वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ८/१५ पृ. ३२
  • खास अर्थाची कोरलेली अक्षरे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास अर्थाची कोरलेली अक्षरे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ८/१५ पृ. ३२

खास अर्थाची कोरलेली अक्षरे

“एहोवा सिट टिबी कसटोस”

हे शब्द, सेलिरीना, पूर्व स्वित्झर्लंड येथे १७ व्या शतकातील एका घराच्या पुढील भिंतीवर कोरले होते. “यहोवा तुझा रक्षक होवो” असा याचा अर्थ होतो. या डोंगराळ भागात, अनेक शतकांच्या जुन्या घरांवर, चर्चच्या व धर्मोपदेशकाच्या निवासस्थानाच्या भिंतींवर देवाचे नाव कोरलेले किंवा रंगवलेले सर्वसामान्यपणे पाहण्यास मिळते. यहोवा हे नाव इतके प्रचलित कसे झाले?

प्राचीन रेहटिया, (आता दक्षिणपूर्व जर्मनी, ऑस्ट्रिया, व पूर्व स्वित्झर्लंडमध्ये समाविष्ट असलेले भाग) सा. यु. पूर्व १५ मध्ये रोमी प्रांत झाले. तेथील रहिवाशी लॅटिन-आधारित भाषा रोमन्श, बोलत होते. ही भाषा अनेक पोटभाषेतून निर्माण झाली आहे ज्या अजूनही स्वित्झर्लंडच्या अल्पाईन खोऱ्‍यात व उत्तर ईटलीत बोलल्या जातात.

या वेळेदरम्यान, पवित्र शास्त्राचे काही भाग रोमन्श भाषेत भाषांतर करण्यात आले. बिब्लिया पित्तशनॉ या एका आवृत्तीत, स्तोत्रे आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने होती. १६६६ मध्ये प्रकाशित केलेल्या या पवित्र शास्त्रात, पूर्ण स्तोत्रात एहोवा हे नाव अनेक वेळा आले. सर्व घरांमध्ये पवित्र शास्त्र हे वाचनाचे प्रमुख साहित्य असल्यामुळे, बिब्लिया पित्तशनॉ याचे वाचक सृष्टीकर्त्याच्या नावासोबत परिचित झाले.

परंतु, त्यानंतर आलेल्या पिढ्यांनी पवित्र शास्त्रीय विषयात अधिक रस घेतला नाही. “एहोवा” या शब्दाचा काय अर्थ होतो याची विचारपूस करण्याचा त्रास घेतला नाही किंवा पाळकांनी देखील तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. अशाप्रकारे ही कोरलेली अक्षरे गत युगाच्या गुणलक्षणांची फक्‍त सजावट झालीत.

अलिकडच्या दशकांमध्ये आकलनशक्‍तीत एक उल्लेखनीय बदल झाला आहे. यहोवाचे साक्षीदार स्वित्झर्लंडच्या सखल प्रदेशातून या रमणीय खोऱ्‍यात सुट्टी घालवण्यासाठी आले व देवाचे नाव यहोवा आहे हे तेथील रहिवाश्‍यांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही साक्षीदार या क्षेत्रात कायमसाठीच राहावयास आले जेणेकरून ते लोकांना पृथ्वी आणि मानवासाठी असलेल्या सृष्टीकर्त्याच्या उद्देशाबद्दल सविस्तरपणे सांगण्यात अधिक वेळ खर्च करू शकतात. अशाप्रकारे, ही प्राचीन रोमन्श भाषेतील कोरलेली अक्षरे महत्त्वपूर्ण होत आहेत कारण लोक सत्य देव यहोवा याच्याबद्दल शिकत आहेत.

[३२ पानांवरील चित्रं]

एहोवा पोरट्यो मेय: यहोवा माझा वाटा आहे—स्तोत्र ११९:५७ पहा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा