अंत जवळ येत असता मनाची एकाग्रता राखा
“सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.”—१ पेत्र ४:७.
१. (अ) एका धार्मिक नेत्याला आणि त्याच्या अनुयायांना कोणती निराशा अनुभवावी लागली? (ब) अपेक्षा केलेल्या गोष्टींची पूर्तता झाली नाही त्यामुळे, कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात?
“आज रात्रीच्या अंतिम प्रार्थनेत देवाचे मला बोलावणे आले आहे. त्याने म्हटले की, १,१६,००० लोक स्वर्गात जातील आणि ३७ लाख विश्वासू जनांच्या कबरा आकाशाकडे उघडल्या जातील.” असे ऑक्टोबर २८, १९९२ च्या संध्याकाळी भविष्यवादित हिशोबाच्या दिवसाबद्दल कमिंग डेज मिशनच्या एका नेत्याने म्हटले. तथापि जेव्हा ऑक्टोबर २९ उजाडला, एकही व्यक्ती स्वर्गात गेला नाही, व मृताची एकही कबर उघडली गेली नाही. स्वर्गीय परमानंदात क्षणात घेतले जाण्याऐवजी, कोरीयामधील, जगाच्या नाशाच्या दिवसावर विश्वास ठेवणाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच दुसरा आणखी एक दिवस उजाडलेला पाहिला. जगाच्या नाशाच्या दिवसाची अंतीम वेळ आली आणि निघून गेली, परंतु जगाच्या नाशाविषयी सांगणाऱ्यांचे धैर्य खचले नाही. ख्रिश्चनांनी काय करावे? अंत लवकर येत आहे हा भरवसा बाळगणे त्यांनी थांबवावे का?
२. येणाऱ्या दिवसातील न्यायदंडाच्या दिवसाविषयी प्रेषितांना कोण बोलला? आणि कोणत्या परिस्थितीत त्यांना हे शिकण्यास मिळाले?
२ याचे उत्तर देण्यासाठी, येशू त्याच्या शिष्यांसोबत जेव्हा खाजगी संभाषण करीत होता तो प्रसंग आपण आठवू या. कैसेरियाच्या फिलिप्पै प्रांतातील, गालील समुद्राच्या ईशान्यकडील वैभवी हेर्मोन डोंगराने एक नाट्यमय पार्श्वभूमी दिली, त्यावेळी त्याला मारले जाईल हे त्याला म्हणताना त्यांनी उघडपणे ऐकले. (मत्तय १६:२१) विचार करायला लावणाऱ्या इतर गोष्टी कळणार होत्या. शिष्य बनणे म्हणजे निरंतर स्वार्थत्यागाचे जीवन जगणे याचा काय अर्थ होतो याचे स्पष्टीकरण दिल्यावर, येशूने इशारा दिला होता: “मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.’” (मत्तय १६:२७) येशू भविष्यात त्याच्या येण्याविषयी बोलला. तथापि ह्या प्रसंगात तो न्यायाधीश असेल. त्यावेळी तो पाहिल की एखादा व्यक्ती त्याचे अनुकरण विश्वासूपणे करतो की नाही आणि यावर सर्व अवलंबून आहे. येशूचा न्याय एखाद्याजवळ जगीक संपत्ती किती आहे किंवा नाही यावर नाही तर त्याची वागणूक यावर आधारीत असणार. ही वास्तविकता शिष्यांनी त्यांच्या मनात दृढपणे बाळगली पाहिजे. (मत्तय १६:२५, २६) या कारणास्तव, स्वतः येशू ख्रिस्त त्याच्या अनुयायांना त्याने न्यायदंड देण्यासाठी त्याच्या महिमायुक्त येण्याविषयी सांगतो.
३. भविष्यातील त्याच्या येण्याच्या खात्रीविषयी येशूने काय स्पष्ट केले?
३ येशू पुढे जे सांगतो ते भविष्यात त्याच्या येण्याच्या खात्रीची स्पष्टता करते. अधिकारयुक्तपणे त्याने व्यक्त केले: “मी तुम्हांस खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्तय १६:२८) सहा दिवसांनी ह्या शब्दांची पूर्णता झाली. येशूच्या रुपांतराचा प्रखर दृष्टांत पाहून त्याच्या निकटच्या शिष्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी खरेपणाने येशूचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झालेले आणि त्याची वस्रे प्रकाशासारखी शुभ्र झालेली पाहिली. ते रूपांतर ख्रिस्ताची महिमा आणि राज्याची पडछाया होते. राज्याच्या भविष्यावाणीची किती दृढतेची पुष्टी होती! मनाची एकाग्रता राखण्यासाठी शिष्यांना किती शक्तीशाली प्रेरक गोष्ट होती!—२ पेत्र १:१६-१९.
मनाची एकाग्रता राखणे इतके निकडीचे का आहे
४. ख्रिश्चनांनी त्याच्या येण्याविषयी आध्यात्मिकदृष्ट्या का जागृत असले पाहिजे?
४ एक वर्षापेक्षा कमी अवधीनंतर, पुन्हा शिष्यांसोबत खाजगी संभाषण करताना येशूला आपण जैतूनाच्या डोंगरावर बसलेले पाहतो. यरूशलेम शहराकडे ते टक लावून पाहत असताना, तो त्यांना भविष्यातील त्याच्या उपस्थितीचे चिन्ह काय आहे याची स्पष्टता करतो आणि इशारा देतो: “म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांस ठाऊक नाही.” त्याच्या येण्याचा समय माहीत नसल्याने त्याच्या अनुयायांना निरंतर जागृत असले पाहिजे. त्यांनी यासाठी सदोदित तयार असले पाहिजे.—मत्तय २४:४२.
५. जागृततेची गरज कशाप्रकारे चित्रित केली जाऊ शकते?
५ प्रभूच्या येण्याविषयी पाहिले तर तो चोरासारखा येईल. तो पुढे असे म्हणतो: “आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.” (मत्तय २४:४३) घरफोडी करणारा तो येण्याची घरधन्याला आगाऊ घोषणा करीत नाही, आश्चर्य हे त्याचे मुख्य हत्यार असते. यास्तव घरमालकाने सतत जागृत असले पाहिजे. तथापि, विश्वासू ख्रिश्चनांची अविरत जागृतता पुढे काय होईल याच्या भीतीसाठी नाही. तर उलटपक्षी, ते शांतीच्या हजार वर्षामध्ये ख्रिस्ताच्या वैभवात येण्याच्या उत्सुक अपेक्षेने प्रवृत्त झालेले असेल.
६. आम्ही मनाची एकाग्रता राखून का वागावे?
६ त्याच्या येण्याची वाट पाहूनसुद्धा कोणीही आगाऊ त्या दिवसाविषयी सांगू शकत नाही. येशू म्हणतो: “म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांस कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४४) या कारणामुळे मनाची एकाग्रता राखण्याची गरज आहे. अमुक दिवशी ख्रिस्त येणार नाही असा ख्रिश्चनाने विचार केला, तर कदाचित त्याच्या येण्याचा तोच दिवस असेल! अर्थातच, चांगल्या परिणामाच्या हेतूने गत काळातील विश्वासू ख्रिश्चनांनी अंत केव्हा येईल याचे भाकीत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, येशूने सांगितलेली दक्षता पुनःपुन्हा खरी ठरली: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाही नाही.”—मत्तय २४:३६.
७. ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी, आम्ही आमचे जीवन कसे व्यतित केले पाहिजे?
७ यास्तव, आम्ही यावरून काय निष्कर्ष काढावा? ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी ह्या दुष्ट परिस्थितीचा अंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे असा विश्वास बाळगून आम्ही आमचे जीवन व्यतित केले पाहिजे.
८. ख्रिस्ती धर्माच्या आधीच्या दिवसातील ख्रिश्चनांची ओळख देणारी चिन्हे कोणती आहेत?
८ अशी मनोवृत्ती ख्रिश्चनांना ओळखण्याचे एक चिन्ह आहे हे लौकिक इतिहासकार आणि पवित्र शास्त्राच्या विद्वानांनी जाणले आहे. उदाहरणार्थ, द ट्रान्सलेटरर्स न्यू टेस्टमेंट याच्या संपादकांनी त्यांच्या शब्दसूचीखालील “दिवस” या शब्दाविषयी ते म्हणतात: “नवीन कराराच्या काळातील ख्रिश्चन त्या दिवसाच्या येण्याची आशा बाळगून जगत होते, ही अशी वेळ आहे जेव्हा सद्याच्या जगातील वाईट आणि दुष्टतेचा अंत घडवून आणला जाईल आणि येशू सर्व मानवजातीचा न्याय करण्यासाठी पृथ्वीवर परतेल, आणि शांतीच्या नव्या जगाची तो स्थापना करील व त्याच्या प्रभुत्त्वाला तो आरंभ करील.” एन्साक्लोपीडिया ब्रिटानिका स्पष्टता पुरविते: “ख्रिस्ती धर्माच्या जागतिक वाढीचा थेट संबंध ख्रिश्चनांनी समाप्तीच्या काळाची अपेक्षा बाळगल्यामुळे, ख्रिस्त लवकरच परतेल या अपेक्षेद्वारे झाला आहे. येणाऱ्या देवाच्या राज्यासाठी ख्रिश्चनांनी अंताच्या काळाविषयी केलेल्या अपेक्षेत केवळ सहनशील उत्कंठा याचाच समावेश नव्हता.
मनाची एकाग्रता राखण्याचा अर्थ काय होतो
९. पेत्राच्या मशीहाविषयी असलेल्या काही अपेक्षा जरी चुकीच्या होत्या तरी तो विश्वासू का राहिला?
९ येशूने त्याच्या निकटच्या शिष्यांबरोबर केलेल्या सलगीच्या संभाषणानंतर अंत येण्याच्या ३० वर्षांपर्यंत वाट पाहण्यामुळे प्रेषित पेत्र थकला नाही. जरी मशीहाच्या येण्याविषयी त्याची आणि त्याच्या सह शिष्यांची प्राथमिक अपेक्षा चुकीची होती, तरी यहोवाची प्रीती आणि शक्तीने त्यांच्या आशेची हमी दिल्यामुळे तो विश्वासू राहिला. (लूक १९:११; २४:२१; प्रे. कृत्ये १:६; २ पेत्र ३:९, १०) ग्रीक शास्त्रवचनात अनेकदा ऐकलेला मुद्दा तो स्पष्ट करतो तेव्हा तो म्हणतो: “सर्वांचा शेवट जवळ आला आहे.” नतंर तो सह ख्रिश्चनांना आर्जवितो: ‘म्हणून मनाची एकाग्रता राखा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.’—१ पेत्र ४:७, न्यू.व.
१०. (अ) मनाची एकाग्रता राखण्याचा अर्थ काय होतो? (ब) देवाच्या इच्छेनुरूप बाबींचा योग्य संबंध पाहण्यात काय समाविष्ट आहे?
१० ‘मनाची एकाग्रता राखण्याचा’ अर्थ जगाच्या दृष्टिने हुशार असा होत नाही. यहोवा म्हणतो: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमतांची बुद्धी व्यर्थ करीन.” (१ करिंथकर १:१९) पेत्राने वापरलेल्या शब्दाचा अर्थ “विचारी वृत्तीचे असणे” असा होऊ शकतो. या आध्यात्मिक गांभीर्याचा संबंध आमच्या उपासनेसोबत आहे. यास्तव, मनात स्थिर असल्यामुळे आम्ही सर्व गोष्टींचा संबंध यहोवाच्या इच्छेनुरूप असल्याचे पाहतो; कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे आम्ही समजतो. (मत्तय ६:३३, ३४) शेवट निकट असताना, भ्रांतचित्त जीवन-शैलीमुळे आम्ही वाहवून जात नाही; व ज्या काळात आम्ही जगत आहोत त्याविषयी आम्ही बेपर्वा देखील नाही. (पडताळा मत्तय २४:३७-३९.) उलटपक्षी, आमच्यावर संयमीपणा आणि विचार, मनोवृत्ती आणि वर्तनातील संतुलन सत्ता करीत आहे, प्रथम देवासाठी ते व्यक्त होत आहे (“प्रार्थना करण्यासाठी सावध असा”) आणि नंतर आमच्या शेजाऱ्यांसाठी (“एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा”).—१ पेत्र ४:७, ८.
११. (अ) “आपल्या मनाला नवे करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या शक्ती”चा अर्थ काय होतो? (ब) चांगले निर्णय घेण्यासाठी नवीन मानसिक शक्ती आम्हाला कशी मदत करते?
११ मनाची एकाग्रता राखण्यात “आपल्या मनाला नवे करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या शक्तीचा समावेश होतो.” (इफिसकर ४:२३, न्यू.व.) नवी का केली जावी? कारण आम्ही अपूर्णता वारशाने मिळवल्याने आणि आजूबाजूच्या पापपूर्ण परिस्थितीत आम्ही जगत असल्यामुळे, आमच्या मनावर आध्यात्मिकतेचा विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचे वर्चस्व होत असते. ती शक्ती आमचे विचार आणि कल जडवादीपणा, स्वार्थी मार्गाने कायम पुढे ढकलत असते. या कारणास्तव जेव्हा एखादा ख्रिस्ती बनतो, तेव्हा त्याला नवी शक्ती किंवा अंमल चालविणाऱ्या मानसिक मनोवृत्तीची गरज असते, जी ती त्याच्या विचारांना योग्य दिशेने, आध्यात्मिक दिशेने स्वार्थत्यागासाठी नेतृत्त्व करील. यारितीने, उदाहरणार्थ शिक्षण, धंदा, नोकरी, मनोरंजन, करमणूक, पेहरावाची शैली किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत जेव्हा त्यांच्यापुढे निवड ठेवली जाते, तेव्हा या गोष्टीचा विचार करण्यासाठी त्याचा पहिला कल दैहिक, स्वार्थी दृष्टिकोनातून करण्याऐवजी आध्यात्मिक असेल. ही नवीन मनोवृत्ती मर्यादेने गोष्टींचा निर्णय घेण्यास आणि शेवट जवळ असल्याची जाणीव ठेवण्यास सोपी बनवते.
१२. आम्ही “विश्वासात दृढ” कसे राहू शकतो?
१२ मनाची एकाग्रता राखून वागण्याद्वारे आम्ही चांगल्या आध्यात्मिक दृढतेत आहोत हे ध्वनित होते. आम्ही “विश्वासात दृढ” कसे राहू शकतो? (तीत २:२) आम्ही आमच्या मनाला योग्य प्रकारच्या आहाराने तृप्त केले पाहिजे. (यिर्मया ३:१५) देवाच्या पवित्र आत्म्याचा पाठिंबा असलेला त्याच्या वचनाच्या सत्याचा स्थिर आहार आमचा आध्यात्मिक समतोल राखण्यास आम्हाला साहाय्य करील. या कारणास्तव, नियमित व्यक्तिगत अभ्यास, त्याचप्रमाणे क्षेत्र सेवा, प्रार्थना आणि ख्रिस्ती सहवास या गोष्टी आवश्यक आहेत.
मनाची एकाग्रता आमचे रक्षण कशी करते
१३. मूर्खतेच्या चूका करण्यापासून मनाची एकाग्रता आमचे रक्षण कशी करते?
१३ सार्वकालिक जीवनाची किंमत द्यावी लागेल अशा मूर्ख चूकीपासून मनाची एकाग्रता आमचे रक्षण करते. हे कसे शक्य आहे? प्रेषित पौल “मनाचा नियम” याविषयी बोलतो. विश्वासात दृढ असणाऱ्या व्यक्तीविषयी प्रेषित पौल म्हणतो की तो “मनाचे नियम” ज्यात त्याला रस वाटतो त्याद्वारे खासपणे “देवाचे नियमा”नुसार चालविला जातो. “पापाचे नियम” मनाच्या नियमाच्या विरुद्ध युद्ध करतात हे खरे आहे. तथापि, ख्रिस्ती यहोवाच्या मदतीने यशस्वी होऊ शकतो.—रोमकर ७:२१-२५.
१४, १५. (अ) मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या दोन शक्ती झगडत असतात? (ब) आम्ही मनाची ही लढाई कशी जिंकू शकतो?
१४ चैनबाजीच्या जीवनावर लक्ष केंद्रित झालेले पापी शरीराच्या वर्चस्वाखालील मन व यहोवाची सेवा करण्यासाठी स्वार्थत्यागाच्या जीवनावर केंद्रित झालेले देवाच्या आत्म्याच्या वर्चस्वाखालील मन या दोघांमधला मोठा फरक दाखवत पौल पुढील गोष्टी दाखवतो. पौल रोमकर ८:५-७ मध्ये लिहितो: “कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे; कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही.”
१५ पवित्र आत्म्याबरोबर सहकार्य करणारे मन लढाई कसे जिंकते याची ११व्या वचनात प्रेषित पौल स्पष्टता देतो: “ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हांमध्ये वसती करतो; तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठविले तो तुम्हामध्ये वसती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील.”
१६. कोणत्या मोहापासून मनाची एकाग्रता आमचे रक्षण करते?
१६ या कारणास्तव मनाची एकाग्रता राखल्यामुळे, सर्व प्रकारच्या सुखविलासात प्रमाणापेक्षा अधिक असलेली चैनबाजी, भौतिक गोष्टी आणि लैंगिक दुवर्तन सर्ववेळी सर्वठिकाणी प्रत्ययास येत असलेल्या जगाच्या मोहामुळे आम्ही फसविले जाऊ नये. आमच्या मनाची एकाग्रता “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”वयास व त्याच्या अनर्थकारक परिणामांपासून बचावण्यास सांगेल. (१ करिंथकर ६:१८) राज्य आस्थेस प्रथम स्थान देण्यासाठी आमची मर्यादशील मनोवृत्ती आम्हाला भाग पाडावयाला लावील आणि यहोवासोबतच्या आमच्या नातेसंबंधाला कमकुवत करणारी ऐहिक नोकरी मिळण्याचे प्रलोभन आम्हावर आल्यावर आमचे विचार सांभाळील.
१७. आर्थिक जबाबदाऱ्यांना तोंड देते वेळी एका पायनियर बहिणीने मनाची एकाग्रता कशी प्रकट केली?
१७ उदाहरणार्थ, आग्नेय आशियाच्या उष्ण कटिबंधातील देशात, तेथील एका बहिणीने राज्य आस्थेला तिच्या मनात प्रथम ठेवले. तिने पूर्ण वेळेच्या सेवेसाठी प्रीती वाढविली. त्या देशात बहुतेक सर्व कामे सहा किंवा सात पूर्ण दिवस करावे लागतात. विश्वविद्यालयातून पदवीधर झाल्यावर, तिने कुटुंबासाठी पुष्कळ पैसा कमवावा अशी अपेक्षा यहोवाचा साक्षीदार नसलेल्या तिच्या वडिलाने केली. परंतु पायनियरींग करण्याची तिची तीव्र इच्छा असल्यामुळे, तिने अर्ध-वेळची नोकरी धरली व पायनियर सेवेला आरंभ केला. यामुळे तिच्या वडिलाला राग आला, त्याने तिच्या वस्तु बाहेर रस्त्यावर फेकून देण्याची धमकीही दिली. जुगारामुळे तो अतिशय कर्जबाजारी झाला होता आणि त्याच्या मुलीने ते कर्ज फेडावे अशी त्याने अपेक्षा धरली होती. तिचा धाकटा भाऊ विद्यालयात शिकत होता, कर्जामुळे त्याच्या शिकवणीची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्याला काम मिळाल्यावर तो कुटुंबाकडे लक्ष देईल असे वचन तिला धाकट्या भावाने दिले. आता भावासाठी व पायनियर सेवेसाठी प्रीती यामध्ये तिचे हृदय विभागले गेले. ह्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार केल्यावर, पायनियरींग कायम करीत राहून दुसरे काम शोधण्याचा तिने निश्चय केला. तिच्या प्रार्थनेच्या उत्तरात तिला चांगले काम मिळाले, यामुळे ती केवळ तिच्या कुटुंबाला व भावालाच आर्थिक मदत करू शकली नाही तर तिने तिची पायनियर सेवेसाठी असलेली पहिली प्रीती कायम ठेवली.
मनाची एकाग्रता राखण्यासाठी यहोवाच्या मदतीचा शोध घ्या
१८. (अ) काही लोकाचे मन खिन्न का होते? (ब) आणि मनात खिन्न असलेल्यांना कोणती शास्त्रवचने सांत्वन देऊ शकतात?
१८ ख्रिस्ताच्या काही अनुयायांना मनाची एकाग्रता राखणे मुश्कीलीचे वाटत असेल. ही सद्य व्यवस्था त्यांनी अपेक्षिल्यापेक्षा अधिक काळ टिकून आहे यामुळे त्यांचा धीर कमी होत असेल. त्यांना याविषयी खिन्नता वाटत असेल. तथापि, अंत येईल. यहोवाने त्याचे अभिवचन दिले आहे. (तीत १:२) आणि त्याने अभिवचन केलेले पार्थिव नंदनवन येईल. याची हमी यहोवाने दिली आहे. (प्रकटीकरण २१:१-५) नवीन जग आल्यावर मनाची एकाग्रता राखलेल्या सर्वांसाठी तो “जीवनाचा वृक्ष” असेल.—नीतीसूत्रे १३:१२.
१९. मनाची एकाग्रता कशी राखली जाऊ शकते?
१९ आम्ही मनाची एकाग्रता कशी राखू शकतो? यहोवाच्या मदतीचा शोध घ्या. (स्तोत्रसंहिता ५४:४) त्याच्या समीप राहा. यहोवा आमच्या जिवलग मैत्रीची इच्छा करतो याचा आम्हाला केवढा आनंद वाटतो बरे! शिष्य याकोब लिहतो, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) पौल म्हणतो: “प्रभुमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टी विषयी प्रार्थना व विनंती करुन आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:४-७) लय पावत चाललेल्या व्यवस्थेचा भार वाहण्यास अधिक जड वाटत असल्यास, ते यहोवावर टाका, आणि तो स्वतः तुमचा पाठिंबा होईल.—स्तोत्रसंहिता ५५:२२.
२०. पहिले तीमथ्य ४:१० या वचनानुसार, आम्ही कोणते कार्य निरंतर करीत असले पाहिजे?
२० होय, अंत समीप आहे, मनाची एकाग्रता राखा! हा १,९०० वर्षापूर्वी दिलेला सल्ला आजही महत्त्वाचा आहे. यहोवाची स्तुती करण्यासाठी आणि त्याच्या नवीन जगात आमचे निरंतर नेतृत्व करण्यासाठी आम्ही आमच्या मानसिक शक्तीचा वापर करू या.—१ तीमथ्य ४:१०.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ मनाची एकाग्रता काय आहे?
▫ मनाची एकाग्रता राखणे तातडीचे का आहे?
▫ आमच्या मनाला प्रवृत्त करणाऱ्या शक्तीने आम्ही नवे कसे केले जाऊ शकतो?
▫ आमच्या मनात आम्ही कोणती लढाई सतत लढली पाहिजे?
▫ मनाची एकाग्रता आम्ही कशी राखू शकतो?
[१४ पानांवरील चित्रं]
प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप गेल्याने मनाची एकाग्रता राखण्यास आम्हाला मदत मिळते
[१६ पानांवरील चित्रं]
मनाची एकाग्रता राखल्याने आम्हाला जगाच्या मोहाने फसविले जाऊ शकणार नाही