वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. २२-२५
  • खऱ्‍या जागतिक बंधुत्वात आनंदी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खऱ्‍या जागतिक बंधुत्वात आनंदी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बंधुत्वासोबत परिचय
  • पूर्णवेळेची विस्तारित सेवा
  • आमच्या बंधुत्वाकरिता एक कसोटी
  • इथियोपियातील विश्‍वासू बांधव
  • जनजातीवादावर विजय
  • आपल्या बंधुत्वामुळे आनंदी
  • दक्षिण आफ्रिका—अनेक वंश, अनेक झगडे पण काहींना शांती प्राप्त
    सावध राहा! माहितीपत्रक ६-४ (gbr6-4)
  • वांशिक असोशिकपणा यावर उपाय काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • यहोवाच्या सेवेतील समृद्ध जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मी यहोवाबद्दल शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद अनुभवलाय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. २२-२५

खऱ्‍या जागतिक बंधुत्वात आनंदी

विली डेवीस यांच्याद्वारे कथित

१९३४ मध्ये महामंदी जगावर पकड बसवत होती, व अमेरिका तर आर्थिक गोंधळाशी झगडत होती. क्लिवलँड, ओहायो येथे प्रॉस्पेक्ट रिलिफ स्टेशन नावाच्या ठिकाणाबाहेर, एका पोलिस आणि प्रतिज्ञात साम्यवाद्यामध्ये जोरदार झटापट चालली होती. पोलिसाने, साम्यवादी आणि त्या दोघांची झटापट पाहत उभी असलेली माझी आजी, विनी विल्यम्स या दोघांना गोळ्या झाडून ठार मारले.

साम्यवाद्यांनी ही मृत्युची घटना, जातीय वादातून झाली असे सांगण्याचा प्रयत्न केला, कारण माझी आजी कृष्णवर्णीय होती आणि तो पोलीस श्‍वेतवर्णीय होता. त्यांनी “जातीयवादी क्लिवलँड पोलिस,” आणि “या खुनाचा बदला घ्या” अशी शीर्षके असलेली बातमीपत्रे वाटली. साम्यवाद्यांनी माझ्या आजीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था व देखरेख केली. माझ्याकडे शवपेटीला उचलणाऱ्‍या श्‍वेतवर्णीय लोकांचा आणि साम्यवादी पक्षाच्या सर्व सदस्यांचा फोटो आहे. प्रत्येकाने त्याची मूठ आवळून वर धरली आहे व हीच पद्धत नंतर, जातीय समता वाढणाऱ्‍या कृष्णवर्णीयांची शक्‍ती नावाच्या गटाने आपले प्रतीक म्हणून स्वीकारली.

माझी आजी वारली तेव्हा तिची मुलगी मला गर्भाशयात वागवत होती. चार महिन्यांनी माझा जन्म झाला. मी लहानपणापासून तोतरा होतो. मी तोतरा बोलत होतो, म्हणून माझ्या सुरवातीच्या शालेय अभ्यासात, बोलण्याची उपचारपद्धत समाविष्ट होती.

मी पाच वर्षांचा असताना माझ्या पालकांची फारकत झाली. माझ्या आईने मला आणि माझ्या थोरल्या बहिणीला सांभाळले. मी दहा वर्षांचा झाल्यावर, कौटुंबिक खर्चाला हातभार लावण्यासाठी शाळेनंतर किराणा माल पोहोचतो करण्याचे काम करत होतो. दोन वर्षांनंतर मी शाळेच्या आधी आणि नंतरही काम करू लागलो. अशारीतीने मी कुटुंबाचा प्रमुख कमावणारा झालो. आईला दवाखान्यात दाखल केल्यावर, आणि तिला लागोपाठ शस्त्रक्रियांची आवश्‍यकता भासल्यामुळे मी शाळा सोडून दिली व पूर्णवेळेची नोकरी करू लागलो.

बंधुत्वासोबत परिचय

१९४४ मध्ये यहोवाच्या एका साक्षीदाराने माझ्या मामे भावाच्या बायकोला, “सत्य तुम्हाला स्वतंत्र करील” (इंग्रजी) हे पुस्तक दिले आणि तिच्यासोबत चालू झालेल्या अभ्यासात मी गोवलो गेलो. त्याच वर्षी मी ईस्टसाईड मंडळीतील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत उपस्थित राहू लागलो. प्रशालेचे शिक्षक, अल्बर्ट क्रडक यांनाही माझ्यासारखीच बोलण्याची समस्या होती. परंतु त्यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यास शिकले होते. ते माझ्यासाठी किती उत्तेजनकारक होते!

आमचा आजूबाजूचा परिसर अधिककरून इटालियन, पॉलिश, हंगेरीयन आणि यहूदी लोकांचा होता. आमची मंडळी या आणि इतर जातीच्या लोकांची मिळून बनलेली होती. माझ्या चुलत भावाची बायको व मी, आम्ही दोघे, श्‍वेतवर्णीयांच्या मंडळीसोबत सहवास ठेवणारे प्रथम आफ्रिकन अमेरिकी होतो. परंतु साक्षीदारांनी आमच्याविषयी कधीही जातीय पूर्वग्रह बाळगला नाही. वास्तविक पाहता, त्यांनी मला नियमितपणे त्यांच्या घरी पाहुणा म्हणून जेवणासाठी आमंत्रण दिले.

१९५६ मध्ये, मी अमेरिकेच्या दक्षिण भागात, सेवकांची जेथे जास्त गरज होती तेथे सेवा करण्यास गेलो. एकदा उन्हाळ्यात, प्रांतीय अधिवेशनासाठी मी उत्तरेला परतलो तेव्हा, क्लिवलँडमधील अनेक बांधव मला भेटावयास आले व माझ्या कार्यांविषयी त्यांनी गाढ आस्था व्यक्‍त केली. त्यांच्या काळजीने मला एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला: नेहमी ‘आपलेच हित न पाहता दुसऱ्‍यांचेही पाहावे.’—फिलिप्पैकर २:४.

पूर्णवेळेची विस्तारित सेवा

तीन वर्षांसाठी पायनियर या नात्याने प्रचारकार्यात पूर्णवेळेची सेवा केल्यावर, नोव्हेंबर १९५९ मध्ये, मला न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त मुख्यालयात, ब्रुकलिन बेथेलमध्ये काम करण्याचे निमंत्रण मिळाले. माझी नेमणूक शिपींग विभागात केली होती. माझ्या विभागाचे पर्यवेक्षक, क्लॉस जेन्सन आणि माझ्या खोलीतील सोबती, विल्यम हॅनन, हे दोघे श्‍वेतवर्णीय, माझ्यासाठी आध्यात्मिक पिता असे बनले. मी बेथेलमध्ये येण्याआधी प्रत्येकाने तेथे जवळजवळ ४० वर्षांसाठी सेवा केली होती.

१९६० च्या दशकाच्या सुरवातीला, बेथेल कुटुंबाचे जवळजवळ ६०० सदस्य होते, आणि सुमारे २० जण आफ्रिकन अमेरिकी होते. तोपर्यंत, अमेरिका, जातीय झगड्यांनी क्षुब्ध झाली होती, व जातीय नातेसंबंधांवर ताण आला होता. परंतु, पवित्र शास्त्र अशी शिकवण देते की, “देव पक्षपाती नाही” व आम्हीही तसे असू नये. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) बेथेलमध्ये रोज सकाळी होणाऱ्‍या आध्यात्मिक चर्चा आम्हा सर्वांना, याबाबतीत देवाचा दृष्टिकोन स्वीकारण्याचा आमचा दृढनिश्‍चय अधिक बळकट करण्यास मदतदायी ठरल्या.—स्तोत्र १९:७.

ब्रुकलिन बेथेलमध्ये काम करत असताना मी रिचमन्ड, वर्जिनिया येथील लोईस रफिन या पायनियरला भेटलो व आमचा विवाह १९६४ मध्ये झाला. पूर्णवेळेच्या सेवेत राहण्याचा आमचा दृढनिश्‍चय होता. यास्तव, आमच्या विवाहानंतर आम्ही अमेरिकेच्या दक्षिणेकडे परतलो. पहिल्यांदा आम्ही खास पायनियर म्हणून कार्य केले आणि मग १९६५ मध्ये मला विभागीय देखरेखीचे काम करण्याचे निमंत्रण मिळाले. त्यानंतरच्या दहा वर्षांसाठी आम्ही केंटकी, टेक्सास, लुइझियाना, अल्बमा, जॉर्जिया, पूर्व कॅरोलिना, व मिसीसिपी या प्रांतातील मंडळ्यांना भेटी दिल्या.

आमच्या बंधुत्वाकरिता एक कसोटी

ती अनेक परिवर्तनाची वर्षे होती. दक्षिणेकडे जाण्याआधी, सर्व जाती वेगळ्या करण्यात आल्या. श्‍वेतवर्णीय लोक ज्या शाळांमध्ये जातात, उपहारगृहांमध्ये जेवतात, ज्या हॉटेलमध्ये झोपतात, दुकानांमध्ये खरेदी करतात, एवढेच काय पण पाणपोईवर जाऊन पाणी पितात तेथे कृष्णवर्णीयांना जाण्यास नियमानुसार बंदी होती. परंतु १९६४ मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसने नागरिक अधिकार अधिनियम संमत केला. या अधिनियमाने सार्वजनिक ठिकाणी शिवाय परिवहनाच्या बाबतीतही होणाऱ्‍या भेदभावावर बंदी आणली. यास्तव, आता जातीय भेदासाठी कोणताही कायदेशीर आधार राहिला नाही.

पण मग, सर्व कृष्णवर्णीय व सर्व श्‍वेतवर्णीय मंडळीतील आमचे बंधू आणि भगिणी एक होऊन एकमेकांना प्रीती आणि स्नेहभाव दाखवतील का, की समाजाकडून येणाऱ्‍या दबावाला बळी पडून व अनेक वर्षांपासून मनात खोलवर रूजून बसलेल्या भावना त्यांना एकात्मतेचा प्रतिकार करण्यास भाग पाडेल, असा प्रश्‍न समोर उपस्थित झाला. “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना,” या शास्त्रवचनीय आज्ञेचे पालन करणे खरोखर एक आव्हान होते.—रोमकर १२:१०.

कोणालाही आठवत होते त्याप्रमाणे, दक्षिण अमेरिकेत खासकरून सर्वांचा असा प्रचलित दृष्टिकोन होता की कृष्णवर्णीय कनिष्ठ लोक आहेत. हाच दृष्टिकोन प्रत्यक्षात समाजाच्या प्रत्येक पैलूद्वारे, ज्यामध्ये चर्चचा देखील समावेश आहे, लोकांच्या मनावर खोलवर ठसवला होता. याकारणास्तव कृष्णवर्णीयांना समभावाने वागवण्यास श्‍वेतवर्णीयांना सोपे वाटत नव्हते. आमच्या बंधुत्वाकरिता—कृष्णवर्णीय आणि श्‍वेतवर्णीय दोघांसाठी—हाच तो कसोटीचा समय होता.

आनंदाची गोष्ट अशी की, एकंदरीत, आमच्या मंडळ्यांच्या एकात्मतेला आश्‍चर्यकारक प्रतिसाद मिळाला. जातीय उच्चतेबद्दल असलेल्या अनेक शतकांपासूनच्या शिकवणी लगेचच मिटवता आल्या नाहीत. तरीही, एकात्मता चालू झाली तेव्हा, आमच्या बांधवांनी त्याचा लागलीच स्वीकार केला. पुष्कळांना एकत्र मिळण्यासाठी अतिशय आनंद झाला.

मनोरंजक गोष्ट म्हणजे, साक्षीदार नसलेल्या लोकांनी देखील आमच्या मंडळीच्या एकात्मतेला सहकार्य दिले. उदाहरणार्थ, अल्बमा येथील लेनट शहरात, राज्य सभागृहाशेजारच्या लोकांना कृष्णवर्णीय लोक सभेला उपस्थित राहाण्याविषयी काही हरकत आहे का असे विचारण्यात आले. एका वृद्ध श्‍वेतवर्णीय स्त्रीने एका कृष्णवर्णीय बांधवाचे हस्तांदोलन करीत म्हटले: “तुम्ही आमच्या परिसरात या व तुम्हाला हवी तशी तुमच्या देवाची उपासना करा.”

इथियोपियातील विश्‍वासू बांधव

१९७४ मध्ये आम्हाला न्यूयॉर्क शहरातील वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेत साडेपाच महिन्यांचे मिशनरी प्रशिक्षण मिळाल्याचा आनंद झाला. त्यानंतर आम्हाला इथियोपियाच्या आफ्रिकी राष्ट्रात नेमणूक मिळाली. हेल सेलासी या सम्राटाला नुकतेच पदच्युत करून नजरबंद करण्यात आले होते. आमच्या प्रचारकार्यावर बंदी होती त्यामुळे आम्ही आमच्या ख्रिस्ती बंधुत्वाच्या उबदार जवळिकीचा आनंद लुटला.

आम्ही अशा अनेकांबरोबर राहिलो व काम केले ज्यांना नंतर खऱ्‍या उपासनेला धरून राहिल्यामुळे कैद करण्यात आले. आमच्या काही प्रिय मित्रांना तर देहान्तदंडही मिळाला. अडेरा टेशोम हे, इथियोपियाची राजधानी आदीस अबाबा येथील मंडळीत माझे सह-वडील होते.a कैदेतील तीन वर्षांनी, त्यांना देहान्तदंड मिळाला. त्यांच्या पत्नीला त्याचे फारच दुःख झाले हे स्वाभाविक आहे. अनेक वर्षांनंतर पायनियर म्हणून सेवा करत असताना तिला तिचा आनंद पसरवताना पाहणे किती आनंदाचे होते!

वोरकू अबीबी नावाच्या आणखी एका विश्‍वासू बांधवाला आठ वेळा देहान्तशिक्षा ठोठावली.* परंतु तो कधी घाबरला नाही! मी त्याला शेवटचे पाहिले तेव्हा त्याने मला, कारागृह रक्षकांनी बंदुकीच्या दस्त्याने त्याचे कान चिरडलेले दाखवले. त्याने असे मजेत म्हटले की त्याने सकाळच्या नाष्ट्याला, दुपारच्या व रात्रीच्या जेवणाला बंदुकीचा दस्ता खाल्ला. त्याचा मृत्यू झाला असला तरी, बांधव त्याची अजूनही प्रेमाने आठवण काढतात.

हायलू येमीरू, हा आणखी एक बांधव आहे ज्याची मला प्रेमाने आठवण होते.* त्याने त्याच्या पत्नीसाठी आदर्श प्रीती दाखवली. तिला अटक करण्यात आली होती, परंतु ती गर्भवती होती व लवकरच बाळाला जन्म देणार असल्यामुळे, तो तिच्याऐवजी कारागृहात राहू शकेल का असे त्याने कारागृहाच्या अधिकाऱ्‍यांना विचारले. नंतर, त्याने त्याच्या विश्‍वासाची हातमिळवणी केली नाही तेव्हा त्याला देहान्तशिक्षा झाली.—योहान १५:१२, १३; इफिसकर ५:२८.

इथियोपियातील ऱ्‍हास होत चाललेल्या राजकीय परिस्थितीमुळे, आम्ही १९७६ मध्ये केनिया येथे राहावयास आलो. सात वर्षांसाठी आम्ही प्रवासी कार्यात काम केले व पूर्व आफ्रिकेच्या अनेक राष्ट्रांतील ज्यामध्ये केनिया, इथियोपिया, सुदान, सेशायल्स्‌, युगांडा, टान्झानिया या राष्ट्रांचाही समावेश होतो, तेथील अनेक बांधवांना भेटी दिल्या. मी अनेक प्रसंगी, बुरूंडी व र्‌वांडा या देशातील आमच्या कार्याच्या कायदेशीर नोंदणीबद्दल अधिकाऱ्‍यांसोबत बोलण्यासाठी प्रतिनिधीमंडळाचा एक भाग या नात्याने तेथे प्रवास केला आहे.

आमच्या कार्यावरील बंदी काढल्यावर, जानेवारी १९९२ मधील पहिल्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी इथियोपियाला जाण्यास आम्हाला आनंद वाटला. तेथे जमलेले ७,००० पेक्षा अधिक जण एकमेकांना ओळखत नव्हते, कारण पूर्वी बांधव लहान गटांमध्येच भेटले होते. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी, बहुतेक जण कार्यक्रम चालू व्हावयाच्या दोन तास आधी येत आणि संध्याकाळी उशारापर्यंत राहून आमच्या प्रेमळ बंधुत्वाचा आनंद लुटत होते.

जनजातीवादावर विजय

अनेक शतकांपासून जनजातीवाद आफ्रिकेत माजलेला आहे. उदाहरणार्थ, बुरूंडी व र्‌वांडा येथील हुतू आणि तुत्सी या सर्वात मोठ्या जमाती एकमेकांचा फार पूर्वीपासून द्वेष करतात. बेल्जियममधून या राष्ट्रांना १९६२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, या दोन जमातींमधील सदस्यांनी वेळोवेळी एकमेकांची हजारोंच्या संख्येत कत्तल केली आहे. परंतु या दोन जमातींतील अनेकांना जे यहोवाचे साक्षीदार झाले आहेत, एकजुटीने व शांतीने काम करताना पाहणे किती आनंददायक आहे! ते एकमेकांसाठी दाखवत असलेल्या खऱ्‍या प्रीतीने, पवित्र शास्त्रीय सत्य ऐकण्यास अनेकांना उत्तेजित केले आहे.

त्याचप्रकारे, केनियातील विविध जातींमध्ये मतभेद राहिले आहेत. केनियातील यहोवाच्या लोकांच्या ख्रिस्ती बंधुत्वात हे किती विरुद्ध आहे! तुम्हाला वेगवेगळ्या जातीतील लोक राज्य सभागृहात ऐक्यतेत उपासना करताना दिसून येईल. अनेक जणांना त्यांच्या मनातून जातीय द्वेष उपटून टाकून दुसऱ्‍या जातीतील त्यांच्या बंधू आणि भगिणींना खरी प्रीती दाखवत असल्याचे पाहून मला अतिशय आनंद होतो.

आपल्या बंधुत्वामुळे आनंदी

देवाच्या संघटनेसोबत ५० वर्षांच्या माझ्या सहवासाकडे मी वळून पाहिल्यावर, यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्यासाठी माझे हृदय कृतज्ञतेने ओतप्रोत भरते. या पृथ्वीवर त्यांनी काय घडवून आणले आहे हे पाहणे खरोखरच आश्‍चर्याचे आहे! नाही, देवाच्या लोकांमध्ये नेहमीच परिस्थिती परिपूर्ण राहिलेल्या नाहीत, व आजही त्या नाहीत. सैतानाच्या जगाद्वारे जातीयवादाच्या शिकवणी ज्या शेकडोवर्षांपासून चालत आल्या आहेत, त्यांना एका रात्रीत काढून टाकण्याची अपेक्षा करता येणार नाही. कारण शेवटी, आपण सर्व अपूर्णच आहोत.—स्तोत्र ५१:५.

मी यहोवाच्या संघटनेची तुलना जगासोबत करतो तेव्हा माझे हृदय आमच्या खऱ्‍या जगव्याप्त बंधुत्वाच्या गुणग्राहकतेने भरून वाहते. मला अजूनही क्लिवलँडमधील सर्व श्‍वेतवर्णीय बांधव आठवतात. त्यांनी सत्यामध्ये माझे पालनपोषण प्रेमाने केले होते. शिवाय दक्षिण अमेरिकेकडील आमच्या श्‍वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय बांधवांनी, पूर्वग्रहाच्या त्यांच्या भावनांच्या बदली पूर्ण हृदयाने बंधुप्रीतीच्या भावना बाळगल्या तेव्हा माझे मन उल्हासित झाले. तसेच, आफ्रिकेला गेल्यावर यहोवाचे वचन जातीय द्वेष कशाप्रकारे पुसून टाकू शकते हे पाहिल्यावर त्या गोष्टींनी, आमच्या जगव्याप्त बंधुत्वाबद्दल आणखी गुणग्राहकता दाखवण्यास भाग पाडले आहे.

खरेच, प्राचीन राजा दावीद ते अगदी उचितपणे व्यक्‍त करू शकला जेव्हा तो म्हणाला: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तोत्र १३३:१.

[तळटीपा]

a अडेरा टेशोम व हायलू येमीरू या दोघांचा फोटो, यहोवाच्या साक्षीदारांचा १९९२ चा वार्षिक अहवाल, पृष्ठ १७७ वर आला आहे; वोरकू अबीबीचा अनुभव पृष्ठ १७८-८१ वर सांगितला आहे.

[२३ पानांवरील चित्रं]

माझ्या आजीची अत्यंयात्रा

[२४ पानांवरील चित्रं]

तुत्सी आणि हुतू साक्षीदार शांतीत एकत्र काम करतात

[२५ पानांवरील चित्रं]

माझी पत्नी, लोईस हिच्याबरोबर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा