वाचकांचे प्रश्न
“माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे,” असे म्हणण्यामागे शिष्य याकोबाचा काय अर्थ होतो?—याकोब ३:१.
याकोब निश्चितच ख्रिश्चनांना इतरास सत्य शिकवण्यापासून निरुत्साहित करत नव्हता. मत्तय २८:१९, २० मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना “सर्व राष्ट्रांतील लोकास शिष्य करा . . . जे काही मी तुम्हास आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा,” अशी आज्ञा दिली. यास्तव, सर्व ख्रिश्चनांनी शिक्षक असलेच पाहिजे. प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना ते अद्याप शिक्षक झाले नव्हते म्हणून सल्ला दिला. त्याने लिहिले: “वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे.”—इब्रीयांस ५:१२.
मग याकोब कशाबद्दल बोलत होता? मंडळीमध्ये शिकवण्याचे खास सुहक्क असलेल्यांचा तो उल्लेख करत होता. इफिसकर ४:११ मध्ये आपण वाचतो: “त्यानेच, [मंडळीचा मस्तक, येशू ख्रिस्त] कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले.” आजच्या प्रमाणे तेव्हाही, पहिल्या शतकातील मंडळ्यांमध्ये शिकवण्याचे खास सुहक्क होते. उदाहरणार्थ, नियमन मंडळ “विश्वासू व बुद्धिमान दासाला” चित्रित करते व त्यांच्यावर जगव्याप्त मंडळांच्या शिक्षणावर देखरेख करण्याची जबाबदारी आहे. (मत्तय २४:४५) प्रवासी पर्यवेक्षकांवर आणि मंडळीतील वडिलांवरही शिकवण्याच्या खास जबाबदाऱ्या आहेत.
देवाचा अधिक दंड होईल या भीतीने शिक्षकाची भूमिका स्वीकारू नये असे कार्यक्षम ख्रिस्ती पुरुषांना याकोब सांगत होता का? मुळीच नाही. १ तीमथ्य ३:१ म्हणते: “कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो.” तेव्हा, या वचनात सूचित केल्यानुसार वडिलाचे पद एक मोठा सुहक्क आहे. मंडळीतील वडिलाची नियुक्ती होण्यासाठी एक आवश्यकता म्हणजे एका पुरुषाला “निपुण शिक्षक” असले पाहिजे. (१ तीमथ्य ३:२) याकोबाने पौलाच्या प्रेरित शब्दांचे खंडन केले नाही.
परंतु, सा. युगाच्या पहिल्या शतकामध्ये काही जण पात्रता नसताना व त्यांची नियुक्ती झालेली नव्हती तरीही स्वतःला शिक्षक म्हणवून घेत होते असे दिसते. त्यांना बहुधा असे वाटले, की त्या भूमिकेमध्ये काही प्रामुख्य आहे आणि त्यांना व्यक्तिगत प्रशंसा हवी होती. (पडताळा मार्क १२:३८-४०; १ तीमथ्य ५:१७) प्रेषित योहानाने दियत्रफेसचा उल्लेख केला की त्याला ‘अग्रगण्य होण्याची लालसा असल्यामुळे त्याने योहानाकडून कशाचाही आदराने स्वीकार केला नाही.’ (३ योहान ९, NW) पहिले तीमथ्य १:७, ‘नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहणारे परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खातरीने सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही’ अशा विशिष्ट जणांबद्दल सांगते. याकोब ३:१ मधील शब्द, चुकीचा हेतू मनी बाळगून शिक्षक होऊ पाहणाऱ्या पुरुषांना खासपणे लागू होतात. असे लोक कळपाला गंभीरपणे हानी पोहंचवू शकतात व त्यानुसार त्यांना अधिक दंड होईल.—रोमकर २:१७-२१; १४:१२.
पात्र असलेले व शिक्षक या नात्याने कार्य करणाऱ्यांसाठी देखील याकोब ३:१ हे एक चांगली स्मरणिका आहे. त्यांच्यावर पुष्कळ काही सोपवण्यात आल्यामुळे त्यांच्याकडून तितकेच मागण्यात येईल. (लूक १२:४८) येशू म्हणाला: “माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.” (मत्तय १२:३६) नियुक्त वडील, अधिक प्रभाव असणाऱ्यांच्याबाबतीत हे विशेषपणे खरे ठरते.
वडीलजन यहोवाच्या मेंढरांसोबत जसा व्यवहार करतील त्याप्रकारे त्यांना हिशोब द्यावा लागेल. (इब्रीयांस १३:१७) ते जे काही म्हणतात त्यामुळे जीवनावर प्रभाव पडतो. यास्तव, एका वडिलाने परूशांप्रमाणे स्वतःच्या मताला बढती देण्याविषयी किंवा मेंढरांना गैरवागणूक देण्याविषयी दक्ष असले पाहिजे. येशूने दाखवलेली खोल प्रीती प्रदर्शित करण्यास त्याने झटले पाहिजे. शिक्षण देण्याच्या प्रत्येक प्रसंगी, विशेषपणे न्यायाधीन प्रकरणांमध्ये वडिलाने विचारपूर्वक बोलावे, फटकळ किंवा अगदी स्वतःच्या कल्पना व्यक्त करू नयेत. यहोवा, त्याचे वचन व त्याच्या संघटनेद्वारा मिळणाऱ्या त्याच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे विसंबून राहिल्याने मेंढपाळाला “अधिक दंड” नव्हे तर देवाचा समृद्ध आशीर्वाद प्राप्त होईल.