वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ९/१ पृ. ८-१३
  • ख्रिस्ती कुटुंब एकत्रितपणे काम करते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती कुटुंब एकत्रितपणे काम करते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकत्रितपणे काम का करावे?
  • कौटुंबिक अभ्यासात एकत्रितपणाची भावना
  • सुवार्तिक कार्यात एकत्रितपणाची भावना
  • समस्या सोडविताना एकत्रितपणाची भावना
  • मनोरंजनात एकत्रितपणाची भावना
  • एकत्रितपणाच्या भावनेचे आशीर्वाद
  • कुटुंब—मानवी गरज!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • कुटुंब मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास नियमितपणे करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • आपल्या कुटुंबांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ९/१ पृ. ८-१३

ख्रिस्ती कुटुंब एकत्रितपणे काम करते

“बंधुजनहो . . . मी तुम्हांस विनंती करतो की . . . तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.”—१ करिंथकर १:१०.

१. अनेक कुटुंबातील ऐक्यतेविषयी कोणती परिस्थिती आहे?

तुमचे कुटुंब ऐक्यतेत आहे का? की प्रत्येक जन त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो? तुम्ही एकत्र मिळून काम करता का? किंवा तुम्ही सर्वचजन एकावेळी एका जागी क्वचितच भेटता? “कुटुंब” या शब्दाचा अर्थ घराण्याच्या एकीकरणाला सूचित करतो.a तथापि, सर्वच कुटुंबे ऐक्यतेत नाही. एक ब्रिटिश अध्यापक असे म्हणण्यापर्यंत पोहचले की: “कुटुंब हे एका चांगल्या समाजाचा पाया ठरण्याऐवजी . . . ते आमच्या सर्व असमाधानाचा उगम ठरले आहे.” हे तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत सत्य आहे का? असल्यास, ते असेच असले पाहिजे का?

२. पवित्र शास्त्रातील कोणत्या व्यक्‍ती एका चांगल्या कुटुंबातून आल्याचा पुरावा देतात?

२ कुटुंबातील ऐक्यता किंवा विभक्‍तता ही कुटुंबातील एक पालकीय किंवा दोन पालकीय नेतृत्वावर अवलंबून असते. पवित्र शास्त्र काळात, ऐक्यतेने भक्‍ती करणाऱ्‍या कुटुंबाने यहोवाच्या आशीर्वादांचा आनंद उपभोगला. हे प्राचीन इस्राएलात देखील खरे होते, इफ्ताहची मुलगी, शमशोन आणि शमुवेल, या प्रत्येकाने ईश्‍वरी कुटुंबातून आल्याचा पुरावा विविध मार्गांनी दिला. (शास्ते ११:३०-४०; १३:२-२५; १ शमुवेल १:२१-२३; २:१८-२१) ख्रिश्‍चन काळाच्या आरंभाला, पौलाच्या काही मिशनरी यात्रेत त्याचा विश्‍वासू सोबती तीमथ्य, याला त्याची आजी लोईस व आई युनीके यांनी इब्री शास्त्रवचनांचे ज्ञान देऊन त्याचे संगोपन केले होते. तो किती उल्लेखनीय शिष्य आणि मिशनरी झाला!—प्रे. कृत्ये १६:१, २; २ तीमथ्य १:५; ३:१४, १५; प्रे. कृत्ये २१:८, ९ हे देखील पहा.

एकत्रितपणे काम का करावे?

३, ४. (अ) ऐक्याच्या कुटुंबामध्ये कोणते गुण स्पष्टपणे दिसले पाहिजेत? (ब) घर हे केवळ आश्रयस्थानापेक्षा अधिक कसे असू शकते?

३ एकत्रितपणे काम करणे कुटुंबासाठी फायद्याचे का आहे? कारण हे एकमेकांची समज आणि आदराची उभारणी करते. एकदुसऱ्‍यांपासून स्वतःला वेगळे करण्याऐवजी, आम्ही सलगीत राहतो व पाठिंबा देतो. फॅमिली रिलेशन्स्‌ या पत्रिकेच्या अलिकडील एका लेखात असे म्हटले होते: “‘बळकट कुटुंबाच्या’ विशिष्ट गुणांचे वर्णन देणारे तुलनात्मकरित्या स्पष्ट चित्र दिसत आहे. अशा गुणात एकदुसऱ्‍याला दिलेल्या वचनाचा आणि एक दुसऱ्‍याची गुणग्राहकता, एकत्रितपणाची भावना, चांगले दळणवळण, समस्या सोडविणारी क्षमता, आणि जीवनात आध्यात्मिकता ही बळकट गोष्ट, या सर्वांचा यात समावेश होतो.”

४ कुटुंबात असे गुण हयात असले तर, घर हे इंधन भरण्यासाठी असलेल्या पेट्रोलपंपाच्या जागेसारखे असणार नाही. ते केवळ एक घर असण्यापेक्षा अधिक काही असू शकते. ती कुटुंबातील सदस्यांना आकर्षित करणारी मोहक जागा आहे. ते आपुलकी आणि ममता, दया आणि समज यांचे आश्रयस्थान आहे. (नीतीसूत्रे ४:३, ४) ते मतभेद आणि फूट असणाऱ्‍या विंचवाच्या जागेसारखे नव्हे तर कुटुंबाची ऐक्यता मिळणारे एक घरटे आहे. परंतु हे कसे साध्य करता येईल?

कौटुंबिक अभ्यासात एकत्रितपणाची भावना

५. खरी भक्‍ती शिकण्यासाठी आम्ही कशाचा उपयोग करु?

५ यहोवाची खरी भक्‍ती तर्क करण्यासाठी आम्ही उपयोग करीत असलेली कार्यक्षमता किंवा ‘तर्क करण्याचे सामर्थ्य’ याद्वारे शिकता येते. (रोमकर १२:१ न्यू.व.) आमचे वर्तन दूरदर्शन प्रसारणाद्वारे त्यांचा विश्‍वास प्रसारित करणाऱ्‍या धर्मादाय संस्थाच्या वक्त्यांचे उपदेश आणि बोलण्यातील पटाईतपणा या तात्कालिक दिसणाऱ्‍या भावनांवर नियंत्रित करु नये. उलटपक्षी, पवित्र शास्त्राचा तसेच “विश्‍वासू व बुद्धिमान दास” यांनी पुरविलेले साहित्य यावर नियमित अभ्यास व त्यावरील मनन यामुळे आम्ही प्रवृत्त झालो आहोत. (मत्तय २४:४५) आमची ख्रिस्ती हालचाल, कोणतीही परिस्थिती उद्‌भवली किंवा मोह झाला तर ख्रिस्ताचे मन असण्यासाठी असली पाहिजे. त्या संबंधी यहोवा आमचा महान शिक्षक आहे.—स्तोत्रसंहिता २५:९; यशया ५४:१३; १ करिंथकर २:१६.

६. कौटुंबिक अभ्यासाविषयी जगभरातील कोणते उदाहरण आमच्याजवळ आहे?

६ कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबासाठी आध्यात्मिकतेची आवश्‍यक भूमिका पार पाडतो. तुमचा कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास कधी असतो? तो योजना केलेला नसेल किंवा अचानकपणे निर्णय घेऊन करत असाल, तर कौटुंबिक अभ्यास अनियमित होत राहतो. एकत्रितपणाच्या भावनेच्या कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यासात एक नियमित आराखड्याची आवश्‍यकता असते. मग सर्वांना माहीत असेल की सर्व कुटुंब मिळून आध्यात्मिक गोष्टीचा एकत्र आनंद घेण्यासाठी कोणत्या दिवशी आणि किती वाजता त्यांनी उपस्थित असले पाहिजे. जगभरातील बेथेल कुटुंबाच्या १२,००० पेक्षा अधिक सदस्यांना सोमवारी संध्याकाळी त्यांचा कौटुंबिक अभ्यास असतो हे माहीत आहे. आणि बेथेल स्वयंसेवकांना याची आठवण ठेवणे किती परिणामकारक आहे की, दिवसाची समाप्ती होत असता, पॅसिफिक बेटे आणि न्यूझिलँड व नंतर प्रगतीशीलपणे ऑस्ट्रेलिया, जपान, तैवान, हाँगकाँग, व त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोप व शेवटी अमेरिकेत ते सर्व एकाच साहित्याचा अभ्यास करतात. हजारो किलोमीटर दूर आहेत, व अनेक भाषा असतानाही, बेथेल कुटुंबातील सदस्यात हा कौटुंबिक अभ्यास एकत्रितपणाची भावना आणण्यास प्रवृत्त करतो. तुम्ही देखील तुमच्या कौटुंबिक अभ्यासात अशाच प्रकारची एकत्रितपणाची भावना लहान प्रमाणात वाढवू शकता.—१ पेत्र २:१७; ५:९.

७. पेत्राने उद्धृत केल्यानुसार, सत्याच्या वचनाला आम्ही कोणत्या दृष्टिने पाहिले पाहिजे?

७ प्रेषित पेत्र आम्हाला सल्ला देतो: “प्रभु कृपाळू आहे ह्‍याचा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, ३) त्या शब्दाद्वारे पेत्राने खरोखर किती सुंदर चित्र उभे केले! त्याने ए․पी․पो․थिʹसे․ट, हे ग्रीक क्रियापद वापरले, लिंग्विस्टिक की टू द ग्रीक न्यू टेस्टमेंट या नुसार ते “लालसा करणे, इच्छा करणे, ओढा असणे” या शब्दांच्या अर्थावरून आले आहे. त्याद्वारे तीव्र इच्छा ध्वनित होते. लहान प्राणी त्याच्या आईचे स्तन कसे अति उत्सुकतेने शोधते व लहान मूल त्याच्या मातेचे स्तनपान करीत असताना किती समाधानी असते याचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का? सत्याच्या वचनासाठी आमची अशीच इच्छा असली पाहिजे. ग्रीक विद्वान विल्यम बार्कले यांनी नमूद केले: “प्रांजळ ख्रिश्‍चनांसाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करणे कष्टाचे नाही तर आनंदाचे आहे, कारण तेथे तो करत असलेली लालसा त्याला मिळू शकेल.”

८. कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास संचालित करताना कुटुंब प्रमुखाला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते?

८ कौटुंबिक अभ्यास, कुटुंब प्रमुखावर मोठी जबाबदारी सोपवतो. अभ्यास सर्वांसाठी मनोरंजक व त्यात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे याची त्याने खात्री बाळगण्यास हवी. अभ्यास केवळ मोठ्यांसाठी आहे असा मुलांनी विचार करता कामा नये. किती साहित्य हाताळले गेले आहे यापेक्षा अभ्यासाचा दर्जा अधिक महत्त्वाचा आहे. पवित्र शास्त्रातील सजीवपणा जागृत करा. उचित आहे तेथे, तुमच्या मुलांना, चर्चा करीत असलेल्या, पॅलेस्टाईनमध्ये घडलेल्या घटनांचे व वैशिष्ट्याचे काल्पनिक दृश्‍य डोळ्यापुढे उभे करायला लावण्यास मदत करा. सर्वांना वैयक्‍तिकपणे संशोधन करण्याचे व कुटुंबासोबत त्याची सहभागिता करण्याचे उत्तेजन द्या. अशारितीने मुले देखील ‘परमेश्‍वरासमोर [यहोवा, न्यू.व.] वाढत जाऊ शकतात.’—१ शमुवेल २:२०, २१.

सुवार्तिक कार्यात एकत्रितपणाची भावना

९. प्रचारकार्याला कुटुंबाचा एक चांगला अनुभव कसा बनविला जाऊ शकतो?

९ येशूने म्हटले: “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) ते शब्द सर्व जाणीव असलेल्या ख्रिश्‍चनांसाठी—सुवार्तेचा प्रचार करण्यात, आणि देवाच्या शासनाच्या सुवार्तेची सहभागिता इतरांसोबत करण्याची नेमणूक देते. कुटुंब मिळून असे करणे प्रोत्साहनदायक आणि आनंदाचा अनुभव असू शकतो. माता आणि पित्याला राज्याच्या सुवार्तेची सादरता करणाऱ्‍या त्यांच्या मुलांबद्दल धन्यता वाटते. एक दांपत्य, त्यांच्या १५ आणि २१ वर्षे वयाच्या आतील तीन मुलांसोबत, प्रत्येक बुधवारी शाळेनंतर व प्रत्येक शनिवारी सकाळी जाहीरपणे प्रचारकार्याच्या कामात भाग घेत असल्याचे सांगतात. पित्याने म्हटले: “प्रत्येक वेळी आम्ही त्यांना काही तरी शिकवत असतो. व तो आनंददायक आणि उत्तेजन देणारा अनुभव असल्याची आम्ही खात्री करतो.”

१०. सेवेमध्ये पालक त्यांच्या मुलांना कसे साहाय्य करु शकतात?

१० कुटुंब या नात्याने प्रचारकार्यात आणि शिक्षण देण्यात एकत्र कार्य करणे फार फलदायक ठरु शकते. कधीकधी लहान मुलांच्या सोप्या आणि अस्सल सादरतेला लोक अधिक सकारात्मकपणे प्रतिसाद देतात. नंतर आई किंवा बाबा गरज भासल्यास तयार असतात. पालकांनी त्यांच्या मुलांना प्रगतीशीलपणे शिक्षण मिळत असल्याची खात्री करावी व अशाप्रकारे ते “सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला” असे होतील. अशा मार्गाने एकत्र प्रचार केल्याने ते सेवेमध्ये मुलांची प्रवृत्ती, प्रभावीपणा आणि उपयुक्‍त सवया पाहू शकतात. नित्यक्रम असण्याद्वारे त्याचा किंवा तिचा विश्‍वास बळकट करण्यासाठी पालक मुलांची प्रगती पाहून यथायोग्य शिक्षण आणि उत्तेजन त्यांना देऊ शकतात. त्याचवेळी, त्यांचे पालक चांगले उदाहरणशील आहेत हे मुले पाहतात. या कठीण आणि हिंसात्मक दिवसात, कुटुंब या नात्याने, ऐक्याने व एकमेकांची काळजी घेणाऱ्‍या कुटुंबाप्रमाणे कार्य केल्याने सभोवतालच्या परिसरात बोकाळत चाललेल्या गुन्ह्यापासून अधिक प्रमाणात सुरक्षितता पुरविली जाते.—२ तीमथ्य २:१५; फिलिप्पैकर ३:१६.

११. मुलाचा सत्यासाठी असलेला आवेश सहजपणे कशाने कमी होऊ शकतो?

११ मुले प्रौढातील दुहेरी दर्जे लगेच शोधून काढतात. पालक सत्यासाठी व घरोघरच्या कार्यासाठी खरे प्रेम दाखवत नसतील तर मुलांनी आवेशी असावे अशी अपेक्षा ते करु शकत नाही. अशाप्रकारे, सुदृढ पालकांचा, मुलांसोबत क्षेत्रकार्य हाच एक साप्ताहिक पवित्र शास्त्र अभ्यास असल्यास, ती मोठी झाल्यावर त्यांना कदाचित कटू परिणामांचा अनुभव घ्यावा लागेल.—नीतीसूत्रे २२:६; इफिसकर ६:४.

१२. काही कुटुंबे यहोवाकडील खास आशीर्वाद कसे मिळवू शकतात?

१२ “एकचित्त” असल्याचा फायदा म्हणजे, कुटुंब मिळून कार्य केल्याने कुटुंबातील एक सदस्य पूर्ण वेळेचा पायनियर सेवक या नात्याने मंडळीत सेवा करु शकतो. जगभरातील अनेक कुटुंबे अशीच करतात, व त्यांच्या पायनियर सदस्यांच्या अनुभवाचा व वाढलेल्या प्रभावीपणाचा सर्वांना आशीर्वाद मिळतो.—२ करिंथकर १३:११; फिलिप्पैकर २:१-४.

समस्या सोडविताना एकत्रितपणाची भावना

१३, १४. (अ) कुटुंबाच्या एकोप्यावर कोणत्या परिस्थितींचा परिणाम होऊ शकतो? (ब) अनेक कौटुंबिक समस्यांना कसे टाळता येऊ शकते?

१३ या “संकटाच्या” आणि “धोक्याच्या” समयात आम्ही सर्वच दबावांचा अनुभव घेत असतो. (२ तीमथ्य ३:१, पं. रमाबाई भाषांतर; न्यू.व.) कामाच्या ठिकाणी, शाळेत, रस्त्यावर आणि इतकेच नव्हे तर घरीसुद्धा समस्या आहेत. काही लोक आजारपणामुळे किंवा दीर्घकालिन भावनिक समस्या सहन करतात, ज्याचे पर्यवसान कुटुंबात बिकट परिस्थिती आणि गैरसमजुतीमध्ये होते. अशी परिस्थिती कशी हाताळली जाऊ शकते? प्रत्येकाने दळणवळण थांबविण्याद्वारे का? एकाच घरात राहत असून स्वतःला अलिप्त ठेवण्याद्वारे का? नाही. उलटपक्षी, आम्ही आमच्या ज्या चिंता आहेत त्याबद्दल दळणवळण करावे व त्यासाठी मदत मागितली पाहिजे. असे करण्यासाठी एका प्रेमळ कौटुंबिक वर्तुळाव्यतिरिक्‍त आणखी कोणते चांगले ठिकाण असू शकेल?—१ करिंथकर १६:१४; १ पेत्र ४:८.

१४ कोणत्याही वैद्याला माहीत आहे की, काळजी घेणे हे उपचार करण्यापेक्षा उत्तम आहे. हीच गोष्ट कौटुंबिक समस्याविषयी देखील खरी आहे. मोकळ्या मनाने केलेली चर्चा समस्यांना अधिक गंभीर होण्यापासून टाळते. गंभीर समस्या उद्‌भवल्या असतानाही, कुटुंबाने एकत्र मिळून पवित्र शास्त्राच्या तत्त्वाचा विचार केला तर त्या सोडविल्या जाऊ शकतात. कलस्सैकर ३:१२-१४ मधील पौलाच्या शब्दांना लागू केल्यास, मतभेदाचे रुपांतर सुरळीत नातेसंबंधात होऊ शकते: “करूणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा . . . पूर्तता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”

मनोरंजनात एकत्रितपणाची भावना

१५, १६. (अ) कोणत्या गुणावरुन ख्रिस्ती कुटुंबाला ओळखले पाहिजे? (ब) काही धर्म कोणत्या प्रकारच्या लोकांना निर्माण करतात आणि का?

१५ यहोवा हा आनंदी देव आहे, आणि सत्य हे मानवजातीसाठी असलेल्या आशेतील एक आनंदाचा संदेश आहे. शिवाय, आत्म्याच्या फळातील एक फळ आनंद हे आहे. हा आनंद स्पर्धात्मक खेळात विजय मिळवलेल्या खेळाडूच्या तात्कालिक अत्यानंदापेक्षा फार वेगळा आहे. ही संतुष्ट करणारी एक गहन आंतरिक भावना आहे, यहोवासोबत घनिष्ट नातेसंबंध विकसित केल्यामुळे ती हृदयात भरुन वाहते. या आनंदाचे मूळ कारण देव आहे. हा आध्यात्मिक मूल्यांवर व उभारणीकारक नातेसंबंधावर आधारलेला आनंद आहे.—गलतीकर ५:२२; १ तीमथ्य १:११.

१६ यास्तव, यहोवाचे ख्रिस्ती साक्षीदार असल्यामुळे, दुर्मूखलेले व विनोदबुद्धिचा अभाव असण्याचे आमच्याकडे कोणतेही कारण नाही. काही धर्म, त्यांचा विश्‍वास नकारात्मक घटकांना प्रदर्शित करीत असल्यामुळे त्या प्रकारच्या लोकांना ते निर्माण करतात. त्यांच्या शिक्षणाचा परिणाम, खिन्‍नता, आनंदाची उणीव असलेली भक्‍ती, जी पवित्र शास्त्रीय नसून अनिश्‍चित असते. ते देवाच्या सेवेत आनंदी कुटुंबांना निर्माण करीत नाही. येशूने मनोरंजन आणि आराम करण्याची जाणीव ओळखली. उदाहरणार्थ, एका प्रसंगी त्याने त्याच्या शिष्यांना, “तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या” असे आमंत्रण दिले.—मार्क ६:३०-३२; स्तोत्रसंहिता १२६:१-३; यिर्मया ३०:१८, १९.

१७, १८. कोणत्या उचित मार्गांनी ख्रिस्ती कुटुंबे मनोरंजन करु शकतात?

१७ अशाप्रकारे कुटुंबाने मनोरंजनाचा आनंद लुटण्याची गरज आहे. एका पालकाने त्यांच्या मुलांविषयी म्हटले: “आम्ही आनंदाच्या अनेक गोष्टी—समुद्रकिनाऱ्‍यावर जाणे, उद्यानात चेंडू खेळणे, डोंगरावर जाण्यासाठी सहलीची योजना एकत्र मिळून करतो. प्रसंगानुसार, आम्ही पायनियरप्रमाणे पूर्ण दिवस सेवेमध्ये घालवतो; नंतर आम्ही तो खास भोजनाद्वारे साजरा करतो, आम्ही एकदुसऱ्‍यांना बक्षीस देखील देतो.”

१८ पालकांनी, प्राणीसंग्रहालयाला, करमणूकीचे साहित्य असणाऱ्‍या उद्यानाला, संग्रहालयाला, आणि इतर आकर्षणाच्या ठिकाणी कुटुंब मिळून भेट देणे या तसेच इतर सल्ल्यांवर विचार केला पाहिजे. जंगलात लांबपर्यंत चालणे, पक्ष्यांचे निरीक्षण करणे, आणि बागकाम करणे अशा कार्यात आनंदाने भाग घेतला जाऊ शकतो. पालक मुलांना संगीताचे साहित्य कसे वाजवावे ते शिकण्याचे किंवा फायदेशीर छंदात मग्न होण्याचे उत्तेजन देऊ शकतात. निश्‍चितच, समतोल असणारे पालक त्यांच्या मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ काढतील. कुटुंब एकत्र मिळून खेळेल ते एकत्र मिळून सुद्धा राहील!

१९. कोणती आधुनिक प्रवृत्ती कुटुंबाची हानी करु शकते?

१९ मनोरंजनाच्या बाबतीत युवकांचा आधुनिक कल, कुटुंबापासून वेगळे राहून त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे करणे हा आहे. तरूणांना एखादा छंद असणे किंवा एखादी आवडणारी वैयक्‍तिक करमणूक असणे हानीकारक नाही, तरी अशा आवडीमुळे कुटुंबातील इतर सदस्यांपासून कायमचे वेगळे राहणे सूज्ञपणाचे नाही. उलटपक्षी, पौलाने दिलेल्या तत्त्वाचे आम्ही अनुसरण केले पाहिजे: “तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेही पाहा.”—फिलिप्पैकर २:४.

२०. संमेलने आणि अधिवेशने आनंदाचे प्रसंग कसे असू शकतात?

२० अधिवेशनात आणि संमेलनात कुटुंब एकत्र मिळून बसलेले पाहणे आम्हा सर्वांसाठी किती आनंदाचे आहे बरे! त्या मार्गाने मोठी मुले लहान मुलांना पुष्कळदा मदत करु शकतात. अशा व्यवस्थेमुळे किशोरवयीनांना मागील रांगेत गटाने एकत्र बसून अधिवेशनाच्या कार्यक्रमाकडे कमी लक्ष देण्याच्या प्रवृत्तीपासून परावृत्त केले जाते. संमेलनाला जाण्या येण्याच्या मार्गाविषयी, मार्गावरील कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत, आणि कोठे राहता येईल याची कुटुंबासोबत चौकशी केल्यावर प्रवास आनंददायक होऊ शकतो. येशूच्या काळी कुटुंबांनी एकत्र मिळून यरूशलेमपर्यंतचा प्रवास करणे त्यांच्यासाठी किती उत्तेजित प्रसंग होता याची कल्पना करा!—लूक २:४१, ४२.

एकत्रितपणाच्या भावनेचे आशीर्वाद

२१. (अ) विवाहातील यशासाठी आम्ही कसे झटू शकतो? (ब) टिकाऊ विवाहासाठी कोणते चार चांगले सल्ले आहेत?

२१ यशस्वी विवाह आणि ऐक्याची कुटुंबे असणे इतके सोपे नाही, आणि ते असेच अचानकपणे घडत नाही. काही लोक कोणतेही प्रयत्न करत नाहीत, यामुळे विवाहाचा शेवट घटस्फोटात होतो, व पुन्हा ते त्याची सुरवात करण्याचा प्रयत्न करतात. तथापि, दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या विवाहात तीच समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होते. यासाठी अधिक उत्तम ख्रिस्ती उत्तर आहे: प्रेम आणि आदराच्या पवित्र शास्त्रीय तत्त्वांना लागू करुन यश मिळण्यासाठी झटणे. ऐक्याची कुटुंबे सहकाराच्या आत्म्यावर, निःस्वार्थीपणावर अवलंबून असतात. विवाहाला टिकवण्यासाठी विवाहाच्या एका सल्लागाराने सोपे सूत्र दिले. त्याने लिहिले: “बहुतेक सर्वच चांगल्या विवाहामध्ये सापडणारे चार कठीण घटक हे आहेत की, ऐकण्याची तयारी, क्षमा मागण्याची योग्यता, सतत भावनात्मक पाठिंबा पुरविण्याची क्षमता, आणि प्रेमळपणे स्पर्श करण्याची इच्छा होय.” ते घटक पवित्र शास्त्राच्या विश्‍वसनीय तत्त्वांवर आधारलेले असल्यामुळे विवाहाला टिकवून ठेवण्यासाठी मदत करू शकतात.—१ करिंथकर १३:१-८; इफिसकर ५:३३; याकोब १:१९.

२२. ऐक्याचे कुटुंब असण्याचे काही फायदे कोणते आहेत?

२२ आम्ही पवित्र शास्त्रीय सल्ल्याचा अवलंब केल्यास, ऐक्याच्या कुटुंबासाठी आमच्याजवळ एक उत्तम आधार असेल, आणि ऐक्याची कुटुंबे ऐक्य आणि आध्यात्मिकतेत मंडळीचा बळकट पाया असे आहेत. अशाप्रकारे, यहोवाची आम्ही ऐक्याने अधिक स्तुती करीत राहिल्यास त्याच्याकडून आम्हाला विपुल आशीर्वाद मिळतील.

[तळटीपा]

a “कुटुंब हा शब्द लॅटिनमधील फॅमिलिया या शब्दापासून आला आहे, मोठ्या घरातील सेवक आणि दास, व स्वामी, गृहस्वामिनी, मुले—व त्यांच्या नोकरमंडळीचा यात समावेश होतो.”—एरिक पारर्टिज यांची, ओरिजिन्स्‌—अ शॉर्ट इटायमोलोजिकल डिक्शनरी ऑफ मॉडर्न इंग्लिश.

तुम्हाला आठवते का?

▫ एकत्र मिळून काम करणे कुटुंबासाठी का फायदेशीर आहे?

▫ नियमित पवित्र शास्त्राचा अभ्यास असणे का आवश्‍यक आहे?

▫ मुलांसोबत क्षेत्रसेवेत भाग घेणे पालकांसाठी का चांगले आहे?

▫ कौटुंबिक वर्तुळातील समस्यांची चर्चा करणे का मदत देणारे आहे?

▫ ख्रिस्ती कुटुंबांनी खिन्‍न आणि उदास का नसावे?

[१० पानांवरील चित्रं]

तुमचे कुटुंब एकत्र मिळून दिवसातून एक तरी भोजन करते का?

[११ पानांवरील चित्रं]

कौटुंबिक सहल, मनोरंजक आणि आनंददायक असली पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा