वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ६/१५ पृ. ३
  • देवावर प्रीती करणे खरोखर शक्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवावर प्रीती करणे खरोखर शक्य आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खऱ्‍या देवाबरोबर चालणे
  • “एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • देवावर प्रीती करणे याचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ६/१५ पृ. ३

देवावर प्रीती करणे खरोखर शक्य आहे का?

देव म्हणतो, “माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्गम ३३:२०) शिवाय, बायबल काळापासून मानवांपैकी कोणीही त्याच्यासोबत प्रत्यक्ष संपर्क साधल्याचा कोणताच पुरावा आढळलेला नाही. आपण ज्याला कधीच प्रत्यक्षात पाहिलेले नाही किंवा ज्याचे बोलणे ऐकलेले नाही, अशा व्यक्‍तीबद्दल निःसीम प्रेम विकसित करणे कठीण—नव्हे, असंभव देखील असल्याचे भासते, नाही का? विश्‍वाच्या निर्मात्यासोबत प्रेमळ नातेसंबंध असणे खरोखर शक्य आहे का?

देवासोबत जिव्हाळ्याचे व्यक्‍तिगत संबंध वाढविणे शक्य आहे याबाबत कोणतीही शंका असू नये. अनुवाद ६:५, या वचनात आपण वाचतो की इस्राएल राष्ट्रास पुढील आज्ञा देण्यात आली होती: “तू आपला देव परमेश्‍वर, ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ही आज्ञा निग्रहाने पुन्हा सांगितली व “हीच मोठी व पहिली आज्ञा आहे” असेही तो पुढे म्हणाला. (मत्तय २२:३७, ३८) अशा प्रकारचा नातेसंबंध जर असाध्य असता तर बायबलने आम्हाला देवावर प्रीती करण्याचे प्रोत्साहन दिले असते का?

तथापि, केवळ यहोवाची आज्ञा आहे म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करावी, अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो का? नाही. देवाने प्रथम मानवी जोडप्यास त्याच्यावर प्रेम करण्याच्या क्षमतेसह निर्माण केले. आदाम व हव्वा यांवर, त्यांच्या निर्मात्यासोबत प्रेमाचा नातेसंबंध बळजबरीने लादण्यात आलेला नव्हता. उलटपक्षी त्यांना, देवाविषयी अगाध प्रेम विकसित करण्यासाठी उपयुक्‍त अशा परिस्थितींत देवाने ठेवले. देवाच्या समीप यावे अथवा त्याच्यापासून दूर जावे, या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे हे त्यांच्या हाती होते.

आदाम व हव्वा यांनी विद्रोहाचा मार्ग निवडला. (उत्पत्ति २:१६, १७; ३:६, ७) तथापि, त्यांच्या वंशजांमध्ये निर्मात्याशी प्रेमाचा नातेसंबंध विकसित करण्याची कुवत असणार होती.

खऱ्‍या देवाबरोबर चालणे

उदाहरणार्थ, बायबलमध्ये अब्राहामाला देवाचा “मित्र” म्हटले आहे. (याकोब २:२३) तथापि अब्राहाम, देवासोबतचा घनिष्ट नातेसंबंध लाभलेला एकटा पुरुष खचितच नव्हता. यहोवाबद्दल निष्कपट प्रेम दाखवलेल्या व ‘खऱ्‍या देवाबरोबर चाललेल्या’ इतर अनेक अपरिपूर्ण मानवांबद्दल बायबल सांगते.—उत्पत्ति ५:२४; ६:९; ईयोब २९:४; स्तोत्र २५:१४; नीतिसूत्रे ३:३२.

प्राचीन काळातील देवाचे सेवक, देवाबद्दल असलेली प्रीती व जिव्हाळा या गुणांसह जन्मास आलेले नव्हते. त्यांना ते विकसित करावे लागले. कसे? यहोवा, या देवाच्या वैयक्‍तिक नावाने त्यास ओळखण्याद्वारे. (निर्गम ३:१३-१५; ६:२, ३) त्याचे अस्तित्व व देवत्व यांविषयी जाणीव राखण्याद्वारे. (इब्री लोकांस ११:६) त्याच्या प्रेमळ कृत्यांविषयी वारंवार मनन करण्याद्वारे. (स्तोत्र ६३:६) प्रार्थनेत देवाजवळ आपल्या मनाच्या गाभाऱ्‍यातील विचार व्यक्‍त करण्याद्वारे. (स्तोत्र ३९:१२) त्याच्या चांगुलपणाविषयी शिकून घेण्याद्वारे. (जखऱ्‍या ९:१७) त्याचे मन दुखावण्याबद्दल एक हितावह भय विकसित करण्याद्वारे.—नीतिसूत्रे १६:६.

तुम्ही देवाचे मित्र होऊन त्याच्याबरोबर चालू शकता का? तुम्ही देवाला पाहू शकत नाही व त्याचा आवाजही ऐकू शकत नाही हे खरे आहे. असे असताना देखील, यहोवा आपल्या ‘मंडपात वस्ती’ करण्यास, आपला मित्र होण्यास तुम्हाला आमंत्रण देतो. (स्तोत्र १५:१-५) या कारणास्तव, देवावर प्रीती करणे तुम्हाला शक्य आहे. तथापि, तुम्ही त्याच्यासोबत एक घनिष्ट व जिव्हाळ्याचा नातेसंबंध कशाप्रकारे विकसित करू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा