वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 २/१ पृ. ३२
  • उत्पादकता देवाची एक उदार देणगी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्पादकता देवाची एक उदार देणगी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 २/१ पृ. ३२

उत्पादकता देवाची एक उदार देणगी

यहोवा त्याच्या उत्पादक कामामध्ये आनंदी आहे. (स्तोत्र १०४:३१) उत्पादक प्रक्रियेमध्ये त्याला फार मोठे समाधान प्राप्त होते आणि त्याचे वर्णन उत्पत्ती १:३१ मध्ये “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले,” असे करण्यात आले आहे.

यहोवाने हा आनंद केवळ स्वतःपुरताच ठेवला नाही. येशूला त्याने प्रतिनिधी होण्याचा किंवा त्याच्या माध्यमाद्वारे सर्व गोष्टी उत्पन्‍न करण्याचा विशेषाधिकार दिला. (योहान १:३; कलस्सैकर १:१६, १७) येशू सुद्धा “कुशल कारागीर” या नात्याने “त्याच्यासमोर [‘यहोवासमोर, NW] सर्वदा . . . हर्ष पावत असे.”—नीतीसूत्रे ८:३०, ३१.

परंतु उत्पादक क्षमता केवळ स्वर्गातच अस्तित्वात नाही. “ती मानव स्वभावामध्ये सामावलेली आहे.” असे युजीन रॉडसेप तुम्ही किती उत्पादक आहात? (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात. आणि म्हणूनच मनुष्याला देवाच्या प्रतिरुपात बनविण्यात आले हा काही योगायोग नव्हे. (उत्पत्ती १:२६) अशाप्रकारे यहोवाने मानवजातीला समाधानकारक उत्पादक क्षमतांची देणगी दिली आहे.—याकोब १:१७.

यामुळे बायबल याच्या सुसंगतेत गाणे, नृत्य, विणकाम, स्वयंपाक, कला आणि अशा इतर उत्पादक प्रयत्नांबद्दल सांगते हे आश्‍चर्याचे नाही. (निर्गम ३५:२५, २६; १ शमुवेल ८:१३; १८:६, ७; २ इतिहास २:१३, १४) बसालेल या कारागीराने त्याच्या कौशल्याचा वापर निवासमंडपाच्या बांधकामास्तव “कलाकुसरीची कामे” करण्यासाठी केला. (निर्गम ३१:३, ४) याबाल मेंढपाळ कदाचित उत्पादक प्रयत्नांनी स्थानांतराच्या जीवनासाठी अनुकूल तंबू बनविण्याचा संशोधक असेल. (उत्पत्ति ४:२०) दावीद हा केवळ संगीतकार आणि रचनाकारच नव्हे, तर संगीत साहित्यामध्ये प्रगती घडविणारा देखील होता. (२ इतिहास ७:६; स्तोत्र ७:१७; आमोस ६:५) तांबड्या समुद्रातून अद्‌भुतरीत्या सुटका झाल्यानंतर इस्राएल लोकांनी आनंदास्तव जे नृत्य केले त्याची रचना कदाचित मिर्यामने केली असावी.—निर्गम १५:२०.

उत्पादकता नेहमीच खऱ्‍या उपासनेसाठी प्रेरणा देणारी एक मौल्यवान गोष्ट आहे. येशूने आपला संदेश कळविण्यासाठी उत्पादकरीत्या दाखल्यांचा आणि वस्तुपाठांचा उपयोग केला. तसेच त्याच्या शिष्यांना देखील, “उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम” घेण्यासाठी आर्जविले जाते. (१ तीमथ्य ५:१७) होय, त्यांचे प्रचार कार्य केवळ नित्यक्रम नाही. उत्पादक शिक्षण पद्धतींची गरज भासणारी ही एक कला आहे. (कलस्सैकर ४:६) विशेषतः आपल्या मुलांना शिक्षण देते वेळी हे महत्त्वाचे आहे.—अनुवाद ६:६, ७; इफिसकर ६:४.

अशाप्रकारे यहोवा निर्माण प्रक्रियेमुळे मिळणाऱ्‍या आनंदाची सहभागिता इतरांसोबत करतो. किती उदार देणगी!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा