वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१५ पृ. २१-२६
  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग दोन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘उच्च शक्‍तींचे’ स्पष्टीकरण
  • संघटनात्मक बाबींवर प्रकाशाचे चकाकणे
  • ख्रिस्ती वर्तणूकीशी संबंधीत असलेला प्रकाश
  • इतर शुद्धीकरणे
  • परिभाषेवर अधिक प्रकाश
  • प्रेषितांच्या काळात प्रकाशाचे चकाकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • प्रकाशमान होत चाललेल्या मार्गावर चालणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग एक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • जगाच्या प्रकाशाला अनुसरा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१५ पृ. २१-२६

प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग दोन

“तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.”—स्तोत्र ३६:९.

१. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील चिन्हे समजण्यासाठी कोणता प्रारंभिक प्रयत्न केला गेला?

बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकाने सुरवातीच्या काळापासून ख्रिश्‍चनांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. सत्याचा प्रकाश अधिक तेजस्वी कसा होत आहे याविषयी ते उत्तम उदाहरण पुरवते. सन १९१७ मध्ये, यहोवाच्या लोकांनी संपलेले गुज (इंग्रजी) या पुस्तकात प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे स्पष्टीकरण प्रकाशित केले. त्याने ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक व राजनैतिक नेत्यांना निडरतेने उघड केले, परंतु त्यातील पुष्कळ स्पष्टीकरणे विविध इतर उगमांकडून घेण्यात आली होती. तरीसुद्धा, संपलेले गुज या पुस्तकाने यहोवा ज्या दृश्‍य माध्यमाला वापरत होता त्याबद्दल बायबल विद्यार्थ्यांच्या निष्ठेची परीक्षा घेतली.

२. “राष्ट्राचा जन्म” या लेखाने प्रकटीकरणाच्या पुस्तकावर कोणता प्रकाश पाडला?

२ मार्च १, १९२५ च्या टेहळणी बुरुज नियतकालिकातील “राष्ट्राचा जन्म” हा लेख प्रकाशित झाला तेव्हा प्रकटीकरणाच्या पुस्तकावर लख्ख प्रकाश पडला. प्रकटीकरणाचा १२ वा अध्याय मूर्तिपूजक रोम आणि पोपच्या रोममधील झगड्याचे वर्णन करत होता व त्यातील पुसंतान पोपच्या अधिकाराला सूचित करते असे समजले जात होते. परंतु त्या लेखाने दर्शवले की, प्रकटीकरण ११:१५-१८ चा संबंध १२ व्या अध्यायाच्या अर्थाशी आहे व दाखवले की, ते देवाच्या राज्याच्या जन्माशी संबंधीत आहे.

३. प्रकटीकरणावर कोणत्या प्रकाशनांनी अधिक प्रकाश टाकला?

३ या सर्वांमुळे १९३० मध्ये प्रकाश (इंग्रजी) या दोन खंडांच्या प्रकाशनामध्ये प्रकटीकरणाची अधिक स्पष्ट समज मिळाली. आणखी सुधार “मोठी बाबेल पडली आहे!” देवाचे राज्य अधिपत्य गाजवते! (इंग्रजी) (१९६३) आणि “मग देवाचे गुज संपले” (इंग्रजी) (१९६९) यामध्ये आढळले. तरीसुद्धा, प्रकटीकरणाच्या भविष्यसूचक पुस्तकाविषयी पुष्कळ शिकण्याजोगे होते. होय, १९८८ मध्ये प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या प्रकाशनासह त्यावर आणखी लख्ख प्रकाश पडला. प्रकटीकरणाची भविष्यवाणी, ज्याची सुरवात १९१४ मध्ये झाली त्या “प्रभूच्या दिवशी” लागू होते ही वास्तविकता या प्रगतीशील प्रज्वलितपणाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले जाऊ शकते. (प्रकटीकरण १:१०) यास्तव, तो दिवस उलटेल तसे प्रकटीकरणाच्या पुस्तकाची अधिक स्पष्टपणे समज प्राप्त होईल.

‘उच्च शक्‍तींचे’ स्पष्टीकरण

४, ५. (अ) बायबल विद्यार्थी रोमकर १३:१ ला कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते? (ब) “उच्च शक्‍ती” यांच्या बाबतीत शास्त्रवचनीय भूमिका काय असल्याची नंतर दिसून आली?

४ रोमकर १३:१ च्या संबंधी १९६२ मध्ये लख्ख प्रकाशाचे चकाकणे दिसून आले: “प्रत्येक जणाने उच्च शक्‍तींच्या [“वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या,” मराठी, आर. व्ही. रेफरन्स] अधीन असावे.” (किंग जेम्स व्हर्शन) प्रारंभिक बायबल विद्यार्थ्यांना, येथे उल्लेखिलेल्या “उच्च शक्‍ती” जागतिक अधिकाऱ्‍यांना सूचित करत असल्याचे समजले. या वचनाचा अर्थ, एखाद्या ख्रिश्‍चनाला युद्धकाळात भरती करण्यात आल्यावर, गणवेश चढवणे, खांद्यावर बंदूक घेणे आणि युद्धादरम्यान खंदकांकडे जाणे असा असल्याचा त्यांना वाटले. ख्रिस्ती आपल्या सहमानवाला ठार मारू शकत नसल्याने बिकट परिस्थिती आलीच तर त्याला हवेत गोळीबार करण्यास भाग पाडले जाईल असे त्यांना वाटले.a

५ नोव्हेंबर १५ आणि डिसेंबर १, १९६२ च्या टेहळणी बुरुजने मत्तय २२:२१ मधील येशूच्या शब्दांची चर्चा करून त्या विषयावर स्पष्ट प्रकाश पाडला: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” प्रेषितांची कृत्ये ५:२९ मधील प्रेषिताचे शब्द याजशी निगडित होते: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” ख्रिस्ती लोक कैसराच्या—‘उच्च शक्‍तींच्या’—अधीन आहेत, केवळ ख्रिश्‍चनाला देवाच्या नियमाच्या विरूद्धतेत जावयाचे नाही. कैसराला अधीन राहणे पूर्ण नव्हे तर सापेक्ष असल्याचे दिसून आले. ज्या गोष्टी देवाच्या अपेक्षांच्या विरोधात जात नाहीत केवळ त्याच गोष्टी ख्रिस्ती लोक कैसराला देतात. त्या विषयावर, स्पष्ट प्रकाश प्राप्त करणे किती समाधानकारक होते!

संघटनात्मक बाबींवर प्रकाशाचे चकाकणे

६. (अ) ख्रिस्ती धर्मजगतातील अधिकार परंपरेची व्यवस्था टाळण्यासाठी कोणते तत्त्व स्वीकारण्यात आले? (ब) मंडळीची देखरेख करणाऱ्‍याची निवड करण्यासाठी कोणता उचित मार्ग आहे असे शेवटी आढळले?

६ मंडळ्यांमध्ये, वडील आणि द्याकोन म्हणून कोणी सेवा करावी हा प्रश्‍न होता. ख्रिस्ती धर्मजगतात प्रचलित असणाऱ्‍या अधिकार परंपरेची व्यवस्था टाळण्यासाठी, यांना प्रत्येक मंडळीच्या सदस्यांचे मतदान घेऊन लोकशाही पद्धतीने निवडावे असा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु सप्टेंबर १ आणि ऑक्टोबर १५, १९३२ च्या टेहळणी बुरुज मधील प्रकाशाने दाखवून दिले की, निवडणूकीने वडिलांना नियुक्‍ती करण्यासाठी शास्त्रवचने काहीही आधार पुरवत नाहीत. यास्तव, यांच्या जागी एक सेवा समिती आली आणि संस्थेने एक सेवा निर्देशक निवडला.

७. मंडळीतील सेवक ज्या पद्धतीने नियुक्‍त करण्यात येत होते त्यामध्ये प्रकाशाच्या चकाकण्यामुळे कोणते सुधार घडून आले?

७ जून १ आणि जून १५, १९३८ च्या टेहळणी बुरुज मध्ये प्रकाशाचे चकाकणे होते आणि मंडळीतील सेवक निवडले न जाता, नियुक्‍त केले गेले पाहिजेत म्हणजेच, ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले गेले पाहिजेत असे त्यात दाखवले गेले. सन १९७१ मध्ये, प्रकाशाच्या आणखी एका चकाकण्याने असे दाखवून दिले की, प्रत्येक मंडळी केवळ एकाच मंडळी सेवकाने निर्देशित व्हावयाची नव्हती. त्याउलट, प्रत्येक मंडळीला यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने नियुक्‍त केलेल्या वडिलांचा किंवा पर्यवेक्षकांचा वर्ग असावयास हवा. अशाप्रकारे, सुमारे ४० पेक्षा अधिक वर्षांच्या वाढत्या प्रकाशामुळे असे स्पष्ट झाले की, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ त्याच्या नियमन मंडळाद्वारे वडील तसेच द्याकोन, ज्यांना आता सेवा सेवक म्हणून ओळखले जाते त्यांची नियुक्‍ती करावी. (मत्तय २४:४५-४७) प्रेषितांच्या काळात जे घडले त्याच्या एकवाक्यतेत हे होते. तीमथ्य तसेच तीतसारखे पुरुष पहिल्या शतकातील नियमन मंडळाद्वारे पर्यवेक्षक या नात्याने नियुक्‍त करण्यात आले होते. (१ तीमथ्य ३:१-७; ५:२२; तीत १:५-९) या सर्व गोष्टी यशया ६०:१७ च्या लक्षणीय पूर्णतेत आहेत: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.”

८. (अ) संस्था ज्या पद्धतीने कार्य करत होती त्यामध्ये वाढत्या सत्यामुळे कोणते सुधार घडले? (ब) नियमन मंडळाच्या समिती कोणत्या आहेत, आणि त्या प्रत्येकांच्या कार्यहालचालींची किंवा देखरेखींची मर्यादा काय आहे?

८ मग वॉचटावर संस्थेच्या कार्याविषयीची बाब देखील होती. पुष्कळ वर्षांपर्यंत वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हानियाच्या संचालक मंडळामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचा समावेश होत होता आणि बाबींची हाताळणी करणे मुख्यत्वे याच्या अध्यक्षांच्या हाती होते. १९७७ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यात दाखवल्याप्रमाणे (पृष्ठे २५८-९), १९७६ मध्ये नियमन मंडळ सहा समितींसह कार्य करू लागले, प्रत्येक समितीला जागतिक कार्याच्या विशिष्ट पैलूंची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आले. सभासद समिती सभासदांच्या बाबींची त्याचप्रमाणे जगभरातील बेथेल कुटुंबांमध्ये सेवा करणाऱ्‍या सर्वांच्या हितांच्या बाबींची हाताळणी करते. प्रकाशन समिती सर्व ऐहिक तसेच कायदेशीर बाबींची जसे की, जमीन आणि छपाई यांची हाताळणी करते. सेवा समिती साक्षकार्याशी संबंधीत आहे आणि ते प्रवासी पर्यवेक्षक, पायनियर व मंडळीच्या प्रचारकांच्या कार्यहालचालींची देखरेख करते. शिक्षण समिती मंडळीच्या सभा, खास संमेलन दिवस, विभागीय संमेलने आणि प्रांतीय तसेच आंतरराष्ट्रीय अधिवेशने त्याचप्रमाणे देवाच्या लोकांच्या आध्यात्मिक शिक्षणाच्या विविध प्रशाला यांच्यासाठी जबाबदार आहे. लिखाण समिती सर्व प्रकारच्या प्रकाशनांच्या तयारीची आणि भाषांतराची देखरेख करते व सर्व गोष्टी शास्त्रवचनांच्या एकवाक्यतेत आहेत याची खात्री करून घेते. अध्यक्षांची समिती आणीबाणीच्या प्रसंगांची तसेच इतर निकडीच्या बाबींची काळजी घेते. तसेच १९७० च्या दशकात, वॉचटावर सोसायटीची शाखा दफ्तरे, पर्यवेक्षकांऐवजी समितीद्वारे निर्देशित होऊ लागली.b

ख्रिस्ती वर्तणूकीशी संबंधीत असलेला प्रकाश

९. सत्याच्या प्रकाशाने ख्रिश्‍चनांचा जगाच्या सरकारांसोबत जो नातेसंबंध आहे त्यावर कसा प्रभाव पाडला?

९ पुष्कळ प्रकाश ख्रिस्ती वर्तणूकीशी सुसंबद्ध ठरला आहे. उदाहरणार्थ, तटस्थतेच्या विषयाचा विचार करा. या विषयावर, नोव्हेंबर १, १९३९ च्या टेहळणी बुरुज मधील “तटस्थता” या लेखात विशेषतः लख्ख प्रकाश चकाकला. तो लेख किती समयोचित होता, तो दुसऱ्‍या महायुद्धाची सुरवात झाल्यानंतर लगेचच प्रकाशित झाला होता! त्या लेखाने तटस्थतेची व्याख्या देऊन दाखवले की, ख्रिश्‍चनांनी राजनैतिक व्यवहारांमध्ये किंवा राष्ट्रांमधील संघर्षांमध्ये गोवले जाऊ नये. (मीखा ४:३, ५; योहान १७:१४, १६) हीच गोष्ट राष्ट्रांकडून त्यांचा जो द्वेष केला जातो यासाठी कारणीभूत आहे. (मत्तय २४:९) येशूने मत्तय २६:५२ मध्ये स्पष्ट केले त्याप्रमाणे, प्राचीन इस्राएलाची युद्धे ख्रिश्‍चनांसाठी कोणतेही मागील उदाहरण पुरवत नाहीत. त्याशिवाय, एकही राजनैतिक राष्ट्र आज ईश्‍वरकृत नाही म्हणजे प्राचीन इस्राएलाप्रमाणे देवाकडून चालवले जाणारे नाही.

१०. ख्रिश्‍चनांनी रक्‍ताबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगावा याविषयी प्रकाशाच्या चकाकण्याने काय प्रकट केले?

१० रक्‍ताच्या पावित्र्यावरही प्रकाश चकाकला. काही बायबल विद्यार्थ्यांना वाटले की, प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ मधील रक्‍त खाण्याबाबतची मनाई यहुदी लोकांपुरतीच होती. तथापि, प्रेषितांची कृत्ये २१:२५ दाखवते की, प्रेषितांच्या काळात ही आज्ञा जे विश्‍वासू बनले त्या राष्ट्रांच्या लोकांना देखील लागू होत होती. यास्तव, जूलै १, १९४५ चे टेहळणी बुरुज दाखवते त्याप्रमाणे रक्‍ताचे पावित्र्य सर्व ख्रिश्‍चनांना लागू होते. त्याचा अर्थ केवळ रक्‍त मिश्रित सॉसेजेससारख्या पदार्थांमधील प्राण्यांचे रक्‍त खाण्याचे नाकारणे एवढेच नव्हे, तर रक्‍त संक्रमणाच्या बाबतीत मानवी रक्‍तापासून देखील दूर असणे असा होतो.

११. तंबाखूचा वापर करण्याबद्दल ख्रिश्‍चनांच्या दृष्टिकोनाविषयी काय पाहण्यात आले?

११ वाढत्या प्रकाशामुळे, ज्या सवयींना अमान्य केले जात होते त्यांना नंतर गंभीर अपराध म्हणून हाताळण्यात आले. याचे एक उदाहरण तंबाखूचा वापर करण्याविषयीचे होते. ऑगस्ट १, १८९५ च्या झायन्स वॉचटावर मध्ये बंधू रस्सेल यांनी १ करिंथकर १०:३१ आणि २ करिंथकर ७:१ कडे लक्ष केंद्रित केले व लिहिले: “कोणत्याही ख्रिश्‍चनाने कोणत्याही प्रकारे तंबाखूचा वापर केला तर त्यामुळे देवाचे गौरव किंवा त्या व्यक्‍तीचा लाभ कसा होईल हे मला कळत नाही.” सन १९७३ पासून असे स्पष्टपणे समजले की, तंबाखूचा वापर करणारी कोणतीही व्यक्‍ती यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असू शकत नाही. सन १९७६ मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की, कोणताही साक्षीदार एखाद्या जुगाराच्या ठिकाणी नोकरी करून मंडळीमध्ये राहू शकत नाही.

इतर शुद्धीकरणे

१२. (अ) पेत्राला दिलेल्या राज्याच्या किल्ल्यांच्या संख्येविषयी प्रकाशाच्या चकाकण्याने काय प्रकट केले? (ब) पेत्राने कोणत्या परिस्थितींमध्ये प्रत्येक किल्ली वापरली?

१२ येशूने पेत्राला दिलेल्या लाक्षणिक किल्ल्यांच्या संख्येबद्दल देखील वाढता प्रकाश प्राप्त झाला आहे. बायबल विद्यार्थ्यांचा असा समज होता की, पेत्राला दोन किल्ल्या मिळाल्या ज्याद्वारे लोकांना राज्याचे वारस होण्यास मार्ग खुला झाला—एकीचा उपयोग यहुद्यांसाठी सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टला आणि दुसरी परराष्ट्रीयांसाठी, सा. यु. ३६ पेन्टेकॉस्टला पेत्राने कर्नेल्याला प्रचार केला त्यावेळी प्रथम वापरण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये २:१४-४१; १०:३४-४८) कालांतराने असे आढळले की, एक तिसरा गट समाविष्ट होता—शमरोन्यांचा. त्यांच्याकरता राज्याच्या संधीचा मार्ग खुला करून देताना पेत्राने दुसरी किल्ली वापरली. (प्रेषितांची कृत्ये ८:१४-१७) अशाप्रकारे, पेत्राने कर्नेल्याला प्रचार केला तेव्हा तिसरी किल्ली वापरण्यात आली.—टेहळणी बुरुज, ऑक्टोबर १, १९७९, पृष्ठे १६-२२, २६.

१३. योहान १० व्या अध्यायात उल्लेखिलेल्या मेंढवाड्यांबद्दल प्रकाशाच्या चकाकण्याने काय प्रकट केले?

१३ प्रकाशाच्या दुसऱ्‍या किरणाद्वारे असे आढळले की, येशू केवळ दोनच नव्हे तर तीन मेंढवाड्यांना सूचित करत होता. (योहान, अध्याय १०) ते म्हणजे, (१) यहुदी मेंढवाडा ज्याचा द्वारपाळ बाप्तिस्मा करणारा योहान होता, (२) राज्याच्या अभिषिक्‍त वारसांचा कळप आणि (३) पार्थिव आशा असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ कळप.—योहान १०:२, ३, १५, १६; टेहळणी बुरुज, फेब्रुवारी १५, १९८४, पृष्ठे १०-२०.

१४. प्रती नमुनेदार योबेलच्या सुरवातीबद्दल प्रखर प्रकाशाने गोष्टी कशा स्पष्ट केल्या?

१४ प्रती नमुनेदार योबोल वर्षाच्या समजूतीविषयी देखील काही स्पष्टीकरण मिळाले. नियमशास्त्रामध्ये, प्रत्येक ५० वे वर्ष एक महान योबोल होते. त्यावेळी सर्व गोष्टी आपल्या मूळच्या मालकांपाशी पूर्ववत करण्यात येत होत्या. (लेवीय २५:१०) ही गोष्ट ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनाचे आगाऊ चिन्ह होते असे बऱ्‍याच काळापासून समजले जात होते. तथापि, अलीकडील काळात, असे दिसून आले की प्रती नमुनेदार योबेलची सुरवात खरे म्हणजे, पवित्र आत्मा मिळालेले लोक मोशेच्या नियमशास्त्राच्या करारातून मुक्‍त करण्यात आले तेव्हा सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टला झाली.—टेहळणी बुरुज, जानेवारी १, १९८७, पृष्ठे १८-२८.

परिभाषेवर अधिक प्रकाश

१५. “योजना” या शब्दाच्या उपयोगावर कोणता प्रकाश पाडण्यात आला?

१५ “सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे.” (उपदेशक १२:१०) हे शब्द आपल्या सद्याच्या विषयाला योग्यपणे लागू केले जाऊ शकतात, कारण प्रकाश केवळ तत्त्वप्रणाली आणि वर्तणूक अशा महत्त्वपूर्ण बाबींवरच नव्हे तर ख्रिस्ती परिभाषा आणि त्याचा अचूक अर्थ यावर देखील पडला आहे. उदाहरणार्थ, बायबल विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते प्रकाशन म्हणजे, शास्त्रवचनांमधील अभ्यास याचा युगांची ईश्‍वरी योजना (इंग्रजी) हा खंड होता. तथापि, कालांतराने असे जाणले गेले की, मानवच केवळ योजना करतात, असे देवाचे वचन सांगते. (नीतीसूत्रे १९:२१) यहोवा योजना करत असल्याचे शास्त्रवचने कधी सांगत नाहीत. त्याला योजना करावयाची गरज नाही. तो जे काही उद्देशितो ते त्याच्या अमर्याद बुद्धी व शक्‍तीमुळे निश्‍चित यशस्वी होते, त्याविषयी आपण इफिसकर १:९, १० मध्ये देखील असे वाचतो: “काळाच्या पूर्णतेची योजना लावण्यासाठी, त्याने आपल्या संतोषाची योजना पूर्वी स्वतःमध्ये योजिली होती.” यास्तव, हळूहळू असे आढळले की, यहोवाला सूचित करताना “उद्देश” ही संज्ञा अधिक उचित आहे.

१६. लूक २:१४ ची अचूक समज काय असल्याचे कालांतराने आढळून आले?

१६ त्यानंतर लूक २:१४ ची स्पष्ट समज मिळण्याची बाब होती. किंग जेम्स व्हर्शन प्रमाणे ते म्हणते: “परम उंचामध्ये असलेल्या देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती व माणसासंबंधी सदिच्छा आहे.” असे आढळले की, या गोष्टीने योग्य विचार व्यक्‍त केला नाही कारण, देवाची सदिच्छा वाईटांकरता व्यक्‍त केली जात नाही. यास्तव, देवाबद्दल सदिच्छा असणाऱ्‍या लोकांकरता ही गोष्ट शांतीची होती अशा दृष्टिकोनातून साक्षीदार या विषयाकडे पाहत होते. यास्तव, बायबलबद्दल आस्था असणाऱ्‍या लोकांचा उल्लेख ते सदिच्छा असणाऱ्‍या व्यक्‍ती असा करू लागले. परंतु त्यानंतर असे समजले गेले की, सदिच्छा ही मनुष्यांची नव्हे तर देवाची होती. यास्तव, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मध्ये लूक २:१४ वरील तळटीप “ज्या माणसांसंबंधी तो [देव] संतुष्ट आहे” त्यांच्याविषयी सांगते. सर्व ख्रिस्ती जे त्यांच्या समर्पणाच्या शपथेच्या एकवाक्यतेत जीवन व्यतीत करतात त्यांच्यावर देवाची सदिच्छा आहे.

१७, १८. यहोवा कशाचे समर्थन करील आणि कशाचे पवित्रीकरण करील?

१७ त्याप्रमाणे, पुष्कळ काळापर्यंत साक्षीदार यहोवाच्या नावाचे समर्थन याविषयी बोलत होते. परंतु, सैतानाने यहोवाच्या नावाबद्दल शंका व्यक्‍ती केली होती का? त्या बाबतीत, यहोवाला त्या नावाचा हक्क नाही म्हणून सैतानाच्या कोणत्याही प्रतिनिधींनी त्याच्या नावाबद्दल शंका बाळगली होती का? नाही, मुळीच नाही. यहोवाच्या नावाला आव्हान देण्यात आले नव्हते किंवा त्याचे समर्थन करण्याची गरज नव्हती. यामुळे, वॉचटावर सोसायटीच्या अलीकडील प्रकाशनांमध्ये यहोवाच्या नावाचे समर्थन करण्याचा उल्लेख केला जात नाही. त्या प्रकाशनांमध्ये यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन आणि त्याचे नाव पवित्र करण्याविषयी सांगितले जाते. येशूने आपल्याला जी प्रार्थना करावयास सांगितली त्याच्या एकवाक्यतेतील ही गोष्ट आहे: “तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) वारंवार, यहोवाने सांगितले की, तो त्याच्या नावाला पवित्र करणार होता. या नावाला इस्राएल लोकांनी आव्हान दिले नव्हते तर त्याला अपवित्र केले होते.—यहेज्केल २०:९, १४, २२; ३६:२३.

१८ मनोरंजक गोष्ट अशी की, “राष्ट्रे जाणतील की मी यहोवा आहे”—कसे? (इंग्रजी) या पुस्तकाने १९७१ मध्ये हा फरक दाखवला: “येशू ख्रिस्त . . . यहोवाच्या विश्‍वव्यापी सार्वभौमत्वाच्या समर्थनासाठी आणि यहोवाच्या नावाचे गौरव व्हावे यासाठी झटतो.” (पृष्ठे ३६४-५) सन १९७३ मध्ये, हजार वर्षांचे देवाचे राज्य जवळ आले आहे (इंग्रजी) यात असे म्हटले गेले: “येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटात,’ सर्वशक्‍तिमान देव यहोवाने त्याच्या विश्‍वव्यापी सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याचा आणि त्याचे योग्य नाव पवित्र करण्याचा हा समय आहे.” (पृष्ठ ४०९) त्यानंतर, १९७५ मध्ये, जगाच्या विपत्तीतून मानवाचे तारण आता समीप आहे! (इंग्रजी) या पुस्तकाने असे म्हटले: “विश्‍वाच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना त्यावेळी पूर्ण झालेली असेल, ती म्हणजे, यहोवाच्या विश्‍वव्यापी सार्वभौमत्वाचे समर्थन आणि त्याच्या पवित्र नावाचे पवित्रीकरण.”—पृष्ठ २८१.

१९, २०. आध्यात्मिक प्रकाशाच्या चकाकण्याबद्दल आपण आपली गुणग्राहकता कशी दाखवू शकतो?

१९ या सर्व आध्यात्मिक प्रकाशाचा उपभोग घेण्यासाठी यहोवाचे लोक किती आशीर्वादित आहेत! त्याच्या अगदीच विरोधात, ख्रिस्ती धर्मजगताचे नेते स्वतःला पाहतात त्या आध्यात्मिक अंधकाराला व्यक्‍त करणारे एका पाळकाचे वाक्य असे आहे: “पाप का आहे? दुःख का आहे? दियाबल का आहे? मी स्वर्गात गेल्यावर हे प्रश्‍न मला प्रभूला विचारायचे आहेत.” परंतु, यहोवाचे साक्षीदार त्याला याचे उत्तर देऊ शकतात: यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या योग्यतेच्या वादामुळे आणि मानव प्राणी दियाबलाचा विरोध असतानाही देवाला एकनिष्ठता टिकवून ठेवू शकतात की नाही या प्रश्‍नामुळे हे असे आहे.

२० पुष्कळ वर्षांपासून, प्रकाशाच्या प्रखर तसेच सौम्य चकाकण्याद्वारे यहोवाच्या समर्पित सेवकांचा मार्ग प्रकाशमान केला जात आहे. हे स्तोत्र ९७:११ आणि नीतीसूत्रे ४:१८ सारख्या शास्त्रवचनांच्या पूर्णतेत झाले आहे. परंतु, प्रकाशात चालणे याचा अर्थ वाढत्या प्रकाशाबद्दल गुणग्राहकता बाळगणे आणि त्याच्या एकवाक्यतेत जगणे असा त्याचा अर्थ होतो हे आपण कधीही विसरू नये. आपण पाहिल्याप्रमाणे, या वाढत्या प्रकाशात आपली वर्तणूक आणि आपल्या प्रचाराची कामगिरी या दोघांचा समावेश आहे.

[तळटीपा]

a या दृष्टिकोनाला प्रतिसाद देऊन, जून १ आणि जून १५, १९२९ च्या टेहळणी बुरुज नियतकालिकाने या “उच्च शक्‍ती” यहोवा देव व येशू ख्रिस्त आहेत असा अर्थ लावला. मूलतः, हाच दृष्टिकोन १९६२ मध्ये सुधारण्यात आला.

b एप्रिल १५, १९९२ च्या टेहळणी बुरुजने घोषित केले की, काही निवडक बंधू विशेषकरून “दुसरी मेंढरे” यातील बांधव नियमन मंडळाच्या समितींचे साहाय्य करण्यासाठी नियुक्‍त करण्यात येत होते, ते एज्राच्या दिवसातील नथीनीमप्रमाणे होते.—योहान १०:१६; एज्रा २:५८.

तुम्हाला आठवते का?

◻ ‘उच्च शक्‍तींना’ अधीनता यावर कोणता प्रकाश पाडण्यात आला आहे?

◻ प्रकाशाच्या चकाकण्यामुळे कोणते संघटनात्मक विकास झाले आहेत?

◻ वाढत्या प्रकाशाचा प्रभाव ख्रिस्ती वर्तणूकीवर कसा पडला आहे?

◻ विशिष्ट शास्त्रवचनीय मुद्यांच्या आपल्या समजूतीबद्दल आध्यात्मिक प्रकाशाने कोणती शुद्धीकरणे आणली आहेत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा