वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 १२/१ पृ. २१-२५
  • यहोवा, अद्‌भुत कृत्ये करणारा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा, अद्‌भुत कृत्ये करणारा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पीडीत पण निष्ठावंत
  • यहोवासोबतची जवळीक
  • यहोवाचा चांगुलपणा
  • यहोवाची अतुलनीय कृत्ये
  • यहोवाची थोरवी
  • एकाग्र अंतःकरणाने चालत राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवा–चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाची प्रेमदया अफाट आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाची थोरवी अगम्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 १२/१ पृ. २१-२५

यहोवा, अद्‌भुत कृत्ये करणारा

“तू थोर व अद्‌भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.”—स्तोत्रसंहिता ८६:१०.

१, २. (अ) मानवाच्या संशोधनांनी जगावर कसा परिणाम केला आहे? (ब) चांगल्या गोष्टीबद्दलची आशा आम्हाला कोठे दिसेल?

आधुनिक मानवाला आपल्या संशोधनाचा मोठा अभिमान वाटतो. विद्युत उपकरणे, दूरसंचार, व्हिडीओ, मोटारगाड्या, जेट विमाने, आणि संगणकाबद्दलचे तंत्रज्ञान या सर्व गोष्टी मानवाला किती अद्‌भुत वाटतात! या सर्व गोष्टींनी जगाला अगदी जवळ आणले आहे. पण ही जवळीक ती काय? सर्वांना शांती, समृद्धता आणि मुबलकता असण्याऐवजी मानवजात घातकी युद्धे, गुन्हेगारी, दहशत, प्रदूषण, रोग आणि गरिबी यांनी ग्रस्त झाली आहे. जगभर विखुरलेली अण्वस्त्रे, जरी प्रमाणात कमी झाली असली तरी मानवजातीचा संहार करु शकतील. मरणाचे व्यापारी म्हणजेच युध्दाची अस्त्रे उत्पादन करणाऱ्‍यांनी पृथ्वीभर फार मोठा व्यापार चालविला आहे. धनवान अधिक धनवान, तर गरीब अधिकच गरीब होत आहेत. यामधून कोणी मार्ग काढू शकेल का?

२ होय, असा एक जण आहे जो, “वरिष्ठावरही वर असणारा” आहे व तोच मुक्‍ततेची हमी देतो व तो यहोवा देव आहे. (उपदेशक ५:८) त्याने स्तोत्रसंहितेच्या लिखाणास प्रेरित केले. ही स्तोत्रे बरेच सांत्वन देतात आणि कठीण काळसाठी सूज्ञ सल्ला देतात. त्यात ८६व्या स्तोत्राचे शिर्षक “दावीदाची प्रार्थना” असे आहे. ही अशी प्रार्थना आहे, जी तुम्हाला स्वतःची बनवता येईल.

पीडीत पण निष्ठावंत

३. सध्याच्या काळात दावीद कोणते प्रोत्साहनदायक उदाहरण आम्हाला देतो?

३ दावीद स्वतः पीडाग्रस्त असताना त्याने हे स्तोत्र लिहिले. आपण सध्या सैतानी व्यवस्थेच्या “शेवटल्या काळी” “कठीण दिवसात” रहात असता अशाच काही त्रासांना तोंड देत असतो. (२ तीमथ्य ३:१; तसेच मत्तय २४:९-१३ पहा.) आम्हाप्रमाणेच, दावीदावर जे गुदरले त्यामुळे त्याला चिंता व नैराश्‍य यांना लढा द्यावा लागला. तथापि, त्याने या परिक्षांना निर्माकर्त्याबद्दल त्याला वाटणाऱ्‍या निष्ठावंत भरवशामध्ये दुबळेपणा आणू दिला नाही. त्याने मोठ्याने म्हटलेः “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] कान लाव; मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्‍त आहे. हे माझ्या देवा, तुजवर भाव ठेवणाऱ्‍या सेवकाचे तारण कर.”—स्तोत्रसंहिता ८६:१, २.

४. आम्ही आपला आत्मविश्‍वास कसा दाखवावा?

४ दावीदाप्रमाणे आम्हाला देखील हा आत्मविश्‍वास राखता येईल की, “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा आपले लक्ष पृथ्वीकडे वळवील आणि आमच्या नम्र प्रार्थनांकडे कान देईल. (२ करिंथकर १:३, ४) आपल्या देवावर पूर्णपणे भाव राखून आपण दावीदाचा हा सल्ला अनुसरु शकतोः “तू आपला भार परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल, धार्मिकाला तो कधीही ढळू देणार नाही.”—स्तोत्रसंहिता ५५:२२.

यहोवासोबतची जवळीक

५. (अ) यहूदी शास्त्र्यांची चूक काही दक्ष भाषांतरांनी कशी सुधारली? (ब) ८५ व ८६वे स्तोत्र यहोवाचे नाव कसे उंचावते? (तळटीप पहा.)

५ दावीद ८६व्या स्तोत्रात “हे देवा [यहोवा, न्यू.व.]” अशी शब्दरचना ११ वेळा वापरतो. दावीदाची प्रार्थना किती कळकळीची आणि त्याची यहोवासोबतची जवळीक किती निकटची वाटते! देवाच्या नावाचा इतक्या सलगीने केलेला वापर नंतर यहूदी शास्त्र्यांना व विशेषरित्या सोफेरिमांना अपमानकारक वाटला. त्यांनी ईश्‍वरी नामाचा गैरवापर होईल अशी अंधश्रद्धेची भीती वाढवली. मानवाला देवाच्या प्रतिमेनुसार बनविण्यात आले आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, त्यांनी, मानव प्रदर्शित करणाऱ्‍या गुणांचे श्रेय देवास देण्याचे नाकारले. आणि या कारणामुळे या स्तोत्राच्या इब्री लिखाणातील ईश्‍वरी नामाच्या ११ पैकी ७ जागी त्यांनी יהוה (यहोवा) या नावाऐवजी ʼअडहो-नाय्‌ʹ (प्रभू) ही संज्ञा वापरली. पण, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स याचप्रमाणे इतर कित्येक दक्ष भाषांतरांनी ते ईश्‍वरी नाम देवाच्या वचनात योग्य ठिकाणी घातले याबद्दल आम्हाला किती कृतज्ञतेचे वाटते बरे! यामुळे यहोवाशी असणाऱ्‍या आमच्या नातेसंबंधाला अधिक भर दिला जातो, जो वस्तुतः तसा असण्यास हवा.a

६. यहोवाचे नाम आम्हाला मोलवान वाटत आहे हे आम्ही कसे दाखवू शकतो?

६ दावीदाची प्रार्थना पुढे म्हणतेः “हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] मजवर कृपा कर; कारण मी दिवसभर तुझा धावा करितो. हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर; मी आपले चित्त तुजकडे लावितो.” (स्तोत्रसंहिता ८६:३, ४) दावीदाने यहोवाचा “दिवसभर” धावा केला हे लक्षात घ्या. खरे म्हणजे जेव्हा तो अरण्यात पळून गेलेला असता रात्रीच्या समयी त्याने प्रार्थना केली असावी. (स्तोत्रसंहिता ६३:६, ७) याचप्रमाणे, काही साक्षीदारांनी बलात्कार किंवा अशाच प्रकारच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या हल्ल्यात यहोवाचा मोठ्याने धावा केला. त्यांना यामुळे जे आनंदी परिणाम मिळाले ते बघून आश्‍चर्य वाटले.b “येशू ख्रिस्त, दावीदाचा पुत्र” याला या पृथ्वीवर असताना यहोवाचे नाम मोलवान वाटत होते, तसेच आजही आम्हाला वाटते. येशूने आपल्या शिष्यांना यहोवाच्या नामाचे पवित्रीकरण होण्यासाठी प्रार्थना करायला शिकवली, आणि ते नाव कशाला अनुलक्षून आहे हे त्यांना कळवले.—मत्तय १:१; ६:९; योहान १७: ६, २५, २६.

७. यहोवाने आपल्या सेवकांच्या जीवनांना आनंदीत केल्याची कोणती उदाहरणे आहेत, यामुळे आम्हाला कसे वाटण्यास हवे?

७ दावीदाने आपले सबंध जीवनमान, स्वतःलाच यहोवाला सोपवून दिले, आणि इतरांनीही तेच करावे असे उत्तेजन दिले. तो स्तोत्रसंहिता ३७:५ मध्ये म्हणालाः “आपला जीवितक्रम परमेश्‍वराकडे [यहोवा, न्यू.व.] सोपवून दे; त्याजवर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.” अशाप्रकारे आपला जीव आनंदी करावा याबद्दल यहोवास केलेली विनवणी तो व्यर्थ जाऊ देणार नाही. त्रास, छळ आणि आजारपण या गोष्टी असल्या तरी कित्येक सचोटी राखणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांना त्याच्या कार्यात मोठ्या आनंदाचा अनुभव येत आहे. आफ्रिका खंडात युद्धाने ग्रस्त असणाऱ्‍या अँगोला, लायबेरिया, मोझांबिक, आणि सेईर या देशात आमच्या बांधवांनी आपल्या जीवनात यहोवाच्या सेवेला सतत प्रथमस्थान दिले आहे.c त्यानेही त्यांना विपुल आध्यात्मिक कापणी पुरवून आनंदित केले आहे. ते टिकून राहिले तसेच आम्हीही राहू शकतो. (रोमकर ५:३-५) आम्ही धीर धरीत असता आम्हाला ही खात्री देण्यात आली आहेः “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे; आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, . . . त्याला विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) यहोवावर पूर्ण स्वरुपाचा आत्मविश्‍वास व भरवसा राखून आपण “शेवटास जाण्याचा यत्न करू” शकू.

यहोवाचा चांगुलपणा

८. आपल्याला यहोवाबरोबर कोणती जवळीक राखता येईल, आणि त्याने आपला चांगुलपणा कसा प्रदर्शित केला आहे?

८ दावीद पुढे आणखी भावनापूर्ण याचना करतोः “हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.” (स्तोत्रसंहिता ८६:५-७) “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.]”—दावीदाचे पुनपुन्हा हे सलगीचे शब्द ऐकून आपण किती भारावून जातो! ही अशी जवळीक प्रार्थनेद्वारा नित्य साधता येते. आणखी एका प्रसंगी दाविदाने अशी प्रार्थना म्हटलीः “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको, तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.” (स्तोत्रसंहिता २५:७) यहोवा चांगुलपणामध्ये सर्वांगपूर्ण आहे—त्यानेच येशूचे बलिदान दिले, पश्‍चात्तापी पाप्यांना दया दाखवली, आणि आपल्या निष्ठावंत तसेच कदर दाखवणाऱ्‍या साक्षीदारांप्रीत्यर्थ त्याने आपले वात्सल्य प्रकट केले आहे.—स्तोत्रसंहिता १००:३-५; मलाखी ३:१०.

९. पश्‍चात्ताप होणाऱ्‍या पाप्यांनी कोणत्या आश्‍वासनाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे?

९ आपल्याला पूर्वीच्या चुकांबद्दल चिंतातुर वाटू देण्यास हवे का? आपण आपल्या पावलांच्या वाटा नीट करीत आहोत, तर प्रेषित पेत्राने पश्‍चात्ताप्यांना जी खात्री दिली आहे ती आठवल्यामुळे आपल्याला हलकेपणा वाटू लागेल. तो म्हणाला होताः “विश्रांती मिळण्याचे समय” यहोवाकडून येतील. (प्रे. कृत्ये ३:१९) यास्तव, आपण स्वतःला यहोवाकडे, आमचा खंडणीदाता येशूच्या द्वारे प्रार्थना करून जवळ ठेवू या. येशूने म्हटले होतेः “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांति देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जिवांस विश्रांति मिळेल.” यहोवाचे निष्ठावंत साक्षीदार त्याला येशूच्या नामाने आज प्रार्थना करतात तेव्हा त्यांना खरीच विश्रांती किंवा तजेला प्राप्त होतो.—मत्तय ११:२८, २९; योहान १५:१६.

१०. यहोवाच्या दयेबद्दल स्तोत्रसंहितेचे पुस्तक कोणते ठळक वैशिष्ट्य दाखवते?

१० स्तोत्रसंहितेच्या पुस्तकात यहोवाची “विपूल दया” याबद्दल शेकडो वेळा उल्लेख आहे. ही विपूल दया खरीच मुबलक प्रमाणात आहे! ११८व्या स्तोत्राच्या पहिल्या चार वचनात देवाच्या सेवकांना यहोवाचे उपकारस्मरण करण्याचे अपील आहे व तेथे चार वेळा “त्याची [“प्रेमळ,” न्यू.व.] दया सनातन आहे,” असा उल्लेख करण्यात आला आहे. १३६व्या स्तोत्रात त्याची “[“प्रेमळ,” न्यू.व.] दया” हा प्रिय गुण २६ वेळा जोर देऊन सांगण्यात आला आहे. आपली चूक कोणत्याही मार्गाने झालेली असो, आणि जसे याकोब ३:२ म्हणते की, “आपण सगळेच पुष्कळ गोष्टीविषयी चुकतो”, आपण यहोवाकडून क्षमा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याची दया व ममता याबद्दल खात्री राखली पाहिजे. त्याची दया ही, त्याचे आम्हावर निष्ठावंत प्रेम असल्याचे प्रतिक आहे. आपण देवाच्या इच्छेप्रमाणे निष्ठावंतपणे करीत राहिल्यास तो सुद्धा आपले निष्ठावंत प्रेम आपणाला दाखवून आम्हाला प्रत्येक परिक्षाप्रसंगात लढत देण्यात आमची मजबूती करील.—१ करिंथकर १०:१३.

११. वडीलांद्वारे केली जाणारी कृति एखाद्याला पापाचा वाटणारा भार कसा हलका करण्यात मदत देऊ शकेल?

११ इतरांद्वारे आम्हास अडखळणे उद्‌भवतील असे काही प्रसंग येतील. लहानपणी जो भावनिक किंवा शारीरिक छळ केला त्यामुळे दोषी असल्याची किंवा आपण लायक नाहीत अशी भावना काहींमध्ये राहून गेली असेल. अशांनी यहोवाचा धावा करावा व तो त्यांना उत्तर देईल अशी खात्री बाळगावी. (स्तोत्रसंहिता ५५:१६, १७) एखादा दयावंत वडील कदाचित अशांच्या बाबतीत आस्था घेऊन अशांना या वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यात मदत देईल की, ती त्यांची चूक नव्हती. यासाठीच, अशा वडीलाने अधूनमधून फोन करून मदत देत राहावे म्हणजे त्याला किंवा तिला ‘स्वतःचा भार सरतेशवेटी वाहता’ येईल.—गलतीकर ६:२, ५.

१२. त्रास कसा वाढलेला आहे, पण आपण यांना कसे यशस्वीपणे तोंड देऊ शकतो?

१२ यहोवाच्या लोकांना आणखी काही त्रस्त परिस्थितींना आज सामोरे जावे लागत आहे. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या आरंभापासून या जगाला निरनिराळ्या विपत्तींनी घेरले आहे. येशूने भाकित केल्याप्रमाणे या “सर्व वेदनांचा प्रारंभ” होत्या. यानंतर, आपण “युगाच्या समाप्ती”मध्ये जसजसे पुढे आलो तसतसा त्रास अधिकच वाढत आहे. (मत्तय २४:३, ८) दियाबलाचा “थोडा काळ” आता समाप्तीला येत आहे. (प्रकटीकरण १२:१२) त्यामुळे हा मोठा शत्रू सावजाच्या शोधात राहणाऱ्‍या एखाद्या “गर्जणाऱ्‍या सिंहाप्रमाणे” आम्हाला देवाच्या कळपापासून दूर करण्यासाठी व फाडून खाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्‍या प्रत्येक युक्‍तिचा उपयोग करीत आहे. (१ पेत्र ५:८) पण तो यशस्वी होऊ शकणार नाही! कारण दावीदाप्रमाणे आपण सुद्धा आपला पूर्ण आत्मविश्‍वास आमचा एकच देव यहोवा याजवर ठेवून आहोत.

१३. पालक तसेच त्यांच्या मुलांना यहोवाच्या चांगुलतेपासून कसा लाभ मिळवता येईल?

१३ यहोवाच्या चांगुलपणावर विसंबून राहण्याची गरज दावीदाने आपला पुत्र शलमोन याच्या अंतःकरणावर बिंबवली होती यात काही संशय नाही. या कारणामुळे शलमोन देखील आपल्या मुलाला हे सांगू शकलाः “तू आपल्या अगदी मनापासून [“अंतःकरणापासून,” न्यू.व.] परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको; परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धर आणि दुष्कर्मांपासून दूर राहा.” (नीतीसूत्रे ३:५-७) आज पालकांनी आपल्या लहान मुलांना यहोवाला भावपूर्ण प्रार्थना करण्याचे तसेच या निर्दयी जगाच्या प्रत्येक हल्ल्याला, मग तो शाळेमध्ये येणारा दबाव असो की, अनैतिक आचरण करण्याचा दबाव असो त्याला, कसे तोंड द्यावे ते शिकवावे. दर दिवशी पवित्र शास्त्रीय तत्त्वांची त्यांच्यासोबत सहभागिता केल्यामुळे त्या बालमनावर यहोवाबद्दलची खरी प्रीती आणि त्याजवर प्रार्थनापूर्वकतेने विसंबून राहणे या गोष्टी चांगलेपणाने बिंबवता येतील.—अनुवाद ६:४-९; ११:१८, १९.

यहोवाची अतुलनीय कृत्ये

१४, १५. यहोवाची काही अतुलनीय कृत्ये कोणती आहेत?

१४ दावीद अगदी गाढ भक्‍तिभावाने असे म्हणतोः “हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] देवांमध्ये तुजसमान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.” (स्तोत्रसंहिता ८६:८) मानवाला कल्पनाही करता येणार नाही इतकी यहोवाची कृत्ये भव्य, सुंदर व सर्वोत्तम आहेत. आधुनिक विज्ञानाने पाहिले त्याप्रमाणे हे निर्माण केले गेलेले विश्‍व, दाविदाने विचार केला त्यापेक्षाही अतिविस्तारीत, सुसंगतपणा आणि दैदिप्यमानपणा यात उच्च आहे. दावीद भारावून असे म्हणाला होताः “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.”—स्तोत्रसंहिता १९:१.

१५ यहोवाने या विश्‍वात पृथ्वीची जागा अशा पद्धतीने ठेवली आहे की तिला दिवस व रात्र, ऋतु, पेरणी व कापणी आणि अशा अनेक गोष्टींनी मानवाच्या आनंदासाठी तयार करण्यात आले त्याद्वारे त्याची अद्‌भूत कृत्ये दिसून येतात. शिवाय आमची घडण व सिद्धता देखील किती अद्‌भूतरित्या झालेली आहे, की ज्यामुळे आम्हाला आम्हासभोवताली असणाऱ्‍या यहोवाच्या कार्याचा आनंद घेता येतो!—उत्पत्ती २:७-९; ८:२२; स्तोत्रसंहिता १३९:१४.

१६. यहोवाने आपले चांगुलपण सर्वात कोणत्या चांगल्याप्रकाराने व्यक्‍त केले आहे, व यामुळे आणखी कोणती अतुलनीय कार्ये घडतील?

१६ आपल्या पहिल्या मानवी पालकांनी देवाची अवज्ञा करून सध्या पृथ्वीला होत असलेल्या त्रासाची सुरवात करून दिली, त्यानंतर यहोवाने आपल्या प्रेमामुळेच आपल्या पुत्राला येथे या पृथ्वीवर देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि मानवजातीसाठी खंडणी या नात्याने मरणाकरता पाठवून एक अद्‌भुत कृत्य केले शिवाय आश्‍चर्य ते काय! यहोवाने ख्रिस्ताचे पुनरुत्थान करुन त्याला राजा असे अधिष्ठित केले. (मत्तय २०:२८; प्रे. कृत्य २:३२, ३४) देवाने निष्ठावंत लोकांमधून एक अशी “नवी उत्पत्ती” निवडली जी ख्रिस्तासोबत मिळून एक परोपकारी “नवे आकाश” बनून अशा “नव्या पृथ्वी”च्या समाजावर आपले अधिपत्य करणार, ज्यामध्ये करोडो पुनरुत्थित मानवांचा समावेश असणार. (२ करिंथकर ५:१७; प्रकटीकरण २१:१, ५-७; १ करिंथकर १५:२२-२६) यहोवाची कृत्ये अशाप्रकारे वैभवी कळसाला पोहंचतील! आम्हाला खरोखरीच हे आनंदाने जाहीर करता येईलः “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्‍यांकरिता तू ते साठवून ठेविले आहे!”—स्तोत्रसंहिता ३१:१७-१९.

१७. यहोवाच्या कृत्यांच्या बाबतीत स्तोत्रसंहिता ८६:९ ची सध्या कशी पूर्णता होत आहे?

१७ यहोवाच्या सध्याच्या कामात दावीदाने स्तोत्रसंहिता ८६:९ मध्ये वर्णिलेल्या गोष्टी येतातः “हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] तू उत्पन्‍न केलेली सर्व रा येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नामाची महिमा गातील.” यहोवाने आपली “नवी उत्पत्ती”, राज्य वारसांचा “लहान कळप” याच्या राहिलेल्यांना मानवजातीतून गोळा केल्यावर त्याने “सर्व राष्ट्रातून” “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” गोळा करीत आहेत. हे लाखों देखील येशूच्या ओतण्यात आलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवीत आहेत. यांची मिळून त्याने एक अशी प्रबळ संस्था उभारली आहे, जो या पृथ्वीवर एकमात्र असा शांतीप्रिय गोलार्धव्याप्त समाज आहे. हे बघून स्वर्गीय सेना यहोवाच्या पाया पडून त्याला म्हणतेः “धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्मरण, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत.” मोठा लोकसमुदाय देखील यहोवाच्या नामाचा धन्यवाद करतो आणि तो या जगाच्या नाशापासून बचावून नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा राखून आहे व या कारणास्तव यहोवाची “अहोरात्र” सेवा करीत आहे.—लूक १२:३२; प्रकटीकरण ७:९-१७; योहान १०:१६.

यहोवाची थोरवी

१८. यहोवाने, तो स्वतः “केवळ देव” आहे हे कसे प्रदर्शित केले आहे?

१८ पुढे दावीद यहोवाच्या देवत्वाकडे लक्ष आकर्षित करतो व म्हणतोः “तू थोर व अद्‌भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.” (स्तोत्रसंहिता ८६:१०) अगदी प्राचीन काळापासून यहोवाने तोच “केवळ देव” असल्याचे प्रदर्शित केले आहे. एकदा मिसराच्या जुलमी फारोने मोशेला अत्यंत उपहासात्मकपणे म्हटले होतेः “हा कोण परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] की, ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्‍वराला [यहोवा, न्यू.व.] जाणत नाही.” पण यहोवा हा किती मोठा आहे हे त्याला लवकरच कळाले. सर्वसमर्थ देवाने मिसराच्या दैवतांना व जादूगार याजकांवर भयानक पीडा पाठवून, मिसराच्या प्रथम जन्मलेल्यांचा वध करून, आणि फारो व त्याच्या उत्तम सैन्याचा तांबड्या समुद्रात सर्वनाश करून नमविले. खरेच, देवांमध्ये यहोवासारखा असणारा कोणी देव नाही!—निर्गम ५:२; १५:११, १२.

१९, २०. (अ) प्रकटीकरण १५:३, ४ मधील गीताला सर्वथोर वक्‍तव्य केव्हा लाभणार? (ब) आम्हाला यहोवाच्या कामामध्ये आता देखील कशी सहभागिता मिळू शकेल?

१९ केवळ देव असल्यामुळे यहोवाने आपल्या आज्ञाधारक उपासकांना आधुनिक काळाचे मिसर, हे सैतानी जग यापासून वाचविण्यासाठी अद्‌भुत कृत्ये केली आहेत. त्याने त्याचे ईश्‍वरी न्यायदंड या सबंध पृथ्वीभर, इतिहासाच्या अत्यंत विस्तारीत प्रचार मोहीमेद्वारे गाजविले आहेत व यामुळे येशूच्या मत्तय २४:१४ मधील भविष्यवादाची पूर्तता केली आहे. लवकरच “शेवट” येईल व त्यावेळी यहोवा दुष्टाईचे पृथ्वीवरून उच्चाटन करून अपूर्व प्रमाणात आपली थोरवी प्रकट करील. (स्तोत्रसंहिता १४५:२०) तेव्हा मोशाचे गीत व कोकऱ्‍याचे गीत यांचा ध्वनि उत्तरोत्तर वाढत राहीलः “सर्वसत्ताधारी प्रभू देवा [यहोवा, न्यू.व.] तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो [यहोवा, न्यू.व.] तुला कोण भिणार नाही? तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही? कारण पवित्र [“निष्ठावंत,” न्यू.व.] असा काय तो तूच एक आहेस.”—प्रकटीकरण १५:३, ४.

२० देवाच्या या भव्य उद्देशांबद्दल बोलत राहण्यामध्ये आपण आपला कार्यभाग पूर्ण करू या. (पडताळा प्रे. कृत्ये २:११.) यहोवा आमच्या काळी आणि भविष्यात मोठी व आश्‍चर्यावह कृत्ये करीत राहील हे आमचा पुढचा लेख दाखवून देईल.

[तळटीपा]

a  १८७४मधील पवित्र शास्त्रावरील एक टिकासंग्रह, ॲन्ड्रू. ए. बोनर यांना असे म्हटल्याचे उद्धृत करतोः “देवाचे विशिष्ट गुण, त्याचे प्रतापी नाम हे गेल्या [८५व्या] स्तोत्रात अधिक लक्षवेधकपणे प्रकट करण्यात आले; आणि यामुळेच आणखी एक ‘दावीदाची प्रार्थना’ यात यहोवाची तीच गुणविशेषता पूर्णपणे दिसून येते. या [८६व्या] स्तोत्राचा मुख्य स्वर यहोवाचे नाम हाच आहे.”

b  वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात येणाऱ्‍या अवेक! मासिकाच्या जून २२, १९८४च्या अंकातील पृष्ठ २८ पहा.

c  याच्या सविस्तर स्पष्टीकरणासाठी जानेवारी १९९३ च्या अंकात येणारा “यहोवाच्या साक्षीदारांचा १९९२ सेवा वर्षाचा अहवाल” पहा.

तुम्हाला आठवते का?

▫ स्तोत्रसंहिता ८६ ची प्रार्थना आम्ही आपली व्यक्‍तिगत प्रार्थना का बनवावी?

▫ आपल्याला यहोवासोबत जवळीक कशी साधता येईल?

▫ यहोवा आपला चांगुलपणा आमच्या बाबतीत कसा व्यक्‍त करतो?

▫ यहोवाची काही अतुलनीय कृत्ये कोणती आहेत?

▫ थोरवीच्या बाबतीत यहोवा हा ‘केवळ देव’ कसा आहे?

[२३ पानांवरील चित्रं]

यहोवाची अद्‌भुत कृत्ये येणाऱ्‍या “नव्या जगात” त्याचे वैभव व चांगुलपणा यांची साक्ष देत राहतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा