गुप्त धनाचा शोध करणे
कॅलीफोर्निया, अमेरिका येथे कोलमा खेड्यात सटर येथिल लाकूड कापण्याच्या कारखान्याच्या जागी १८४८ मध्ये सोने सापडले. या भागाच्या जवळपास लगेच श्रीमंत होण्याच्या लालसेने १८४९ पासून पुष्कळजन येऊ लागले, व अमेरिकेतील इतिहासामध्ये सर्वात जास्त प्रमाणातील सोने सापडलेल्या ठिकाणाकडे लोकांची धाव प्रगतीपथावर पोहचली. एका वर्षाच्या कालखंडात, जवळचे बंदर, सॅन फ्रॅन्सिसको, एका लहान खेड्यापासून २५,००० लोकवस्ती असलेले शहर बनले. अचानक संपत्तीचा शोध हे एक शक्तीशाली आकर्षण शाबीत झाले.
प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन हे जाणून होता की गुप्त धनासाठी मनुष्य किती जोमदारपणे मेहनत करतो, व याचा संदर्भ त्याने असे लिहिले तेव्हा केला की: “जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”—नीतिसूत्रे २:३-५.
सोने व चांदी यामुळे तुम्ही पुष्कळ गोष्टी करु शकाल, पण त्याही पेक्षा अधिक तुम्ही विवेक व सुज्ञानाने करु शकाल. याद्वारे तुम्हाला योग्य निर्णय करण्यास, समस्यांचे निरसन करण्यास, विवाहात यशस्वी होण्यास, व आनंद मिळविण्यास मदत मिळेल. (नीतिसूत्रे २:११, १२) याप्रमाणेच, खरे ज्ञान व शहाणपण तुमच्या निर्माणकर्त्यास ओळखण्यास, त्याच्या उद्देशास जाणण्यास, व त्याला आज्ञाधारक राहून त्याला संतोषविण्यास मदत करते. पण सोने यापैकीची कोणतीही गोष्ट तुम्हाला देऊ शकणार नाही.
पवित्र शास्त्राची वचने सत्य आहेत: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” (उपदेशक ७:१२) अनेकजन अचानक श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असता, पवित्र शास्त्र उघडून त्यातील चाणाक्षपणा, समजबुद्धी, ज्ञान, व शहाणपण जे की खरी संपत्ती आहे ती मिळविण्यास मेहनत घेणे हे किती सुज्ञतेचे आहे बरे.