वाचकांचे प्रश्न
गलतीकर ६:८ नुसार “जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.” येथे कोणत्या ‘आत्म्याबद्दल’ सांगण्यात आले आहे आणि आपण जीवनाच्या पिकाची कापणी कशी मिळवू शकतो?
इब्री आणि ग्रीक संज्ञांमध्ये “आत्मा” या शब्दाला भाषांतरीत केले आहे आणि या सज्ञांचे विभिन्न अर्थ होतात, जसे की: (१) देवाची कार्यकारी शक्ती, (२) मानव किंवा प्राण्यांमधील जीवन-शक्ती, (३) एखाद्या व्यक्तिला प्रवृत्त करणारी मानसिक शक्ती आणि (४) आत्मिक व्यक्ती किंवा देवदूत. यापैकीचा पहिला अर्थ—देवाची कार्यकारी शक्ती—आपल्याला गलतीकर ६:८ मध्ये आढळतो.
याच्या पार्श्वभूमिकरता गलतीकर ३:२ कडे लक्ष द्या. या ठिकाणी गलतीकर पुस्तकात “आत्मा” या शब्दाचा पहिल्यांदा उपयोग केलेला आपल्याला आढळतो. “तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला?,” असे पौलाने ख्रिश्चनांना विचारले. त्यानंतर त्याने गलतीकर ३:५ मध्ये त्या ‘आत्म्याचा’ संदर्भ महत्कृत्ये करण्याशी लावला. म्हणूनच त्याने उल्लेख केलेला “आत्मा” पवित्र आत्मा म्हणजेच देवाची अदृश्य कार्यकारी शक्ती हा होता.
त्यानंतर पौलाने गलतीकर ५:१६ मध्ये आत्मा आणि देह यातील तफावत दाखवली. आपण वाचतो: “मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.” “देहवासना” म्हणजे पापी मानवी देह, असा त्याचा यामागील अर्थ होता. यास्तव, गलतीकर ५:१९-२३ मध्ये त्याने ‘आत्म्याद्वारे निष्पन्न होणाऱ्या फळाच्या’ विरुद्धतेत ‘देहाच्या कर्मांची’ यादी दिली.
या कारणास्तव, गलतीकर ६:८ मधील, ‘देहासाठी पेरणारी’ व्यक्ती ‘देहाच्या कर्मांमध्ये’ पूर्णपणे गुंग होऊन स्वतःला पापी मानवी आकांक्षेप्रमाणे वागण्याची मुभा देणारी असली पाहिजे. अशा वर्तणूकीचा त्या व्यक्तीवर अनिष्ट परिणाम होतील आणि तिने यात बदल केला नाही तर तिला निश्चितच देवाच्या राज्यामध्ये किंवा त्याच्या आधिपत्याखाली प्रवेश मिळणार नाही.—१ करिंथकर ६:९ १०.
एकनिष्ठ ख्रिस्ती या नात्याने ‘देवाच्या आत्म्यासाठी पेरणी’ करण्याची आपली मनीषा असली पाहिजे. पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात मुक्तपणे कार्य करण्यास अनुमती देणारे जीवन व्यतीत करण्याचा यामध्ये समावेश होतो. ते आपल्याला पवित्र आत्म्याच्या फळांना प्रदर्शित करण्यास मदत करते. आपण काय वाचावे आणि कोणते दूरदर्शन कार्यक्रम पाहावे याचा निर्णय घेताना हे तत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. मंडळीच्या सभांमध्ये लक्ष दिल्याने आणि आत्म्याने नियुक्त केलेल्या वडिलांच्या सल्ल्याला कार्यान्वित करण्याद्वारे आपण आत्म्यासाठी पेरणी करतो.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, गलतीकर ६:८ अशी हमी देऊन समारोप करते की, पवित्र आत्म्याच्या एकवाक्यतेत पेरणी केल्यास आपण “सार्वकालिक जीवन हे पीक” मिळवण्यास पात्र ठरू. होय, ख्रिस्ताच्या खंडणीच्या आधारावर पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे देव अनंत जीवन बहाल करील.—मत्तय १९:२९; २५:४६; योहान ३:१४-१६; रोमकर २:६; ७; इफिसकर १:७.