोग करण्यात आला आहे असे समजण्यात येऊ नये.

बौअर, आँट व गिंग्रिच यांचा नवा करार व इतर प्रारंभिक ख्रिस्ती वाङ्‌मयाचा ग्रीक-इंग्रजी शब्दकोष (इंग्रजी) स्पष्ट करतो की टोटे या शब्दाचे शास्त्रवचनांत दोन मूलभूत अर्थबोध आहेत.

एक म्हणजे “त्या समयी.“ यातून “भूतकाळातील तेव्हा चा” बोध होऊ शकतो. यासाठी दिलेले उदाहरण आहे मत्तय २:१७ जे म्हणते: “यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी [तेव्हा] पूर्ण झाले.” हे क्रमानुसार घडणाऱ्‍या घटनेस सूचित करीत नसून भूतकाळातील एका विशिष्ट वेळेला अर्थात त्या समयास सूचित करते. या व्यतिरिक्‍त, टोटे हा शब्द “भविष्यातील तेव्हा यासाठी” देखील उपयोगात आणता येऊ शकतो. याचे एक उदाहरण १ करिंथकर १३:१२ येथे आढळते: “कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर [तेव्हा], मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन.” (तिरपे वळण आमचे.) याठिकाणी पौलाने टोटे या शब्दाचा, ‘भविष्यातील त्या वेळेच्या’ अर्थबोधाने उपयोग केला आहे.

या शब्दकोषाप्रमाणे, टोटे या शब्दाचा आणखीन एका प्रकारे, म्हणजे, “कालांतराने घडणाऱ्‍या घटनांचा परिचय करून देण्यासाठी” उपयोग केला जातो. येशूच्या उपस्थितीबद्दलa प्रेषितांच्या प्रश्‍नाला त्याने दिलेल्या उत्तराच्या तीन वृत्तान्तांतून सदर शब्दकोष, अनेक उदाहरण देतो. “कालांतराने घडणाऱ्‍या घटनांचा परिचय करून देण्यासाठी” टोटे या शब्दाच्या उपयोगाची उदाहरणे म्हणून या शब्दकोषाने मत्तय २४:१०, १४, १६, ३०; मार्क १३:१४, २१; व लूक २१:२०, २७ या वचनांचा उल्लेख केला. संदर्भ विचारात घेतल्यास असे स्पष्ट होते की, कालांतराने घडणारे काहीतरी, ही समज उचित आहे. हे भविष्यातील घटनांच्या विकासाबद्दल सांगणाऱ्‍या येशूच्या भविष्यवादाची समज प्राप्त करण्यासही मदत करते.

तथापि, या वृत्तान्तांत जेथे कोठे टोटे हा शब्द आढळतो त्या प्रत्येक ठिकाणी कालांतराने घडणाऱ्‍या घटनेचा परिचय दिला जात असावा, असा निष्कर्ष आपण काढू नये. उदाहरणार्थ, मत्तय २४:७, ८ येथे आपण वाचतो की, राष्ट्रावर राष्ट्र उठेल व दुष्काळ व भूमिकंप होतील असे येशूने भाकीत केले. पुढे ९ व्या वचनात म्हटले आहे: “तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” यास्तव, छळ सुरू होण्याच्या आतच पूर्वभाकीत युद्धे, दुष्काळ व भूमिकंप हे सर्व घडतील व कदाचित घडण्याचे थांबतील असे समजणे योग्य ठरेल का?

असे समजणे तर्कशुद्ध नाही. शिवाय, या भाकिताच्या पहिल्या शतकातील पूर्णतेविषयी आपल्याला असलेली माहिती देखील यास पुष्टी देत नाही. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील अहवाल दाखवतो की, नवनिर्मित ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांनी, प्रचार सुरू केल्यावर लगेच कडव्या विरोधास तोंड दिले. (प्रेषितांची कृत्ये ४:५-२१; ५:१७-४०) येशूने सांगितलेली युद्धे, दुष्काळ व भूमिकंप, हे त्या प्रारंभिक छळापूर्वीच घडून गेले असे आपण निश्‍चितच म्हणू शकत नाही. उलटपक्षी, हा छळ पूर्वभाकीत केलेल्या इतर अनेक घटनांच्या “पूर्वी“ झाला; लूकने या घटनांचे वर्णन केल्याप्रमाणे: “परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील.” (लूक २१:१२) यावरून असे सूचित होईल की, मत्तय २४:९ येथे उपयोगात आणलेला टोटे हा शब्द, प्रामुख्याने “त्या समयी” या अर्थबोधाने उपयोगात आणलेला आहे. युद्धे, दुष्काळ व भूमिकंप घडत होते त्या दरम्यान किंवा त्या समयी येशूच्या अनुयायांवर छळ येणार होता.

[तळटीपा]

a मत्तय, मार्क व लूक यांतील हे समान वृत्तान्त फेब्रुवारी १, १९९४ च्या टेहळणीबुरूज अंकात २४ व २५ या पृष्ठांवर रकान्यांमध्ये रचलेले होते. टोटे हा शब्द जेथे जेथे “तेव्हा” या अर्थी उपयोगात आणण्यात आला होता तेथे तेथे ठळक अक्षरांत हा दाखवण्यात आला होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा