वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१ पृ. ८-१२
  • यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात न्याय्य स्थान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात न्याय्य स्थान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इस्राएलने केलेली यहोवाची भक्‍ती
  • खऱ्‍या भक्‍तीसाठी पहिल्या शतकातील आवेश
  • यहोवाची भक्‍ती आज उंचावली गेली
  • यहोवाची उपासना केल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • देव कोणाच्या भक्‍तीचा स्वीकार करतो?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१ पृ. ८-१२

यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात न्याय्य स्थान

“मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन, आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.”—स्तोत्र १४५:२.

१. भक्‍तीच्या बाबतीत, यहोवा काय अपेक्षितो?

“मी तुझा देव यहोवा एकनिष्ठ भक्‍ती अपेक्षिणारा देव आहे.” (निर्गम २०:५, NW] मोशेने यहोवाकडून ती घोषणा ऐकली व नंतर त्याने ती इस्राएल राष्ट्राला संबोधताना पुन्हा सांगितली. (अनुवाद ५:९) आपल्या सेवकांनी आपली भक्‍ती एकनिष्ठेने करावी अशी यहोवा देव अपेक्षा करतो याबद्दल मोशेच्या मनात कोणतीही शंका नव्हती.

२, ३. (अ) सीयोन डोंगराजवळ जे घडले ते विलक्षणीय होते याबद्दल कोणत्या गोष्टीची छाप इस्राएल लोकांवर पडली? (ब) इस्राएल लोक आणि आज देवाचे सेवक करीत असलेली भक्‍ती याबद्दल आपण कोणत्या प्रश्‍नांचे परीक्षण करणार आहोत?

२ इस्राएल लोक तसेच इजिप्तमधून त्यांच्याबरोबर आलेला “मोठा मिश्र समुदाय” यांनी सीयोन डोंगराजवळ छावण्या घातलेल्या असताना काही असामान्य गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या. (निर्गम १२:३८) ज्यांची आता दहा विपत्त्या किंवा पीडांद्वारे मानखंडना करण्यात येत होती त्या, इजिप्तमधील देवांच्या भक्‍तीला ती गोष्ट साम्य नव्हती. यहोवाने मोशेला आपली उपस्थिती प्रकट केली, तेव्हा भयप्रद घटना घडल्या: गडगडाट, विजा व शिंगाचा कानठाळ्या बसवणारा मोठा नाद ज्यामुळे छावणीतले सर्व लोक थरथर कापू लागले. नंतर अग्नी व धूर पसरला व सर्व पर्वत थरथरु लागला. (निर्गम १९:१६-२०; इब्रीयांस १२:१८-२१) घडत असलेले सर्वकाही विलक्षणीय होते याबद्दल एखाद्या इस्राएल व्यक्‍तीला आणखी पुरावा हवा असल्यास तो लवकरच दिसणार होता. त्यानंतर काही काळातच देवाच्या नियमांची दुसरी प्रत प्राप्त केल्यावर आताच मोशे डोंगरावरुन उतरला. प्रेरित अहवालानुसार, “मोशेच्या चेहऱ्‍यांतून तेजाचे किरण निघत आहेत असे . . . लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले.” खरेच एक अविस्मरणीय, अमानुष अनुभव.—निर्गम ३४:३०.

३ देवाच्या त्या नमुनेदार राष्ट्राचे यहोवाच्या भक्‍तीसाठी कोणते स्थान होते याबद्दल काही प्रश्‍नच नव्हता. तो त्यांचा मुक्‍तिदाता होता. त्याने त्यांना जीवन दिले होते. तो त्यांचा नियमदाता देखील होता. पण यहोवाच्या भक्‍तीला त्यांनी प्रथम स्थानी ठेवले का? तसेच देवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांबद्दल काय? यहोवाच्या भक्‍तीला त्यांच्या जीवनात कोणते स्थान आहे?—रोमकर १५:४.

इस्राएलने केलेली यहोवाची भक्‍ती

४. इस्राएलाच्या अरण्यवासातील वास्तव्यात त्यांच्या छावण्यांची रचना कशी होती आणि छावणीच्या केंद्रस्थानी काय होते?

४ इस्राएलांनी अरण्यात ठोकलेल्या डेऱ्‍यांचे तुम्ही विहंगमावलोकन केले असते तर काय पाहिले असते? कदाचित ३० लाख किंवा त्यापेक्षाही अधिक लोकांचे ते विखुरलेले पुष्कळ पण व्यवस्थित डेरे होते. त्यांची विभागणी दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्‍चिमेकडील दिशेत तीन वंशाच्या दलात केली होती. जवळून निरीक्षण केल्यावर, छावणीच्या मध्यभागी असलेल्या डेऱ्‍याजवळ आणखी एक दल देखील तुमच्या दृष्टीस पडले असते. या चार लहान डेऱ्‍यांमध्ये लेवी वंशाची कुटुंबे होती. छावणीच्या अगदी मध्यभागी, कापडाच्या भिंतीने वेगळा केलेला एक भाग अद्वितीय होता. तो भाग, “दर्शनमंडप,” किंवा “निवासमंडप” होता; त्याला यहोवाच्या योजनेनुसार ‘सुबुद्ध हृदयाच्या’ इस्राएल लोकांनी बांधले होते.—गणना १:५२, ५३; २:३, १०, १७, १८, २५; निर्गम ३५:१०.

५. इस्राएलात निवासमंडपाने कोणता उद्देश सार्थ केला?

५ इस्राएलांनी अरण्यवासाच्या स्थलांतरादरम्यान ४० वेळा तळ ठोकण्याच्या प्रत्येक वेळी, निवासमंडपाची उभारणी केली व ते त्यांच्या डेऱ्‍याचे केंद्रस्थान बनले. (गणना, अध्याय ३३) यामुळे, यहोवा आपल्या लोकांच्या छावणीच्या मध्यभागी राहतो असे वर्णन बायबल करते, हे अगदी उचित आहे. त्याचे वैभव निवासमंडपाला भरुन टाकत होते. (निर्गम २९:४३-४६; ४०:३४; गणना ५:३; ११:२०; १६:३) आवर लिव्हिंग बायबल हे पुस्तक सांगते: “हे सहज वाहून नेता येण्याजोगे पवित्र मंडप, अतिशय महत्त्वाचे होते कारण त्यामुळे ते सर्व वंशांसाठी धार्मिक मेळाव्याचे केंद्र बनले. अशाप्रकारे त्याने त्यांना प्रदीर्घ वर्षांसाठी ओसाड प्रदेशात भटकत राहताना एकतेत ठेवले व शक्यतो ऐक्याने कार्य करण्यास शक्य केले.” यापेक्षाही अधिक म्हणजे, इस्राएल लोकांच्या जीवनात त्यांच्या निर्माणकर्त्याची भक्‍ती महत्त्वपूर्ण स्थानी होती याचे निवासमंडपाने त्यांना सतत स्मरण करुन दिले.

६, ७. उपासनेसाठी निवासमंडपाचा बदल कोणत्या रचनेत केला व याने इस्राएलाच्या राष्ट्रात कसे कार्य केले?

६ इस्राएल लोक वाग्दत्त देशात पोहंचल्यावर देखील निवासमंडप त्यांच्या उपासनेचे एक केंद्रस्थान राहिले. (यहोशवा १८:१; १ शमुवेल १:३) काही काळानंतर, दावीद राजाने कायम स्वरुपाची इमारत उभारण्याची योजना केली. त्याचा पुत्र शलमोन याने नंतर बांधलेले हेच ते मंदिर होय. (२ शमुवेल ७:१-१०) समर्पणाच्यावेळी त्या इमारतीला यहोवाची संमती दर्शवण्यासाठी मेघ खाली उतरले. शलमोनाने प्रार्थना केली, “तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग रहावयासाठी मंदिर मी बांधिले आहे.” (१ राजे ८:१२, १३; २ इतिहास ६:२) आता नव्यानेच बांधलेले मंदिर, राष्ट्राला भक्‍तीचे केंद्र झाले.

७ यहोवाच्या आशीर्वादाप्रीत्यर्थ, सर्व इस्राएल पुरूष वर्षातून तीन वेळा मंदिरात हर्षदायक सणाला उपस्थित राहण्यासाठी जेरूसलेमला जात. अगदी उचितपणे, देवाच्या भक्‍तीवर लक्ष केंद्रित करणाऱ्‍या या पुनर्मीलनांची योजना ‘यहोवाच्या नेमलेल्या सणासाठी’ केली होती. (लेवीय २३:२, ४, पं. र. भाषांतर) धर्मपरायण स्त्रिया कुटुंबाच्या इतर सदस्यांसोबत त्या सणाला उपस्थित राहात.—१ शमुवेल १:३-७; लूक २:४१-४४.

८. स्तोत्र ८४:१-१२ यहोवाच्या भक्‍तीच्या महत्त्वाबद्दल कशी साक्ष देते?

८ प्रेरित स्तोत्रकर्त्यांनी भक्‍ती त्यांच्या जीवनात किती महत्त्वपूर्ण होती हे मनोवेधकपणे कबूल केले. कोरहाच्या पुत्रांनी गायिले, “हे सेनाधीश परमेश्‍वरा [यहोवा, NW] तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!” ते निश्‍चितच केवळ एखाद्या भव्य इमारतीचे स्तवन करीत नव्हते. उलटपक्षी त्यांनी: “माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत” असे म्हणत यहोवा देवाची स्तुती करीत आपला आवाज उंचावला. लेव्यांच्या सेवेमुळे त्यांना अत्याधिक आनंद मिळाला. त्यांनी म्हटले, “तुझ्या घरात राहणाऱ्‍यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुति करीत राहतील.” वस्तुतः, सर्व इस्राएल लोक गाऊ शकत होते: “ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य. . . . ते अधिकाधिक शक्‍ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते.” एखाद्या इस्राएल मनुष्याला जेरूसलेमचा प्रवास लांबचा आणि थकवा आणणारा वाटला असला, तरी राजधानीत आल्यावर त्याला परत शक्‍ती मिळत असे. यहोवाची भक्‍ती करण्याच्या विशेषाधिकाराची जशी स्तुती केली जात तसे त्याचे अंतःकरण हर्षाने भरत असे: “खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. . . . हे सेनाधीश परमेश्‍वरा [यहोवा, NW] जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य!” या वक्‍तव्यामुळे त्या इस्राएली लोकांनी यहोवाच्या भक्‍तीला दिलेली प्राधान्यता प्रकट होते.—स्तोत्र ८४:१-१२.

९. इस्राएल राष्ट्र यहोवाच्या भक्‍तीला प्रथम स्थानी ठेवण्यात अपयशी झाल्याने त्याचे काय झाले?

९ इस्राएल लोक खऱ्‍या भक्‍तीला प्रथम स्थानी ठेवण्यात मागे पडले हे दुःखाचे आहे. त्यांनी खोट्या देवांच्या भक्‍तीला यहोवाबद्दलच्या स्वतःच्या आवेशाला कमजोर होऊ दिले. परिणामी, यहोवाने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती सोडून देऊन, बॅबिलोनला दास्यत्वात घेऊन जाण्यासाठी अनुमती दिली. त्यांना ७० वर्षांनी आपल्या मायदेशी पाठवल्यावर, यहोवाने इस्राएलांना हाग्गय, जखऱ्‍या व मलाखी या विश्‍वासू संदेष्ट्यांचा उत्साहवर्धक उपदेश पुरवला. एज्रा याजक आणि राज्यपाल नहेम्या यांनी तेथे मंदिराची पुर्नउभारणी व खऱ्‍या भक्‍तीची पुनर्स्थापणा करण्याचे उत्तेजन देवाच्या लोकांना दिले. पण काही शतके उलटल्यावर खऱ्‍या भक्‍तीला त्या राष्ट्रात पुन्हा एकदा कमी प्राधान्य मिळू लागले.

खऱ्‍या भक्‍तीसाठी पहिल्या शतकातील आवेश

१०, ११. येशू पृथ्वीवर असताना, यहोवाच्या भक्‍तीला विश्‍वासू सेवकांच्या जीवनात कोणते स्थान होते?

१० यहोवाच्या नेमस्त वेळी, मशीहा आला. विश्‍वासू लोक तारण मिळण्यासाठी यहोवाकडे पाहत होते. (लूक २:२५; ३:१५) लूक शुभवर्तमानाचा अहवाल ८४ वर्षे वयाची विधवा हन्‍ना हिचे मार्मिकपणे वर्णन करतो की, ती “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे.”—लूक २:३७.

११ येशूने म्हटले, “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) येशूने मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्‍यांचा सामना करताना कशी प्रतिक्रिया दाखवली त्याची आठवण करा. त्याने त्यांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्‍यांच्या बैठकी उलथून टाकल्या. मार्क सांगतो: “[येशूने] कोणालाहि कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही; मग तो त्यास शिक्षण देऊ लागला व म्हणाला की: “माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील, ‘असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही लुटारुंची गुहा करुन टाकली आहे.’” (मार्क ११:१५-१७) होय, येशूने शहराच्या दुसऱ्‍या भागात वस्तू घेऊन जाण्यासाठी मंदिराच्या अंगणातून जवळच्या मार्गाने देखील कोणालाही जाऊ दिले नाही. येशूच्या कार्यांनी त्याच्या आधी दिलेल्या सल्ल्याला मजबूत केले: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व [देवाचे] नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्तय ६:३३) यहोवा देवाची एकनिष्ठ भक्‍ती करण्यात येशूने आपल्यासाठी एक आश्‍चर्यकारक उदाहरण मांडले आहे. त्याने ज्याचा प्रचार केला त्याचा खरोखरच अवलंब केला.—१ पेत्र २:२१.

१२. येशूच्या शिष्यांनी यहोवाच्या भक्‍तीला दिलेली प्राथमिकता कशी प्रदर्शित केली?

१२ येशूने अपमानीत पण विश्‍वासू यहुद्यांना खोट्या धार्मिक प्रथांच्या ओझ्यापासून मुक्‍त करुन आपले कार्य पूर्ण करण्याद्वारे, आपल्या शिष्यांना अनुसरण्यासाठी आदर्श ठेवला. (लूक ४:१८) शिष्य बनविण्याच्या व बाप्तिस्मा देण्याच्या येशूच्या आज्ञेचे पालन करून, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आपल्या पुनरूत्थित प्रभूसंबंधी धैर्याने यहोवाची इच्छा विदित केली. त्यांनी यहोवाच्या भक्‍तीसाठी दिलेल्या प्राधान्यतेमुळे तो अधिक प्रसन्‍न झाला. अशाप्रकारे, स्वतः देवाच्या दूताने प्रेषित पेत्र व योहान यांना चमत्कारिकरित्या मुक्‍त केले आणि त्यांना सूचना दिली: “जा आणि मंदिरात उभे राहून ह्‍या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा.” त्यांनी पूर्वीच्या जोमाने त्याचे आज्ञापालन केले. दररोज जेरुशलेमातील मंदिरात व घरोघर “शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.”—प्रेषितांची कृत्ये १:८; ४:२९, ३०; ५:२०, ४२; मत्तय २८:१९, २०.

१३, १४. (अ) सैतानाने आरंभीच्या ख्रिस्ती काळापासून, देवाच्या सेवकांना काय करण्याचा प्रयत्न केला? (ब) देवाच्या विश्‍वासू सेवकांनी काय करण्याचे चालू ठेवले आहे?

१३ त्यांच्या प्रचाराला विरोध जसा वाढत राहिला, तसा समयोचित सल्ला लिहिण्यास देवाने आपल्या विश्‍वासू सेवकांना मार्गदर्शन दिले. “[यहोवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो,” असे पेत्राने सा. यु. ६० नंतर लगेच लिहिले. “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो; त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” आरंभीच्या ख्रिश्‍चनांना त्या शब्दांमुळे निश्‍चितच धीर मिळाला. त्यांना माहीत होते की थोडा वेळ दुःख सोसल्यावर देव त्यांचे हे प्रशिक्षण समाप्त करील. (१ पेत्र ५:७-१०) यहुदी व्यवस्थिकरणाच्या त्या शेवटल्या काळात, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी यहोवाच्या प्रेमळ भक्‍तीचे गौरव करुन तिला उंचावले.—कलस्सैकर १:२३.

१४ प्रेषित पौलाने भाकीत केल्याप्रमाणे, खऱ्‍या भक्‍तीपासून दूर नेणारा धर्मत्याग घडला. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनीकाकर २:३) पहिल्या शतकाच्या शेवटल्या दशकातील साक्षीने हा पुरावा दिला. (१ योहान २:१८, १९) सैतानाने खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये नकली ख्रिश्‍चनांची यशस्वी पेरणी केल्यामुळे, गव्हासारख्या ख्रिश्‍चनांमधून या ‘निदणाला’ ओळखणे कठीण झाले. असे असले तरी, गेल्या शतकांमध्ये काही वैयक्‍तिकांनी त्यांचे जीव धोक्यात घालूनही देवाच्या भक्‍तीला प्रथम स्थान दिले. पण देवाने खऱ्‍या भक्‍तीला उंचावण्यासाठी आपल्या सेवकांना ‘परराष्ट्रीयांच्या सद्दीची’ दशके समाप्त होईपर्यंत पुन्हा एकत्र केले नाही.—मत्तय १३:२४-३०, ३६-४३; लूक २१:२४.

यहोवाची भक्‍ती आज उंचावली गेली

१५. १९१९ पासून, यशया २:२-४ आणि मीखा ४:१-४ मधील भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या आहेत?

१५ यहोवाने १९१९ मध्ये अभिषिक्‍त शेषांना धैर्याने जगव्याप्त साक्ष देण्याची जोरदार मोहीम सुरु करण्यासाठी समर्थ केल्यामुळे खऱ्‍या देवाच्या भक्‍तीला उंच केले गेले. १९३५ पासून लाक्षणिक “दुसरी मेंढरे,” यांच्या झुंडी येत राहिल्याने, “परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] मंदिराचा डोंगर” आध्यात्मिकरित्या चढून येत असलेल्या लोकांच्या झुंडी वाढतच आहेत. १९९३ सेवा वर्षाच्या दरम्यान, ४७,०९,८८९ यहोवाच्या साक्षीदारांनी उंचावलेली भक्‍ती करण्यात इतरांना आमंत्रण देऊन त्याची स्तुती केली. ही गोष्ट खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य असलेल्या, विशेषपणे ख्रिस्ती धर्मजगताच्या सांप्रदायिक ‘टेकड्यांच्या’ हिणकस आध्यात्मिक परिस्थितीच्या किती विपरीत आहे!—योहान १०:१६; यशया २:२-४; मीखा ४:१-४.

१६. यशया २:१०-२२ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, देवाच्या सर्वच सेवकांना काय करण्याची गरज आहे?

१६ खोट्या धर्माचे अनुयायी त्यांचे चर्च व मुख्य चर्च तसेच पाळकांना “उच्च” समजून मनोवेधक पदव्या व सन्मान देतात. पण यशयाने काय भाकीत केले त्याकडे लक्ष द्या: “त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल, व परमेश्‍वरच [यहोवा, NW] काय तो उच्च स्थानी विराजेल.” हे केव्हा होईल? जवळ येऊन ठेपलेल्या मोठ्या संकटाच्या दरम्यान “मूर्ति तर अगदी नाहीतशा होतील” तेव्हा. तो भयप्रद काळ जवळ येऊन ठेपला आहे हे लक्षात घेता, देवाच्या सर्व सेवकांनी त्यांच्या जीवनात यहोवाच्या भक्‍तीला कोणते स्थान आहे याचे गंभीरपणे परीक्षण करण्याची आवश्‍यकता आहे.—यशया २:१०-२२.

१७. यहोवाचे सेवक आज यहोवाच्या भक्‍तीसाठी प्राथमिकता देत असल्याचे कसे प्रदर्शित करीत आहेत?

१७ आंतरराष्ट्रीय बंधुत्त्व या नात्याने, यहोवाचे साक्षीदार राज्याचा प्रचार करण्याच्या आवेशाबद्दल विख्यात आहेत. त्यांची भक्‍ती वरकरणी धर्माने आठवड्यातून अंदाजे केवळ एका तासापुरती मर्यादित केलेली नाही. उलटपक्षी, ती त्यांच्या संपूर्ण जीवनाचा भाग आहे. (स्तोत्र १४५:२) गत वर्षात ६,२०,००० पेक्षा अधिक साक्षीदारांनी ख्रिस्ती सेवेत पूर्ण वेळ भाग घेण्यासाठी आपल्या कामकाजाची तजवीज केली. इतरजण यहोवाच्या भक्‍तीकडे नक्कीच दुर्लक्ष करत नाहीत. त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍या त्यांच्याकडून लौकिक नोकरीवर कष्टाचे काम करण्याची मागणी करीत असले, तरी ही गोष्ट, त्यांच्या दैनंदिन संभाषणात आणि जाहीर प्रचारकार्यात प्रामुख्याने दिसून येते.

१८, १९. साक्षीदारांच्या जीवनकथा वाचल्याने तुम्हाला मिळालेली प्रोत्साहनदायक उदाहरणे सांगा.

१८ टेहळणी बुरुज यामध्ये प्रकाशित झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवनकथांमध्ये विविध बंधू व भगिनींनी यहोवाच्या भक्‍तीला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवले याची सूक्ष्मदृष्टी पुरवितात. एका तरुण बहिणीने ती सहा वर्षांची असताना स्वतःचे जीवन यहोवाला समर्पित करुन मिशनरी सेवा करण्याचे ध्येय ठेवले. तरुण बांधवांनो व भगिनींनो यहोवाच्या भक्‍तीला तुमच्या जीवनात प्रथम स्थानी ठेवण्यास मदत करण्यासाठी कोणत्या ध्येयाची निवड तुम्ही करु शकता?—टेहळणी बुरुज मार्च १, १९९२, पृष्ठे २६-३० वरील “सहा वर्षांची असताना ठेवलेले ध्येय गाठण्याचा पाठलाग,” हा लेख पाहा.

१९ यहोवाच्या भक्‍तीला न्याय्य स्थान देण्याच्या बाबतीत आणखी एक वयस्कर विधवा बहीण उत्तम उदाहरण पुरवते. सत्य शिकण्यास मदत केलेल्यांकडून तिला सहन करण्याचे अधिक प्रोत्साहन मिळाले. ते तिचे “कुटुंब” होते. (मार्क ३:३१-३५) तुमची परिस्थिती यासारखीच असल्यास, मंडळीतील तरुणांकडून तुम्ही पाठबळ व मदतीचा स्वीकार करणार का? (विनीफ्रेड रिमी या बहिणीने जुलै १, १९९२ मध्ये प्रकाशित झालेल्या टेहळणी बुरुज मधील पृष्ठे २१-३ वरील “मी कापणीच्या काळी प्रतिसाद दिला,” यात आपले मत कशाप्रकारे मांडले ते पहा.) तुम्ही पूर्ण वेळेचे सेवकहो, नेमलेल्या ठिकाणी नम्रतेने सेवा करुन आणि स्वेच्छेने ईश्‍वरशासित मार्गदर्शनाच्या अधीन राहून यहोवाची भक्‍ती तुमच्या जीवनात प्रथम स्थानी येते हे प्रदर्शित करा. (कृपया डिसेंबर १, १९९१ च्या टेहळणी बुरुज मधील पृष्ठे २४-७ वरील “देवाच्या संघटनेला जडून राहा” या लेखात कथन केलेल्या बंधू रॉय राय्यन यांचे उदाहरण लक्षात घ्या.) यहोवाच्या भक्‍तीला आपण प्राथमिकता देतो, तेव्हा तो काळजी घेईल ही खातरी आपल्याला असते, हे लक्षात ठेवा. आपल्या जीवनाच्या गरजा कशा पुरवल्या जातील याची काळजी करीत बसण्याची गरज नाही. बहीण ऑलिव्ह आणि सोनिया स्प्रिंगेट यांचा अनुभव याची स्पष्टता करतो—“आम्ही प्रथम राज्याचा शोध केला,” हा टेहळणी बुरुज फेब्रुवारी १, १९९४ पृष्ठे २०-५ वरील लेख पाहा.

२०. आता आपण स्वतःला कोणते समर्पक प्रश्‍ने विचारले पाहिजेत?

२० मग, वैयक्‍तिकरित्या आपण स्वतःला काही भेदक प्रश्‍ने विचारु नयेत का? माझ्या जीवनात यहोवाच्या भक्‍तीला काय स्थान आहे? देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्तृत्वाची पराकाष्टा करुन मी माझ्या समर्पणानुरूप कार्य करत आहे का? मी जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात सुधारणा करु शकतो? पुढील लेखाचा काळजीपूर्वक विचार, आपण निवडलेली जीवनातील प्राथमिकता म्हणजे, आमचा प्रेमळ पिता, सार्वभौम प्रभू यहोवाची भक्‍ती—यासोबत जुळवून घेण्यासाठी आपण आपल्या संपत्तीचा वापर कसा करतो, याबद्दल मनन करण्यास सुसंधी पुरवील.—उपदेशक १२:१३; २ करिंथकर १३:५

उजळणीत

▫ भक्‍तीच्या बाबतीत, यहोवा काय अपेक्षितो?

▫ निवासमंडप कशाचे स्मरण करुन देणारा होता?

▫ सा. यु. पहिल्या शतकात, खऱ्‍या भक्‍तीच्या आवेशासाठी कोणाची उदाहरणे उल्लेखनीय होती आणि कशी?

▫ यहोवाची भक्‍ती १९१९ पासून कशी उंचावली गेली आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा