वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१ पृ. ३-४
  • देव, सरकार व तुम्ही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव, सरकार व तुम्ही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • प्रारंभिक ख्रिस्ती विश्‍वास व सरकार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • देव आणि कैसर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एकच ‘खरे चर्च’ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१ पृ. ३-४

देव, सरकार व तुम्ही

“आयर्लंडमध्ये घटस्फोट या विषयाच्या सार्वमतात चर्च व सरकार यांचा आमनासामना.”

द न्यूयॉर्क टाइम्स मधील हा ठळक मथळा, सरकारला जे हवे आहे व लोकांना चर्चमध्ये जे शिकवण्यात येते या दोहोंतील कोणतेही एक निवडावे लागण्याची वेळ त्यांच्यावर कशाप्रकारे येऊ शकते, हे स्पष्ट करतो.

या लेखात म्हटले होते: “घटस्फोटावरील घटनात्मक प्रतिबंध रद्द करावा किंवा नाही या मुद्यावर होणाऱ्‍या सार्वमतास महिन्याहून कमी वेळ राहिला असताना, प्रामुख्यत्वे रोमन कॅथलिक असलेल्या आयर्लंडमधील शासनाच्या व चर्चच्या पुढाऱ्‍यांत असामान्य दुमत पाहायला मिळत आहे.” सरकारने घटस्फोटावरील प्रतिबंध रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला तर दुसरीकडे कॅथलिक चर्चचा घटस्फोट व पुनर्विवाहास कडवा विरोध आहे. आयरिश कॅथलिकांवर चर्च किंवा सरकार या दोघांतील एकाची निवड करण्याची पाळी आली. घडले असे, की किंचित फरकाने सरकार जिंकले.

याहून अधिक नाट्यमयरित्या, उत्तर आयर्लंडमध्ये लोक अनेक वर्षे राष्ट्रीय सार्वभौमत्वाविषयी एका कटू मतभेदास तोंड देऊन आहेत. अनेकांचे जीव गेले आहेत. उत्तर आयर्लंडमध्ये पूर्वीपासून असलेले ब्रिटिश सरकार अथवा सबंध आयर्लंडसाठी केंद्रीय सरकार यांपैकी कोणत्या सरकारला अधीन व्हावे याबाबतीत रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट लोकांची विरोधी मते राहिली आहेत.

तसेच पूर्वीच्या युगोस्लाव्हियात, मुलुखासाठी लढलेल्या युद्धात कॅथलिक व ऑर्थडॉक्ससहित वेगवेगळ्या विश्‍वासांच्या सदस्यांनी लढावे अशी शासकीय अधिकाऱ्‍यांनी मागणी केली आहे. सामान्य नागरिकांचे प्रथम कर्तव्य कोणते होते? सरकारचे प्रतिनिधीत्व करण्याचा दावा करणाऱ्‍यांना त्यांनी अनुसरायचे होते, की त्याऐवजी “खून करू नको . . . जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर,” असे म्हणणाऱ्‍या देवाच्या आज्ञेचे पालन करायचे होते?—रोमकर १३:९.

तुम्ही विचार कराल, की अशा प्रकारची परिस्थिती तुम्हावर कदाचित कधीच प्रभाव पाडणार नाही. तथापि, ती पाडू शकते. खरे तर, कदाचित तुम्ही अशा परिस्थितीत आताच गोवलेले असाल. ‘हुकुमशाही शासनांकडून धमकावण्यात येते तेव्हा, अर्वाचीन काळातील ख्रिश्‍चनांनी बिकट परिस्थितींत सापडले असता घ्यावेत अशा, किंवा त्यांना घेणे कदाचित जरूरी असतील अशा जीवन मरणाच्या निर्णयांचा,’ उल्लेख लेखक ऑस्कर कुलमॉन नवीन करारातील सरकार (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात करतात. तथापि, ‘केवळ ख्रिश्‍चन असल्यामुळे उद्‌भवणाऱ्‍या समस्येला तोंड देण्याच्या व तिचे निरसन करण्याच्या, तथाकथित ‘सामान्य’ अथवा ‘दैनंदिन’ परिस्थितींत जगणाऱ्‍या ख्रिश्‍चनासहित प्रत्येक ख्रिश्‍चनावर येणाऱ्‍या तेवढ्याच यथार्थ व महत्त्वपूर्ण जबाबदारीविषयीही’ ते सांगतात.

तर मग, धर्म व सरकार यांमधील संबंधांविषयी ख्रिश्‍चन लोकांनी आस्थेवाईक असावे का? निश्‍चितच असावे. अगदी प्राचीन काळापासून, ख्रिश्‍चनांनी प्रापंचिक अधिकाऱ्‍यांविषयी समतोल दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा पुढारी येशू ख्रिस्त यास रोमी सरकारने दोषी ठरवून, त्याचा निषेध करून त्यास जिवे मारले होते. त्याच्या शिष्यांना आपल्या ख्रिश्‍चन बाध्यता व रोमी साम्राज्याप्रती आपली कर्तव्ये यांत संतुलन साधावे लागले. याच कारणास्तव, अधिकाऱ्‍यांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर फेरविचार करणे आजच्या काळातील ख्रिश्‍चनांसाठी मार्गदर्शक ठरेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा