वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ८/१ पृ. ३१
  • गर्विष्ठ आत्म्यास टाळा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गर्विष्ठ आत्म्यास टाळा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ८/१ पृ. ३१

गर्विष्ठ आत्म्यास टाळा!

पवित्र शास्त्राचे सुज्ञ नीतिसूत्र म्हणते: “जो आपले दार उंच करितो, तो नाशाला आमंत्रण देतो.” (नीतिसूत्रे १७:१९) उंच फाटक असणे यामध्ये चुकीचे काय आहे? आणि या नीतिसूत्रातील मुख्य मुद्दा कोणता आहे?

प्राचीन काळात एकट्याने अथवा टोळीने घोड्यावर स्वार होऊन लुटमार करणे ह्‍यात काही असामान्य असे नव्हते. तट नसलेल्या गावातील असुरक्षित घरावर लुटेरे हल्ला करीत. काही घरमालक त्यांची मालमत्ता चोरीला जाण्यापासून रोखण्यासाठी खास फाटक असलेल्या भिंतीची आवारे बांधीत असत. भिंती खूप उंच असत पण त्याचा दरवाजा खूप लहान असे. वस्तुतः, काही तर एक मीटर पेक्षा उंच नसत—घोड्याला व त्यावरील स्वाराला प्रवेश करावयास ते खूपच लहान होते. ज्यांनी आपल्या पटांगणाला लहान प्रवेशद्वार ठेवले नव्हते ते घोडेस्वारांना आत येण्यास व त्यांच्या चांगल्या वस्तुंची लुट करण्यास आमंत्रण देत होते.

सर्वसाधारणपणे शहराच्या वेशीचे फाटक लहान व बेढब होते, ज्यामुळे त्याच्या आत असणाऱ्‍या संपत्तीच्या बाबतीत कोणतीही सूचना मिळत नसे. तथापि, पर्शिया मध्ये अति भव्य फाटक हे राज्यपदाच्या प्रतिष्ठेचे एक चिन्ह मानले जात होते, ज्याचा मोठा धोका पत्करून काही प्रजाजनांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. जो कोणी आपल्या घराला उंच दरवाजा करी तो त्याच्या या संपन्‍नेच्या दिखाव्यामुळे दरोडेखोरास आमंत्रण देत होता.

या रीतीने, नीतिसूत्रे १७:१९ दाखविते की जे कोणी आपले फाटक उंच करतात ते त्यांच्यापाशी असणाऱ्‍या धनापेक्षा स्वतः खूप मोठे आहोत असा आभास निर्माण केल्यामुळे अरिष्टास आमंत्रण देतात. हेच नीतिसूत्र अप्रत्यक्षपणे तोंडास उंच फाटकाप्रमाणे उल्लेखते ज्यातून बढाईखोर व उद्धट बोल निघतात. अशी बोलणी संघर्षाला वाढीस लावते व अखेरीस गर्विष्ठ मनुष्यास नाशाप्रत निरविते. तर मग, गर्विष्ठ आत्म्यास टाळणे हे किती सूज्ञतेचे आहे बरे!

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

Picturesque Palestine, Sinai and Egypt, Volume 1, by Colonel Wilson (1881)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा