वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १०/१ पृ. १८-२२
  • बंधुप्रेमाची गुरूकिल्ली शोधणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बंधुप्रेमाची गुरूकिल्ली शोधणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खास बंधुप्रेमाची उदाहरणे
  • प्रेषित पौलाचे उदाहरण
  • गुणग्राहकता—बंधुप्रेमाची गुरूकिल्ली
  • बंधुप्रेम दाखवणे
  • आपलं बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचा निर्धार करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • आमच्या बंधुवर्गाविषयीची रसिकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • एकमेकांना आपुलकी दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १०/१ पृ. १८-२२

बंधुप्रेमाची गुरूकिल्ली शोधणे

“ईश्‍वरी भक्‍तीत बंधुप्रेमाची . . . भर घाला.”—२ पेत्र १:५-७, न्यूव.

१. यहोवाच्या लोकांचे मेळावे आनंदाचे प्रसंग का असतात या कारणांतील एक प्रमुख कारण कोणते आहे?

यहोवाचा साक्षीदार नसलेला एक वैद्य एकदा, वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडकडून मिळालेल्या आपल्या मुलीच्या मिशनरी पदवीदानाच्या समारंभाला उपस्थित राहिला होता. आनंदी समुदाय पाहून त्याला वाटले की, या लोकात आजारपणाचे प्रमाण फारच कमी असेल. त्या समुदायाला आनंदी कशाने बनविले? त्याबाबतीसाठी, यहोवाच्या लोकांच्या सर्व मेळाव्यांना, मंडळीत, विभागिय संमेलनात आणि प्रांतिय अधिवेशनाच्या हर्षमय प्रसंगांना काय आनंदी बनविते? एक दुसऱ्‍यांसाठी दाखवत असलेले ते बंधुप्रेम नाही का? निसंशये, यहोवाच्या साक्षीदारांसारखा कोणत्याही धार्मिक गटाला त्यांच्या धर्मामुळे अधिक हर्ष, आनंद, आणि समाधान मिळत नाही, असे का म्हटले जाऊ शकते त्याचे एक कारण बंधुप्रेम हे आहे.

२, ३. आम्हाला एकमेकांसाठी कसे वाटले पाहिजे त्याबद्दल कोणत्या दोन ग्रीक शब्दांचा संबंध आहे व त्यांची कोणती भिन्‍नतादर्शक गुणलक्षणे आहेत?

२ प्रेषित पेत्राच्या १ पेत्र १:२२ मधील शब्दाच्या अनुषंगाने आम्ही असे बंधुप्रेम पाहण्याची अपेक्षा केली पाहिजे: “निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.” येथे “बंधुप्रेम” यासाठी भाषांतरीत करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा एक प्रमुख घटक फि․लिʹया (आपुलकी) हा आहे. अ․गाʹपे याचे भाषांतर नेहमी “प्रीती” असे केले जाते त्या शब्दाबरोबर याच्या अर्थाचा निकटचा संबंध आहे. (१ योहान ४:८) बंधुप्रेम आणि प्रीती हे शब्द अदलाबदलीसाठी अनेकदा वापरले जात असले तरी, त्यांची विशेष गुणलक्षणे आहेत. पवित्र शास्त्राच्या अनेक भाषांतरकाराप्रमाणे आम्ही त्याविषयी गोंधळून जाऊ नये. (या आणि पुढील लेखात आम्ही या प्रत्येक शब्दांविषयी चर्चा करणार आहोत.)

३ या दोन ग्रीक शब्दातील फरकाविषयी, एका विद्वानाने सांगितले की फि․लिʹया हा शब्द “निश्‍चितच कळकळ आणि जवळीक व ममता याविषयी आहे.” दुसऱ्‍या बाजूला पाहता, अ․गाʹपे त्याचा जास्त संबंध मनाशी आहे. यास्तव आम्हाला आमच्या शत्रूवर प्रीती (अ․गाʹपे) करायला लावली असली तरी आम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाटत नाही. का बरे? कारण “कुसंगतीने नीती बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) पुढे प्रेषित पेत्राच्या शब्दात फरक दाखवला आहे: “तुमच्या बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.”—२ पेत्र १:५-७; पडताळा योहान २१:१५-१७.a

खास बंधुप्रेमाची उदाहरणे

४. येशू आणि योहान यांना परस्परांसाठी खास आपुलकी का होती?

४ देवाचे वचन आम्हाला खास बंधुप्रेमाची अनेक चांगली उदाहरणे देते. खास आपुलकी ही एखाद्या लहरीच्या परिणामामुळे नव्हे तर ती उल्लेखनीय गुणांबद्दलच्या गुणग्राहकतेवर आधारलेली असते. अधिक परिचित असलेले उदाहरण, निसंशये, येशू ख्रिस्ताला प्रेषित योहानाबद्दल असलेल्या आपुलकीचे आहे. येशूला त्याच्या सर्व विश्‍वासू प्रेषितांबद्दल चांगल्या कारणासाठी बंधुप्रेम होते यात काही प्रश्‍नच नाही. (लूक २२:२८) एक मार्ग म्हणजे त्याने त्यांचे पाय धुऊन त्यांना विनयशीलतेचा धडा शिकवण्याद्वारे ते दाखवले. (योहान १३:३-१६) परंतु येशूला योहानाबद्दल खास आपुलकी होती, त्याबद्दल योहानाने अनेकदा उल्लेख केला. (योहान १३:२३; १९:२६; २०:२) येशूला त्याचे शिष्य आणि प्रेषितांविषयी जरी खास आपुलकी होती, तरी योहानाची येशू ख्रिस्तावरील गाढ गुणग्राहकता यामुळे येशूला योहानाबद्दल आपुलकी असण्याचे चांगले कारण होते. योहानाचे शुभवर्तमान तसेच त्याच्या ईश्‍वरप्रेरीत पत्रांवरून आम्ही ते पाहू शकतो. त्या लिखाणात त्याने प्रेमाचा कित्येकदा उल्लेख केला! येशूच्या आध्यात्मिक गुणांसाठी असलेली योहानाची मोठी गुणग्राहकता त्याने लिहिलेल्या १ व १३ ते १७ अध्यायात स्पष्टपणे दिसते तसेच येशूच्या मानवपूर्व अस्तित्वाविषयीचा त्याने पुनःपुन्हा संदर्भ घेतला.—योहान १:१-३; ३:१३; ६:३८, ४२, ५८; १७:५; १८:३७.

५. पौल आणि तीमथ्याची एकमेकांसाठी असलेली खास आपुलकी याबद्दल काय म्हटले जाऊ शकते?

५ अशाचप्रकारे, प्रेषित पौल आणि त्याचा ख्रिश्‍चन सोबती तीमथ्य यांच्या परस्परांच्या गुणांची गुणग्राहकता बाळगण्यावर आधारित असलेल्या खास बंधुप्रेमाकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. पौलाच्या लिखाणात तीमथ्याबद्दल चांगले मत आढळते, जसे की: “तुमच्या बाबीसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही . . . त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.” (फिलिप्पैकर २:२०-२२) पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या त्याच्या पत्रात अनेक असे वैयक्‍तिक संदर्भ मिळतात जे तीमथ्याबद्दलच्या हार्दिक आपुलकीला प्रकट करतात. उदाहरणार्थ, १ तीमथ्य ६:२० पहा: “हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ.” (१ तीमथ्य ४:१२-१६; ५:२३; २ तीमथ्य १:५; ३:१४, १५ हेही पहा.) पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या पत्राची तुलना तीताला लिहिलेल्या पत्राबरोबर केल्यास त्याला या युवकासाठी [तीमथ्य] खास आपुलकी होती यावर ते जोर देत असल्याचे दिसून येते. त्यांच्या मैत्रीबद्दल तीमथ्याला देखील असेच वाटले असावे, ते २ तीमथ्य १:३, ४ मधील पौलाच्या शब्दावरून पाहिले जाऊ शकते: “मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो . . . तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो.”

६, ७. दावीद आणि योनाथान यांच्यात एकदुसऱ्‍यांसाठी कोणत्या भावना होत्या, आणि का बरे?

६ इब्री शास्त्रवचने दावीद आणि योनाथानासारखी देखील उत्कृष्ट उदाहरणे पुरवतात. दाविदाने गल्याथाचा वध केल्यानंतर आम्ही असे वाचतो की, “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले होते की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.” (१ शमुवेल १८:१) यहोवाच्या नावाबद्दल आणि त्याच्या निर्भयतेने धिप्पाड गल्याथाचा पुढे जाऊन सामना करण्याचा आवेश याबद्दलच्या गुणग्राहकतेमुळे योनाथानला दाविदाबद्दल खास आपुलकी वाटत होती यात काही शंकाच नाही.

७ योनाथानला दाविदाविषयी इतकी आपुलकी वाटत होती की शौल राजापासून त्याचे रक्षण करण्याकरता त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. यहोवाने दाविदाला इस्राएलचा होणारा भावी राजा या नात्याने निवडल्यामुळे योनाथानला कधीही राग आला नाही. (१ शमुवेल २३:१७) दाविदाला देखील योनाथानविषयी तेवढीच आपुलकी होती, ते योनाथानचा मृत्यू झाल्यावर केलेल्या शोकावरून ते दिसते: “माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरीता विव्हळ होत आहे तू मजवर फार माया करीत असस तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते.” खरेच, उत्सुक गुणग्राहकतेने त्यांच्या नातेसंबंधाला सूचित केले.—२ शमुवेल १:२६.

८. कोणत्या दोन स्त्रियांनी परस्परांसाठी खास आपुलकी प्रदर्शित केली आणि का?

८ इब्री शास्त्रवचनात नामी आणि तिची विधवा सून रूथ या दोन स्त्रियांमधील खास आपुलकीचे देखील उत्तम उदाहरण आमच्यासाठी आहे. नामीला रूथने म्हटलेल्या शब्दांची आठवण करा: “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) नामीने तिच्या वर्तनाद्वारे आणि यहोवाविषयी तिच्या बोलण्याद्वारे रुथला गुणग्राहकतेच्या प्रतिसादाला जागृत केले असा आम्ही निष्कर्ष काढू नये का?—पडताळा लूक ६:४०.

प्रेषित पौलाचे उदाहरण

९. बंधुप्रेमाविषयी पौल उदाहरणशील होता हे कशावरून दिसते?

९ आम्ही पाहिल्याप्रमाणे, प्रेषित पौलाचे तीमथ्यावर खास बंधुप्रेम होते. परंतु सर्वसाधारणपणे, त्याच्या बांधवासाठी हार्दिक बंधुप्रेम व्यक्‍त करून त्याने एक उत्कृष्ट उदाहरण देखील प्रदर्शित केले होते. त्याने इफिसमधील वडिलांना सांगितले की “तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यास [त्याने] खंड पडू दिला नाही.” हे हार्दिक बंधुप्रेम आहे का? यात कोणताही संशय नाही! त्यांनाही पौलाच्याबाबतीत तसेच वाटले. त्याला पुन्हा पाहू शकणार नाही हे त्यांनी ऐकल्यावर, “ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.” (प्रे. कृत्ये २०:३१, ३७) हे गुणग्राहकतेवर आधारलेले बंधुप्रेम होते का? होय! त्याचे बंधुप्रेम २ करिंथकर ६:११-१३ मधील शब्दांवरून देखील दिसून येते: “अहो करिंथकरांनो, तुम्हांबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे अंतःकरण विशाल झाले आहे. संकुचित अंतःकरणाविषयी म्हणाल तर तुमचीच अंतःकरणे संकुचित झाली आहेत; आमचे नाही. तेव्हा तुम्हाला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विशाल करा.”

१०. बंधुप्रेमाच्या आपुलकीच्या कोणत्या कमतरतेमुळे पौलाला २ करिंथकराच्या ११ व्या अध्यायात त्याच्या परीक्षांविषयी लिहिण्यास प्रवृत्त केले?

१० स्पष्टपणे, अनेक करिंथकरांठायी पौलासाठी असलेल्या गुणग्राहकतेच्या बंधुप्रेमाची उणीव होती. यास्तव, त्यांच्यातील काहींनी अशी कुरकूर केली की: “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” (२ करिंथकर १०:१०) यामुळेच पौलाने त्यांच्या “अतिश्रेष्ठ प्रेषितांचा” उल्लेख केला व २ करिंथकर ११:५, २२-३३ मध्ये नमूद केलेल्या परीक्षांत तो धीराने टिकून राहिला त्याबद्दल सांगण्यास प्रवृत्त झाला.

११. थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चन बांधवांच्या बाबतीत पौलाला आपुलकी वाटत होती याला काय पुरावा आहे?

११ पौलाने ज्यांची सेवा केली त्यांच्याबद्दलची त्याची हार्दिक आपुलकी त्याच्या १ थेस्सलनीकाकर २:८ मधील शब्दांवरून स्पष्टपणे दिसून येते: “आम्हांस तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हांवरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरीता आपला जीवही देण्यास राजी होतो.” वस्तुतः त्याला त्या नवीन बांधवाविषयी अशी आपुलकी होती, यामुळे त्यांच्याबद्दल काही ऐकण्यासाठी तो अधिक थांबू शकत नव्हता, ते छळात कसे टिकून आहेत हे जाणण्याची त्याची उत्कट इच्छा होती म्हणून त्याने तीमथ्याला पाठवले, ज्याने चांगला अहवाल दिल्यामुळे पौलाला तजेला मिळाला. (१ थेस्सलनीकाकर ३:१, २, ६, ७) इन्साइट ऑन द स्क्रिपचर्सने उत्तमरीतीने निरीक्षण केले: “पौल आणि ज्यांची त्याने सेवा केली त्यांच्यामध्ये बंधुप्रेमाच्या जवळिकीचे बंधन अस्तित्वात होते.”

गुणग्राहकता—बंधुप्रेमाची गुरूकिल्ली

१२. आमच्या बांधवांसाठी हार्दिक आपुलकी दाखवण्यासाठी आम्हाजवळ कोणती कारणे आहेत?

१२ निःसंशये, बंधुप्रेमाची गुरुकिल्ली गुणग्राहकता ही आहे. यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांकडे, गुणग्राहकता बाळगण्यासारखे, आमची आपुलकी दाखवण्यासारखे, प्रेमळ आवड असणारे गुण नाहीत का? आम्ही सर्वच देवाचे राज्य आणि धार्मिकतेचा प्रथम शोध करीत आहोत. आपण सर्व जण आपल्या तीन सामान्य शत्रूंविरूद्ध पराक्रमी लढत देत आहोत: सैतान आणि त्याचे दुरात्मे, सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेले दुष्ट जग, आणि पापमय शरीराने वारशाने मिळवलेल्या स्वार्थी प्रवृत्या. परिस्थितीला अनुलक्षून आमचे बाधंव त्यांच्या वतीने उत्तम प्रयत्न करण्याचा जो पवित्रा घेतात तसाच आम्ही देखील घेऊ नये का? जगातील प्रत्येक जण एक तर यहोवाच्या बाजूने आहे किंवा सैतानाच्या बाजूने आहे. आमचे समर्पित बंधू आणि बहिणी यहोवाच्या बाजूने आहेत, होय, आमच्या बाजूने असल्यामुळे ते बंधुप्रेम मिळण्याच्या पात्रतेचे आहेत.

१३. आम्हाला वडिलांसाठी हार्दिक आपुलकी का असली पाहिजे?

१३ आम्हामधील वडिलांचा आदर करण्याविषयी काय? मंडळीच्या आस्थेसाठी ते कठीण परिश्रम घेत असल्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही आमच्या हृदयात आवड बाळगू नये का? आमच्या सर्वांप्रमाणेच, त्यांना स्वतःची तसेच त्यांच्या कुटुंबांची तरतूद करावी लागते. आम्हा बाकीच्या प्रमाणेच त्यांना वैयक्‍तिक अभ्यास करावा लागतो, मंडळीच्या सभांना उपस्थित राहावे लागते, आणि क्षेत्रसेवेत देखील भाग घ्यावा लागतो. त्या व्यतिरिक्‍त, मंडळीच्या कार्यक्रमातील भागांची तयारी, जाहीर व्याख्यान देण्याची, आणि मंडळीत आलेल्या समस्यांवर लक्ष देण्याची, ज्यात कधीकधी न्याय विषयक गोष्टी ऐकण्यासाठी तासन्‌तास घालवण्याचा समावेश असतो या सर्व जबाबदाऱ्‍या त्यांच्यावर असतात. खरेच, आम्ही ‘अशांचा मान राखला’ पाहिजे.—फिलिप्पैकर २:२९.

बंधुप्रेम दाखवणे

१४. बंधुप्रेम प्रदर्शित करण्यासाठी कोणती शास्त्रवचने आम्हाला आज्ञा देतात?

१४ यहोवाला संतोषविण्यासाठी, आम्ही येशू ख्रिस्त आणि पौलाप्रमाणे आमच्या समविश्‍वासूंसाठी बंधुप्रेमाच्या भावना व्यक्‍त केल्या पाहिजे. आम्ही वाचतो: “[बंधुप्रेमाच्या बाबतीत] एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.” (रोमकर १२:१०, किंगडम इंटरलिनियर) “[बंधुप्रेमाविषयी] आम्ही तुम्हांस लिहावे ह्‍याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हाला देवानेच शिकवले आहे.” (१ थेस्सलनीकाकर ४:९) “बंधुप्रेम टिकून राहो.” (इब्रीयांस १३:१) निश्‍चितच, आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याच्या पृथ्वीवरील मुलांना बंधुप्रेम दाखवल्यावर तो संतुष्ट होतो!

१५. बंधुप्रेम दाखवण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

१५ प्रेषितांच्या काळात, “पवित्र चुंबनाने” किंवा “प्रीतीच्या चुंबनाने” एकमेकांचे अभिवादन करण्याची प्रथा होती. (रोमकर १६:१६; १ पेत्र ५:१४) खरेच बंधुप्रेमाची एक अभिव्यक्‍ती! आज, पृथ्वीवरील अनेक देशामध्ये, अधिक चांगले वक्‍तव्य म्हणजे, मैत्रीपूर्ण स्मित हास्य आणि हस्तांदोलन आहे. लॅटीन देशात, जसे की मेक्सिकोत, अभिवादन करण्याची प्रथा आलिंगन देण्याची आहे, आपुलकीचे खरेच एक वक्‍तव्य! हे बांधव दाखवत असलेली ही हार्दिक आपुलकी, कदाचित त्यांच्या देशात अधिक वाढ होत असण्यासाठी कारणीभूत ठरत असली पाहिजे.

१६. आमच्या राज्यसभागृहात बंधुप्रेम दाखवण्यासाठी कोणत्या सुसंध्या आम्हाला असतात?

१६ आम्ही राज्यसभागृहात जातो तेव्हा बंधुप्रेम व्यक्‍त करण्यासाठी खास प्रयत्न करतो का? जे खासपणे उदासीन वाटतात अशांबरोबर उत्तेजनदायक शब्द बोलण्यासाठी ते आम्हाला प्रवृत्त करील. ‘उदासीन जणांबरोबर सांत्वनपर बोलण्यासाठी’ आम्हाला सांगितले आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४, न्यूव) बंधुप्रेमाच्या आपुलकीचे दळवळण करण्याचा तो निश्‍चितच एक मार्ग आहे. आणखी एक मार्ग, चांगल्या जाहीर व्याख्यानाबद्दल, कार्यक्रमाचा भाग चांगल्याप्रकारे हाताळल्याबद्दल, ईश्‍वरशासित प्रशालेत विद्यार्थी भाषण देण्यासाठी अधिक प्रयत्न केल्याबद्दल आणि इत्यादी गोष्टींबद्दल गुणग्राहकता व्यक्‍त करणे हा आहे.

१७. एका वडिलाने मंडळीची आपुलकी कशी मिळवली?

१७ विविध जणांना आमच्या घरी जेवणासाठी किंवा जास्त उशीर होत नसल्यास, सभेनंतर अल्पाहार करण्यासाठी निमंत्रण देण्याविषयी काय? येशूने लूक १४:१२-१४ मध्ये दिलेल्या सल्ल्याचा परिणाम आमच्यावर होऊ देऊ नये का? एकदा गत काळात मिशनरी सेवा करीत असलेल्या मिशनऱ्‍याला, सर्वच जण विविध वंशाचे असलेल्या एका मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नेमणूक मिळाली. त्याला बंधुप्रेमाच्या उणीवेची जाणीव झाली तेव्हा ती परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने एक योजना बनवली. कशाप्रकारे? प्रत्येक रविवारी त्याने वेगळ्या कुटुंबाला जेवणासाठी निमंत्रण दिले. वर्षाच्या शेवटी, सर्वच जण त्याच्याबरोबर हार्दिक बंधुप्रेम दाखवू लागले.

१८. आम्ही आमच्या आजारी बंधू आणि बहिणींना बंधुप्रेम कसे दाखवू शकतो?

१८ एखादा बंधू किंवा बहीण घरी किंवा इस्पितळात आजारी असतात तेव्हा, त्यांची आम्ही काळजी करतो हे त्यांना समजण्यासाठी बंधुप्रेम आम्हाला प्रेरणा देईल. तसेच जे शुश्रूषा गृहात राहतात त्यांच्याविषयी काय? त्यांची व्यक्‍तिगतपणे भेट घेणे, फोन करून त्यांची विचारणा करणे किंवा एखादे पत्र पाठवून त्यात आपुलकीचे काही अभिप्राय का व्यक्‍त करू नये?

१९, २०. आमचे बंधुप्रेम विस्तारीत झाले आहे हे आम्ही कसे दाखवू शकतो?

१९ बंधुप्रेमाचे असे वक्‍तव्य करताना, आम्ही स्वतःला विचारावे, ‘माझे बंधुप्रेम पक्षपाती आहे का? त्वचेचा रंग, शिक्षण, किंवा भौतिक मालमत्तेचा प्रभाव माझे बंधुप्रेम दाखविण्यावर होतो का? करिंथमधील ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने आर्जवल्याप्रमाणे, माझ्या बंधुप्रेमात मला विस्तार करण्याची गरज आहे का?’ बंधुप्रेम आम्हाला आमच्या बांधवांकडे सकारात्मकपणे पाहण्यासाठी, त्यांच्या चांगल्या मुद्याबद्दल त्यांची गुणग्राहकता करण्यास प्रेरणा देईल. बंधुप्रेम आमच्या बांधवांच्या प्रगतीबद्दल त्यांचा हेवा करण्याऐवजी त्यांच्याबरोबर आनंद करण्यास देखील आम्हाला मदत करील.

२० बंधुप्रेमाने, सेवेत आमच्या बांधवाची मदत करण्यासाठीसुद्धा आम्हाला जागृत केले पाहिजे. आमच्या एका गीतात (क्रमांक ९२) जसे म्हटले आहे त्याप्रमाणे:

“सर्व अशक्‍तांना दयाळूपणे मदत करा,

जेणेकडून निर्भयपणे ते देखील बोलतील.

त्या कोमल वय असलेल्यांकडे कधी दुर्लक्ष करू नका,

खंबीर होत राहण्यासाठी व त्यांच्या भयावर मात करण्यासाठी त्यांना मदत करा.”

२१. आम्ही बंधुप्रेम प्रदर्शित करतो तेव्हा कोणत्या प्रतिसादाची अपेक्षा करू शकतो?

२१ बंधुप्रेम व्यक्‍त केल्यामुळे, येशूने त्याच्या डोंगरावरील उपदेशात सांगितलेले तत्त्व लागू होते ते आम्ही कधीही विसरू नये: “द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” (लूक ६:३८) स्वतःप्रमाणेच, यहोवाचे सेवक असणाऱ्‍यांसाठी बहुमान व्यक्‍त करण्याद्वारे आम्ही बंधुप्रेम प्रदर्शित करून स्वतःचा फायदा करतो. खरेच बंधुप्रेम प्रदर्शित करण्यात ज्यांना हर्ष होतो ते धन्य आहेत!

[तळटीपा]

a “प्रीती (अगापे)—काय नाही व काय आहे” हा पुढील लेख पहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ आमच्या भावनांबरोबर कोणत्या ग्रीक शब्दांचा संबंध आहे, आणि त्यात कोणता भिन्‍नतादर्शक फरक आहे?

▫ बंधुप्रेमाची गुरूकिल्ली कोणती आहे?

▫ खास बंधुप्रेमाची कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आमच्याजवळ आहेत?

▫ आम्हाला आमच्या बांधवांसाठी आणि वडिलांसाठी हार्दिक आपुलकी का असली पाहिजे?

[२१ पानांवरील चित्रं]

प्रेषित पेत्राने त्याच्या बांधवांना त्यांच्या विश्‍वासात बंधुप्रेमाची आणि इतर ख्रिश्‍चन गुणांची भर घालण्यास आर्जवले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा