राज्य घोषकांचा वृत्तांत
त्यांनी भारतात त्यांचा प्रकाश पाडला
भारतातील ११,५२४ आनंदी साक्षीदार राज्याची सुवार्ता गाजवत आहेत. (मत्तय २४:१४) १९९१च्या सेवा वर्षात १,०६६ बाप्तिस्मा घेतलेले राज्य घोषक आहेत, व ते त्यांचा प्रकाश दुसऱ्यांवर पाडत आहेत. ख्रिस्ताच्या स्मारकविधीच्या वेळी २८,८६६ जणांची उपस्थिती पाहून सर्वांना किती आनंद झाला!
▫ पुष्कळांना राज्य-आशा अनौपचारिक साक्षीद्वारेच शिकण्यास मिळाली. उदाहरणार्थ, एका साक्षीदाराने त्याच्यासोबत सुतारकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्याबद्दल सांगितले. एका कामकऱ्याने प्रतिसाद दिला व त्याचा प्रकाश त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या मित्रांवर तो पाडू लागला. ह्या सर्वांनी राज्याची भव्य आशा इतरांना सांगितली. अहवालानुसार, काही वर्षातच, ‘३० पेक्षा अधिक लोकांनी सत्याचा स्वीकार केला.’ यहोवाने या साक्षीदाराला व त्याच्या नवीन आध्यात्मिक बांधवांना त्यांचा प्रकाश दुसऱ्यांवर पाडल्याबद्दल आशीर्वाद दिले.
▫ दुसऱ्या मंडळीतील एका तरूण बांधवाने त्याचा उजेड अनौपचारिक साक्षीने त्याच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर पाडला. काहींची राज्याबद्दलची आस्था वाढू लागली. व हा बांधव त्यांना कधीकधी मध्यरात्रीपर्यंत पवित्र शास्त्र समजावून सांगत असे. त्यातील एक जो कॅथोलिक होता, त्याला तर त्याच्या पाळकाने बजावले होते की जर त्याने साक्षीदारांसोबत संबंध जोडलेत तर त्याचा परिणाम वाईट होईल, असे असूनही तो सत्यासाठी दृढ उभा राहिला. तथापि त्या विद्यार्थ्याची खात्री पटली की तो साक्षीदाराकडून पवित्र शास्त्राचे सत्य शिकत आहे व तो अधिक ज्ञान घेत राहिला. काही काळानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला व आता तो एका मंडळीत उपाध्य सेवक म्हणून काम करीत आहे. सत्याच्या भव्य प्रकाशातून येणाऱ्या आशेत तो हर्ष करीत आहे!—रोमकरांस पत्र १२:१२.
▫ आणखी एक नामवंत विद्यार्थी जो नास्तिक होता त्याने ह्या तरुण साक्षीदाराचे ऐकले. देव आहे म्हणून विश्वास ठेवणाऱ्यांची तो आधी टिंगल करीत असे. पण एके दिवशी तोही ह्या चर्चेत सामिल झाला व बहुत प्रश्न विचारले. त्याच्या सर्व प्रश्नांना योग्य उत्तरे मिळालेली पाहून तो आश्चर्यचकीत झाला व ह्या समाप्तीस पोहंचला की पवित्र शास्त्र खरेच देवाचे वचन आहे. त्याने पवित्र शास्त्राच्या ज्ञानात वृध्दि केली व शेवटी बाप्तिस्मा घेतला. त्याच्या हिंदू पित्याने त्याचा इतका विरोध केला की त्याला घराबाहेर काढले. तथापि, ह्या तरुणाला सत्याबद्दलच्या त्याच्या दृढ भूमिकेसाठी प्रतिफळ मिळाले; त्याच्या दोन सख्या भावांनी व दोन मित्रांनी सत्याचा स्वीकार केला व बाप्तिस्मा घेतला. आता सध्या त्याचा एक भाऊ भारतातील शाखा दप्तरात काम करीत आहे.
▫ एका विद्यार्थी संघटकाने सुध्दा त्या युवक साक्षीदारासोबतच्या चर्चेत सहभाग घेतला. तो लागोपाठ बिड्या ओढणारा व अति मद्यप्राशन करणारा देखील होता. एकदा तर त्याने दोन विद्यार्थ्यांना, त्यांनी ह्या युवक साक्षीदाराकडून सत्य शिकून घेतले म्हणून मारायचा प्रयत्न केला सत्याचा स्वीकार केल्यामुळे त्या दोघांनीही कॉलेजच्या संपात भाग घेण्यास व ह्या विद्यार्थी संघटकाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रक्तदान शिबिरात रक्त देण्यास नकार दर्शविला होता. पण आता हा तरुण माणूस यहोवाचा ज्योति वाहक असा साक्षीदार आहे म्हणून त्याला आनंद वाटतो.
▫ एकंदरीत, ह्या विद्यार्थ्याने त्याचा प्रकाश पाडल्यामुळे अनौपचारिक साक्ष देऊन त्याच्या १५ मित्रांच्या समर्पण व बाप्तिस्म्यास कारणीभूत ठरला.
ह्या मोठ्या राष्ट्रात, पुष्कळांनी पवित्र शास्त्रातील देवाच्या नवीन जगाच्या आशेचा स्वीकार केलेला पाहून मन अगदी आनंदाने भरून येते, व हे सर्व जण त्या जागतिक बंधुत्वाचा एक भाग बनत आहेत जो यहोवा देव स्वत: त्याच्या राज्यात सदासर्वकाळ राहण्यास एकत्रित करत आहे.