वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१ पृ. १३-१८
  • “तुझे हात गळू देऊ नको”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुझे हात गळू देऊ नको”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘परमेश्‍वराच्या क्रोधदिनी दृष्टिआड होणे’
  • ‘सर्व राष्ट्रांत लौकिक व गौरव’
  • ‘यहोवाचा दिवस येईल’
  • “तुझे हात गळू देऊ नको”
  • उदासीनतेविरुद्ध लढा देणे
  • मोठ्या दिवसाची वाट पाहत असताना पुढे चला!
  • “माझी वाट पाहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाचे पुनर्स्थापित लोक जगभरात त्याची स्तुती करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१ पृ. १३-१८

“तुझे हात गळू देऊ नको”

“तुझे हात गळू देऊ नको. परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझा देव, साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे.”—सफन्या ३:१६, १७.

१. सफन्याच्या भविष्यवाणीविषयी एका बायबल विद्वानांनी काय म्हटले?

सफन्याच्या भविष्यवाणीने, सा. यु. पू. सातव्या आणि सहाव्या शतकांतील पहिल्या पूर्णतेच्याही पलीकडील लांबच्या घटनांकडे लक्ष वेधले. प्राध्यापक सी. एफ. कील यांनी सफन्यावरील त्यांच्या विवेचनात असे लिहिले: “सफन्याच्या भविष्यवाणीची . . . सुरवात, यहुदाच्या पापांमुळे त्याच्यावर येणारा न्यायदंड आणि यहोवाच्या लोकांशी शत्रुत्व केल्यामुळे जगाच्या राष्ट्रांवर येणारा न्यायदंड ही संपूर्ण जगावर येणाऱ्‍या विश्‍वव्यापी न्यायदंडाच्या घोषणेनेच केवळ होत नाही तर संबंध भविष्यवाणीमध्ये यहोवाच्या महान आणि भयंकर दिवसाचे विवेचन देते.”

२. सफन्याच्या दिवसांतील परिस्थिती आणि आजच्या ख्रिस्ती धर्मजगतातील परिस्थितीमध्ये कोणत्या समानता आहेत?

२ आज, सफन्याच्या दिवसांपेक्षा मोठ्या प्रमाणात, राष्ट्रांना नाशासाठी एकत्र करण्याचा यहोवाचा न्यायिक निर्णय आहे. (सफन्या ३:८) ख्रिस्ती असल्याचा दावा करणारी राष्ट्रे देवाच्या नजरेत विशेषकरून दोषास्पद आहेत. ज्याप्रमाणे जेरूसलेमला अविश्‍वासूपणाकरता यहोवाप्रती मोठी किंमत मोजावी लागली त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगताने त्याच्या दुश्‍चरित्र मार्गांसाठी देवाला जाब दिला पाहिजे. सफन्याच्या दिवसांमधील यहुदा आणि जेरूसलेमविरुद्ध उच्चारलेले ईश्‍वरी न्यायदंड, चर्च आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या पंथांना अधिक जोरदारपणे लागू होतात. त्यांनी पुष्कळ खोट्या उगमाकडून असणाऱ्‍या त्यांच्या देव-निंदात्मक शिकवणींद्वारे शुद्ध उपासनेला देखील धुडकावले. त्यांनी युद्धाच्या आधुनिक वेदीवर त्यांच्या लाखो धष्टपुष्ट पुत्रांचा बळी दिला आहे. याहूनही अधिक म्हणजे, प्रतिनमुनेदार जेरूसलेमच्या रहिवाशांनी तथाकथित ख्रिस्ती विश्‍वासात फलज्योतिष, दुरात्मिक प्रथा आणि ओंगळ लैंगिक अनैतिकता यांची भेसळ करतात, यावरून बआल उपासनेची आठवण होते.—सफन्या १:४, ५.

३. आजच्या पुष्कळ प्रापंचिक नेत्यांविषयी व राजकीय सरकारांविषयी काय म्हटले जाऊ शकते आणि सफन्याने काय भाकीत केले?

३ ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक राजकीय नेत्यांना चर्चमध्ये तोरा मिरवायला आवडतो. पण यहुदाच्या ‘सरदारांप्रमाणे,’ त्यांच्यातील पुष्कळ जण लोकांना ‘गर्जना करणाऱ्‍या सिंहाप्रमाणे’ व हवऱ्‍या ‘लांडग्यांप्रमाणे’ लुबाडतात. (सफन्या ३:१-३) अशा लोकांचे राजकीय अनुयायी ‘आपल्या धन्याचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात.’ (सफन्या १:९) लाच घेणे आणि भ्रष्टाचार चालू आहे. ख्रिस्ती धर्मजगताच्या आतील आणि बाहेरील राजकीय सरकारांच्या बाबतीत पाहिल्यास त्यांच्यातील वाढती संख्या सेनाधीश यहोवाच्या लोकांना, त्याच्या साक्षीदारांना तिरस्कृत ‘पंथ’ म्हणून ‘तुच्छ मानतात.’ (सफन्या २:८; प्रेषितांची कृत्ये २४:५, १४) अशा प्रकारच्या सर्व राजकीय नेत्यांविषयी आणि त्यांच्या अनुयायांविषयी सफन्याने असे भविष्यकथन केले: “परमेश्‍वराच्या [यहोवाच्या] क्रोधदिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाश्‍यांचा अंत करील आणि तोहि एकाएकी करील.”—सफन्या १:१८.

‘परमेश्‍वराच्या क्रोधदिनी दृष्टिआड होणे’

४. यहोवाच्या मोठ्या दिवसातून वाचणारे असतील हे कोणती गोष्ट दाखवते, पण त्यांनी काय केले पाहिजे?

४ सा. यु. पू. सातव्या शतकात यहुदाच्या सर्वच रहिवाशांचा नाश झाला नव्हता. त्याचप्रमाणे, यहोवाच्या दिवसातून देखील बचावणारे असतील. अशा लोकांना यहोवाने त्याचा संदेष्टा सफन्या याच्याद्वारे म्हटले: “निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्‍वराचा [यहोवाचा] क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराच्या न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:२, ३.

५. या शेवटल्या काळामध्ये सफन्याचा इशारा ऐकणारे प्रथम कोण होते व यहोवाने त्यांचा कसा उपयोग केला आहे?

५ या जगाच्या अंत समयामध्ये, भविष्यसूचक आमंत्रणाला प्रथम प्रतिसाद देणारे आध्यात्मिक इस्राएलांचा शेष, अभिषिक्‍त ख्रिस्ती होते. (रोमकर २:२८, २९; ९:६; गलतीकर ६:१६) धार्मिकतेचा व नम्रतेचा अवलंब केल्यामुळे आणि यहोवाच्या न्यायिक निर्णयांना आदर दाखवल्यामुळे त्यांची खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, मोठ्या बाबेलमधून सुटका करण्यात आली व १९१९ मध्ये ईश्‍वरी कृपा पुन्हा देण्यात आली. तेव्हापासून, विशेषकरून १९२२ पासून हा विश्‍वासू शेष निर्भयपणे चर्च, ख्रिस्ती धर्मजगतातील पंथ आणि राजकीय राष्ट्र यांच्याविरुद्ध यहोवाचे न्यायदंड घोषित करत आहे.

६. (अ) सफन्याने विश्‍वासू शेषांबद्दल काय भविष्यकथन केले? (ब) ही भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

६ या विश्‍वासू शेषांबद्दल सफन्याने असे भविष्यकथन केले: “मी तुजमध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्‍वराच्या [यहोवाच्या] नामावर श्रद्धा ठेवितील. इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखांत कपटी जिव्हा आढळावयाची नाही; ते चरतील व विश्रांति मिळवतील, कोणी त्यांस भेवडावणार नाही.” (सफन्या ३:१२, १३) या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी नेहमी, विशेषकरून १९३१ मध्ये जेव्हा त्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केले तेव्हापासून यहोवाच्या नावाला प्राधान्य दिले आहे. (यशया ४३:१०-१२) यहोवाच्या सार्वभौमत्वाचा वादविषय ठळक करून त्यांनी ईश्‍वरी नावाला सन्मान दिला आहे ज्यामुळे ते नाव त्यांच्यासाठी दुर्ग ठरले आहे. (नीतिसूत्रे १८:१०) यहोवाने त्यांना विपुल आध्यात्मिक अन्‍न दिले आहे आणि ते एका आध्यात्मिक परादीसमध्ये निर्भयपणे वावरत आहेत.—सफन्या ३:१६, १७.

‘सर्व राष्ट्रांत लौकिक व गौरव’

७, ८. (अ) आध्यात्मिक इस्राएलच्या शेषांच्या बाबतीत आणखी कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली आहे? (ब) लाखो लोकांना काय समजून आले आहे व याविषयी तुमचे स्वतःचे विचार काय आहेत?

७ यहोवाच्या नावाशी आणि त्याच्या वचनातील धार्मिक तत्त्वांशी शेषांच्या दाट जवळीकीकडे दुर्लक्ष झालेले नाही. प्रामाणिक लोकांनी, शेषांची वागणूक आणि या जगाच्या राजकीय व धार्मिक नेतृत्वाचा भ्रष्टाचार आणि दांभिकपणा यांतील फरक पाहिला आहे. यहोवाने ‘[आध्यात्मिक] इस्राएलाच्या अवशिष्ट जनांना’ आशीर्वादित केले आहे. त्याचे नाव धारण करण्याचा सुहक्क देऊन त्याने त्यांना सन्मानित केले आहे आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये उत्तम ख्याती मिळवावे असे केले आहे. हे सफन्याने भाकीत केल्याप्रमाणे आहे: “त्या समयी मी तुम्हास आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन, तेव्हा पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”—सफन्या ३:२०.

८ सन १९३५ पासून अक्षरशः लाखो लोकांना हे समजले आहे, की शेषांवर यहोवाचा आशीर्वाद आहे. ते आनंदाने या आध्यात्मिक यहुद्यांचे किंवा इस्राएलांचे असे म्हणत अनुकरण करतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्‍या ८:२३) ख्रिस्ताने ‘त्याच्या [पार्थिव] सर्वस्वावर नेमलेले’ ते हेच अभिषिक्‍त शेष ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आहेत असे ‘दुसऱ्‍या मेंढरांनी’ ओळखले आहे. ते, हा दास वर्ग “यथाकाळी” पुरवत असलेले आध्यात्मिक अन्‍न आभारप्रदर्शनासह घेतात.—योहान १०:१६; मत्तय २४:४५-४७.

९. लाखो लोक कोणती “वाणी” बोलण्यास शिकले आहेत व दुसरी मेंढरे अभिषिक्‍त शेषांबरोबर कोणते महान कार्य “एकचित्ताने [खांद्याला खांदा लावून]” करत आहेत?

९ शेषांच्या संगतीने, ही लाखो दुसरी मेंढरे ‘शुद्ध वाणीच्या’ सुसंगतेत जगण्यास व बोलण्यास शिकत आहेत.a यहोवाने सफन्याकरवी असे भाकीत केले: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची [यहोवाची] सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने [खांद्याला खांदा लावून] करितील.” (सफन्या ३:९) होय, ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी राज्याच्या या सुवार्तेचा’ प्रचार करण्याच्या तातडीच्या कार्यात दुसरी मेंढरे, ‘लहान कळपाच्या’ अभिषिक्‍त सदस्यांबरोबर ‘खांद्याला खांदा लावून’ यहोवाची सेवा एकतेने करतात.—लूक १२:३२; मत्तय २४:१४.

‘यहोवाचा दिवस येईल’

१०. अभिषिक्‍त शेषांना नेहमीच कशाची खात्री पटली आहे व वर्ग या नात्याने ते जिवंत असताना काय पाहतील?

१० अभिषिक्‍त शेषांनी नेहमीच प्रेषित पेत्राचे हे प्रेरित शब्द लक्षात ठेवले आहेत: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू [यहोवा] आपल्या वचनाविषयी करीत नाही; तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” (२ पेत्र ३:९, १०) विश्‍वासू दास वर्गाच्या सदस्यांनी कधीही आपल्या काळात येणाऱ्‍या यहोवाच्या दिवसाबद्दलच्या शंका मनी बाळगल्या नाहीत. त्या महान दिवसाची सुरवात, जेरूसलेमचा प्रतिनमुना म्हणजेच ख्रिस्ती धर्मजगत आणि मोठ्या बाबेलचा शेष भाग यांच्याविरुद्ध देवाच्या न्यायाची अंमलबजावणीने होईल.—सफन्या १:२-४; प्रकटीकरण १७:१, ५; १९:१, २.

११, १२. (अ) सफन्याच्या भविष्यवाणीचा आणखी कोणता भाग शेषांच्या बाबतीत पूर्ण झाला आहे? (ब) “तुझे हात गळू देऊ नको” या हाकेला अभिषिक्‍त शेषांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला आहे?

११ खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, मोठी बाबेल हिच्या आध्यात्मिक बंदिवासातून १९१९ पासून मुक्‍त झाल्यामुळे विश्‍वासू शेष आनंदी आहेत. त्यांनी सफन्याच्या भविष्यवाणीची पूर्णता अनुभवली: “सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर. परमेश्‍वराने [यहोवाने] तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलचा राजा परमेश्‍वर तुजमध्ये आहे; तुला पुनः अरिष्टाची भीति प्राप्त होणार नाही. त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील हे सीयोने, भिऊ नको, तुझे हात गळू देऊ नको, परमेश्‍वर तुझा देव साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुजविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.”—सफन्या ३:१४-१७.

१२ यहोवा अभिषिक्‍त शेषांना पाठिंबा देत आहे अशा खात्रीने व विपुल पुराव्याने ते, त्यांना दिलेली ईश्‍वरी आज्ञा पूर्ण करण्यासाठी धैर्याने पुढे गेले आहेत. त्यांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला आहे आणि ख्रिस्ती धर्मजगत, मोठ्या बाबेलचा शेष भाग आणि सैतानाच्या संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध यहोवाचा न्यायदंड घोषित केला आहे. सर्व परिस्थितींमध्ये १९१९ च्या शतकांपासून त्यांनी “हे सीयोने, भिऊ नको, तुझे हात गळू देऊ नको,” या ईश्‍वरी आज्ञेचे पालन केले आहे. यहोवाच्या राज्याची घोषणा करणाऱ्‍या कोट्यावधी पत्रिका, नियतकालिके, पुस्तके व पुस्तिकांचे वाटप करण्यात त्यांनी ढिलाई दाखवली नाही. ते, १९३५ पासून झुंडीच्या झुंडीने येणाऱ्‍या दुसऱ्‍या मेंढरांसाठी विश्‍वास-प्रेरक उदाहरण ठरले आहेत.

“तुझे हात गळू देऊ नको”

१३, १४. (अ) काही यहुदी यहोवाची सेवा करण्यापासून मागे का पडले व हे कशा प्रकारे प्रदर्शित झाले? (ब) काय करणे मूर्खपणाचे ठरेल व कोणत्या कार्यात आपण आपले हात गळू देऊ नयेत?

१३ यहोवाच्या मोठ्या दिवसाची आपण ‘वाट पाहत असताना’ सफन्याच्या भविष्यवाणीतून आपण व्यावहारिक मदत कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? पहिली गोष्ट आपण, यहोवाच्या दिवसाच्या समीपतेविषयी शंका बाळगल्यामुळे यहोवाचे अनुकरण करण्यापासून अलिप्त झालेल्या सफन्याच्या दिवसांतील यहुद्यांप्रमाणे होण्यापासून जागृत राहिले पाहिजे. अशा यहुद्यांनी त्यांच्या शंका जाहीरपणे व्यक्‍त केल्या नाहीत पण त्यांच्या कृतीने हे दाखवले, की यहोवाचा मोठा दिवस समीप आहे यावर त्यांनी खरोखर विश्‍वास ठेवला नव्हता. यहोवाची वाट पाहण्याऐवजी ते धनसंपत्ती गोळा करण्यात मग्न झाले होते.—सफन्या १:१२, १३; ३:८.

१४ आपल्या अंतःकरणामध्ये शंकेला मूळ धरू देण्याची ही वेळ नाही. यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसाचा विचार आपल्या मनातून किंवा अंतःकरणातून काढून टाकणे मूर्खपणाचे ठरेल. (२ पेत्र ३:१-४, १०) यहोवापासून दूर जाण्याचे किंवा त्याच्या सेवेतून ‘आपले हात गळू’ देण्याचे आपण टाळले पाहिजे. त्यामध्ये आपल्या ‘सुवार्तेच्या’ प्रचारकार्यात “सैल हाताने” काम न करणे समाविष्ट आहे.—नीतिसूत्रे १०:४; मार्क १३:१०.

उदासीनतेविरुद्ध लढा देणे

१५. कोणत्या कारणामुळे आपण यहोवाच्या सेवेत ढिलाई दाखवू शकतो व सफन्याच्या भविष्यवाणीत या समस्येविषयी कसे सांगितले आहे?

१५ दुसरी गोष्ट आपण, उदासीनतेच्या निर्बल करणाऱ्‍या परिणामांविषयी जागृत असले पाहिजे. अनेक पाश्‍चिमात्य देशांत, आध्यात्मिक बाबींविषयी बेपर्वाई सुवार्तेच्या प्रचारकांमध्ये निरुत्साहास कारणीभूत ठरू शकते. अशा प्रकारची उदासीनता सफन्याच्या दिवसांतील लोकांमध्ये होती. यहोवाने त्याच्या संदेष्ट्याद्वारे म्हटले: “जे . . . आपल्या मनात म्हणतात की परमेश्‍वर [यहोवा] बरे करीत नाही व वाईटहि करीत नाही त्यांचा मी समाचार घेईन.” (सफन्या १:१२) या उताऱ्‍यावर कॅम्ब्रीज बायबल फॉर स्कूल्स ॲण्ड कॉलेजेस या पुस्तकात लिहिताना ए. बी. डेवीडसन म्हणाले, की हा उतारा त्या लोकांना सूचित करतो “जे निर्दयीपणे किंवा मानवजातीच्या बाबींमध्ये एखाद्या उच्च शक्‍तीच्या हस्तक्षेपाविषयीच्या शंकेखोर उदासीनतेत बुडाले आहेत.”

१६. ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चच्या सदस्यांमध्ये कोणत्या प्रकारची विचारसरणी आहे पण यहोवा आपल्याला कोणते उत्तेजन देतो?

१६ उदासीनतेची मनोवृत्ती आज पृथ्वीच्या अनेक भागांत, विशेषकरून अधिक समृद्ध राष्ट्रांमध्ये सर्वत्र दिसून येते. यहोवा देव आपल्या दिवसांतील मानवी कारभारांमध्ये हस्तक्षेप करील यावर ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चचे सदस्य देखील विश्‍वास ठेवत नाहीत. त्यांच्यापर्यंत राज्याची सुवार्ता पोहंचवण्यासाठी आपण जो प्रयास करतो त्याच्याबद्दल केवळ एका संशयखोर हास्याने ते एकतर विचार करत नाहीत किंवा “मला यामध्ये आस्था नाही!” असे थोडक्यात बोलून मोकळे होतात. या परिस्थितींमध्ये, साक्षकार्यांत टिकून राहणे खरोखरच एक आव्हान ठरेल. यामुळे आपल्या धीराची परीक्षा होते. पण सफन्याच्या भविष्यवाणीद्वारे, यहोवा त्याच्या विश्‍वासू लोकांना असे म्हणून बल देतो की: “तुझे हात गळू देऊ नको, परमेश्‍वर [यहोवा] तुझा देव साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुजविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.”—सफन्या ३:१६, १७.

१७. दुसऱ्‍या मेंढरांपैकीच्या नवोदितांनी कोणत्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करावे व कसे?

१७ यहोवाच्या लोकांच्या आधुनिक दिवसांतील इतिहासात शेष तसेच दुसरी मेंढरे यांच्यातील वृद्ध जनांनी या शेवटल्या दिवसांमध्ये एकत्रीकरणाचे प्रचंड कार्य साध्य केले आहे ही एक वास्तविकता आहे. या सर्व विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी अनेक दशकांपासून सहनशीलता प्रदर्शित केली आहे. त्यांनी स्वतःला ख्रिस्ती धर्मजगतातील बहुसंख्याकांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे निरुत्साहित होऊ दिले नाही. यास्तव, दुसऱ्‍या मेंढरांतील नवोदितांनी स्वतःला, आज अनेक देशांमध्ये आध्यात्मिक बाबींविषयी सर्वत्र असलेल्या उदासीनतेमुळे नाउमेद होऊ देऊ नये. त्यांनी ‘आपले हात गळू’ देऊ नयेत किंवा गलित होऊ देऊ नये. त्यांनी यहोवाचा दिवस आणि त्यानंतर येणाऱ्‍या आशीर्वादांविषयीचे सत्य शिकण्यास मेंढरासमान लोकांना मदत करण्यास तयार केलेले टेहळणी बुरूज, सावध राहा! आणि इतर उत्तम प्रकाशने सादर करण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करावा.

मोठ्या दिवसाची वाट पाहत असताना पुढे चला!

१८, १९. (अ) धीर धरण्यासाठी मत्तय २४:१३ आणि यशया ३५:३, ४ मध्ये आपल्याला कोणते उत्तेजन मिळते? (ब) यहोवाच्या सेवेत ऐक्याने पुढे गेल्यावर आपण कशा प्रकारे आशीर्वादित होऊ?

१८ येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) म्हणूनच, यहोवाच्या मोठ्या दिवसाची वाट पाहत असताना आपले “गलित हस्त” किंवा “लटपटणारे गुडघे” होण्याची गरज नाही. (यशया ३५:३, ४) सफन्याची भविष्यवाणी यहोवाविषयी खात्रीपूर्वकतेने म्हणते, की तो: “साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे.” (सफन्या ३:१७) होय, यहोवा त्याच्या लोकांना, ‘तुच्छ मानणाऱ्‍या’ राजकीय राष्ट्रांना चूर्ण करण्यासाठी त्याच्या पुत्राला आज्ञा देतो तेव्हा ‘मोठ्या संकटाच्या’ शेवटल्या टप्प्यातून ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ बचाव करील.—प्रकटीकरण ७:९, १४; सफन्या २:१०, ११; स्तोत्र २:७-९.

१९ यहोवाचा मोठा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे आपण आवेशाने, “एकचित्ताने [खांद्याला खांदा लावून]” त्याची सेवा करत पुढे जाऊ! (सफन्या ३:९) असे केल्याने आपण आणि आपल्यासोबत असंख्य इतर जण “परमेश्‍वराच्या [यहोवाच्या] क्रोधदिनी दृष्टीआड” होण्यास व त्याच्या नावाच्या पवित्रीकरणाची साक्ष देण्यास पात्र ठरू.

[तळटीपा]

a “शुद्ध वाणी”च्या पूर्ण चर्चेसाठी एप्रिल १, १९९१, पृष्ठे २०-५, (इंग्रजी) व मे १, १९९१, पृष्ठे १०-२० चे टेहळणी बुरूज पहा.

उजळणीत

◻ ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक परिस्थिती कोणत्या बाबतीत सफन्याच्या दिवसांशी मिळतीजुळती आहे?

◻ आजचे अनेक राजकीय नेते सफन्याच्या काळातील प्रापंचिक ‘सरदारांनुरूप’ कसे आहेत?

◻ सफन्यातील कोणती अभिवचने शेषांच्या बाबतीत पूर्ण झाली आहेत?

◻ लाखो लोकांना काय कळून चुकले आहे?

◻ यहोवाच्या सेवेत आपण आपले हात का गळू देऊ नयेत?

[१५ पानांवरील चित्रं]

सफन्याप्रमाणे, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे विश्‍वासू शेष यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा धैर्याने करीत आहेत

[१८ पानांवरील चित्रं]

‘दुसऱ्‍या मेंढरांनी’ लोकांच्या उदासीनतेमुळे स्वतःला निरुत्साहित होऊ दिले नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा