वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 २/१ पृ. ३२
  • स्वरूप फसवे असू शकते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वरूप फसवे असू शकते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 २/१ पृ. ३२

स्वरूप फसवे असू शकते

“भरवसा ठेवण्यालायक कोठलेच स्वरुप नाही,” असे रिचर्ड शेरीदन या आयरिश नाटककाराने म्हटले. झाडे तसेच लोकांबद्दलही हे सत्य आहे.

इ. स. ३३ या वर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धातील एके दिवशी बेथानीहून यरुशलेमकडे शिष्यांबरोबर जात असतांना येशूने एक अंजिराचे झाड पाहिले. झाड पाल्याने भरलेले होते, पण जवळून पाहिल्यावर कळले की त्याला फळ लागलेले नाही. यामुळे येशूने त्यास म्हटलेः “यापुढे कोणी तुझे फळ कधीहि न खावो.”—मार्क ११:१२-१४.

मार्क याचे वर्णन करतो, “अंजिराचा हंगाम आला नव्हता.” मग येशूने त्या झाडाला शाप का दिला? (मार्क ११:१३) अंजिराच्या झाडाला पाने आल्यावर साहजिकच सुरूवातीचे अंजीरही येतात. तथापि, वर्षातील त्या काळात अंजिराच्या झाडाला पाने असणे हे असामान्य होते. परंतु त्याला पाने असल्यामुळे येशू अंजीर मिळतील अशी योग्यपणे अपेक्षा करु शकत होता. (वरील चित्र पहा) झाड फक्‍त पाल्यानेच भरलेले असल्याने ते फळ देणारे नव्हते असे समजते. त्याचे स्वरुप फसवे होते. फळांच्या झाडाचा कर भरावा लागत असल्यामुळे फळ न देणारे झाड आर्थिक बोजाचे होते म्हणून ते तोडून टाकण्याची गरज होती.

विश्‍वासाबद्दल योग्य धडा शिकविण्यासाठी येशूने त्या फळ न देणाऱ्‍या अंजिराच्या झाडाचा दाखला वापरला. दुसऱ्‍या दिवशी, ते अंजिराचे झाड वाळून गेल्याचे पाहिल्यामुळे शिष्यांना आश्‍चर्य वाटले. येशूने समजावलेः “देवावर विश्‍वास ठेवा. . .जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे.” (मार्क ११:२२-२४) विश्‍वासाने प्रार्थना करण्याच्या गरजेला समजावताना, ज्या राष्ट्राचा विश्‍वास कमी असेल त्याचे काय होईल ते वाळलेल्या अंजिराच्या झाडावरून अगदी उचितपणे दिसते.

काही महिन्यांआधी येशूने यहुदी राष्ट्राची तुलना फळ न देणाऱ्‍या अंजिराच्या झाडाबरोबर केली जे तीन वर्ष निष्फळ होते व ते निष्फळच राहिल्यास तोडून टाकावे असे त्याने म्हटले. (लूक १३:६-९) त्याच्या मृत्युच्या चार दिवस अगोदर अंजिराच्या झाडाला शाप देताना, येशूने दाखविले की यहुदी राष्ट्राने पश्‍चाताप करण्याजोगी फळे उत्त्पन्‍न केली नाहीत व यामुळे ते नाशाच्या मार्गावर होते. यद्यपि ते राष्ट्र—अंजिराच्या झाडासारखे—बाहेरून फळदायी दिसले, परंतु जवळून पाहिल्यावर प्रकट झाले की मशीहाचा अस्वीकार करण्याप्रत त्यांचा अविश्‍वास कळसाला पोहचला होता.—लूक ३:८, ९.

त्याच्या डोंगरावरील प्रवचनात, येशूने “खोट्या संदेष्ट्यां”विषयी सूचना दिली. तो म्हणालाः “तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यास ओळखाल. काटेरी झाडावरुन द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरुन अंजीर काढितात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते, आणि वाईट झाड वाईट फळ देते; चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येत नाहीत. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकण्यात येते. यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांस ओळखाल.” (मत्तय ७:१५-२०) येशूचे हे शब्द व शाप दिलेल्या अंजिराच्या झाडाचा दाखला स्पष्टपणे दाखवतो की आम्ही आध्यात्मिकतेत दक्ष असले पाहिजे, कारण धार्मिक स्वरुपदेखील फसवे असू शकते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा