वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. ८-९
  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार बहामा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार बहामा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नव्या विश्‍वासाला आव्हान
  • परदेशी नवे गीत ऐकतात
  • अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. ८-९

संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार बहामा

बहामाचे प्रजासत्ताक राज्य—३,००० द्वीपसमूह आणि लहान बेटांचा समुद्र—फ्लोरिडा आणि क्युबाच्या मध्ये असलेल्या निळसर हिरव्या समुद्राच्या पलिकडे ९०० किलोमीटर दूरवर पवळ्यांच्या कंठमाळेसारखे पसरलेले आहे. त्याच्या २,६७,००० रहिवाश्‍यांमध्ये राज्य घोषकांचा वाढता स्वर आहे. त्यांच्या स्तुतीचे गीत, यशया ४२:१०-१२ मधील शब्दांची आठवण करून देतात: “अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोकहो, अहो, द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाश्‍यांसह परमेश्‍वराला [यहोवा न्यूव] नवगीत गा. . . . अरण्य व त्यांतील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यात केदार वसत आहे ती गाण्याचा गजर करोत; सेलाचे रहिवासी उत्सव करोत, ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोष करोत.”

नव्या विश्‍वासाला आव्हान

जुलै १९९२ मध्ये, एका नियमित पायनियरने त्याच्या व्यावसायिक मित्राला तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकता हे पवित्र शास्त्राचे साधन दिले. पुस्तक वाचल्यावर तो मनुष्य स्वतःस म्हणाला, ‘ह्‍या धर्मात काहीतरी विशेष आहे ज्याचे परिक्षण मी केले पाहिजे.’ पुढील दोन रविवारी तो, यहोवाच्या साक्षीदारांच्या दोन वेगवेगळ्या राज्य सभागृहांमधील सभांना उपस्थित राहिला. पुढे, त्याच्यासोबत पवित्र शास्त्र अभ्यास सुरू केला गेला. परंतु पवित्र शास्त्राचे धडे शिकण्यास केवळ सहा आठवडे झाले नाहीत तोच, त्याच्या नव्या विश्‍वासाची पारख होईल असे आव्हान त्याच्यासमोर उभे राहिले. आणि ते आव्हान—वाढदिवस साजरा करण्याचे होते.

त्या व्यापाऱ्‍याचे संपूर्ण कुटूंब अशा प्रकारच्या उत्सवांमध्ये अतिशय गुरफटलेले होते, परंतु देवाच्या वचनावरील त्याच्या प्रीतीने त्याला, त्याचे पवित्र शास्त्र धडे शिकत राहण्याची प्रेरणा दिली. शास्त्रवचनाच्या सत्याचे ज्ञान जसजसे वाढत गेले, तसे वाढदिवस व जगिक सुट्यांना साजरे करण्याची व यहोवा या गोष्टींकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या सर्वांची त्याची समज वाढत गेली.

ह्‍या मनुष्याच्या पत्नीने वडील दिनासाठी (वडिलांच्या आदराप्रीत्यर्थ जून महिन्यातील तिसरा रविवार) एका छोट्याशा मेळाव्याची योजना केली, तेव्हा, त्याने त्याला उपस्थित राहण्यास सौजन्यपूर्वक नकार दिला. तेव्हा, तिला वाटले की आता त्याला तिच्याबद्दल पहिल्यासारखे प्रेम राहिले नाही व तो तिच्यापेक्षा व कुटुंबापेक्षा त्याच्या धर्माला पहिले स्थान देतो. परंतु त्याने नम्रपणे स्पष्टीकरण दिले की पवित्र शास्त्रातून तो जे काही शिकत होता त्या गोष्टी त्याला एक चांगला पती व पित्यामध्ये रूपांतर होण्यास मदत करत होत्या. परिणामत:, शास्त्रवचनांच्या सत्यासाठी असलेल्या त्याच्या प्रीतीची ती गुणग्राहकता करू लागली व पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तयार झाली. आता तो त्याच्या कुटुंबासमवेत पवित्र शास्त्र अभ्यास घेत आहे. मागील वर्षात, “ईश्‍वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनात त्याला किती आनंद झाला! त्याची पत्नी आणि मुलगी उपस्थित होते आणि त्यांनी त्याला बाप्तिस्मा घेताना पाहिले.

परदेशी नवे गीत ऐकतात

हजारो हायतीयन परदेशी, बहामी समाजात मिसळू लागले आहेत. त्यांनीही राज्याच्या सत्याचे नवे गीत ऐकण्याची गरज आहे. दोन हायतीयन-अमेरिकी जोडपे बहामा येथे आल्यामुळे तेथील साक्षीदार कृतज्ञ आहेत. यांनी, महान बहामा आणि अबाको येथील द्वीपसमूहांवर नव्याने स्थापन झालेल्या हायतीयन गटांना सुदृढ करण्यासाठी मदत केली.

राज्याच्या संदेशामध्ये आस्थेवाईक हायतीयांसाठी आणखी साधन, क्रेओल भाषेत, जुलै ३१ ते ऑगस्ट १, १९९३ पर्यंत झालेले प्रथम प्रांतीय अधिवेशन होते. तेथील उपस्थिती २१४ पर्यंत गेली, व तीन नव्या जनांचा बाप्तिस्मा झाला. बहामा येथे सत्य शिकलेले अनेक हायतीयन स्वद्वीपाकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन वसले जेणेकडून तेथील स्थानिक साक्षीदारांसोबत यहोवाला स्तुती गाण्यासाठी त्यांचाही आवाज ते त्यात मिळवू शकतील.

[८ पानांवरील चौकट]

राष्ट्राचे पार्श्‍वचित्र

१९९३ सेवा वर्षa

साक्ष देणाऱ्‍यांचा उच्चांक: १,२९४

प्रमाण: १९७ जणांसाठी १ साक्षीदार

स्मारक विधीची उपस्थिती: ३,७९४

पायनियर प्रचारकांची सरासरी: १८६

पवित्र शास्त्र अभ्यासांची सरासरी: १,७१५

बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ७९

मंडळ्यांची संख्या: २२

शाखा दप्तर: नासो

[तळटीपा]

a अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांची १९९४ ची दिनदर्शिका पहा.

[९ पानांवरील चित्रं]

शाखा दप्तर व मिशनरी गृहासोबत, पहिले राज्य सभागृह

[९ पानांवरील चित्रं]

साक्षीदार आवेशाने सुवार्तेचा प्रचार करत आहेत

[९ पानांवरील चित्रं]

मिल्टन जी. हेंश्‍चल व नेथन एच. नॉर, ४५ वर्षांपूर्वी नासो येथील मिशनऱ्‍यांसोबत

[९ पानांवरील चित्रं]

फेब्रुवारी ८, १९९२ रोजी समर्पित केलेले नवे शाखा दप्तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा