वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ६/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे राज्य काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • ‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • देवाचे राज्य आधिपत्य गाजवते
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ६/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

आपण काही वेळा बांधवांना, देवाचे राज्य पृथ्वीवर यावे याविषयी बोलत असल्याचे किंवा त्याकरिता प्रार्थना करत असल्याचे ऐकतो. परंतु, असा वाक्‌प्रचार वापरणे योग्य आहे का?

शब्दशः बोलायचे झाल्यास, गोष्टी व्यक्‍त करण्याची ही शास्त्रवचनीय पद्धत नाही. देवाचे राज्य स्वर्गीय आहे. म्हणूनच प्रेषित पौल असे लिहू शकला: “प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्‍त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.”—२ तीमथ्य ४:१८; मत्तय १३:४४; १ करिंथकर १५:५०.

त्या राज्याची स्थापना १९१४ मध्ये स्वर्गात झाली आणि पृथ्वीवरील पुनःस्थापित परादीसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याचे कदापिही स्थानांतर होणार नाही. येशू ख्रिस्त त्या राज्याचा राजा आहे. राजा या नात्याने, येशूला देवदूतांवर अधिकार आहे. यास्तव, प्रभुत्वाचे त्याचे योग्य स्थान स्वर्गात देवाच्या उजवीकडे आहे. अभिषिक्‍त ख्रिस्ती, राजे व याजक या नात्याने स्वर्गात त्याच्याबरोबर सामील होतात.—इफिसकर १:१९-२१; प्रकटीकरण ५:९, १०; २०:६.

तर मग, प्रभूच्या प्रार्थनेतील त्या भागात आढळणाऱ्‍या विनंत्या जेथे म्हटले आहे: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” आपण आता देवाला व्यक्‍त करू नये असा याचा अर्थ होतो का? (मत्तय ६:१०) उलटपक्षी, ती प्रार्थना योग्य व अद्यापही अर्थभरीत आहे.

देवाचे राज्य भावी काळात या पृथ्वीसंबंधी निर्णायकपणे कार्य करील आणि हीच बाब आपण प्रार्थना करत असता किंवा प्रभूच्या प्रार्थनेत आढळणाऱ्‍या शब्दांसारखेच शब्द वापरत असता आपल्या ध्यानात असते. उदाहरणार्थ, दानिएल २:४४ असे भाकीत करते, की ते राज्य सर्व राष्ट्रांचा विध्वंस करण्यासाठी ‘येईल’ व या पृथ्वीचे प्रभुत्व हाती घेईल. प्रकटीकरण २१:२, स्वर्गातून उतरणाऱ्‍या नवीन यरुशलेमाबाबत बोलणी करते. नवीन यरुशलेम ही १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी बनलेली आहे जे ख्रिस्ताची वधू होतील. राज्यात ते येशूबरोबर सहवारसदेखील आहेत. म्हणूनच, ते आपले लक्ष पृथ्वीकडे देत असल्यामुळे विश्‍वासू मानवजातीला महान आशीर्वाद लाभल्याचे वर्णन प्रकटीकरण २१:२ करते.—प्रकटीकरण २१:३, ४.

जोपर्यंत हे आणि इतर भविष्यवाद पूर्ण होत नाहीत तोपर्यंत “तुझे राज्य येवो,” ह्‍या येशूच्या शब्दांनुरूप यहोवा देवाला प्रार्थना करत राहणे योग्यच असेल. परंतु, ते राज्य खरोखर पृथ्वी ग्रहावर येणार नाही ही बाब मात्र आपण लक्षात ठेवावी. राजकीय सरकार पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गात स्थायिक आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा