वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१५ पृ. ८-९
  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार न्यूझीलंड

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार न्यूझीलंड
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार बहामा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१५ पृ. ८-९

संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार न्यूझीलंड

द्वीप यहोवाची स्तुती करू शकतात का? होय, यशया ४२:१० म्हणते: “अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाश्‍यांसह परमेश्‍वराला [यहोवा, NW] नवगीत गा. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.” ज्या द्वीपांचे न्यूझीलंड बनले आहे ते खरोखरच यहोवाची स्तुती करतात. नद्या, खाडी, विशाल पर्वतराजी, हिमनद्या, समुद्रकिनारे, नेचे या रोपाने सजलेली आर्द्र जंगले आणि हिरवीगार चराऊ कुरणे यांसाठी प्रसिद्ध असलेले जग न्यूझीलंड, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याच्या वैभव आणि प्रतापाविषयी वक्‍तृत्वपूर्ण बोलते.

विसावे शतक संपल्यानंतर लगेचच, न्यूझीलंडच्या अधिकांश रहिवाश्‍यांनी, यहोवाची उपासना करण्याकडे वळून आणि इतरांबरोबर त्याच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करून त्याची स्तुती करण्यात आपल्या आवाजाची साथ दिली आहे. अलीकडेच, एका साक्षीदाराने नातेवाईकांना साक्ष देण्याविषयी एक चांगला अनुभव ऐकल्यावर आपल्या कुटुंबाला साक्ष देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या अनेक कौटुंबिक सदस्यांना तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकांच्या प्रती बक्षीस म्हणून दिल्या. त्याचे परिणाम काय झाले? तो सांगतो की आता त्याची बहीण आणि भाऊ बायबलचा अभ्यास करीत आहेत, एका पुतण्याचा यहोवाचा साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा झाला व बाकीचे, देवाच्या वचनातील सत्य आणखी जाणू इच्छितात. त्याच्या पालकांच्या व्यतिरिक्‍त, त्याला सहा भाऊ आणि नऊ बहिणी असल्यामुळे कार्य करण्यासाठी त्याच्याकडे आणखी पुष्कळसे क्षेत्र आहे!

साक्षीदार त्यांच्या प्रयत्नांना एकवटून राज्य सभागृह बांधत असल्यामुळे सुद्धा यहोवाची स्तुती होते. उदाहरणार्थ, रॉय पर्किन्स या वृत्तपत्र स्तंभलेखकाने मे १७, १९९४ च्या ओपोटिकी न्यूज मध्ये लिहिले: “मी ख्रिस्ती विश्‍वासात नाही तरी देखील, सर्व समर्पित कामकऱ्‍यांनी, देवाबद्दल त्यांना असलेल्या प्रीतीमुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती वेळ आणि परिश्रम घेतले हे पाहून मी किती प्रभावीत झालो.

“सप्ताहांतात केल्या गेलेल्या कामादरम्यान मी एकही युनियन वाद पाहिला किंवा ऐकला नाही. स्त्रिया त्यांच्या पुरुषांसोबत परांचीवर चढून दरजा भरणे, उचलणे, बांधकामाचे साहित्य इकडून तिकडे नेणे, ही सर्व कामे अगदी शांतीने आणि आनंदाने करीत होत्या.

“आणि त्यांच्यापैकी एकही जण सिगारेट ओढत वेळ घालवत नव्हता. तेथे काम करणारे सर्व कामकरी कोणतेही काम करत असले तरी, रंगाचा गंध आणि विटांची धूळ याच्या व्यतिरिक्‍त, वातावरण अगदी स्वच्छ आणि निर्मळ होते.”

ओपोटिकी मंडळीच्या वडीलवर्गाने लिहिले: “या संपूर्ण प्रकल्पामुळे शहराच्या लोकांवर मोठा प्रभाव पाडला आहे. असे दिसते की सर्वच जण या गोष्टीची चर्चा करत आहेत. पुष्कळ बायबल अभ्यास चालू करण्यात आले. विशेषकरून सर्वात जास्त उत्तेजित करणारा अनुभव एका अतिधार्मिक जोडप्याचा आहे, ज्यांनी त्यांच्याकडे आपण येऊ नये असे अनेक वर्षे सांगितले होते. ते दररोज जेथे बांधकाम होत होते तेथे आणि सभेला येत होते. नंतर पतीने म्हटले: ‘तुम्ही देवाचे लोक आहात हे मला दिसून येते. मला मनापासून अशा प्रकारच्या लोकांसोबत सहवास ठेवण्याची संपूर्ण जीवनभर उत्कंठा लागली होती.’”

गत वर्षी, ओटागा डेली टाईम्सच्या एका स्तंभलेखकाने, दनीदिनमध्ये त्वरित बांधलेल्या एका राज्य सभागृहाबद्दल म्हटले: “ती एक विलक्षण साध्यता होती, ते प्रेरणा आणि आत्मसहाय्याचे एक विलक्षण उदाहरण होते.” त्याच वृत्तपत्राने विवेचन मांडले: “शहरातील लोक, त्यांच्या डोळ्यांदेखत एक मोठी इमारत बांधली जात असताना प्रशंसेने पाहत होते आणि स्वयंसेवकांचा असाच एक मोठा समूह व सहकार्याचा आत्मा उपलब्ध झाला तर किती तरी इतर रूपांतरे व सकारात्मक प्रकल्प साध्य करता येतील याचा अनेक जण विचार करत असतील. राज्य सभागृह, परिणाम साध्य करणारे रचनात्मक प्रयत्नांचे एक अभिमानाचे चिन्ह आहे.”

बांधकाम चाललेल्या ठिकाणी भेट दिलेल्या शेकडो लोकांपैकी एका गृहस्थाने पाहिले, की साक्षीदार “चर्च” बांधत होते पण त्या गृहस्थाचा धार्मिक संप्रदाय, उपस्थिती घटत चाललेल्या सभासदत्वामुळे चर्च विकत होता. त्याने असे बोलण्याचे धाडस केले, “तुम्ही आणखी बारा महिन्यांसाठी थांबला असता तर आमचे एखादे चर्च तुम्हाला विकत घेता आले असते. आम्हाला आमचे एक चर्च विकावे लागेल कारण आम्ही त्याचा खर्च भागवू शकत नाही. अर्थातच, तुमच्या लोकांमध्ये पगारी पाळक नाहीत. . . . शिवाय तुमच्या इमारती कमी खर्चिक आहेत, कारण त्यांना उंच मनोरे नाहीत ज्यांची देखभाल करण्यास अतिशय कठीण आहे.”

स्पष्टतः द्वीप देवाची स्तुती करू शकतात. या सुंदर पॅसिफिक भूमीवर—आणि संपूर्ण जगभरात यहोवाची स्तुती निनादत राहो!

[९ पानांवरील चौकट]

राष्ट्राचे पार्श्‍वचित्र

१९९४ सेवा वर्ष

साक्ष देणाऱ्‍यांचा उच्चांक: १२,८६७

प्रमाण: २७१ जणांसाठी १ साक्षीदार

स्मारक विधीची उपस्थिती: २४,४३६

पायनियर प्रचारकांची सरासरी: १,३८६

बायबल अभ्यासांची सरासरी: ७,५१९

बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ५६८

मंडळ्यांची संख्या: १५८

शाखा दप्तर: मॅन्यूरिवा

[९ पानांवरील चित्रं]

सन १९३० च्या सुमारास क्षेत्रात निघालेले पायनियर

[९ पानांवरील चित्रं]

मॅन्यूरिवा येथील शाखा तरतुदी

[९ पानांवरील चित्रं]

डेवनपोर्ट, ऑकलंड येथे राज्याच्या संदेशाचा प्रचार करताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा