खऱ्या देवाचे भय आता का बाळगावे?
“देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” —उपदेशक १२:१३.
१, २. देवाचे उचित भय असणे योग्य का आहे?
मनुष्यासाठी देवाचे हितकर आणि श्रद्धायुक्त भय चांगले आहे. होय, अनेक मानवी भय भावनात्मकरित्या त्रस्त करणारे इतकेच नव्हे तर हानीकारकही असले, तरी यहोवा देवाचे भय बाळगणे आपल्याकरता चांगले आहे.—स्तोत्र ११२:१; उपदेशक ८:१२.
२ निर्माणकर्त्याला हे माहीत आहे. तो आपल्या निर्मितीठायी असलेल्या प्रेमामुळे त्याचे भय बाळगण्याची व त्याची उपासना करण्याची आज्ञा सर्वांना देतो. आपण वाचतो: “मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला: देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले,’ त्याला नमन करा.”—प्रकटीकरण १४:६, ७.
३. आपल्या पहिल्या पालकांसाठी निर्माणकर्त्याने काय केले?
३ सर्व गोष्टींची निर्मिती केलेल्या व जीवनाचा उगम असलेल्या निर्माणकर्त्याकडे आपण निश्चितच दुर्लक्ष करू नये, कारण त्याची आपल्यावर आणि या ग्रहावर मालकी आहे. (स्तोत्र २४:१) यहोवाने उत्कट प्रीतीची अभिव्यक्ती करून त्याच्या पार्थिव मुलांना जीवन दिले व राहण्यासाठी अद्भुत जागा—सुंदर परादीस दिले. तथापि, ही अद्भुत देणगी बिनशर्त नव्हती. वस्तुतः, विश्वासाने काळजी घेण्यासाठी ती त्यांच्या स्वाधीन केली होती. आपल्या प्रथम पालकांना त्यांच्या घराची काळजी घ्यावयाची होती आणि संपूर्ण पृथ्वी लोकवस्तीने व्यापून व सत्तेखाली आणेपर्यंत विस्तारित करावयाची होती. त्यांच्यासोबत व त्यांच्या संततीसोबत राहणारे इतर सर्व जिवंत प्राणी—भूमीवरील पशू, पक्षी आणि मासे याविषयी त्यांना विशेषाधिकार व जबाबदाऱ्या होत्या. स्वाधीन करण्यात आलेल्या या मोठ्या मालमत्तेसाठी मनुष्य जबाबदार असणार होता.
४. मानवाने देवाच्या सृष्टीला काय केले आहे?
४ असा अद्भुत आरंभ केला असतानाही, मनुष्याने या सुंदर पार्थिव घराला कसे दूषित केले आहे, ते जरा पाहा! या रत्नावर देवाची मालकी असण्याला तिरस्करणीय अनादर दाखवून, मानवांनी ही पृथ्वी घाणेरडी केली आहे. हा दूषितपणा, पशूपक्षी आणि मासे यांच्या अधिकाधिक जातींच्या अस्तित्वाला धोका संभवण्याच्या बेतात आहे. आपला न्यायी व प्रेमाळू देव हे अनिश्चित काळापर्यंत सहन करणार नाही. पृथ्वीचे नागवणे जाब विचारण्याची मागणी करत आहे, हे अनेकांसाठी भय बाळगण्याचे कारण आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, काय घडेल हे जाणणे, देवावर आदराने भाव ठेवणाऱ्यांसाठी सांत्वनदायक आहे. यहोवा जाब विचारीलच आणि पृथ्वी पूर्ववत होईलच. ही पृथ्वीवरील सर्व प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांकरता खरोखर आनंदाची वार्ता आहे.
५, ६. मानवाने यहोवाच्या सृष्टीला जे काही केले आहे त्याबद्दल तो कशी प्रतिक्रिया दाखवील?
५ देव कोणाद्वारे त्याचा न्यायदंड बजावेल? देवाच्या स्वर्गीय राज्याचा आता सिंहासनाधिष्ट झालेला राजा, येशू ख्रिस्त याद्वारे. त्या स्वर्गीय पुत्राद्वारे यहोवा, या सध्याच्या अशुद्ध व बंडखोर व्यवस्थीकरणाची समाप्ती करील. (२ थेस्सलनीकाकर १:६-९; प्रकटीकरण १९:११) या रीतीने तो आपले भय बाळगणाऱ्यांची मुक्तता आणि त्याचवेळी आपल्या पार्थिव घराचा बचाव व संरक्षण करील.
६ हे कसे घडेल? बायबल, हर्मगिदोनात कळसास पोहंचणाऱ्या भावी मोठ्या संकटाविषयी सांगते. (प्रकटीकरण ७:१४; १६:१६) हे प्रदूषित व्यवस्थीकरण आणि प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध हा देवाचा न्यायदंड असेल. कोणी मानव जिवंत राहतील का? होय! ज्यांना देवाचे हानीकारक व अहितकर भय नसून आदरयुक्त व पूज्यबुद्धीचे भय आहे, असे ते लोक असतील. त्यांना मुक्त केले जाईल.—नीतिसूत्रे २:२१, २२.
सामर्थ्याचे जबरदस्त प्रदर्शन
७. देवाने मोशेच्या दिवसात इस्राएलाच्या वतीने मध्यस्थी का केली?
७ यहोवा देवाची ही नाट्यमय कृती, आपल्या उपासकांच्यावतीने सामान्य युग पूर्व सुमारे १,५०० वर्षांआधी सामर्थ्यशाली कृत्य तडीस नेण्याद्वारे पूर्वचित्रित करण्यात आली होती. इजिप्तच्या बलाढ्य सैन्य बळाने परदेशी इस्राएलांच्या कामगारांना गुलाम बनविले इतकेच नव्हे, तर त्यांचा शासक फारो याने इस्राएली लोकांच्या सर्व नवजात बालकांना ठार मारण्याची आज्ञा दिली तेव्हा जातिसंहार घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवाचा इजिप्तवरील विजय, त्या जुलमी राजनैतिक व्यवस्थीकरणापासून, होय अनेक दैवतांची भक्ती करून दूषित झालेल्या राष्ट्रापासून इस्राएलाची मुक्तता घडवून आणण्यावर होता.
८, ९. देवाच्या हस्तक्षेपाबद्दल मोशे आणि इतर इस्राएलांनी कसा प्रतिसाद दर्शवला?
८ निर्गम याचा १५ वा अध्याय, इजिप्तमधून इस्राएलाची मुक्तता झाल्यावर त्याच्या प्रतिक्रियेचा अहवाल देतो. या अहवालाचे परीक्षण केल्यावर, आध्यात्मिक आणि शारीरिकरित्या प्रदूषित झालेल्या या सद्य व्यवस्थेतून ख्रिश्चनांना कसे बचावण्यात येऊ शकते, याची गुणग्राहकता बाळगण्यास आपल्याला मदत होईल. आपण खरा देव, यहोवा याचे भय बाळगण्याची निवड का केली पाहिजे, हे शिकण्यासाठी निर्गमच्या १५ व्या अध्यायातील निवडक वचनांवर लक्ष केंद्रित करून याचा विचार करू या. आपण पहिल्या व दुसऱ्या वचनाने सुरवात करू:
९ “तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला [यहोवाला, NW] हे गीत गाईले; ते म्हणाले: मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत परमेश्वर माझे बल माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे.”
१०. देवाने इजिप्तच्या सैन्यांचा नाश कशामुळे केला?
१० यहोवाने इजिप्तमधून इस्राएलाची सुटका कशी केली, हा अहवाल जगभरातील सर्व लोकांच्या परिचयाचा आहे. त्याने त्या बलाढ्य जागतिक सत्तेवर पीडा आणल्या, मग फारोने इस्राएल लोकांना जाऊ देण्याची अनुमती दिली. परंतु, नंतर फारोच्या सैन्यांनी स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या या लोकांचा पाठलाग केला आणि असे दिसले, की तांबड्या समुद्राच्या तीरावर असताना त्यांना अडचणीत पकडले. इस्राएलाचे पुत्र त्यांचे नव्याने मिळालेले स्वातंत्र्य लगेच गमावतील असे वाटत असले तरी, यहोवाच्या मनात वेगळेच काही होते. त्याने चमत्कारिकरित्या समुद्रातून मार्ग केला आणि आपल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आणले. इजिप्तचे लोक त्यांच्या पाठोपाठ गेले तेव्हा त्याने तांबड्या समुद्राचे पाणी पूर्ववत केले व फारो आणि त्याच्या सैन्यबळाला पाण्यात बुडवून टाकले.—निर्गम १४:१-३१.
११. देवाने इजिप्तविरुद्ध कारवाई करण्याचा परिणाम काय झाला?
११ यहोवाने इजिप्तच्या सैन्यबळाचा नाश केल्यामुळे तो आपल्या उपासकांच्या नजरेत उंचावला गेला आणि त्याचे नाव सर्वत्र परिचित झाले. (यहोशवा २:९, १०; ४:२३, २४) होय, आपल्या उपासकांना वाचवण्यास असमर्थ ठरलेल्या इजिप्तमधील निर्बळ, खोट्या दैवतांपेक्षा त्याचे नाव अधिक उंचावले गेले. इजिप्तमधील लोकांना त्यांची दैवते, मर्त्य मानव आणि सैन्यबळ यावरील भरवशामुळे कटू निराशा झाली. (स्तोत्र १४६:३) इस्राएल लोक देवाची स्तुती गाण्यास प्रवृत्त झाले होते, ज्यामुळे आपल्या लोकांची सामर्थ्याने मुक्तता करणाऱ्या जिवंत देवाचे हितकर भय प्रदर्शित झाले, यात काही आश्चर्य नाही!
१२, १३. तांबड्या समुद्रावरील देवाच्या विजयाबद्दल आपण काय शिकले पाहिजे?
१२ अशाच रितीने, आपल्या काळातील कोणतेही खोटे दैवत आणि कोणतीही उच्चशक्ती, तिच्याजवळ अणुशक्ती असली तरी यहोवाची तुलना करू शकणार नाही, हे आपण ओळखले पाहिजे. तो आपल्या लोकांची मुक्तता करू शकतो आणि करील. “तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील सर्व रहिवाश्यांचे इच्छेस येईल ते करितो; तू असे काय करितोस, असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.” (दानीएल ४:३५) या शब्दांची पूर्ण समज प्राप्त झाल्यावर आपण देखील आनंदाने त्याची स्तुती गाण्यास प्रवृत्त होतो.
१३ तांबड्या समुद्रावरील विजयाचे गीत पुढे असे आहे: “परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.” तथापि, हा अजिंक्य योद्धा, मानवी कल्पनेची काही निनावी कल्पित गोष्ट नाही. त्याला नाव आहे! तो ‘व्हावयाला लावणारा,’ महान घडवणारा, ‘ज्याचे नाव यहोवा असा सर्व पृथ्वीवर परात्पर’ असणारा आहे. (निर्गम ३:१४; १५:३-५; स्तोत्र ८३:१८) प्राचीन इजिप्तमधील त्या लोकांनी यहोवाचा अवमान करण्याऐवजी त्या सर्वसमर्थाचे रास्त व आदरयुक्त भयाची जाणीव बाळगणे सुज्ञतेचे ठरले असते, याबरोबर तुम्ही सहमत नाही का?
१४. तांबड्या समुद्राजवळ ईश्वरी भयाचे मूल्य कसे प्रदर्शित करण्यात आले?
१४ पृथ्वीचा रचनाकार असल्यामुळे, समुद्र बनविणाऱ्याचे पाण्याच्या विस्तारावर पूर्ण नियंत्रण आहे. (निर्गम १५:८) वायुवर देखील आपले नियंत्रण उपयोगात आणून, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्याने साध्य केल्या. त्याने जलराशींना विशिष्ट ठिकाणी वेगळे केले व त्याच्या लोकांना त्यामधून जाण्याकरता मार्ग व्हावा म्हणून पाण्याच्या भिंती बनवण्यासाठी जलराशींना मागे विरुद्ध दिशेला लोटले. डोळ्यापुढे याचे चित्र उभे करा: समुद्राचे लक्षावधी टन पाणी भिंतीसारखे उभे करून इस्राएलांसाठी बचावाचा एक सुरक्षित मार्ग तयार केला. होय, देवाचे हितकर भय बाळगणाऱ्यांना सुरक्षितता मिळाली. मग यहोवाने पाण्याचा मार्ग मोकळा करून पाणी महापुराप्रमाणे जोराने वाहू दिले, त्यात फारोचे सैन्य आणि त्यांच्या सर्व साधनांना गिळंकृत करण्यात आले. निरर्थक दैवते आणि मानवी सैन्यबळावरील ईश्वरी सामर्थ्याचे केवढे प्रदर्शन! निश्चितच, केवळ यहोवाचेच भय बाळगण्यास हवे, नाही का?—निर्गम १४:२१, २२, २८; १५:८.
देवाबद्दल आपले भय प्रदर्शित करणे
१५. देवाच्या शक्तिशाली बचावाच्या कृत्यांबद्दल आपला प्रतिसाद कसा असला पाहिजे?
१५ आपण मोशेसोबत सुरक्षित उभे असतो तर, निश्चितच असे गाण्यास प्रवृत्त झालो असतो: “हे परमेश्वरा [यहोवा], देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू त्या तुझ्यासारखा कोण आहे?” (निर्गम १५:११) तेव्हापासून आतापर्यंतच्या शतकांमध्ये अशा भावनांचे पडसाद उठत गेले. बायबलच्या शेवटल्या पुस्तकात, प्रेषित योहान देवाच्या विश्वासू अभिषिक्त सेवकांच्या गटाचे वर्णन असे करतो: ‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गातात.’ ते महान गीत कोणते आहे? “हे प्रभु देवा, सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र [निष्ठावान] आहेस.”—प्रकटीकरण १५:२-४.
१६, १७. आज कोणती अद्भुत वाढ होत असल्याचे आपण पाहतो?
१६ अशाच रितीने आजही बंधमुक्त उपासक, देवाच्या केवळ सर्जनशील हस्तकृतीचीच नाही, तर त्याच्या हुकुमांची देखील गुणग्राहकता बाळगतात. देवाच्या नीतिमान आज्ञा ओळखून त्यांचा अवलंब करत असल्यामुळे सर्व राष्ट्रातील लोक आध्यात्मिकरित्या मुक्त आणि या प्रदूषित जगापासून वेगळे झाले आहेत. दरवर्षी लाखो लोक यहोवाच्या उपासकांच्या शुद्ध, प्रामाणिक संघटनेत राहण्याकरता या भ्रष्ट जगातून निघतात. लवकरच, खोटा धर्म आणि या उर्वरित दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध देवाच्या अग्निमय न्यायदंडांची अंमलबजावणी झाल्यावर हे लोक नीतिमान नवीन जगात अनंतकाल जगतील.
१७ प्रकटीकरण १४:६, ७ च्या एकमतात मानवजात आता, यहोवाचे साक्षीदार देवदूतीय मार्गदर्शनानुसार घोषित करीत असलेले न्यायदंडाचे इशारेवजा संदेश ऐकत आहेत. गत वर्षी, २३० पेक्षा अधिक देशांमध्ये जवळपास ५० लाख साक्षीदारांनी देवाच्या राज्याची सुवार्ता आणि त्याच्या न्यायाची घटका घोषित केली. साक्षीदारांनी त्यांच्या सहमानवांचा बचाव व्हावा म्हणून त्यांना शिक्षित करण्यासाठी लोकांच्या घरी नियमित भेटी दिल्या व मोफत बायबल अभ्यास संचालित केले. खऱ्या देवाचे जाणीवपूर्वक भय बाळगता यावे म्हणून, दर वर्षी लाखो जण पुरेसे शिकतात, आपले जीवन समर्पित करतात आणि बाप्तिस्मा घेतात. असे लोक खऱ्या देवाचे भय बाळगू लागले आहेत, हे किती आनंददायक आहे बरे!—लूक १:४९-५१; प्रेषितांची कृत्ये ९:३१; पडताळा इब्रीयांस ११:७.
१८. आपल्या प्रचारकार्यात देवदूतांचा समावेश आहे हे कशावरून स्पष्ट होते?
१८ या प्रचार कार्यात देवदूतांचा समावेश आहे, हे खरे का? यहोवाच्या साक्षीदारांना दिव्यदूतीय मार्गदर्शनाने याचना करीत असलेल्या खिन्न इतकेच नव्हे तर आध्यात्मिक मदतीसाठी प्रार्थना करीत असलेल्याच्या घरी नेले, हे समजण्याजोगे आहे! उदाहरणार्थ, करिबियन द्वीपावर राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना एक लहान मुलगा यहोवाच्या दोन साक्षीदारांसोबत होता. दुपार होऊ लागली असता, या दोन स्त्रियांनी कार्य थांबवण्याचे ठरवले. परंतु, पुढच्या घरी जाण्यासाठी तो मुलगा असामान्यरित्या उत्सुक होता. त्यावेळी या स्त्रियांची प्रचार करण्याची इच्छा नसल्याचे त्याने पाहिल्यावर, तो एकटाच गेला व त्याने दार वाजवले. एका युवतीने दार उघडले. त्या स्त्रियांनी हे पाहिले तेव्हा त्या तेथे गेल्या व तिच्यासोबत बोलल्या. तिने आत बोलावून त्यांना म्हटले, दार वाजल्याचा आवाज ऐकू आला त्यावेळी बायबल शिकवण्यासाठी देवाने साक्षीदारांना तिच्याकडे पाठवावे अशी प्रार्थना ती करीत होती. बायबल अभ्यासाकरता योजना करण्यात आल्या.
१९. देवाचे भय बाळगण्याचा एक लाभ दर्शवण्यासाठी आपण कोणती गोष्ट दाखवू शकतो?
१९ आपण देवाचा न्यायदंडाचा संदेश विश्वासूपणे देतो, तेव्हा त्याचे धार्मिक नियम देखील शिकवतो. लोकांच्या जीवनात यांचा अवलंब झाल्यास, भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात. उदाहरणार्थ, बायबल सर्व प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेचा स्पष्टपणे धिक्कार करते. (रोमकर १:२६, २७, ३२) आज जगामध्ये सर्वत्र ईश्वरी दर्जांकडे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम? विवाह मोडकळीस येत आहेत. अपराधात वाढ होत आहे. अपंग करणारे किंवा लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार या २० व्या शतकात साथीच्या आजारासारखे फैलावत आहेत. वस्तुत:, लैंगिक अनैतिकतेमुळे भीतीदायक एड्स आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. परंतु, देवाबद्दल आदरयुक्त भय त्याच्या खऱ्या उपासकांसाठी मोठे संरक्षण असल्याचे शाबीत झाले नाही का?—२ करिंथकर ७:१; फिलिप्पैकर २:१२; तसेच प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ देखील पाहा.
देवाचे भय आता बाळगण्याचे परिणाम
२०. यहोवाच्या साक्षीदारांच्या वर्तनाबद्दल इतरांना माहीत आहे, यास कोणती गोष्ट स्पष्ट करते?
२० देवाचे भय बाळगणाऱ्यांना व त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांसाठी त्याचे विपुल आशीर्वाद आहेत. यहोवाच्या साक्षीदारांचे, नैतिकरित्या योग्य असणाऱ्या ख्रिश्चनांचे मिळून एक शांतीदायक बंधुत्व बनते, ही वास्तविकता जनमान्य होत असल्याचे स्पष्ट करणाऱ्या एका घटनेचा विचार करा. दक्षिण अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनातील अनेक प्रतिनिधी, म्हणजेच साक्षीदार एका हॉटेलमध्ये राहत होते आणि याच हॉटेलमध्ये राष्ट्रपतींच्या भाषणासाठी एके रात्री, गैर-साक्षीदारांची सभा भरवण्यात आली होती. सुरक्षा गटाने राष्ट्रपतीला त्वरेने लिफ्टमध्ये आणल्यावर, लिफ्टमध्ये कोण आहे याबद्दल जाणीव नसल्यामुळे एक साक्षीदार बहीण देखील लिफ्टमध्ये गेली व याचे सुरक्षा करणाऱ्या मनुष्यांना आश्चर्य वाटले! तिने काय केले याची जाणीव झाल्यावर, या साक्षीदार बहिणीने अनाहूतपणे आत शिरल्याची माफी मागितली. तिने अधिवेशनाचे बॅज कार्ड दाखवून साक्षीदार असल्याची ओळख दिली आणि राष्ट्रपतीला तिच्याकडून काही धोका होणार नाही, असे तिने म्हटले. स्मित करून त्या संरक्षकाने म्हटले: “सर्व लोक, यहोवाच्या साक्षीदारांसारखेच असते, तर अशा प्रकारच्या सुरक्षिततेची काही जरुर भासली नसती.”—यशया २:२-४.
२१. आज लोकांसमोर कोणते कार्य करण्याचे मार्ग खुले आहेत?
२१ यहोवा अशा प्रकारच्या लोकांना या व्यवस्थीकरणाचा शेवट करणाऱ्या ‘मोठ्या संकटातून बचावण्यासाठी’ आता एकत्र आणि तयार करत आहे. (प्रकटीकरण ७:९, १०, १४) हा बचाव एक योगायोग असणार नाही. बचावलेल्यांपैकी असण्यासाठी एखाद्या व्यक्तीने यहोवाचे भय बाळगले पाहिजे, त्याला न्याय्य सार्वभौम म्हणून ओळखले पाहिजे व समर्पण केले पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक जण, ज्यामुळे संरक्षण मिळेल असे भय विकसित करणार नाहीत. (स्तोत्र २:१-६) उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यानुसार, यहोवाचा निवडलेला शासक, येशू ख्रिस्त, १९१४ या निर्णायक वर्षापासून राजा या नात्याने राज्य करीत आहे. याचा अर्थ, लोकांनी यहोवाचे हितकर भय विकसित आणि प्रदर्शित करण्यासाठी उरलेला समय वेगाने संपुष्टात येत आहे. तथापि, आपला निर्माणकर्ता, वैयक्तिकांना इतकेच नव्हे तर उच्चपदी असणाऱ्यांनाही प्रतिसाद देण्याची संधी देतो: “राजांनो आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची [यहोवा] सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.”—स्तोत्र २:७-१२.
२२. देवाचे भय आता बाळगणाऱ्यांकरता कोणते भवितव्य आहे?
२२ आपली सुटका करणारा अशी आपल्या निर्माणकर्त्याची स्तुती करणाऱ्यांपैकी आपण असू या. यामुळे खऱ्या देवाचे आता भय बाळगण्याची जबाबदारी आपल्यावर येते! (पडताळा स्तोत्र २:११; इब्रीयांस १२:२८; १ पेत्र १:१७.) आपण त्याच्या नीतिमान आज्ञा सतत शिकत आणि त्यांचे पालन करत राहिले पाहिजे. यहोवा पृथ्वीवरील सर्व दुष्टता काढून टाकतो आणि मानव व त्याच्या पार्थिव घरावरील पापाचे दूषित प्रभाव बरे करण्यास आरंभ करतो, तेव्हा प्रकटीकरण १५:३, ४ मध्ये नमूद केलेल्या मोशे आणि कोकऱ्याच्या गीताचा उत्कर्ष होईल. मग आपल्या संपूर्ण अंतःकरणांनी आपण गाऊ: “हे प्रभु, देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो [यहोवा] तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?”
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवा आपल्या हितकर भयाच्या योग्य का आहे?
◻ तांबड्या समुद्राजवळ देवाने जे साध्य केले त्यातून काय प्रकट करण्यात आले?
◻ आपण यहोवाचे आदरयुक्त भय बाळगल्यामुळे कोणते लाभ मिळतात?
◻ खऱ्या देवाचे भय आता बाळगणाऱ्यांसाठी कोणते भवितव्य आहे?