वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १/१ पृ. ३२
  • “आकाशातील विश्‍वसनीय साक्षी”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आकाशातील विश्‍वसनीय साक्षी”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १/१ पृ. ३२

“आकाशातील विश्‍वसनीय साक्षी”

पहिला माणूस पृथ्वीवर वावरण्यापूर्वी बऱ्‍याच काळापासून रात्री आकाशात चंद्र प्रज्वलितपणे चमकत आहे. एके काळी अनेकजण त्याची भक्‍ती एक देवता समजून करीत असत. ग्रीक लेखक प्लॅटार्क यांनी दावा केला की मृत्युनंतर शुद्ध आत्म्यांचे शेवटचे ठिकाण चंद्र होते. बाल्टीक दंतकथेत चंद्र हा एक पुरूष असून तो व सूर्याचा पति होता. त्यांच्यात वैवाहिक मतभेद झाले, व नंतर चंद्र त्याच्या बायकोपासून लांब पळून गेला, व तो आकाशातून अधुनमधून दिसू लागला.

आज, तरूण तसेच वयस्कर प्रेमिक चंद्राकडे पाहतात व प्रेममय विचारात दंग होतात. १९६० मध्ये शास्त्रज्ञांनी चंद्रावर माणूस पाठवून त्यावरुन काही पौंड खडक आणले व हे सर्व संशोधन करण्यासाठी अफाट पैसा खर्च केला. चंद्राविषयी एक गोष्ट मात्र खात्रीची आहे. प्रत्येक दिवशी नित्यनियमाने, तो उदय पावतो व अस्तास जातो. त्याच्या नियुक्‍त केलेल्या भ्रमणासंबंधी तो विश्‍वसनीय असल्यामुळे हजारो वर्षांमागील त्याच्या चंद्रकला व ग्रहण आपल्याला मोजता येऊ शकतात.

इस्त्राएली चंद्राकडे पाहत तेव्हा, त्यांना काहीतरी अद्‌भुत गोष्टींची आठवण दिली जात असे. देवाने अभिवचन दिले की दाविद राजाचे राजघराणे कायम टिकेल. तो म्हणतोः “चंद्राप्रमाणे आणि आकाशातील साक्षीप्रमाणे हे विश्‍वसनीय आहे, की ते [दाविदाचे संतान] सर्वकाळ टिकेल.” (स्तोत्रसंहिता ८९:३५-३७ न्यू.व.) या अभिवचनाची पूर्णता “दाविदाचा पुत्र येशू” मध्ये झाली. (लूक १८:३८) त्याच्या मृत्युनंतर येशूचे अमर असे आत्मिकरुपाने पुनरूत्थान झाले व तो स्वर्गात गेला. (प्रे. कृत्ये २:३४-३६) नियुक्‍त वेळी देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून त्याला नेमस्त केले गेले. (प्रकटीकरण १२:१०) ते राज्य आता राज्य करीत आहे व “ते सर्वकाळ टिकेल.” (दानिएल २:४४) अशाप्रकारे येशू, दाविदाच्या राजवंशावळीचा अमर प्रतिनिधी यानात्याने “आकाशातील विश्‍वसनीय साक्षी” चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल.

यास्तव, प्रत्येक वेळी रात्री आकाशात चंद्र चमकताना तुम्ही पाहाल, तेव्हा देवाने दाविदाला दिलेल्या अभिवचनाची आठवण करा व देवाच्या गौरवासाठी तसेच विश्‍वासू मानवजातीच्या सर्वकाळाच्या आशिर्वादासाठी देवाचे राज्य आता राज्य करीत आहे व सर्वकाळ करीत राहील यासाठी त्याला धन्यवाद द्या.—प्रकटीकरण ११:१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा