वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१५ पृ. ८-९
  • त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
  • “मी तुम्हास नवी आज्ञा देतो”
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण
    बायबल नेमके काय शिकवते?
  • प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता फार महत्त्व आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१५ पृ. ८-९

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

येशूचे निरोपाचे शब्द लक्षपूर्वक ऐकणे

सा.यु. ३३, निसान १४ तारखेच्या सायंकाळी येशू ख्रिस्त आणि त्याचे ११ विश्‍वासू प्रेषित जेरुसलेममधील वरील खोलीत मेजाभोवती बसले होते. स्वतःचा मृत्यू जवळ आला आहे, याची त्याला जाणीव होती म्हणून त्याने त्यांना म्हटले: “मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे.” (योहान १३:३३) खरे पाहता, यहूदा इस्कर्योत, याने येशूला ठार मारण्याची इच्छा असणाऱ्‍या दुष्ट लोकांसोबत कट रचण्यास आधीच सुरवात केली होती.

येशूपेक्षा, त्या वरील खोलीतील इतर कोणालाही परिस्थितीच्या निकडीची जाणीव इतक्या चांगल्या प्रकारे झाली नव्हती. आता आपल्याला कष्ट सहन करावे लागणार, हे त्याला ठाऊक होते. त्याच रात्री त्याचे प्रेषित त्याला सोडून जाणार होते, याची सुद्धा त्याला कल्पना होती. (मत्तय २६:३१; जखऱ्‍या १३:७) मृत्यूपूर्वी प्रेषितांसोबत बोलण्याची येशूची ही अखेरची संधी होती, यास्तव त्याचे हे निरोपाचे शब्द अतिशय महत्त्वपूर्ण बाबींवर केंद्रित होते, याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो.

“माझ्या स्मरणार्थ हे करा”

येशूने त्याच्या विश्‍वासू प्रेषितांसोबत यहुदी वल्हांडणाऐवजी एका नवीन विधीची प्रस्थापना केली. प्रेषित पौलाने त्यास ‘प्रभूचे सांज भोजन’ असे संबोधले. (१ करिंथकर ११:२०) येशूने बेखमीर भाकरीचा एक तुकडा घेऊन प्रार्थना केली. त्यानंतर त्याने तुकडा तोडून ती भाकरी प्रेषितांना दिली. “घ्या, खा, हे माझे शरीर आहे,” त्याने म्हटले. नंतर त्याने एक प्याला द्राक्षारस घेतला आणि उपकारस्तुती करून तो शिष्यांस असे म्हणून दिला: “तुम्ही सर्व ह्‍यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्‍त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी ओतले जात आहे.”—मत्तय २६:२६-२८.

या घटनेचे काय महत्त्व होते? येशूने दाखविल्याप्रमाणे, भाकरीने त्याच्या पापरहित शरीरास सूचित केले. (इब्रीयांस ७:२६; १ पेत्र २:२२, २४) द्राक्षारसाने येशूच्या सांडलेल्या रक्‍तास सूचित केले ज्यामुळे पापांची क्षमा मिळणे शक्य होणार होते. त्याच्या बलिदानरूपी रक्‍ताने यहोवा देव आणि १,४४,००० मानवांमधील नवा करार देखील अंमलात आणला जाणार होता आणि हे मानव अखेरीस येशूसह स्वर्गात राज्य करतील. (इब्रीयांस ९:१४; १२:२२-२४; प्रकटीकरण १४:१) प्रेषित, येशूसह स्वर्गीय राज्यात सहभागी होणार, हे त्याने त्यांना भोजनामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देण्याद्वारे प्रदर्शित केले.

या स्मृत्यर्थ भोजनाबद्दल येशूने आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) होय, प्रभूचे सांज भोजन, वल्हांडणाप्रमाणे वार्षिक घटना होणार होती. इस्राएलांची इजिप्तच्या दास्यत्वातून सुटका झाली त्याच्या स्मृत्यर्थ वल्हांडण साजरा केला जात होता, तर प्रभूचे सांज भोजन याहीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणातील—विमोचनयोग्य मानवजातीच्या पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून होणाऱ्‍या सुटकेवर जोर देणार होते. (१ करिंथकर ५:७; इफिसकर १:७) याशिवाय, प्रतिकात्मक भाकरी आणि द्राक्षारसामध्ये भाग घेणाऱ्‍यांना देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये राजे आणि याजक या अर्थाने त्यांच्या भावी विशेषाधिकारांबद्दल स्मरण करून दिले जाणार होते.—प्रकटीकरण २०:६.

येशू ख्रिस्ताचा मृत्यू मानव इतिहासातील खरोखरच एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना होती. येशूने जे काही केले त्याविषयी गुणग्राहकता बाळगणारे प्रभूच्या सांज भोजनाविषयी, “माझ्या स्मरणार्थ हे करा,” या त्याच्या आज्ञेचे पालन करतात. यहोवाचे साक्षीदार प्रत्येक वर्षी येशूचा मृत्युदिन निसान १४ शी जुळणाऱ्‍या तारखेस साजरा करतात. ही तारीख १९९६ एप्रिल २ रोजी सूर्यास्तानंतर येते. तुमच्या क्षेत्रातील राज्य सभागृहामध्ये उपस्थित राहावे म्हणून आम्ही तुम्हास सस्नेह आमंत्रण देत आहोत.

“मी तुम्हास नवी आज्ञा देतो”

प्रभूच्या सांज भोजनाची प्रस्थापना करण्याखेरीज, येशूकडे त्याच्या प्रेषितांना देण्याकरता निरोपाचा सल्ला होता. त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले होते तरी देखील, अद्याप त्यांना पुष्कळ काही शिकायचे होते. त्यांना येशूकरिता, त्यांच्याकरिता किंवा भवितव्याकरिता असणाऱ्‍या देवाच्या उद्देशाविषयी पूर्णपणे समज आलेली नव्हती. परंतु, येशूने या घटकेस या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला नाही. (योहान १४:२६; १६:१२, १३) उलटपक्षी, काहीतरी अधिक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तो बोलला. तो म्हणाला, “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी.” नंतर येशूने पुढे म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५.

ही कोणत्या अर्थाने “नवी आज्ञा” होती? मोशेच्या नियमशास्त्राने आज्ञापिले: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (लेवीय १९:१८) तथापि, येशूने त्याच्या अनुयायांना सहख्रिश्‍चनांकरिता स्वतःचे जीवन देण्याची परिसीमा गाठणारी आत्म-बलिदानरूपी प्रीती प्रदर्शित करण्यास सांगितले. अर्थातच, ‘प्रीतीचा नियम’ इतक्या कठीण नसणाऱ्‍या परिस्थितींमध्ये सुद्धा लागू होणार होता. येशू ख्रिस्ताचा अनुयायी सर्व परिस्थितींमध्ये इतरांना आध्यात्मिक आणि इतर रीतीने मदत करण्याद्वारे पुढाकार घेण्यात प्रीती प्रदर्शित करणार होता.—गलतीकर ६:१०.

येशूला, त्याच्या शिष्यांकरिता यहोवा देवाला प्रार्थना करावी म्हणून प्रीतीने उद्युक्‍त केले. त्याची प्रार्थना काहीशी अशी होती: “ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्‍यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे.” (योहान १७:११) येशूने त्याच्या पित्याकडे केलेल्या विनवणीत, त्याच्या अनुयायांतील प्रेममय ऐक्यासाठी प्रार्थना केली, हे उल्लेखनीय आहे. (योहान १७:२०-२३) ‘येशूने जशी त्यांच्यावर प्रीती केली तशी त्यांनीही एकमेकांवर प्रीती करण्याची’ गरज होती.—योहान १५:१२.

येशूचे निरोपाचे शब्द त्याच्या विश्‍वासू प्रेषितांनी लक्षपूर्वक ऐकले. आपणही त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ खऱ्‍या उपासकांमधील प्रीती आणि ऐक्य पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. (२ तीमथ्य ३:१) निश्‍चितच, खरे ख्रिस्ती येशूच्या आज्ञांचे पालन करतात आणि बंधुप्रेम प्रदर्शित करतात. त्यामध्ये प्रभूचे सांज भोजन साजरे करा, या त्याच्या आज्ञेचा समावेश होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा