वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ४/१ पृ. ३०
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ
    उपासनेतील ऐक्य
  • बाप्तिस्मा—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • बाप्तिस्मा म्हणजे काय?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • बाप्तिस्मा—एक महत्त्वाचं ध्येय!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ४/१ पृ. ३०

वाचकांचे प्रश्‍न

ख्रिस्ती बाप्तिस्म्याच्या वेळी कोणती मनोवृत्ती प्रदर्शित केली पाहिजे?

हा खरोखरच चित्ताकर्षक प्रश्‍न आहे, कारण आपल्यातील बहुतेक वाचकांचा बाप्तिस्मा झाला असला तरी, ज्यांचा अद्याप बाप्तिस्मा व्हावयाचा आहे त्यांच्याप्रमाणे तेही या प्रश्‍नामध्ये गोवले आहेत. जे बाप्तिस्मा घेतात म्हणजे पूर्णपणे पाण्याखाली बुडवले जातात त्यांच्यावर आपण प्रथम विवेचन मांडू या. त्यांची कोणती मनोवृत्ती असावी?

मत्तय २८:१९, २० मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना लोकास शिष्य करण्यास, शिकवण्यास आणि बाप्तिस्मा देण्यास सांगितले. त्याने बाप्तिस्म्याच्या प्रसंगाला, तात्पुरत्या आनंदातून उचंबळून येणारा अतिशय भावनिक अनुभव असे सादर केले नाही. येशूच्या उदाहरणावरून आपण पाहतो त्याप्रमाणे ते एक गंभीर पाऊल आहे. लूक ३:२१ म्हणते: “येशूहि बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की, आकाश उघडले गेले.” होय, आपल्या आदर्शाने बाप्तिस्म्याचे पाऊल गंभीर, प्रार्थनापूर्वक असे लेखले. त्याने पाण्यातून वर आल्यावर, जणू काय विजय प्राप्त केल्याप्रमाणे जोरजोराने हातवारे केले नाहीत, आनंदाची आरोळी ठोकली नाही, किंवा जंगलीपणाने हवेत हावभाव देखील केले नाहीत. अलिकडेच काहींनी अशी वर्तणूक केली आहे. तेथे केवळ बाप्तिस्मा करणारा योहान उपस्थित होता तेव्हा येशूने त्याच्या पित्याला प्रार्थना केली.

परंतु, बाप्तिस्म्याचा प्रसंग मौन पाळण्याचा किंवा उदास राहण्याचा आहे, व आजच्या ख्रिस्ती धर्मजगतातील काही चर्चमध्ये करावे लागते त्याप्रमाणे विशिष्ट स्थितीतच बाप्तिस्मा घ्यावा किंवा काही पाठ म्हणावेत असेही बायबल सुचवत नाही. इतकेच काय, पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेव्हा हजारो यहुदी आणि धर्मांतर केलेल्यांनी ख्रिस्ती बाप्तिस्मा घेतला त्या दिवसाचा जरा विचार करा. त्या सर्वांनी आधीच देवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास केला होता आणि त्याच्यासोबतचे जवळचे नातेसंबंध सांधले होते. यास्तव, त्यांना केवळ येशू या मशीहाविषयी शिकायचे व त्याचा स्वीकार करायचा होता. त्यांनी असे केल्यावर ते बाप्तिस्मा घेऊ शकत होते.

प्रेषितांची कृत्ये २:४१ म्हणते: “ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला.” वेमत यांच्या बायबल भाषांतरात असे म्हटले आहे: “ज्यांनी त्याच्या वचनाचा आनंदाने स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला.” त्यांना मशीहाच्या उद्दीपक सुवार्तेत आनंद मिळाला आणि निश्‍चितच त्या अंतःकरणपूर्वक आनंदाने त्यांना शेकडो आनंदी निरिक्षकांसमोर बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त केले. स्वर्गातील देवदूत देखील त्यांना पाहून आनंद करीत होते. येशूच्या शब्दांची आठवण करा: “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो.”—लूक १५:१०.

आपल्यातील प्रत्येकाचे बाप्तिस्म्याची गंभीरता आणि आनंद प्रतिबिंबित करण्याचे विविध मार्ग आहेत. काही चर्चमध्ये बाप्तिस्मा घेणारे शुभ्र किंवा काळे वस्त्र परिधान करतात. अशा आवश्‍यकतेला शास्त्रवचनात कोठेही आधार नाही. तरी, पुरूष किंवा महिलांनी अपुरे किंवा शरीराला पुरेसे न झाकणारे दर्शक स्नान वस्त्र घालणे अयोग्य ठरेल. तसेच नोंद केल्याप्रमाणे, पाण्यातून वर आल्यावर त्या नव्या ख्रिस्ती व्यक्‍तीने खास हावभाव किंवा त्याने जणू काय विजय प्राप्त केला असे विशेष हावभाव करू नयेत. या नव्या व्यक्‍तीने बाप्तिस्मा घेतला याचा इतर ख्रिस्ती बंधुजनांना आनंद होतो. त्या व्यक्‍तीने हे समजून घ्यावे की विश्‍वासाचे हे प्रदर्शन, देवाची स्वीकृती प्राप्त करण्याच्या सत्वनिष्ठेच्या दीर्घ मार्गाक्रमणामधील पहिले पाऊल आहे.—मत्तय १६:२४.

बाप्तिस्मा घेणारा आपला नातेवाईक किंवा ज्याच्याबरोबर आपण बायबलचा अभ्यास केला आहे ती व्यक्‍ती आहे तर सार्वजनिक बाप्तिस्म्याच्या वेळी आपण निरिक्षक या नात्याने, त्या प्रसंगाच्या आनंदात सहभाग घेतो. परंतु पूर्ण सहभाग घेण्यासाठी, आपण उमेदवारांसोबत संपूर्ण भाषण ऐकावे आणि जे प्रश्‍न विचारले जातात त्यांची जाहीरपणे उत्तरे देताना त्यांना लक्षपूर्वक ऐकावे व प्रार्थनेतही भाग घ्यावा. असे केल्याने आपल्याला बाप्तिस्म्याचा योग्य दृष्टिकोन मनी बाळगण्यास मदत मिळते; आपण देवाप्रमाणेच आपलाही दृष्टिकोन ठेवू. बाप्तिस्म्यानंतर, आपला आनंद व्यक्‍त करण्यासाठी आपल्याला समारंभ योजण्याची, फुलांचा गुच्छ देण्याची किंवा बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तीला आदर देणाऱ्‍या पार्टीची काहीच गरज नाही. त्यापेक्षा आपण आपल्या नव्या बंधू किंवा भगिणीकडे जाऊन त्याने किंवा तिने उचलेल्या उत्तम पावलाबद्दल आनंद व्यक्‍त करू शकतो आणि आपल्या ख्रिस्ती बंधुत्वात त्यांचे हार्दिक स्वागत करू शकतो.

या सर्वाचा सारांश असा की, पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांसोबत आम्हा सर्वांनी बाप्तिस्म्याकडे योग्य गांभीर्याने पाहावे. तो मोठ्याने जयघोष करण्याचा, मेजवाण्या करण्याचा किंवा आनंदाने गर्जना करण्याचा समय नाही. किंवा मौन पाळण्याचा वा उदास राहण्याचा देखील समय नाही. सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर नवे लोक आपल्याला येऊन मिळाले आहेत म्हणून आपण यथायोग्यपणे आनंदी असू शकतो. तसेच, आपल्या नवीन बंधू आणि भगिणींचे आपण आनंदाने स्वागत करू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा