संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार—प्वेर्त रीको
कॅरिबियन आणि ॲटलांटिक समुद्राच्या मध्यभागी प्वेर्त रीकोचे कसदार, उष्ण कटिबंधीय बेट आहे. ते स्पेनच्या क्षेत्राखाली येते असा ख्रिस्तोफर कोलंबसने १४९३ मध्ये दावा केला आणि त्याला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानची आठवण म्हणून सॅन ज्युअन बाऊटिस्ट असे नाव दिले. त्यातील सर्वात मोठ्या शहराला प्वेर्त रीको किंवा “समृद्ध बंदर” असे म्हणण्यात येऊ लागले. कालांतराने, हेच नाव संपूर्ण बेटाला लागू करण्यात येऊ लागले व शहराला सॅन ज्युअन हे नाव पडले.
प्वेर्त रीको अनेक बाबतीत खरोखरच एक समृद्ध बंदर ठरले आहे. स्पॅनिश कारकीर्दीच्या सुरवातीच्या वर्षांमध्ये येथून पुष्कळ सोने वाहून नेण्यात आले. तथापि, आजची अर्थव्यवस्था उत्पादन व अनुत्पादन उद्योगाची अधिक प्रमाणात बनली असली तरी, आता हे बेट ऊस, कॉफी, केळी आणि सिट्रस फळे निर्यात करते.
देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार येथे १९३० च्या दशकामध्ये सुरू झाला. आज, प्वेर्त रीकोमध्ये सुवार्तेचे सुमारे २५,००० प्रचारक आहेत. १९९३ मध्ये वॉचटावर संस्थेच्या या शाखेचा कर्मचारी वर्ग २३ पासून १०० पर्यंत पोहंचला आहे. ही वाढ अतिशय आवश्यक होती जेणेकरून हे शाखा दप्तर बायबल साहित्याचे स्पॅनिश भाषेतील भाषांतराच्या कामावर देखरेख करून ते संपूर्ण जगभरातील जवळजवळ ३५,००००,००० स्पॅनिश बोलणाऱ्या लोकांना ही प्रकाशने उपलब्ध करून देता येऊ शकतील.
नवे क्षेत्र
शाखा दप्तर याविषयी असा देखील अहवाल देते: “प्वेर्त रीकोमध्ये एक नवे क्षेत्र खुले करण्यात आले आहे कारण आम्ही राज्याचा संदेश कर्णबधिरांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. एक भगिणी पुढील अनुभव सांगते: ‘मी एकदा कर्णबधिर असलेल्या लोकांमध्ये कार्य करत होते व दोन लहान लेकरे असलेल्या एका स्त्रीला भेट दिली. मी एक साक्षीदार आहे असे तिला कळल्यावर तिने लगेचच मला धिक्कारले कारण तिच्या कर्णबधिर पतीला यहोवाचे साक्षीदार मुळीच आवडत नव्हते.
“‘काही महिन्यांनंतर ही स्त्री तिच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली तेव्हा तिची मैत्रिण साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करीत होती. ती देखील त्या अभ्यासाला बसली आणि तिला तो अतिशय आवडला. मी त्या स्त्रीला पुन्हा भेट दिली तेव्हा पुन्हा एकदा तिने तेच सांगितले की तिच्या पतीला साक्षीदार आवडत नाहीत. परंतु तिची बायबल समजून घेण्याची इच्छा होती. तिला तिच्या चर्चचा कंटाळा आला होता कारण ते बायबल शिकवत नव्हते. आम्ही एका पत्रिकेचा वापर करून अभ्यासाला सुरवात केली. एके दिवशी तिने मला शनिवारच्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितले कारण तिचा पती तेव्हा घरात असेल. मी तिला विचारले, “पण त्यांना तर आम्ही आवडत नाही हो ना?” तिने उत्तर दिले: “यहोवाचे साक्षीदार काय शिकवतात ते त्यांना पाहायचे आहे.”
“‘दुसऱ्या दिवशी दोघेही माझ्या घरी आले! त्या स्त्रीच्या पतीचे खूप प्रश्न असल्यामुळे, मी त्यांना कर्णबधिरांसाठी असलेल्या सभेला येण्याचे आमंत्रण दिले. मी येण्याआधीच तो तेथे आला होता आणि तेव्हापासून त्याने एकही सभा चुकवलेली नाही. तो इतर कर्णबधिरांना प्रचार करतो, एका संमेलनाला उपस्थित राहिला, व बाप्तिस्मा घेण्याची उत्कंठतेने वाट पाहत आहे.’”
शाखा दप्तराचा अहवाल पुढे म्हणतो: “या वर्षी आमच्या प्रांतीय अधिवेशनातील संपूर्ण कार्यक्रम सांकेतिक भाषेत सादर करण्यात आला, यामुळे अनेक कर्णबधिर लोक त्यांच्या कुटुंबासमवेत उपस्थित होते. वक्त्याने, शेवटल्या भाषणात कर्णबधिरांमध्ये चाललेल्या कार्याबद्दलचा उल्लेख केला व ७० जण उपस्थित होते असे सांगितले तेव्हा तो क्षण खरोखरच अतिशय भावनिक होता. तेव्हा खूप मोठ्याने गजर झाला, परंतु वक्त्याने पाहिल्यानुसार कर्णबधिरांना तो ऐकू आला नाही. यास्तव, कर्णबधिरांना श्रोत्यांकडे पाहण्यास सांगून वक्त्याने, ‘तुम्हाला तुमच्या कर्णबधिर बांधवांना तुमच्यासोबत येथे पाहून आनंद होतो का?’ हाच प्रश्न पुन्हा उच्चारला व श्रोत्यांनाही त्यांच्यासोबत दोन्ही हात हालवून गजर करण्यास सांगितले. आमचे ११,००० बंधू आणि भगिणी त्यांचे हात हालवून गजर करतानाचे दृश्य किती मनोरम होते. आमच्या कर्णबधिर बंधू आणि भगिणींना अतिशय आनंद झाला व ते एका महान बंधुत्वाचा एक भाग आहेत असे त्यांना जाणवले. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.”
यहोवाचे साक्षीदार जसे प्वेर्त रीकोमध्ये कापणीच्या कार्यात भाग घेतात तसे ते नक्कीच एक समृद्ध बंदर होत राहील यात काहीच शंका नाही. देवाची “मेंढरे” ज्यांना तो “सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु” असे संबोधतो ते येत राहतील जेणेकरून यहोवाचे भवन गौरवाने भरून जाईल.—योहान १०:१६; हाग्गय २:७.
[९ पानांवरील चौकट]
राष्ट्राची रूपरेषा
१९९४ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: २५,४२८
प्रमाण: १३९ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: ६०,२५२
पायनियर प्रचारकांची सरासरी: २,३२९
बायबल अभ्यासांची सरासरी: १९,०१२
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ९१९
मंडळ्यांची संख्या: ३१२
शाखा दप्तर: ग्वानाबो