वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ७/१५ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • गब्रीएल मरीयाला भेटायला येतो
    बायबलमधून शिकू या!
  • जन्मापूर्वीच सन्मानित केलेला
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • देवदूत मरीयेला भेट देतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “पाहा! मी प्रभूची दासी!”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ७/१५ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

येशूची आई झालेली मरीया, तिची नातलग अलीशिबा हिला भेटण्यास गेली तेव्हा गरोदर होती का?

होय, उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार ती गरोदर होती.

लूकच्या पहिल्या अध्यायात सुरवातीला आपण (बाप्तिस्मा देणाऱ्‍या) योहानाला जन्म देणाऱ्‍या जखऱ्‍या याजकाच्या पत्नीच्या गरोदरपणाविषयी वाचतो. अलीशिबा ‘सहा महिन्यांची गरोदर होती तेव्हा गब्रीएल देवदूताने,’ मरीया गरोदर राहून ‘परात्पराच्या पुत्राला’ जन्म देईल हे सांगण्यासाठी मरीयाला भेट दिली. (लूक १:२६, ३०-३३) परंतु मरीया गरोदर कधी राहिली?

देवदूताच्या भेटीनंतर मरीया तिची गरोदर नातलग अलीशिबा हिला भेटण्यासाठी यहुदाला प्रवास करून जाते असा लूकचा अहवाल पुढे सांगतो. या दोन्ही स्त्रिया एकमेकींना भेटल्या तेव्हा अलीशिबाच्या उदरातील बाळाने (योहानाने) उडी मारली. अलीशिबाने ‘मरीयाच्या पोटच्या फळाचा’ उल्लेख केला आणि तिला ‘माझ्या प्रभूच्या माते’ असे संबोधले. (लूक १:३९-४४) यास्तव, मरीया आधीच गरोदर होती, ती अलीशिबाला भेटण्यास गेली होती तेव्हाच गरोदर होती असा तर्कशुद्ध समारोप करता येतो.

लूक १:५६ असे वाचते: “नंतर मरीया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली.” हे वचन दिनदर्शिकेच्या नेमक्या दिवसाचा विशेष उल्लेख करण्यासाठी अचूक मोजणी करत नाही. ते “सुमारे तीन महिने” असे म्हणते ज्यावरून अलीशिबाचा नववा महिना असल्याचे दिसून येते.

अलीशिबाला तिच्या गरोदरपणाच्या शेवटल्या दिवसांमध्ये मदत केल्यानंतर मरीया नासरेथमधील तिच्या घरी परतली. अलीशिबाने बाळाला (योहानाला) जन्म दिल्यानंतर पुष्कळ पाहुणे, कदाचित तिचे स्वतःचे नातेवाईक देखील भेटावयास येतील हे मरीयाने ओळखले. एका अविवाहित तरुण स्त्रीला गरोदर असणे किती विचित्र किंवा अस्वस्थजनक झाले असते. मरीया नासरेथला परतण्यासाठी निघाली तेव्हा ती किती महिन्यांची गरोदर होती? मरीया अलीशिबासोबत ‘सुमारे तीन महिन्यांसाठी’ होती म्हणजेच नासरेथला परताना कदाचित तिचा तिसरा महिना संपत आला असेल किंवा नुकताच चौथा महिना लागला असेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा