वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१५ पृ. ३२
  • ‘ढळणार नाहीत अशी मूळे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘ढळणार नाहीत अशी मूळे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१५ पृ. ३२

‘ढळणार नाहीत अशी मूळे’

कॅलिफोर्नियातील सीख़या वृक्ष जगातील सर्वात उत्तुंग व जुन्या सजीव गोष्टी आहेत. हे उत्तुंग आश्‍चर्यकारक वृक्ष ९० मीटर उंच वाढतात तेव्हा पूर्णतेला पोंहचतात. ते ३,००० वर्षांपर्यंत जगू शकतात.

सीख़या वृक्षाचे दृश्‍य भयजनक असले तरी, त्याची अदृश्‍य मूळसंस्था त्यासारखीच प्रभावकारी आहे. सीख़या वृक्षाची मुळे सपाट व अतिशय गुंतागुंतीची असतात जी तीन किंवा चार एकर जमिनीला व्यापू शकतात. ही अवाढव्य मूळसंस्था, पूर किंवा वादळ असला तरी जमिनीत भक्कम पकड ठेवते. सीख़या वृक्ष जोरदार भूमिकंपातही टिकाव धरू शकतो!

शलमोन राजाने त्याच्या एका नीतीसूत्रामध्ये रूपक म्हणून, सर्वात बळकट वृक्षाची मूळसंस्था निवडली. तो म्हणाला, “दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण न्यायीचे मूळ ढळणार नाही.” (नीतीसूत्रे १२:३, पं. र. भाषांतर) होय, दुष्ट लोक डळमळणाऱ्‍या जमिनीवर आहेत. त्यांना मिळणारे कोणतेही यश तात्कालिक स्वरूपाचे असते, कारण यहोवा अभिवचन देतो की “दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.”—नीतीसूत्रे १०:२८.

ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांसाठी हा इशारा आहे. कारण येशूने म्हटले की काहींना स्वतःमध्ये “मूळ नसल्याकारणाने” ते अडखळतील. (मत्तय १३:२१) पुढे, प्रेषित पौलाने ‘[खोट्या] शिकवणरूपी वाऱ्‍याने हेलकावतील व फिरतील’ अशा लोकांविषयी लिहिले. (इफिसकर ४:१४) ते कसे टाळता येऊ शकेल?

सीख़या वृक्षाची मुळे पृथ्वीच्या कसदार जमिनीत जशी विस्तारितपणे पसरतात त्याचप्रकारे देवाच्या वचनातील जीवन देणारे पाणी शोषून घेण्यासाठी आपले मन आणि हृदय ज्ञानार्जनासाठी घालणे जरूरीचे आहे. हे आम्हाला खोलवर रूजलेला विश्‍वास वाढवण्यास मदत करील. होय, आम्हाला वादळी परीक्षांचे परिणाम जाणवतील. संकटकाळी आम्ही कदाचित वृक्षासारखे थरथर कापू. परंतु जर आमचा विश्‍वास भक्कम आहे तर आम्ही ‘ढळणार नाहीत अशी मूळे’ शाबीत होऊ.—पडताळा इब्रीकर ६:१९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा