वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १/१ पृ. १२-१७
  • आपल्या महान निर्माणकर्त्यासोबत पालन करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या महान निर्माणकर्त्यासोबत पालन करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा सहकारी मेंढपाळ
  • “एक शांतिचा करार”
  • सहमेंढपाळ नेतृत्व करतात
  • ईश्‍वरशासित मेंढपाळकत्व
  • वडीलांनों, तुमच्या मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्‍या गंभीरतेने पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • ख्रिस्ती मेंढपाळांनो, ‘आपले अंतःकरण विशाल करा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १/१ पृ. १२-१७

आपल्या महान निर्माणकर्त्यासोबत पालन करणे

“परमेश्‍वर [यहोवा न्यू. व.] माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही. तो माझा जीव ताजातवाना करितो; तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गांनी चालवितो.”—स्तोत्रसंहिता २३:१, ३

१. यहोवा कोणता प्रेमळ तजेला देतो?

अनेक थकलेल्या जिवांना स्तोत्र २३वे “दाविदाचे स्तोत्र” याने तजेला आणला आहे. त्याने ६व्या वचनात व्यक्‍त केलेला भरवसा बाळगण्यासाठी त्यांना उत्तेजन दिले आहेः “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील; आणि परमेश्‍वराच्या [यहोवा न्यू. व.] घरात मी चिरकाल राहीन.” यहोवाच्या उपासनेच्या घरात चिरकाल राहण्याची, व पृथ्वीतील सर्व राष्ट्रांतून आज लोकांना गोळा केले जात आहे अशांबरोबर एकत्र येण्याची तुमची इच्छा आहे का? “तुमच्या जिवाचा मेंढपाळ व अध्यक्ष” आमचा महान सृष्टिकर्त्ता, यहोवा देव हे ध्येय प्राप्त करण्यास तुम्हाला मदत करील.—१ पेत्र २:२५.

२, ३. (अ) यहोवा त्याच्या लोकांची देखरेख प्रेमळपणे कशी करत आहे? (ब) यहोवाच्या “कळपाची” वाढ नाट्यमयरित्या कशी झाली?

२ “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांचा सृष्टिकर्त्ता “देवाचे घर,” ख्रिस्ती मंडळीचा व्यवस्थापक व उत्तम देखरेखा देखील आहे. (२ पेत्र ३:१३; १ तीमथ्य ३:१५) यशया ४०:१०, ११ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या लोकांचे पालन करण्याची त्याला अतिशय आस्था आहेः “पाहा, प्रभु परमेश्‍वर [यहोवा न्यू. व.] पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याजजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरुन वाहील, आणि पोरे पाजणाऱ्‍यांस संभाळून नेईल.”

३ विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल्यावर, या “कळपा”त ख्रिस्ती सत्यात बऱ्‍याच काळापासून चालणारे व अलिकडच्या काळात, आफ्रिका व पूर्व युरोपात बाप्तिस्मा झालेल्या बहुसंख्य लोकांचा समावेश आहे, त्या एकत्रित केलेल्या “मेंढरे” यांचा भरणा आहे. यहोवाचा बळकट व सुरक्षित हात त्यांना त्याच्या अधिक जवळ आणतो. जरी ते भटकलेल्या मेंढरासमान होते तरी, ते आता त्यांचा प्रेमाळु देव व मेंढपाळाच्या अगदी निकटच्या नातेसंबंधात आले आहेत.

यहोवाचा सहकारी मेंढपाळ

४, ५. (अ) “उत्तम मेंढपाळ” कोण आहे व त्याच्याकडे भविष्यवादाने कसा निर्देश केला आहे? (ब) वेगळे करण्याच्या कोणत्या कामाची देखरेख येशू करीत आहे, व कोणत्या अतुलनीय परिणामासह?

४ “उत्तम मेंढपाळ” येशू खिस्त, स्वर्गात त्याच्या पित्याच्या उजव्या हाताकडे बसून कार्य करीत असताना, “मेंढरां”कडे दयाशील लक्षही देत आहे. त्याने प्रथम अभिषिक्‍त जनांच्या “लहान कळपा”साठी व आज, मोठ्या लोकसमुदायातील “इतर मेंढरां”साठी स्वतःचा प्राण दिला. (लूक १२:३२; योहान १०:१४, १६) महान मेंढपाळ, यहोवा देव, या सर्व मेंढरांना असे म्हणतोः “पाहा मी, मीच . . मेंढरांमेंढरांमध्ये निवाडा करीन. त्यावर एक मेंढपाळ नेमून त्यांस चारीन, तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांस चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल. मी परमेश्‍वर [यहोवा न्यू. व.] त्यांचा देव होईल, व त्यांच्यामध्ये दावीद अधिपति होईल; मी परमेश्‍वर [यहोवा न्यू. व.] हे बोललो आहे.”—यहेज्केल ३४:२०-२४.

५ “माझा सेवक दावीद” ही संज्ञा दावीदाचे सिंहासन वारसाने प्राप्त होणाऱ्‍या ‘संताना’ला येशू खिस्त याला भविष्यवादित रितीने लागू होते. (स्तोत्रसंहिता ८९:३५, ३६) राष्ट्रांच्या या न्यायनिवाड्याच्या दिवसात, यहोवाचा सहमेंढपाळ व राजा, येशू ख्रिस्त, दावीद पुत्र, जे “मेंढरे” असल्याचा दावा करतात परंतु खरेपणाने ते “शेरडे” आहेत यापासून मानवजातीची “मेंढरे” वेगळी करीत आहे. (मत्तय २५:३१-३३) हा “एक मेंढपाळ” ‘मेंढरांना चारण्यासाठी’ देखील उठला आहे. या भविष्यवादाची किती वैभवी पूर्णता आज आम्ही पाहतो! राजनैतिक पुढारी मानवजातीला एका “नव्या जगाच्या व्यवस्थेत” एकत्रित करण्यासाठी बोलत आहेत, पण हा एक मेंढपाळ “मेंढरांना” सर्व राष्ट्रांतून बहूभाषीय साक्षीकार्याच्या मोहीमेद्वारे खरेपणाने एकत्र करीत आहे. ही मोहीम केवळ देवाच्याच पृथ्वीवरील संस्थेने हाती घेतलेली आहे.

६, ७. “यथाकाळी” मेंढरांना अन्‍न उपलब्ध करून देण्याकडे “विश्‍वासू बुद्धिमान दास” याने कसे लक्ष दिले आहे?

६ राज्याचा संदेश नित्याने नवीन क्षेत्रात पसरला जातो, एक मेंढपाळाने नेमलेला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा “विश्‍वासु बुद्धीमान दास,” “यथाकाळी अन्‍नाची तरतूद” केलेली आहे की नाही ते पहात आहे. (मत्तय २४:४५) सर्व पृथ्वीभरातील वॉचटावर संस्थेच्या छपाई करणाऱ्‍या अनेक शाखापैकी ३४ शाखा अधिक पवित्र शास्त्र पुस्तकांची व मासिकांची वाढती मागणी पुरविण्यासाठी प्रगती करीत आहे.

७ यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ जगातील सर्व क्षेत्र उरकण्यासाठी २०० भाषेतील भाषांतराच्या कामात प्रगती करण्यासाठी, व इतर भाषेत भाषांतर सुरू करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रे. कृत्ये. १:८ वचनात येशूने त्याच्या शिष्यांना दिलेल्या नेमणूकीला हे पुष्टी देतेः “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. . .व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” शिवाय, १४ भाषेत पूर्ण किंवा काही भागात उपलब्ध असणाऱ्‍या न्यू. वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स, याचे, युरोप, आफ्रिका व पौर्वात्य देशातील १६ भाषेत भाषांतर होत आहे.

“एक शांतिचा करार”

८. यहोवाने केलेल्या शांती करारामुळे मेंढरे कशी अधिक आशीर्वादीत झाली?

८ त्याचा एक मेंढपाळ, येशू ख्रिस्त याकरवी यहोवा त्याच्या पुष्ट मेंढरासोबत एक शांतिचा करार करतो. येशूच्या सांडलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवल्याने मेंढरांना यहोवाच्या प्रकाशमय कृपेत चालणे शक्य होते. (१ योहान ४:७) ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाची शांति त्यांचे अंतःकरणे व विचार खिस्त येशूमध्ये राखील’ याचा त्यांना आनंद वाटतो. (फिलिप्पैकर ४:७) यहेज्केल ३४:२५-२८ पुढे वर्णन करते त्याप्रमाणे, त्याच्या मेंढरांना यहोवा निर्भयतेची उत्तम परिस्थिती, समृद्धतेची विश्रांति, व फलदायी परिस्थितीच्या आध्यात्मिक नंदनवनात भरवणूक देतो. याच्या मेंढरांविषयी हा प्रेमाळू मेंढपाळ म्हणतोः “मी त्याजवरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्याजकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातातून त्यांस सोडवील तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्‍वर [यहोवा न्यू. व.] आहे. ते यापुढे विधर्मी राष्ट्रांस भक्ष्य होणार नाहीत. . .तर ते निर्भय वसतील, कोणी त्यांस भीति घालणार नाही.”

९. “जोखडाची बंधने तोडल्याने” यहोवाच्या लोकांसाठी कोणती सुसंधी उघडली गेली आहे?

९ अलिकडील काही वर्षात, अनेक राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांनी “त्याजवरील जोखडांची बंधने” तोडल्याचा अनुभव घेतला आहे. पूर्वीपेक्षा आता त्यांना प्रचार करण्यास मोकळीक मिळाली आहे. आम्ही सर्व आपल्या देशात आपले काम पूर्ण करीत असतांना, यहोवाने पुरविलेल्या निर्भयतेचा चांगला उपयोग करू. मानवजातीने कधीही न पाहिलेल्या मोठ्या संकटाचा समय समीप येत असता यहोवा केवढे खात्रीचे आश्‍वासन देतो!—दानीएल १२:१; मत्तय २४:२१, २२.

१०. उत्तम मेंढपाळ, येशू खिस्ताच्या मदतीसाठी यहोवाने कोणाला पुरविले आहे, व त्यातील काहींचा उल्लेख प्रेषित पौलाने कसा केला होता?

१० शत्रूविरूद्ध त्याच्या क्रोधाच्या दिवसाची तयारीत असताना, कळपाची काळजी घेण्यासाठी यहोवाने, उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्ताच्या मदतीसाठी सहमेंढपाळ पुरविलेले आहेत. प्रकटीकरण ६:१ मध्ये यांचे वर्णन येशूच्या उजव्या हातातील “सात तारे” असे पूर्ण संख्येने केले आहे. पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने या सहमेंढपाळाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मंडळास लिहिले, तो म्हणतोः “तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची मंडळी त्याने आपल्या पुत्राच्या रक्‍ताने मिळवली तिचे पाळण तुम्ही करावे.” (प्रे. कृत्ये. २०:२८) आज, संबंध पृथ्वीभरात ६९,५५८ मंडळ्यामध्ये लाखो सहमेंढपाळ कार्य करीत आहेत.

सहमेंढपाळ नेतृत्व करतात

११. अनेकदा उरकल्या गेलेल्या क्षेत्रात काही मेंढपाळांनी यशस्वीपणे कसे नेतृत्व केले आहे?

११ या शेवटल्या दिवसात अनेकदा उरकल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात अनेक ठिकाणी या मेंढपाळांनी नेतृत्व घेतले पाहिजे. कळपाचा आवेश ते कसा वाढता ठेवू शकतील? मेंढपाळ अधिक प्रशंसनीय काम करीत आहेत, व त्यांना यश मिळण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांनी सहाय्यक व नियमित पायनियरींग कार्यास चेतना वाढविली हा आहे. या सेवेत अनेक मेंढपाळांनी सहभाग घेतला, व अनेक प्रचारकांना हे करणे शक्य नसतांना देखील त्यांनी पायनियर आत्मा प्रदर्शित केला, आणि आनंदाने सेवा करीत असल्यामुळे क्षेत्रातील उदासीनतेवर मात करता आली. (स्तोत्रसंहिता १००:२; १०४:३३, ३४; फिलिप्पैकर ४:४, ५) अशाप्रकारे, दुष्टता व अराजकता या जगात पसरत असता, राज्याच्या आस्थेमुळे अनेक मेंढरासमान लोक जागृत होत आहेत.—मत्तय १२:१८, २१; रोमकर १५:१२.

१२. अधिक वाढ होत असलेल्या क्षेत्रात कोणती गंभीर समस्या उभी राहते व काही वेळा ती कशारितीने हाताळली जाते?

१२ आणखी एक समस्या म्हणजे कळपाची काळजी घेण्यासाठी मेंढपाळ पुरेसे प्रशिक्षित नाहीत. पूर्व युरोपासारखी जेथे अधिक वाढ आहे तेथे, अनेक नव्या मंडळ्यात नियुक्‍त केलेले वडील नाहीत. अनेक इच्छुक मेंढरे ती जबाबदारी स्वीकारीत आहे, परंतु ते अतिशय कमी अनुभवी आहेत, मंडळीत येणाऱ्‍या मेंढरांना तालीम देण्याची आवश्‍यकता आहे. ब्राझील, मेक्सिको व झाईर या देशात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, तेथे सेवेची योजना करण्यासाठी व नवोदितांना तालीम देण्यासाठी अगदीच तरूण साक्षीदारांचा वापर करावा लागत आहे. पायनियर उत्तम मदत देत आहेत व असे क्षेत्र आहे ज्यात आमच्या भगिनी नवोदित बहिणींना तालीम देऊ शकतात. यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे त्यांचे परिणाम आशीर्वादित करतो. अजूनही वाढ होत आहे.—यशया ५४:२, ३.

१३. (अ) पीक अधिक असल्यामुळे, सर्व साक्षीदारांनी कशासाठी प्रार्थना करावी? (ब) दुसऱ्‍या महायुद्धापूर्वी व ते चालू असताना देवाच्या लोकांच्या प्रार्थनांना उत्तर कसे मिळाले?

१३ ज्या देशात प्रचारकार्याची चांगली स्थापना झाली आहे, अलिकडेच काही देशातील कार्यावर असणारी बंधने काढली गेली असे, व नविनच सुरू केलेल्या क्षेत्राला येशूचे मत्तय ९:३७, ३८ मधील शब्द अद्याप लागू होतातः “पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत; यास्तव, पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावेत म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.” यहोवाने अधिक मेंढपाळांची व्यवस्था करावी म्हणून आम्ही देखील प्रार्थना करू शकतो. तो असे करू शकतो हे त्याने दाखविले आहे. दुसऱ्‍या महायुद्धापूर्वी व ते चालू असताना क्रुर अश्‍शुरी लोकांसमान असणाऱ्‍या हुकूमशहांनी यहोवाच्या साक्षीदारांचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर देताना, यहोवाने त्यांची संस्था शुद्ध केली, तिला खरेपणाने इश्‍वरशासित केले, व आवश्‍यक “मेंढपाळ” पुरविले.a हे या भविष्यवाणीनुरूप होतेः “जेव्हा अश्‍शुरी आमच्या देशात आमचे महाल तुडवील तेव्हा त्याजविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू.”—नेतृत्व घेण्यासाठी समर्पित वडील पुरेसे होते.—मीखा ५:५.

१४. संस्थेत कोणती मोठी गरज आहे, व बांधवांना कोणते उत्तेजन दिले गेले?

१४ बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व बांधवांनी पुढील विशेषाधिकार प्राप्त करण्याची गरज आहे. (१ तीमथ्य ३:१) हे फारच निकडीचे आहे. ह्‍या जगाचा अंत वेगाने जवळ येत आहे. हबक्कूक २:३ स्पष्ट करतोः “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्याचा आपणच नेट करीत आहे, तो फसवायचा नाही. . .तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.” अंत येण्यापूर्वीच—ह्‍या मेंढपाळकत्वाच्या कामातील पुढील विशेषाधिकारात योग्य बनण्यासाठी बांधवांनो, तुम्ही प्रगती कराल का?—तीतास १:६-९.

ईश्‍वरशासित मेंढपाळकत्व

१५. यहोवाचे लोक कोणत्या अर्थाने ईश्‍वरसत्ताक आहेत?

१५ यहोवाच्या संस्थेच्या होणाऱ्‍या वाढीत अधिक सहभाग घेत असताना त्याच्या लोकांचा दृष्टिकोन देखील ईश्‍वरशासित असणे जरुरीचे आहे. हे ते कसे साध्य करू शकतील? “ईश्‍वरशासित” या शब्दाचा अर्थ तरी काय होतो? वेबस्टर्स न्यू ट्‌वेन्टीयथ सेनच्युरी डिक्शनरी “ईश्‍वरसत्ताक” याची व्याख्या “देवाने दिलेले नियम” अशी देते. व या अर्थाने “पवित्र राष्ट्राचे” यहोवाचे लोक ईश्‍वरसत्ताक आहेत. (१ पेत्र २:९; यशया ३३:२२) त्या ईश्‍वरशासित राष्ट्राचे सदस्य किंवा संबंध राखणारे म्हणून खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनाच्या व त्याच्या तत्वाच्या आज्ञेत राहून सेवा केली पाहिजे.

१६. आम्ही स्वतःस मुळातच, ईश्‍वरशासित आहोत हे कसे दाखवू शकतो?

१६ ख्रिश्‍चनांनी ईश्‍वरशासित कसे असले पाहिजे याविषयी प्रेषित पौल स्पष्टता करतो. प्रथम, तो असे म्हणतो, त्यांनी “धार्मिकता व सत्याची निष्ठा यांनी युक्‍त असा देवानुरूप उत्पन्‍न केलेला नवा मनुष्य धारण करावा.” ख्रिश्‍चनांचे मनुष्यत्व देवाच्या वचनात दिलेल्या त्याच्या धार्मिक तत्वानुरूप बदलेले गेले पाहिजे. तो यहोवाला व त्याच्या नियमांना ईमानदार असला पाहिजे. हे कसे केले जाऊ शकते ते स्पष्ट केल्यावर, पौल आर्जवितोः “प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ४:२४-५:१) आज्ञाधारक मुलांप्रमाणे आम्ही देवाचे अनुकरण केले पाहिजे. ही खऱ्‍या ईश्‍वरसत्ताकपणाची कृती आहे, जी आमच्यावर खरेपणाने देवाचे अधिपत्त्य असल्याचे दाखवते!—कलस्सैकर ३:१०, १२-१४ हेही पहा.

१७, १८. (अ) देवाच्या कोणत्या मूलभूत गुणांचे ईश्‍वरसत्ताक ख्रिश्‍चन अनुकरण करतात? (ब) मोशेला दिलेल्या शब्दात यहोवाने त्याच्या मूलभूत गुणांवर कसा जोर दिला, परंतु कोणती दक्षता घेण्यास त्याने भर घातली?

१७ आम्ही ज्याचे अनुकरण केले पाहिजे असा देवाचा मूलभूत गुण कोणता आहे? १ योहान ४:८ मध्ये प्रेषित योहान याचे उत्तर देतो, तो म्हणतोः “देव प्रीती आहे.” याच्या ८ वचनानंतर पुढे १६व्या वचनात तो पुन्हा या महत्वपूर्ण तत्त्वाची पुनरावृत्ती अशी देतोः “देव प्रेमस्वरूप आहे; जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो, व देव त्यामध्ये राहतो.” महान मेंढपाळ, यहोवा देव प्रेमस्वरूप आहे. ईश्‍वरशासित मेंढपाळ यहोवाच्या मेंढरांना खोल प्रीती दाखवून त्याचे अनुकरण करतात.—पडताळा १ योहान ३:१६, १८; ४:७-११.

१८ महान ईश्‍वरशासकाने स्वतःला मोशेसमोर अशाप्रकारे प्रकट केलेः “परमेश्‍वर, [यहोवा न्यू. व.] परमेश्‍वर [यहोवा न्यू. व.] दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारों जणांवर दया करणारा, अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या अधर्माबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.” (निर्गम ३४:६, ७) अशाप्रकारे, अधर्माबद्दल समाचार घेईल अशी सावधगिरी देतांना, यहोवाने त्याच्या ईश्‍वरशासित गुण व प्रीतिच्या विविध पैलूवर जोर दिला.

१९. परूशांच्या तुलनेत, ख्रिस्ती मेंढपाळाने ईश्‍वरशासित मार्गाने कसे वागले पाहिजे?

१९ संस्थेमध्ये जे जबाबदारीच्या पदावर आहेत, त्यांनी ईश्‍वरशासित असणे याचा काय अर्थ होतो? येशूने त्याच्या दिवसातील यहूदी याजकांना म्हटलेः “जड आणि वाहावयास कठीण अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती सारण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत.” (मत्तय २३:४) हे किती अन्यायी व प्रीतिचा अभाव असणारे होते! कळपावर मेंढपाळकत्व करतांना खरे ईश्‍वरसत्ताक, किंवा दैवी-नियम पवित्र शास्त्रातील प्रेमाच्या तत्वांचे पालन करण्याची हाक देते, मेंढरांवर मानव-निर्मित अनन्त नियमांचे ओझे लादू नये. (पडताळा मत्तय १५:१-९.) परंतु, याचवेळी मंडळीची शुद्धता राखण्यासाठी ईश्‍वरशासित मेंढपाळाने प्रीति व खंबीरपणा व्यक्‍त करून देवाचे अनुकरण केले पाहिजे.—पडताळा रोमकर २:११, १ पेत्र १:१७.

२०. ईश्‍वरसत्ताक मेंढपाळ कोणती संघटनात्मक व्यवस्था ओळखतात?

२० खरे मेंढपाळ हे ओळखतात की ह्‍या शेवटल्या दिवसात, येशूने विश्‍वासू व बुद्धिमान दासाला आपल्या सर्वस्वावर नेमले आहे, व पवित्र आत्मा मेंढरांचे पाळण करण्यासाठी वडीलांची नेमणूक करण्यास या दासाला मार्गदर्शन करीत आहे. (मत्तय २४:३, ४७; प्रे. कृत्ये २०:२८) यास्तव, ईश्‍वरसत्ताक असणे यात, दास वर्गासाठी खोल आदर दाखविणे, दासाने स्थापन केलेल्या संघटनात्मक योजनेसाठी, व मंडळीतील वडीलांच्या व्यवस्थेसाठी आदर दाखविणे समाविष्ट आहे.—इब्रीयांस १३:७, १७.

२१. सहमेंढपाळांसाठी येशूने कोणते उत्तम उदाहरण मांडले?

२१ मार्गदर्शनासाठी यहोवाकडे व त्याच्या वचनाकडे सर्ववेळी पाहून येशूने स्वतःचे उत्तम उदाहरण मांडले. तो म्हणालाः “माझ्याने स्वतः होऊन काही करवत नाही; जसे मी ऐकतो, तसा न्यायनिवाडा करितो; आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे; कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहान ५:३०) प्रभु येशू ख्रिस्ताच्या सहमेंढपाळांनी त्याच्यासारखी नम्र मनोवृत्ती जोपासली पाहिजे. जर एखादा वडील येशूप्रमाणे, मार्गदर्शनासाठी नेहमी देवाच्या वचनाकडे वळत असेल तर मग तो खरा ईश्‍वरसत्ताक आहे.—मत्तय ४:१-११; योहान ६:३८.

२२. (अ) कोणत्या मार्गाने सर्वांनीच ईश्‍वरसत्ताक असण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (ब) येशू मेंढरांना कोणते दयाशील निमंत्रण देतो?

२२ बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवानो, मंडळीमध्ये जबाबदार हक्कांना प्राप्त करण्यासाठी योग्य प्रगती करा! तुम्ही सर्व प्रिय मेंढरांनो, ईश्‍वरसत्ताक होण्यासाठी लक्ष ठेवा, व प्रीति करण्यात देव व ख्रिस्ताचे अनुकरण करा! मेंढपाळ व कळप येशूच्या निमंत्रणास आनंदाने प्रत्त्युतर देवोः “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांति देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जिवांला विश्रांति मिळेल, कारण माझे जू सोईचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.

[तळटीपा]

a जून १ व १५, १९३८ च्या वॉचटावर अंकातील “ऑर्गनायझेशन” हा लेख पहा.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

▫ यहोवाचा “कळप” काय आहे, व त्यात कोणाचा समावेश होतो?

▫ पहिल्या शतकात, “उत्तम मेंढपाळाचे” कार्य येशूने कसे केले व आज तो ते कसे करतो?

▫ कळपाची देखरेख करण्यात सहमेंढपाळ कोणती प्रमुख भूमिका करतात?

▫ “ईश्‍वरसत्ताक” या शब्दातील अर्थ कोणता आहे?

▫ ईश्‍वरशासित असण्यासाठी एका ख्रिश्‍चनाने—खासपणे सहमेंढपाळाने— कसे वागावे?

[१४ पानांवरील चित्रं]

यहोवा समर्पित मेंढपाळासारखी त्याच्या कळपाची काळजी घेतो

[१७ पानांवरील चित्रं]

यहोवा देवाच्या प्रीतीचे अनुकरण करणे म्हणजे वागणूकीत ईश्‍वरसत्ताक असणे होय

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा