वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ७/१५ पृ. ३२
  • आरसा काय प्रकट करतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आरसा काय प्रकट करतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ७/१५ पृ. ३२

आरसा काय प्रकट करतो?

जरा आरशात पहा. तुम्हाला काय दिसते? कधीकधी तुमच्या स्वरुपात तुम्हाला अस्वस्थ करणारी उणीव दिसेल व इतर जण ती पाहण्याआधी तिला सुधारण्यास तुम्हाला आवडेल.

बायबल बहुधा आरशासारखेच आहे. ते आपल्याला स्वतःचे खरे स्वरूप पाहण्यास मदत करू शकते जे देवाच्या नजरेतील आपल्या किंमतीचा अधिक—किंवा फारच कमी—विचार करण्यापासून प्रतिबंध करील. (मत्तय १०:२९-३१; रोमकर १२:३) शिवाय, बायबल आपल्याला सुधारणा कराव्या लागणाऱ्‍या आपल्या बोलण्याच्या, वागणूकीच्या व मनोवृत्तीच्या उणीवांना प्रकट करते. अशा वेळी तुम्ही आरसा जे काही प्रकट करतो त्याकडे दुर्लक्ष कराल का?

बायबल लेखक याकोब लिहितो: “जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या माणसासारखा आहे; तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो.”—याकोब १:२३, २४.

याच्याविरूद्ध, याकोब आणखी एका मनुष्याचे वर्णन देतो जो “स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो.” (याकोब १:२५) येथे भाषांतरीत केलेला ग्रीक शब्द “निरीक्षण” याचा अर्थ डोकावून किंवा वाकून पाहणे असा होतो. “ओझरते पाहणे यापेक्षा यात अधिक काही समाविष्ट आहे,” असे थिओलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट म्हणते. तो शब्द, एखाद्या गुप्त वस्तूला सूक्ष्म दृष्टीने शोधण्याला सूचित करतो. “काही तरी अशी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी, पाहणाऱ्‍याला स्पष्टपणे दिसत नाही किंवा लगेचच तिचा अर्थ कळत नाही आणि तरीदेखील तिला पाहण्याची तीव्र इच्छा त्याला लागलेली असते,” असे बायबल विवेचनकार आर. वी. जी. टास्कर लिहितात.

तेव्हा, देवाच्या वचनाच्या आरशामध्ये तुम्ही स्वतःचे निरीक्षण करून त्याच्या आवश्‍यकतेनुरूप क्रिया कराल का? याकोब पुढे म्हणतो: “तो [मनुष्य] ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.”—याकोब १:२५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा