हे भोजन तुम्हासाठी अर्थपूर्ण ठरू शकेल का?
पौर्णिमेच्या चंद्राने आपल्या सुखद प्रकाशाने सबंध प्रदेशाला न्हाऊन घातले आहे. यरुशलेमातील एका जुन्या इमारतीतील वरच्या खोलीत १२ जण एका मेजाभोवती बसले आहेत. त्यांच्यामधील शिक्षक एका अभूतपूर्व सोहळ्याची प्रस्तुती करताना आणि त्यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बोलणी करीत असताना बाकीचे अकरा जण लक्ष देऊन ऐकत आहेत. अहवाल त्यासंबंधाने असे म्हणतोः
“येशू [ख्रिस्ता] ने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडिली; आणि शिष्यांस देऊन म्हटले, ‘घ्या, खा; हे माझे शरीर आहे.’ आणि त्याने प्याला घेतला व ईशोपकारस्मरण करून तो त्यांस दिला व म्हटलेः ‘तुम्ही सर्व यांतील प्या. हे माझे “कराराचे रक्त” आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतिले जात आहे. मी तुम्हांस सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हांबरोबर नवा पिईपर्यंत एथून पुढे द्राक्षीचा हा उपज पिणारच नाही.’ नंतर गीत गाऊन ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.”—मत्तय २६:२६-३०.
हे आमच्या सर्वसाधारण काळातील ३३ व्या वर्षी निसान या यहूदी महिन्याच्या १४व्या दिवशी सूर्यास्तानंतर घडले. येशू व त्याच्या शिष्यांनी, इ. स. पूर्वी १६व्या शतकात मिसरी दास्यातून इस्राएलांची जी सुटका झाली होती त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ नुकताच वल्हांडण सण पाळला होता. ख्रिस्ताने त्याचा विश्वासघात करणारा यहूदा इस्कर्योत याला घालवून दिले होते. यास्तव, यावेळी येशू व त्याचे ११ निष्ठावंत प्रेषित होते.
हे रात्रीचे भोजन, चालू राहिलेल्या यहूदी वल्हांडण सणाचे नव्हते. ते तर नवे भोजन होते, ज्याला प्रभूचे सांजभोजन असे म्हणण्यात येऊ लागले. हे पाळण्याबद्दल येशूने त्याच्या अनुयायांना अशी आज्ञा दिलीः “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९, २०; १ करिंथकर ११:२४-२६) हे त्याने का म्हटले? आणि हा शतकानुशतकांचा प्रसंग तुम्हाला काही अर्थ कसा राखू शकतो?