वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१ पृ. १३-१७
  • चांगली आणि वाईट—फळे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगली आणि वाईट—फळे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दृष्टांतातील चांगली अंजिरे
  • दृष्टांतातील वाईट अंजिरे
  • आमच्या दिवसातील लाक्षणिक नासकी अंजिरे
  • आमच्यासाठी इशाऱ्‍याचा धडा
  • तुमच्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • प्रत्येक जण आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१ पृ. १३-१७

चांगली आणि वाईट—फळे

‘यहोवाने मला हे दाखवले, पाहा, अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या . . . एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरासारखे फार चांगले अंजीर होते; दुसऱ्‍या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खावयाजोगे नव्हते.’—यिर्मया २४:१, २, न्यूव.

१. यहोवाने त्याचे लोक, इस्त्राएल, यांना कशी करुणा दाखवली, परंतु त्यांनी त्याला कसा प्रतिसाद दिला?

सामान्य युग पूर्व ६१७ चे ते वर्ष होते. केवळ दहा वर्षाआधी, यरुशलेम आणि त्याच्या लोकांविरुद्ध यहोवाचा पात्र असलेला न्यायदंड बजावला गेला होता. यिर्मया आधीच ३० वर्षांपासून अधिक परिश्रमाने प्रचार करीत होता. दुसरे इतिहास ३६:१५ मध्ये एज्राने दिलेल्या परिस्थितीच्या हुबेहूब वर्णनाची नोंद घ्या: “त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांस आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती.” या सर्व परिश्रमांचा परिणाम काय झाला? दुःखाने, एज्रा १६ व्या वचनात सांगतो: “पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्‍वराचा [यहोवा, न्यूव] कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.”

२, ३. यहोवाने यिर्मयाला दिलेल्या थरारक दृष्टांताचे वर्णन करा.

२ तर मग, यहूदाच्या राष्ट्राला पूर्णपणे नष्ट केले जाईल असा याचा अर्थ होतो का? याचे उत्तर शोधण्यासाठी आपण यिर्मयाला दिलेल्या महत्त्वाच्या दृष्टांताचा विचार करु या, याचा उल्लेख त्याचे नाव असलेल्या पुस्तकाच्या २४ व्या अध्यायात केला आहे. त्याने करार केलेल्या लोकांच्या वाढीला संकेत करण्यासाठी देवाने अंजिराच्या दोन टोपल्यांचा या दृष्टांतात वापर केला आहे. या दोन्ही, दोन विविध प्रकारच्या, चांगल्या आणि वाईट फळांना सूचित करत होत्या.

३ यिर्मयाच्या २४ अध्यायातील १ आणि २ वचने, देवाच्या संदेष्ट्याने जे पाहिले, त्याचे वर्णन करतात: “यहोयाकीम याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्यास व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार यांस नबुखद्‌नेस्सराने धरुन यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्‍वराने [यहोवा, न्यूव] मला हे दाखवले; पाहा, परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव] मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या, एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरासारखे फार चांगले अंजीर होते; दुसऱ्‍या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खावयाजोगे नव्हते.”

दृष्टांतातील चांगली अंजिरे

४. अंजिरांचा दृष्टांत, विश्‍वासू इस्त्राएलांसाठी कोणता सांत्वनपर संदेश राखून होता?

४ यिर्मयाने जे पाहिले होते त्यावर प्रश्‍न विचारल्यानंतर, यहोवाने ५ ते ७ वचनात पुढे त्याला म्हटले: “या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खास्द्यांच्या देशी पाठविले आहेत त्यांस या चांगल्या अंजिराप्रमाणे मी समजेन. मी त्यांजवर कृपादृष्टी करीन; आणि त्यांस या देशी परत आणीन; त्यांस उभारीन, पाडून टाकणार नाही. मी परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांस देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून मजकडे वळतील.”

५, ६. (अ) काही इस्त्राएलांना कोणत्या ‘चांगल्या मार्गाने खास्द्यांच्या भूमीकडे निरवले’? (ब) यहोवाने बंदिवासात असलेल्या विश्‍वासू इस्त्राएलांवर कशाप्रकारे ‘कृपादृष्टी’ ठेवली?

५ यहोवाने जे म्हटले होते त्यावरुन हे स्पष्ट होते की चांगले समय पुढे होते, व यहुदाचे राष्ट्र पूर्णपणे नष्ट होणार नव्हते. परंतु, चांगल्या अंजिराच्या टोपलीचा काय अर्थ आहे?

६ यकोन्या किंवा यहोयाकीम याने नबुखद्‌नेस्सराला, यरूशलेम स्वेच्छेने स्वाधीन करण्यापूर्वी तो यहूदाचा केवळ तीन महिने आणि दहा दिवसांसाठी राजा होता. त्याने धरुन नेलेल्या बंदिवानांपैकी दानीएल आणि त्याचे तीन इब्री साथीदार हनन्या, मासेया, अजऱ्‍या तसेच यहेज्केल हे होते. यांचे जीवन बाबेलच्या राजाने सुरक्षित ठेवले, आणि यामुळे असे म्हटले जाऊ शकते की, यहोवाने या सर्व बंदिवानांना चांगल्या मार्गाने खालड्यांच्या [खास्दी] भूमीकडे निरवले. यहोवाने त्यांच्यावर “कृपादृष्टी” ठेवण्याचे अभिवचन दिले हे तुम्ही पाहिले का? हे कशाप्रकारे पूर्ण झाले? सामान्य युग पूर्व ५३७ मध्ये, ८० वर्षांनंतर, यहोवाने कोरेश राजाला त्यांच्या वंशजाच्या शेषांना यहूदाच्या देशी जाण्याविषयीचा जाहीरनामा काढण्यास कारणीभूत केले. या विश्‍वासू यहूद्यांनी यरुशलेम शहराला बांधले; त्यांचा देव, यहोवा याच्या उपासनेसाठी त्यांनी नव्या यरुशलेम मंदिराची उभारणी केलीः व ते पूर्ण हृदयाने त्याच्याकडे परत गेले. तर या सर्वांमध्ये, हे बंदिवान आणि त्यांचे वंशज यहोवासाठी अगदी चांगल्या अंजिराप्रमाणे होते.

७. यहोवाचे नेत्र आधुनिक यिर्मया वर्गावर “त्यांच्या भल्यासाठी” कधी आणि कसे होते?

७ यिर्मयाच्या भविष्यवादित शब्दांचा आमच्या २०व्या शतकासाठी अर्थ आहे, हे आम्ही आधीच्या लेखातून शिकलो होतो ते तुम्हाला कदचित आठवत असेल. आणि २४ वा अध्याय याला अपवाद नाही. पहिल्या महायुद्धाच्या भयाण वर्षामध्ये, एका किंवा दुसऱ्‍या मार्गाने, अनेक यहोवाचे समर्पित सेवक मोठ्या बाबेलच्या प्रभावाखाली आले. परंतु यहोवाचे ‘नेत्र त्यांच्यावर कृपादृष्टी राखून होते.’ यास्तव, थोर कोरेश, ख्रिस्त येशूकरवी यहोवाने त्यांच्यावर असलेल्या मोठ्या बाबेलच्या शक्‍तिला तोडून टाकले व हळुवारपणे त्याने त्यांना आध्यात्मिक नंदनवनात आणले. ह्‍या आध्यात्मिक इस्राएलांनी प्रतिसाद दिला आणि पूर्ण हृदयाने यहोवाकडे वळाले. यानंतर १९३१ मध्ये, त्यांनी यहोवाचे साक्षीदार या नावाचा स्वीकार आनंदाने केला. आता अगदी वास्तविकपणे असे म्हटले जाऊ शकते की, ते यहोवाच्या दृष्टीत टोपलीतील उत्तम अंजिराप्रमाणे बनले गेले.

८. यहोवाच्या साक्षीदारांनी अंजिराच्या मधूर गोडपणासारखा असणारा राज्य संदेश कशाप्रकारे घोषित केला आहे?

८ यहोवाच्या साक्षीदारांनी, त्यांना मोठ्या बाबेलातून मुक्‍त करण्याच्या देवाच्या अपात्री कृपेचा उद्देश गमावला नाही. अंजिराच्या मधूर गोडपणासारखा असणारा राज्य संदेश त्यांनी स्वतःजवळच बाळगला नाही, परंतु त्यांनी मत्तय २४:१४ मधील येशूचे शब्द लक्षात ठेवून: “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल,” याची घोषणा केली. आणि परिणाम काय झाला? आध्यात्मिक इस्राएल नसलेले ४७,००,००० पेक्षा अधिक मेंढरासमान लोक मोठ्या बाबेलमधून मुक्‍त झाले आहेत!

दृष्टांतातील वाईट अंजिरे

९. यिर्मयाच्या दृष्टांतातील वाईट अंजिरे कोणाचे प्रतिनिधीत्व करतात, आणि त्यांना काय होणार होते?

९ परंतु यिर्मयाच्या दृष्टांतातील वाईट अंजिराविषयी काय? यहोवा आता असे म्हणून यिर्मयाचे लक्ष वेधून घेतो, जे यिर्मयाच्या २४ अध्यायातील ८ ते १० वचनात सापडतातः “परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] म्हणतो, ‘खावयाजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत, त्याप्रमाणे यहूदाचा राजा सिदकीया व त्याचे सरदार, आणि या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करुन राहिलेले यरुशलेमेचे अविशिष्ट लोक यांचे मी करीन; त्यांचे वाईट होईल; पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांस हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप यांचे विषय होतील; आणि मी त्यांच्यामध्ये तरवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यांस व त्यांच्या पूर्वजांस दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल.’”

१०. यहोवाने सिदकीयाला ‘वाईट अंजीर’ म्हणून का गणले?

१० यास्तव सिदकीया खरेपणाने यहोवाच्या नजरेत ‘वाईट अंजीर’ शाबीत झाला. त्याने नबुखद्‌नेस्सर राजाबरोबर यहोवाच्या नावाने वाहिलेली निष्ठेची शपथ तोडून, त्याच्याविरूद्ध केवळ बंडच केले नाही तर, यिर्मयाद्वारे यहोवाने पुरविलेल्या दयेला त्याने पूर्णपणे नाकारले. वास्तविकपणे, त्याने याहीपेक्षा पुढे जाऊन यिर्मयावर पहारा ठेवला! दुसरे इतिहास ३६:१२ मध्ये एज्राने राजाच्या वृत्तीचा याप्रकारे सारांश दिला: “त्याने आपला देव परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] याच्या दृष्टीने जे वाईट ते केले; तो त्याजसमोर नम्र झाला नाही.” यहोवाच्या नजरेत सिदकीया आणि यरुशलेमेत राहणारे, टोपलीतल्या वाईट, नासक्या अंजिराप्रमाणे होते!

आमच्या दिवसातील लाक्षणिक नासकी अंजिरे

११, १२. दुष्ट अंजीर म्हणून आज कोण ओळखले जातात, आणि त्यांच्याबाबतीत काय होणार आहे?

११ आता आम्हा सभोवतालच्या जगाकडे पाहा. आम्हाला लाक्षणिक वाईट अंजिराच्या टोपल्या मिळू शकतील असे तुम्हाला वाटते का? तर आता, आमच्या दिवसाची तुलना यिर्मयाच्या दिवसाबरोबर करुन या वस्तुस्थितींचा आपण विचार करु या. यहोवाने या २० व्या शतकात यिर्मया वर्ग, अभिषिक्‍त शेषांचा उपयोग, महासंकटात त्याच्या येणाऱ्‍या सुडाविषयी राष्ट्रांना कायम इशारा देत राहण्यास केला आहे. त्याच्या नावासाठी, त्याची आत्म्याने आणि खरेपणाने भक्‍ती करण्याविषयी आणि त्याचा पुत्र ख्रिस्त येशू याला पृथ्वीचा हक्कदार शासक या नात्याने राष्ट्रांनी गौरव द्यावे हे त्याने आर्जवले. पण, कोणती प्रतिक्रिया दर्शविली गेली? यिर्मयाच्या दिवसासारखीच. यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे तेच रा करीत आहेत.

१२ ह्‍या बंडखोर वृत्तीला कोण चिथावणी देत आहेत? देवाचे सेवक या नात्याने काम करण्याच्या अधिकाराला प्रश्‍न विचारुन, यिर्मयासारख्या देवाच्या संदेशवाहकाची सतत थट्टा कोण करीत आहेत? देवाच्या वचनाचा सतत तिरस्कार कोण करीत आहेत? आज यहोवाच्या साक्षीदारांवर येणाऱ्‍या बहुतेक सर्व छळाच्या मागे कोण आहेत? याचे उत्तर अगदी स्पष्टच आहे—तो ख्रिस्ती धर्मजगत आहे, खासपणे पाळकवर्ग! आम्ही मागील लेखात चर्चा केलेली ख्रिस्ती धर्मजगातातील नासकी, वाईट फळे पाहा. खरोखरच, आज पृथ्वीवरील लाक्षणिक टोपलीत वाईट अंजिरे आहेत. वस्तुतः, यहोवा म्हणतो की ते ‘इतके वाईट आहेत की खावयाजोगे नाहीत.’ यहोवाने यिर्मयाद्वारे म्हटलेले शब्द आज आमच्या दिवसापर्यंत प्रतिध्वनीत होतात: ‘त्यातून त्यांचा नायनाट होईल’! ख्रिस्ती धर्मजगताविषयी असलेल्या यहोवाच्या क्रोधाचा समेट केला जाणार नाही.

आमच्यासाठी इशाऱ्‍याचा धडा

१३. पहिले करिंथकर १०:११, मधील पौलाच्या शब्दांना लक्षात घेता, अंजिरांच्या दोन टोपल्यांच्या दृष्टांताला, आम्ही कसे समजले पाहिजे?

१३ आम्ही यिर्मयाच्या प्रेरित इशारेवजा संदेशाच्या संबंधाचे परीक्षण करताना, प्रेषित पौलाचे १ करिंथकर १०:११ मधील शब्द आमच्या कानात घुमतात: “ह्‍या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी लिहिल्या आहेत.” या दोन टोपलीभर अंजिराच्या दृष्टांताद्वारे आम्हाला दिलेला इशारा आम्ही व्यक्‍तिगतरीत्या हृदयाप्रत घेतला आहे का? इस्राएलांवर गुदरलेल्या भागाची आम्ही करीत असलेली चर्चा, आमच्यासाठी इशारेवजा उदाहरण आहे.

१४. यहोवाने दाखवलेल्या चांगल्या काळजीला इस्त्राएल राष्ट्राने कसा प्रतिसाद दिला?

१४ शेवटी, इस्राएलाच्याबाबतीत, यहोवाने राजा दाविदाला सांगितलेल्या शब्दांची आपण पुनः आठवण करु या, जे २ शमुवेल ७:१० वचनात आम्हाला सापडतात: “मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन, आणि मी तेथे त्यास रुजविन.” यहोवाने प्रत्येक मार्गाने त्याच्या इस्राएली लोकांची चांगली काळजी घेतली. इस्राएलांना त्यांच्या जीवनात चांगली फळे उत्पन्‍न करण्यासाठी प्रत्येक कारण होते. त्यांना फक्‍त यहोवाचे ईश्‍वरी शिक्षण नीट लक्षपूर्वक ऐकायचे होते आणि त्याच्या आज्ञा पाळावयाच्या होत्या. तथापि, त्यांच्यातील केवळ काहींनीच असे केले. त्यातील अधिकांश फार हट्टी आणि हेका चालविणारे होते व त्यांनी वाईट आणि नासकी फळे उपजविली.

१५. यहोवाच्या करूणेला आज आध्यात्मिक इस्त्राएलाने आणि त्यांच्या मेंढरासमान सोबत्यांनी कसा प्रतिसाद दिला आहे?

१५ तर मग, आमच्या दिवसाविषयी काय? यहोवाने त्याच्या अभिषिक्‍त इस्राएलातील शेषांना आणि मेंढरासमान असलेल्या त्यांच्या साथीदारांना बरीच दया दाखवली आहे. त्यांची १९१९ मध्ये आध्यात्मिक मुक्‍तता झाल्यापासून त्याची कृपादृष्टी सतत त्यांच्यावर आहे. यशयाद्वारे भाकीत केल्याप्रमाणे, त्यांना सृष्टीचा महान शिक्षक, यहोवा देवाकडून ईश्‍वरी मार्गदर्शन मिळत आहे. (यशया ५४:१३) हे ईश्‍वरी शिक्षण, त्याच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे येत असल्यामुळे त्यांच्यात विपूल शांती आहे आणि त्याने त्यांना यहोवासोबतच्या निकट नातेसंबंधात स्थिरपणे आणले आहे. त्यामुळे यहोवाची ओळख असण्यासाठी, त्याचे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि आमच्या जीवनात चांगली फळे उपजविण्यामुळे यहोवाची स्तुती करण्यासाठी आम्हा सर्वांना किती अद्‌भुत आध्यात्मिक परिस्थिती सादर करते! याचा अर्थ हेच आमचे जीवन होय!

१६. अंजिरांच्या दोन टोपल्यांच्या दृष्टांताचा कोणता अवलंब प्रत्येक जण व्यक्‍तिगतरित्या लागू करू शकतो?

१६ देवाची एवढी अपात्री कृपा असूनही, असेही काही आहेत जे अजूनही बंडखोर आणि कठोर आहेत, ज्यांनी वाईट आणि नासकी फळे त्यांच्या जीवनात उपजविली त्या प्राचीन यहुदाप्रमाणे आहेत. हे किती भयंकर आहे! त्या दोन टोपल्यातील चांगल्या आणि वाईट अंजिराच्या फळाद्वारे स्पष्टपणे आमच्या लक्षात आणून दिल्याप्रमाणे आम्हातील कोणीही हा इशारेवजा धडा कदापि विसरू नये. यहोवाचा धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताच्या विरुद्ध असलेला पात्र न्यायदंड त्वरेने जवळ येत असता, आम्ही प्रेषित पौलाच्या सल्ल्याचा हृदयापासून विचार करु या: “तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला [यहोवा, न्यूव] संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे.”—कलस्सैकर १:१०.

उजळणी करणे

“चांगली आणि वाईट—फळे” तसेच “यहोवाचा राष्ट्रांविरुद्ध वादविवाद” मधील १-४ परिच्छेद

▫ चांगल्या अंजिराची टोपली कशाला चित्रित करते?

▫ दृष्टांतातील वाईट अंजिरांची टोपली कशारितीने स्पष्ट दिसून येत आहे?

▫ यिर्मयाचा संदेश कोणता ईशारेवजा धडा आम्हाकरता पुरवतो?

▫ सामान्य युग पूर्व ६०७ आणि १९१४ याबद्दल असे काय उल्लेखनीय होते?

[१५ पानांवरील चित्रं]

चांगल्या अंजिरांप्रमाणे, देवाच्या लोकांनी मधूर राज्याची फळे आणली आहेत

[१५ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ती धर्मराज्य वाईट अंजिरांच्या टोपलीप्रमाणे शाबीत झाले आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा