तुम्हाला आठवते का?
तुम्हाला टेहळणी बुरूज याचे अलीकडील अंक स्वतःकरता व्यावहारिकरित्या महत्त्वाचे वाटले का? असल्यास पुढील प्रश्नांद्वारे तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा का करू नये:
◻ अम्मोनी लोकांच्या पतनावरून आम्हास कोणता धडा शिकण्यास मिळतो? (सफन्या २:९, १०)
यहोवा, त्याच्या दयेची शत्रुत्वाने केलेली परतफेड इतक्या सहजासहजी घेत नाही आणि त्याच्या नियोजित समयी, प्राचीन काळी त्याने केले त्याप्रमाणेच तो कार्यवाही करील. (पडताळा स्तोत्र २:६-१२.)—१२/१५, पृष्ठ १०.
◻ ख्रिश्चनांना कोणत्या मार्गांनी शांती प्राप्त होते?
पहिले, त्यांना “[त्यांच्या] प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांति आहे.” (रोमकर ५:१) दुसरा, ‘मुळात शुद्ध शिवाय शांतिप्रिय असणारे’ “वरून येणारे ज्ञान,” विकसित करण्याद्वारे त्यांच्यात परस्पर शांती आहे. (याकोब ३:१७)—१/१, पृष्ठ ११.
◻ देवाच्या वचनाची तुलना कोणत्या गोष्टींसोबत करण्यात आली आहे व हे आपल्याकरता कसे उपयोगी आहे?
देवाच्या वचनाची तुलना पौष्टिक दूध, जड अन्न, उत्साह देणारे व स्वच्छ करणारे पाणी, आरसा आणि तीक्ष्ण तरवार या गोष्टींसोबत करण्यात आली आहे. या संज्ञा काय सूचित करतात याची समज मिळाल्याने बायबलचा कुशलतेने उपयोग करण्यास एखाद्या सेवकाला मदत होते.—१/१, पृष्ठ २९.
◻ समतोल प्रापंचिक शिक्षणाने आपल्याला काय करण्यास मदत करावी?
चांगले वाचण्यास, सुवाच्य लिहिण्यास, मानसिक तसेच नैतिकरीत्या विकसित होण्यास आणि दैनंदिन जीवनासाठी व प्रभावकारी पवित्र सेवेकरता आवश्यक असलेले व्यावहारिक प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी मदत करावी.—२/१, पृष्ठ १०.
◻ आपण शिक्षणासंबंधी येशूकडून कोणता मौल्यवान धडा शिकू शिकतो?
शिक्षणाचा उपयोग, स्वतःचे गौरव करण्यासाठी नव्हे तर महान शिक्षक, यहोवा देव याची स्तुती करण्यासाठी केला जावा. (योहान ७:१८)—२/१, पृष्ठ १०.
◻ देवाचे राज्य काय आहे?
ते राज्य, ईश्वर स्थापित स्वर्गीय सरकार आहे जे पाप आणि मृत्यूच्या परिणामांना काढून व पृथ्वीवर धार्मिक परिस्थिती पुनःस्थापित करून देवाची इच्छा पूर्ण करते. (दानीएल २:४४; प्रकटीकरण ११:१५; १२:१०)—२/१, पृष्ठ १६.
◻ हिंसाचाराचा कायम अंत करण्याकरता आवश्यक असलेले शिक्षण बायबल कसे पुरवते?
यहोवा देव त्याचे वचन बायबल याच्यामार्फत लोकांना शांतिप्रिय आणि धार्मिक लोक होण्याचे शिकवतो. (यशया ४८:१७, १८) एखाद्याच्या अंतःकरणापर्यंत पोहंचण्याचे व त्यावर परिणाम करून त्या व्यक्तीचे विचार आणि आचार बदलण्याचे सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. (इब्री लोकांस ४:१२)—२/१५, पृष्ठ ६.
◻ यशयाच्या ३५ व्या अध्यायातील भविष्यवाणीच्या तीन पूर्णता आहेत, असे आपण कोणत्या अर्थाने म्हणू शकतो?
सा. यु. पू. ५३७ मध्ये जेव्हा यहुदी बॅबिलोनच्या दास्यत्वातून परतले तेव्हा यशयाच्या भविष्यवाणीची पहिली पूर्णता झाली. आताच्या काळात मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून आध्यात्मिक इस्राएलाची सुटका झाली तेव्हापासून त्याची आध्यात्मिक पूर्णता होत चालली आहे. त्याची तिसरी पूर्णता, पृथ्वीवर येणाऱ्या एका वास्तविक परादीस परिस्थितींविषयी बायबलमध्ये दिलेल्या खात्रीशी संबंधित असेल. (स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण २१:४, ५)—२/१५, पृष्ठ १७.
◻ देवाला मानवांमध्ये असलेली वैयक्तिक आस्था, त्याचा पुत्र येशूने, केलेल्या चमत्कारांतून कशी प्रदर्शित झाली?
येशू “पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून, [त्याला] काहीहि स्वतः होऊन करिता येत” नसल्यामुळे तो दाखवित असलेला कळवळा यहोवाला आपल्या प्रत्येक सेवकाबद्दल वाटणाऱ्या काळजीचे एक हृदयस्पर्शी चित्र रेखाटतो. (योहान ५:१९)—३/१, पृष्ठ ५.
◻ योहान ५:२८, २९ मध्ये येशूने वापरलेली “स्मृती कबरा,” (NW) ही अभिव्यक्ती काय सूचित करते?
येथे वापरण्यात आलेला ने·मिʹऑन (स्मृती कबर), हा ग्रीक शब्द मृत व्यक्तीच्या जीवनाचा अहवाल यहोवाच्या स्मरणात आहे असे सूचित करतो व यासोबत त्याचे किंवा तिचे वारशाने प्राप्त झालेले गुण व संपूर्ण स्मरणशक्ती त्यात समाविष्ट आहे. यहोवाला प्रत्येक मानवांबद्दल काळजी आहे याचा हा सबळ पुरावा आहे!—३/१, पृष्ठ ६.
◻ सफन्याच्या भविष्यवाणीतील कोणता इशारायुक्त संदेश आपल्या व्यावहारिक मदतीचा आहे?
आज आपल्या अंतःकरणांमध्ये शंका मुळावू देण्याची आणि यहोवाच्या येणाऱ्या दिवसाविषयीचा विचार लांबणीवर टाकण्याची ही वेळ नाही. या व्यतिरिक्त, निर्बल करणाऱ्या उदासीनतेच्या परिणामांविषयी आपण जागृत असले पाहिजे. (सफन्या १:१२, १३; ३:८)—३/१, पृष्ठ १७.
◻ देवाशी एकनिष्ठ असणे एक आव्हान का प्रस्तुत करते?
कारण एकनिष्ठता, आपल्या पालकांकडून आपल्याला वारशाने मिळालेल्या स्वार्थी प्रवृत्तींच्या विरुद्ध आहे. (उत्पत्ति ८:२१; रोमकर ७:१९) यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा, आपल्याला देवाशी बेईमानी करण्यास भाग पाडण्याचा निर्धार आहे. (इफिसकर ६:१२; १ पेत्र ५:८)—३/१५, पृष्ठ १०.
◻ कोणत्या चार क्षेत्रांमध्ये आपण एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड द्यावे व असे करण्यासाठी आपल्याला काय मदत करील?
यहोवा, त्याची संघटना, मंडळी आणि आपल्या विवाह सोबत्यांशी एकनिष्ठ राहणे ही चार क्षेत्रे आहेत. या आव्हानांना तोंड देण्याचा एक मार्ग म्हणजे, एकनिष्ठतेचे आव्हान हे यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनाशी गुंफलेले आहे हे समजून घेणे होय.—३/१५, पृष्ठ २०.
◻ दावीदाने कराराचा कोश जेरूसलेममध्ये पुन्हा वाहून आणण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या अनुभवावरून आपल्याला कोणता धडा शिकण्यास मिळू शकतो? (२ शमुवेल ६:२-७)
दावीदाने कोश वाहून नेण्याबद्दलच्या यहोवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळे विपत्ती ओढवून घेतली. यहोवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा दोष यहोवाला देता कामा नये, हा आपल्याकरता एक धडा आहे. (नीतिसूत्रे १९:३)—४/१, पृष्ठे २८, २९.