वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१५ पृ. ३१
  • “ती त्याची वाणी ओळखतात”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “ती त्याची वाणी ओळखतात”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१५ पृ. ३१

“ती त्याची वाणी ओळखतात”

“यहोवा माझा मेंढपाळ आहे.” २३ व्या स्तोत्राचे हे सुरवातीचे बोल आहेत. शास्त्रवचने पुन्हा एकदा यहोवा देवाची तुलना, यशयाच्या भविष्यवाणीत केली त्याप्रमाणे, एका मेंढपाळासोबत करतात, जे म्हणते: “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्‍यास संभाळून नेईल.”—यशया ४०:११.

त्याचप्रमाणे, येशू ख्रिस्ताची तुलना देखील एका मेंढपाळासोबत केली आहे. त्याने म्हटले: “मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरीता आपला प्राण देतो.” (योहान १०:११) येशूने म्हटले की, “मेंढरे [मेंढपाळाची] वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो.” पुढे त्याने म्हटले, “मेंढरे [मेंढपाळाच्या] मागे चालतात कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत.”—योहान १०:२-५.

यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त हे दोघेही, मागील शास्त्रवचनात जसे वर्णन दिले आहे त्याप्रमाणे वागले आहेत. ते त्यांच्या लाक्षणिक मेंढरांना कोमलतेने आणि प्रेमळ काळजीने हाताळतात. त्यामुळे, मेंढरासमान असलेल्या लोकांना, त्यांच्यावर कोणीतरी माया करत आहे, व त्यांना निर्धास्त आणि सुरक्षित असल्याचे जाणवते.

या नातेसंबंधाची तुलना यथायोग्यपणे, अक्षरार्थ मेंढरांचा त्यांच्या मेंढपाळासोबतच्या नातेसंबंधाशी केली आहे. मागे १८३१ मध्ये, जॉन हॉर्टली यांनी या बाबतीत केलेल्या निरीक्षणाबद्दल लिहिले. त्यांनी अशी नोंद केली की, ग्रीसमध्ये मेंढपाळांनी त्यांच्या मेंढरांना नावे द्यायची एक रीत होती. नावाने हाक मारल्यावर, ते मेंढरू मेंढपाळाच्या आवाजाला प्रतिसाद देई. ५१ वर्षांनंतर, म्हणजेच १८८२ मध्ये, जे. एल. पोर्टर यांनीसुद्धा याच प्रकारचे निरीक्षण केले. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष, मेंढपाळांनी “विशिष्ट कर्कशपणे आवाज काढल्यावर,” मेंढरे अगदी आज्ञाधारकतेने मेंढपाळाच्या मागे जाताना पाहिले आहे. त्याच वर्षी, विल्यम एम. टॉमसन यांनी, वारंवार केलेल्या प्रयोगांबद्दल लिहिले, ज्यामध्ये हे शाबीत झाले की, मेंढरांना त्यांच्या मेंढपाळाच्या मागे जाण्यास व त्याचा आवाज ओळखण्यास शिकवता येते.

मेंढपाळ आणि त्यांच्या मेंढरांतील या अतुलनीय नातेसंबंधाचे निरीक्षण अधिक अलिकडील काळात केले आहे का? होय. नॅशनल जियॉग्रफीकच्या १९९३ च्या सप्टेंबर अंकात, ऑस्ट्रेलियन साहसी रॉबिन डेविडसन यांनी भारताच्या ईशान्येकडील ग्रामीण मेंढपाळ, रबारी यांच्याविषयी असे लिहिले: “प्रत्येक मेंढपाळाच्या बोलावण्यात वेगवेगळ्या समयी किंचीत फरक असतो. सकाळी निघताना दिलेली हाक, मेंढरांना पाण्याजवळ आणण्यासाठी दिलेली हाक, यात थोडासा फरक असतो. प्रत्येक माणूस त्याच्या स्वतःच्या मेंढरांना ओळखतो आणि त्याची मेंढरे त्याला ओळखतात, आणि सकाळच्या वेळी त्याचा विशिष्ट कळप, मोठ्या कळपात मिसळला तरी त्याच्या आवाजाने त्याच्या मागे जातो.”

निसंशये, आत्ताच उल्लेखलेल्या चार प्रवाश्‍यांनी जे वर्णन केले त्याचे येशूने निरीक्षण केले होते. त्याच्या स्वतःच्या निरीक्षणांनी, मेंढरे त्याची वाणी ऐकतात याविषयीच्या त्याच्या दाखल्यात वास्तविकता आणखी भर घालते. तुम्ही येशूच्या मेंढरांपैकी एक आहात का? तुम्ही त्याची वाणी ऐकून त्याला ओळखू शकता का? तुम्ही जर त्याच्या शिकवणी सत्य आहेत हे ओळखून कबूल केले व त्याच्या आज्ञा पाळून यहोवाची उपासना करण्यात तो जो पुढाकार घेतो त्याच्या मागे गेला तर, तुम्ही यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्या प्रेमळ व कोमल मेंढपाळकत्त्वाचा अनुभव घेऊ शकता.—योहान १५:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा