तुमचे मनःपूर्वक स्वागत केले जाते
सुमारे १,९०० वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त या मनुष्याच्या मृत्यूची घटना मानवी इतिहासात सर्वात महत्त्वपूर्ण ठरली होती. या घटनेने पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाची आशा उपलब्ध करून दिली. एका साध्या विधीदरम्यान, येशूने त्याच्या प्रेमळ मानवी अर्पणाची चिन्हे म्हणून बेखमीर भाकर आणि द्राक्षारस वापरला. मग त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) तुम्ही ही महत्त्वपूर्ण घटना स्मराल का? यहोवाचे साक्षीदार हा स्मारक विधी त्यांच्यासोबत साजरा करण्यास तुम्हाला उबदार आमंत्रण देत आहेत. बायबलच्या चांद्रमास दिनदर्शिकेतील निसान १४ तारखेशी जुळणाऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर तो साजरा केला जाईल. तुमच्या घराजवळच्या राज्यसभागृहात तुम्ही उपस्थित राहू शकता. स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांकडे निश्चित वेळ आणि ठिकाणाची विचारपूस करा. साजरा करण्याची तारीख, १९९५ मध्ये एप्रिल १४, शुक्रवार ही असेल.