तुम्ही चुकवू नये अशी घटना
“प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देव आपला स्वर्गीय पिता याच्याकडून येते. (याकोब १:१७) देवाने पतित मानवजातीला परत मिळविण्यासाठी जे सर्वश्रेष्ठ बक्षीस देऊ केले आहे ते म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्यामार्फत केलेली तरतूद होय. खंडणीदाता या नात्याने येशूचा मृत्यू, पृथ्वीवरील परादीसमधील सार्वकालिक जीवन शक्य करते. लूक २२:१९ मध्ये आपल्याला येशूच्या मृत्यूचे स्मरण करण्याची आज्ञा दिली आहे.
येशूच्या आज्ञेचे पालन करण्यामध्ये यहोवाच्या साक्षीदारांबरोबर सहभागी होण्यास ते तुम्हाला उबदार आमंत्रण देत आहेत. हा वार्षिक विधी सूर्यास्तानंतर, बायबलच्या चांद्र दिनदर्शिकेतील निसान १४ या तारखेशी जुळणाऱ्या दिवशी, अर्थात मंगळवार, एप्रिल २, १९९६ या दिवशी साजरा करण्यात येईल. या तारखेची नोंद करून ठेवा म्हणजे तुम्ही ती विसरणार नाही. भेटण्याची निश्चित जागा व वेळ याबद्दल तुमच्या विभागातील यहोवाचे साक्षीदार तुम्हाला सांगू शकतील.