वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१५ पृ. ३१
  • रुग्णांच्या हक्कांचा आदर केला जातो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रुग्णांच्या हक्कांचा आदर केला जातो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकाच्या अभ्यासासाठी प्रश्‍न
    आमची राज्य सेवा—२००१
  • तुम्हाला निवड करण्याचा हक्क आहे
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • तुमच्या मुलांना रक्‍ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१५ पृ. ३१

रुग्णांच्या हक्कांचा आदर केला जातो

‘रक्‍ताविना मी ही शस्त्रक्रिया करूच शकत नाही. तुम्हाला हे ऑपरेशन करून घ्यायचे आहे, तर तुम्हाला माझ्या पद्धतीनेच ते करून घ्यावे लागेल. नाहीतर, तुम्हाला दुसरा डॉक्टर शोधावा लागेल.’

डॉक्टरांच्या या शब्दांमुळे, थायलंडमध्ये राहणाऱ्‍या जेंग से जू नामक यहोवाची साक्षीदार असलेल्या भगिनीचा विश्‍वास डगमगला नाही. जेंगला, मेनीनजायओमा, म्हणजेच एक प्रकारचा ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान करण्यात आल्यावर शस्त्रक्रियेची अत्यंत गरज होती. परंतु, ‘रक्‍त वर्ज्य करावे’ ही बायबलची आज्ञा मानण्याचा तिने निर्धार केला होता.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

जेंग इतर दोन रुग्णालयांमध्ये गेली, तिला शक्यतः तिच्या स्वतःच्याच देशात उपचार करायचा होता. पण, तेथील डॉक्टरांनी देखील रक्‍ताविना शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यावर तिची निराशा झाली. सरतेशेवटी, थायलंडमधील इस्पितळ माहिती सेवा (एचआयएस) याद्वारे ती टोकयो स्त्रियांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या संपर्कात आली. किरणोत्सर्जन उपचारातील एक नवीन विकास म्हणजेच गॅमा नाईफचा उपयोग करून त्या रुग्णालयाने २०० पेक्षा अधिक ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांवर उपचार केला होता.

रुग्णालयाजवळ राहणाऱ्‍या जपानी साक्षीदारांसोबत जेंगची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिला विमानतळावर एक गट भेटला, त्यातील दोघा साक्षीदारांना थाई भाषा बोलता येत होती आणि एक एचआयएसचा प्रतिनिधी होता. एक आठवडाभर चाचण्या घेतल्यावर, जेंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथे गॅमा नाईफचा उपचार तिच्यावर करण्यात आला. या प्रक्रियेला केवळ एक तास लागला. दुसऱ्‍या दिवशी ती रुग्णालयातून बाहेर पडली व त्याच्या दुसऱ्‍या दिवशी ती पुन्हा थायलंडला जाण्याच्या मार्गावर होती.

जेंग म्हणाली, “या व्यवस्थेद्वारे इतकी मदत दिली जाईल अशी मी कल्पना सुद्धा केली नव्हती. दाखविण्यात आलेले प्रेम तसेच संबंधित गटांमधील सहकार्य पाहून मी खरोखर प्रभावित झाले.”

या वृत्ताचा अहवाल देताना, मायनिची शिंमबून या जपानी वृत्तपत्राने म्हटले: “आतापर्यंत, रक्‍त संक्रमण नाकारण्याच्या धार्मिक कारणांवर जोर दिला गेला आहे. तथापि, रक्‍त संक्रमणांनी एडस्‌, हेपटायटीस सी सारख्या विषाणू संसर्गांचा धोका, आणि ॲलर्जी हे दुष्परिणाम होतात. या कारणास्तव, असे काही रुग्ण आहेत ज्यांचा धार्मिक विश्‍वास कोणताही असला, तरी ते रक्‍त संक्रमण नाकारतात.”

वृत्तपत्राने पुढे असे म्हटले: “रक्‍त संक्रमण नकारलेल्या अनेक रुग्णांना रुग्णालये बदलण्यास भाग पाडले गेले आहे, पण रुग्णाच्या इच्छेचा आदर करण्याबाबत वैद्यकीय संस्थांमध्ये बदल होण्याची गरज आहे. माहितीपूर्वक संमती (काय समाविष्ट आहे त्याचे पूर्ण स्पष्टीकरण मिळवून उपचारास संमती देणारा रुग्ण) असण्याची गरज आहे, आणि रक्‍त संक्रमणाच्या केसेस काही अपवाद नाहीत. एखाद्या विशिष्ट धर्माचा समावेश असण्याची ही बाब नाही हे ओळखले पाहिजे.”

जेंग से जू हिच्या मते, रक्‍ताविना उपचार घेण्याची इच्छा असणाऱ्‍यांना दुसऱ्‍या रुग्णालयांमध्ये बदली करावी लागते. परंतु, जे डॉक्टर त्यांच्या रुग्णांच्या हक्कांचा आदर करतात अशांच्या प्रयत्नांची ते गुणग्राहकता बाळगतात.

यहोवाच्या साक्षीदारांनी, वॉच टावर संस्थेच्या शाखांमध्ये इस्पितळ माहिती सेवा याची स्थापना, त्यांच्या विश्‍वासांचा आदर करणाऱ्‍या चिकित्सकांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी केली होती. जगभरात, संपूर्ण एचआयएस, रुग्णालये, चिकित्सक, आरोग्य-निगा कार्यकर्ते, वकील व न्यायाधीश यांच्यासोबत सहकारी नातेसंबंध निर्माण करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा