वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ६/१ पृ. ३-४
  • धर्माविषयी आवड का बाळगावी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्माविषयी आवड का बाळगावी?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • धर्माला एवढे गंभीर का घ्यावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • योग्य धर्म तुम्हाला सापडला का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुमची आध्यात्मिक गरज तुम्ही कशी भागवू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या संभाव्य लोकांना तुम्ही कसा प्रतिसाद दाखवाल
    चर्चा कशा सुरु कराव्या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ६/१ पृ. ३-४

धर्माविषयी आवड का बाळगावी?

पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक देशामध्ये धर्माविषयीची आवड आहे. दुसऱ्‍या बाजूला पाहू जाता, अनेक असे देखील आहेत की, जे धर्माविषयी त्यांना कसलेही स्वारस्य नसल्याचे मोकळेपणाने सांगतात. परंतु त्यांना नेहमीच असे वाटते का?

मानवाची घडण अशारीतीची आहे की, एखादा व्यक्‍ती केवळ भौतिक गोष्टीनेच समाधानी होऊ शकत नाही. मानवांना आध्यात्मिक गोष्टींची गरज आहे. केवळ शारीरिक गरजा प्राप्त करण्यावर केंद्रिभूत असणारे व जोडीला अधूनमधून मनोरंजन असलेले दैनंदिन जीवन, एखाद्याच्या आंतरिक गरजांना पूर्णपणे तृप्त करीत नाही. प्राण्यांपेक्षा भिन्‍न असल्यामुळे, मानवांना, ‘जीवनाचा उद्देश काय आहे?’ ‘ह्‍या अल्प जीवनात, अधिक सुंदर गोष्टी तर अनेक विचित्र गोष्टी आहेत, हेच सर्व काही आहे का?’ यांची माहिती हवी असते. तुम्ही देखील असेच प्रश्‍न विचारले नाहीत का?

तरीदेखील, आज जिवंत असलेले लक्षावधी लोक, अशा परिस्थितीत मोठे झाले आहेत, जिने धर्माविषयीच्या त्यांच्या कोणत्याही अर्थपूर्ण आवडीला निराश केले आहे. तो प्रभाव, त्यांच्या पालकांकडून, शिक्षकांकडून, समवस्कांकडून किंवा सरकारकडून देखील आलेला असेल.

अल्बेनियातील स्कॉलॉब्रेनो या तरुण मनुष्याने खुलासा केला की, कम्युनिस्ट शासनामध्ये लोकांना, देव नसल्याचे शिकवले जात होते. शिवाय, धर्माविषयी बोलणे, त्यांच्यासाठी घातक होते; असे केल्याने तुरुंगवास होऊ शकत होता. तरीही, त्याला १९९१ मध्ये स्वीत्झर्लंडमध्ये शरणार्थी असताना, पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची संधी दिली गेली. त्याने याचा स्वीकार केला. का बरे?

अल्बेनियामध्ये असताना पवित्र शास्त्र या पुस्तकाविषयी त्याने ऐकले होते, परंतु त्याविषयी खरेपणाने त्याला काही माहीत नव्हते. सुरवातीला, त्याला प्रवृत्त केलेली इच्छा पवित्र शास्त्र समजण्याची नसावी. मानवजातीसाठी व पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश शिकेल असे सांगितले असताना, स्थानिक भाषात सुधरण्याची ही चांगली संधी आहे असे त्याला दिसले. लवकरच त्याला कळले की, तो जे काही शिकत होता, त्या गोष्टी त्याच्या परीने आंतरिक आध्यात्मिक ओढीला तृप्त करत आहेत. देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगात शांती असेल, व या जगात लोक अनंतकाळ जगतील तसेच जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या मुबलक गोष्टींचा ते आनंद उपभोगतील किंवा हे समजल्यावर त्याला आनंद झाला. तो व त्याचे कुटुंब या नवीन जगाचे सदस्य होऊ शकतील हे शिकल्यामुळे त्याची आवड वाढली. सुवार्ता स्वतःपुरतीच ठेवण्यास राहावले नाही म्हणून त्याने कुटुंबासोबत त्याची सहभागिता करण्यासाठी अल्बेनियाला फोन केला.

अल्यीक्से रशियात राहतो. पवित्र शास्त्राच्या अचूक ज्ञानाचा एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल त्याला आश्‍चर्य वाटले होते. समस्यांनी ग्रस्त झाल्यामुळे, व जीवनाच्या उद्देशाबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण न सापडल्यामुळे, त्याने आत्महत्या करण्याची योजना केली. तथापि, प्रथम तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी फिनलंडला गेला. मार्गावर असताना, रेल्वेतील काही सहप्रवाश्‍यांना त्याने त्याच्या समस्यांबद्दल सांगितले. त्यांच्यामध्ये एक यहोवाची साक्षीदार होती. तिने त्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचे आर्जवले. कारण पवित्र शास्त्र अशा समस्यांवर उपाय सांगते. त्याला जरा संशय वाटला. परतीच्या प्रवासात, त्याला परत एकदा असाच अनुभव आला. यावेळी दुसरी एक साक्षीदार त्याच्याबरोबर बोलली. तिने त्याला सांगितले की तिला देखील अशाप्रकारच्या समस्या होत्या, परंतु यांच्यावर मात करण्यासाठी पवित्र शास्त्राने तिला मदत केली होती. तिने देखील त्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचे उत्तेजन दिले. तो घरी पोहोचल्यावर, फोनची घंटी वाजली. तो आणखी एका मैत्रिणीचा होता. ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करत होती व अतिशय आनंदी होती. पवित्र शास्त्र, त्याला आवश्‍यक आहे ते खरेच पुरवील असा विचार हा गृहस्थ करु लागला, परंतु मदतीविना त्याला ते समजणार नाही, हे त्याला कळाले. त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत नियमित गृह पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सहमत दर्शवले, व सभेला जाण्यास सुरवात केली. पवित्र शास्त्र जे शिकवते त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनाची घडण करणारे खरेच आनंदी आहेत हे समजण्यास त्याला वेळ लागला नाही. ते देखील इतर मानवांना सामान्य असणाऱ्‍या समस्यांना तोंड देतात, यात काही शंका नाही.

मानवाच्या घडणीला समजून येशू ख्रिस्ताने म्हटले: “मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही.” (मत्तय ४:४, पंडिता रमाबाई भाषांतर) त्याने हे देखील म्हटले: “आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले धन्य.” (मत्तय ५:३, NW) त्यांना आनंद मिळतो कारण, त्यांना त्यांची गरज चांगल्याप्रकारे अवगत असते. ते तिला पूर्ण करण्यासाठी योग्य पावले उचलतात, व मग देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेतात. परंतु, आमची आध्यात्मिक गरज, केवळ चर्चमध्ये दाखल होण्याद्वारे किंवा काही धार्मिक सेवेत भाग घेण्याद्वारे तृप्त केली जाऊ शकणार नाही. धार्मिक विधींवर अधिक आधारलेल्या धर्माचे भावनात्मक अपील असू शकते. परंतु ही गोष्ट, जीवनाच्या समस्येवर व्यावहारिक तोडगा पुरवते का? एखादा धर्म जरी योग्य वाटत असणाऱ्‍या विशिष्ट मूलभूत सल्ल्याचे समर्थन करीत असला तरी, जीवनाच्या खऱ्‍या उद्देशाचा अर्थ दाखवण्यात अपयशी ठरत असेल तर, तो तुमची आध्यात्मिक गरज तृप्त करु शकेल का? किंवा यापेक्षा अधिक कळकळीची गोष्ट म्हणजे, अशा धर्माच्या आचरणामुळे देवाबरोबर चांगला संबंध राखता येईल का? कारण त्याच्याविना, खऱ्‍या संतुष्टतेची उणीव भासेल.

या संबंधात अनेक लोक कशाचा तरी शोध करीत आहेत, जे अजुनही त्यांना सापडले नाही.

[३ पानांवरील चित्रं]

चर्चचे सभासदत्त्व स्वीकारल्याने तुमच्या आध्यात्मिक गरजा खऱ्‍या अर्थाने तृप्त केल्या जातील का?

[४ पानांवरील चित्रं]

अनेकांना पवित्र शास्त्रातील समज प्राप्त केल्यावर जीवनाला नवा अर्थ मिळतो असे दिसले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा