संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार पोलंड
बाल्टिक पासून काळ्या समुद्रापर्यंतच्या साम्यवादी सरकारांचा, १९८९ च्या शरदऋतुत चुराडा होण्यास सुरवात झाली. पोलादी पडदा जसजसा फाडला जात होता तसे पूर्व युरोपातील राष्ट्र, त्यांच्या स्वतंत्र मार्गांचे अवलंबन करू लागले. त्यामध्ये अखंड टेकड्यांनी, सपाट मैदान आणि खडबडीत पर्वतांनी वेढलेले पोलंड हे एक राष्ट्र होते.a
पोलिश लोक कष्टाळू कामगार आहेत, शिवाय पोलंडमध्ये जगातील काही नामवंत कलावंत व शास्त्रज्ञ होऊन गेले. परंतु याहूनही अधिक म्हणजे, देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणाऱ्या उद्घोषकांची वाढती संख्या तेथे आहे.
खोटेपणा उघड करण्यात धैर्यशील
पोलंड मध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना बायबलमधून सत्य शिकण्याची इच्छा आहे. परंतु काहींना त्यांच्या नातेवाईकांचे किंवा शेजाऱ्यांचे भय वाटते. उदाहरणार्थ, व्रोक्लॉ शहराच्या आसपास, एका आस्थेवाईक स्त्रीने, तिचे कुटुंब व स्नेही तिच्यावर दबाव आणू लागले तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांसोबतचा तिचा बायबल अभ्यास थांबवला. तरी देखील तिच्या किशोरवयीन मुलीने, खोटा धर्म उघडकीस आणणारी टेहळणी बुरूज श्रृंखला वाचली. यामुळे तिच्या मुलीची सत्यासाठी आस्था प्रज्वलित झाली.
सहा महिन्याच्या बायबल अभ्यासानंतर, ह्या तरुणीने खोट्या धर्मासोबत असलेले तिचे सर्व संबंध तोडण्याचा निश्चय केला. तिने तिच्या चर्चच्या पाळकाला भेट देऊन तिचा निर्णय स्पष्ट सांगितला. त्याने तिला पुढीलप्रमाणे लिहावयास सांगितले: “मी, के—— पी——, कॅथलिक विश्वासाचा त्याग करते.”
पुढील रविवारी, हे विधान चर्चमध्ये वाचण्यात आले. त्या मुलीचे आजोबा बेशुद्ध झाले आणि तिच्या आजीला रडू आवरले नाही. परंतु इतर चर्च सदस्य प्रभावीत झाले आणि म्हणाले: “आमच्या चर्चमध्ये पुष्कळ खोटेपणा आहे हे सांगण्यासाठी निदान एकाचे तरी धैर्य झाले.” ही धैर्यशील कुमारी आता बाप्तिस्मा प्राप्त आध्यात्मिक बहीण आहे आणि तिने तिच्या गावात सात बायबल अभ्यास चालू केले आहेत.
‘त्यांच्या फळांवरून’
कुआव ई पोमोझ या साप्ताहिकाने “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल” हा अहवाल प्रकाशित केला. त्या लेखाच्या काही भागात असे म्हटले, की ख्रिस्ती धर्मजगतातील उपासक “वास्तविक पाहता त्यांनी जी धार्मिक तत्त्वे स्वीकारली आहेत त्यांचे गंभीरपणे पालन करीत नाहीत. त्यांच्यामध्ये आणि यहोवाच्या साक्षीदारांमध्ये बराच फरक आहे. कारण यहोवाचे साक्षीदार जो प्रचार करतात त्यानुसार वागतात व बायबल जी आज्ञा देते त्याचाच प्रचार करतात.”
साक्षीदार आणि नामधारी ख्रिस्ती लोकांमधील फरक दाखवल्यानंतर, तो अहवाल पुढे म्हणतो: “नामधारी ख्रिस्ती लोकांना त्यांच्या विश्वासाची महत्त्वपूर्ण सत्ये आणि तत्त्वे माहीत नसतात, त्याहूनही अधिक म्हणजे ते त्यांचे पालन करीत नाहीत. . . . यहोवाचे साक्षीदार त्यांच्या बोलण्यातील आणि कृतीतील सुसंगतता त्यांच्या वृत्तीतून प्रदर्शित करतात. यावरून ते, ‘खोटे संदेष्टे’ नाहीत तर, त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखता येते हे शाबीत करतात. ‘काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय?’ (मत्तय ७:१५-२०).”
एका स्त्रीने, पचेचुच्का नावाच्या साप्ताहिकेला एक पत्र लिहिले. त्यात तिने विलाप करीत म्हटले, की तिच्या मुलाने कॅथलिक चर्च सोडून दिले आणि तो यहोवाचा एक साक्षीदार बनला. त्यावर संपादिकेची प्रतिक्रिया काय होती? “तुमच्या मुलाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास करण्याचे निवडले असेल, त्यांच्या विश्वासाबद्दल शिकून त्याचा स्वीकार केला असेल तर तो त्याचा निर्णय आहे, ज्याला आम्ही मान्यता देऊन आदर दिला पाहिजे. . . . या धार्मिक गटाची अनेक सुंदर आणि सामाजिकरीत्या इष्ट वाटणारी गुणलक्षणे आहेत ज्यांची वैशिष्ट्ये सांगता येतात. जसे की, त्यांचा विलक्षण ऐक्यभाव व नातेसंबंधाचे सखोल बंध, मोठी प्रामाणिकता आणि सामाजिक जीवनाच्या स्वीकृत नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि शेवटी ज्या मूल्यांचा ते दावा करतात त्यांचे अनुकरण करून त्यांच्या सत्यानुसार चालण्याची त्यांची क्षमता. हे मौल्यवान सद्गुण आहेत.”
[तळटीपा]
a अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांची १९९४ दिनदर्शिका पहा.
[९ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र १९९३ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: १,१३,५५१
प्रमाण: ३३९ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: २,३५,६४२
पायनियर प्रचारकांची सरासरी: ७,९६१
बायबल अभ्यासांची सरासरी: ७९,१३१
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ८,१६४
मंडळ्यांची संख्या: १,३९७
शाखा दप्तर: नॉदॉझीन
[९ पानांवरील चित्रं]
लुझ येथील १९४८ मधील पोलंडचे शाखा दप्तर
[९ पानांवरील चित्रं]
पूर्वीच्या पश्चिम प्रशियात, जून १९४८ मधील घोषणाफलक कार्य
[९ पानांवरील चित्रं]
पोलंड बेथेल कर्मचारी वर्गाचे ७२ सदस्य, जानेवारी १९९३
[९ पानांवरील चित्रं]
नॉदॉझीन येथील नवे शाखा दप्तर