वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 २/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 २/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

बायबलमधील उल्लेखित फिलिस्टाईन लोक कोण होते?

देवाच्या प्राचीन लोकांनी वाग्दत्त देश ताब्यात घेतला तेव्हा केननमध्ये राहत असणाऱ्‍या फिलिस्टाईन नामक लोकांविषयी बायबल वारंवार सांगते. पुष्कळ काळापासून या फिलिस्टीयन लोकांनी देवाच्या लोकांना विरोध केला होता आणि त्याचे वर्णन गल्याथ नामक फिलिस्टाईन महावीर आणि दावीद यांच्यातील सामन्याच्या अहवालामध्ये करण्यात आले आहे.—१शमुवेल १७:१-३, २३-५३.

बायबल दाखविते, की प्राचीन फिलिस्टीईन लोकांनी कॅफतोरपासून केननच्या नैऋत्येकडील प्रदेशात स्थानांतर केले. (यिर्मया ४७:४) कॅफतोर कुठे होते? इंटरनॅशनल स्टॅडर्ड बायबल एन्सायक्लोपिडीया टिप्पणी करतो, “निश्‍चित उत्तर देण्यासाठी पुरेसे सबळ पुरावे नसले तरी; वर्तमान ज्ञान क्रीट बेटाकडे (किंवा क्रीट बरोबर ॲगियन बेटांवर जो प्राकृतिकरीत्या एकमेकांशी संबंधित आहे) निश्‍चितपणे संभाव्य स्थानाकडे अंगुली दर्शविते.”—खंड १, पृष्ठ ६१०.

याच्या एकवाक्यतेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यातील आमोस ९:७ म्हणते: “इस्राएल वंशजहो, ‘तुम्ही मला कुशाचा वंशजांसारखे नाही काय?’ असे यहोवा म्हणतो. मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून, फिलिस्टाईन लोकास क्रीटमधून आणि अरामी लोकास कीरातून आणिले नाही काय’?”

हे समुद्र किनाऱ्‍याजवळील प्राचीन लोक क्रीटपासून केननच्या भागामध्ये केव्हा स्थानांतरीत झाले हे ठाऊक नाही आणि नंतर त्या प्रदेशाला फिलिष्टिया असे म्हणण्यात येऊ लागले आणि हा प्रदेश नैऋत्येकडील जोपा आणि गेझा यातील किनाऱ्‍यामध्ये आहे. तथापि असे दिसून येते की, अब्राहाम आणि इसहाक या दोघांच्या दिवसामध्ये समुद्रकिनाऱ्‍याजवळील सखल प्रदेशामध्ये ते सुरवातीपासून होते.—उत्पत्ती २०:१, २; २१:३२-३४; २६:१-१८.

देवाने अभिवचन दिलेल्या वाग्दत्त देशात इस्राएल लोकांनी प्रवेश केल्यानंतरही पुष्कळ काळापर्यंत फिलिस्टाईन लोकांचा शक्‍तिशाली प्रभाव कायम होता. (निर्गम १३:१७; यहोशवा १३:२; शास्ते १:१८, १९; ३:३, ४; १५:९, १०; १ शमुवेल ४:१-११; ७:७-१४; १३:१९-२३; १ राजे १६:१५) दिर्घकाळापर्यंत म्हणजेच उज्जीया राजाच्या अधिपत्याच्या काळात देखील फिलिस्टाईन लोक गथ, यन्‍नो व अश्‍दोद या त्यांच्या नगरामध्ये राहीले. (२ इतिहास २६:६) एक्रोन, अश्‍केलोन आणि गेजा ही बायबल वृत्तांतातील त्यांची इतर प्रमुख शहरे होती.

जगविजेता ॲलेक्झॅडर याने फिलिस्टाईन लोकांच्या गेजा या नगरावर विजय मिळविला, परंतु तेव्हा फिलिस्टाईन लोकांची ओळख स्पष्टपणे राहिली नाही. प्राध्यापक लॉरेंस ई स्टेजर यांनी बिब्लिकल आर्किलॉजी रीव्हीयू (मे/जून १९९१) यामध्ये लिहिले, “फिलिस्टाईन लोकांना देखील बॅबेलॉनमधून हद्दपार करण्यात आले. . . . परंतु हद्दपार फिलिस्टाईन लोकांचे काय झाले याबद्दल कोणताही अहवाल उपलब्ध नाही. नबुखद्‌नेस्सरच्या विजयानंतर अश्‍केलोन येथे जे राहिले असतील त्यांची जातीय ओळख संपुष्टात आली. ते इतिहासातून केवळ नाहीसे झाले.”

आधुनिक दिवसातील पॅलेस्टाईन हे नाव लॅटीन आणि ग्रीक शब्दांमधून घेतले आहे आणि ते “फिलिस्टीया” या इब्री शब्दापर्यंत घेऊन जाते. काही अरबी भाषांमधील बायबल भाषांतरे “फिलिस्टाईन्स्‌” यासाठी आधुनिक पॅलेस्टाईन्स्‌ याकरिता असणाऱ्‍या शब्दाबरोबर जुळणारा शब्द वापरतात. तथापि, टुडेज अरॅबिक व्हर्शन एका वेगळ्याच शब्दाचा वापर करते आणि अशाप्रकारे प्राचीन फिलिस्टाईन्स्‌ आणि आधुनिक पॅलेस्टाईन लोक यामधील भेद स्पष्ट करते.

[३१ पानांवरील चित्रं]

अश्‍केलोन याचे काही अवशेष

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा