एकमेकांची उभारणी करीत राहा
“तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतिकरिता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो.”—इफिसकर ४:२९.
१, २. (अ) संभाषण ही अद्भूत गोष्ट आहे असे का म्हणता येते? (ब) आपण आपल्या जिव्हेचा कसा उपयोग करतो याकरता दक्षता घेणे का जरुरीचे आहे?
“संभाषण मित्रांना, कुटुंबाना आणि समाजाला बांधणारा दोर आहे. . . . मेंदू व जीभेच्या स्नायुंच्या आकुंचनामुळे आम्हाला प्रेम, द्वेष, आदर आणि खरे म्हणजे कोणतीही भावना शब्दात व्यक्त करता येते.”—हिअरिंग, टेस्ट ॲण्ड स्मेल.
२ आपली जीभ ही अन्नाची रुचि घेणे व ते गिळणे यापेक्षाही अधिक कार्यक्षम आहे. आपण स्वतःमध्ये जो विचार करीत असतो व जे भरवीत असतो त्यामध्ये तिचा सहभाग असतो. ‘जीभ ही लहानसे अंग आहे,’ असे याकोबाने लिहिले. “तिच्या योगे प्रभु [यहोवा, न्यू.व.] पिता याची आपण स्तुति करतो आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या मनुष्यांस . . . शापही देतो.” (याकोब ३:५, ९) होय, आम्हाला आमच्या जिव्हेचा उपयोग यहोवाची स्तुति करण्याच्या चांगल्या कामासाठीही करता येऊ शकतो. तथापि, आपण अपूर्ण असल्यामुळे आपली जीभ इजात्मक किंवा नकारात्मक गोष्टींचे बोलणे करण्याकडे सहज वळते. याकोबाने लिहिलेः “माझ्या बंधूनो, अशी गोष्ट व्हावी, हे उचित नाही.”—याकोब ३:१०.
३. आमच्या भाषणाच्या कोणत्या दोन गोष्टींबद्दल आम्ही लक्ष दिले पाहिजे?
३ वस्तुतः कोणाही मानवाला आपली जीभ पूर्णपणे ताब्यात ठेवता येणे शक्य नसले तरी आपण त्यात सुधारणा करीत राहिले पाहिजे. प्रेषित पौल आम्हाला सल्ला देतोः “तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरिता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकरुन ऐकणाऱ्यांस कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिसकर ४:२९) या आज्ञेत दोन गोष्टी समाविष्ट आहेत हे लक्षात घ्याः आम्ही टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी व आम्ही केल्या पाहिजेत अशा गोष्टी. या दोन्ही गोष्टींबद्दल आपण विचार करू.
कुजके भाषण टाळणे
४, ५. (अ) ख्रिश्चनांना घाणेरड्या भाषेबद्दल कोणती लढत द्यावी लागते? (ब) “कुजके भाषण” याकरता कोणती उपमा साजेशी आहे?
४ प्रथम इफिसकर ४:२९ आम्हाला असे आर्जवितेः “तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो.” हे सोपे नसणार. याचे एक कारण म्हणजे निंदा ही आम्हासभोवतालच्या जगात एक सर्वसाधारण गोष्ट बनली आहे. पुष्कळशा ख्रिस्ती युवकांना दर दिवशी त्यांच्या शाळकरी मित्रांकडून शिव्या ऐकायला मिळतात, कारण त्या मित्रांना वाटते की, अशा प्रकारच्या भाषणामुळे त्यांच्या वक्तव्याला जोर येतो आणि आपण सबळ आहोत हे त्याद्वारे दाखवता येते. घाणेरडे शब्द ऐकण्यापासून आम्हाला आमचे कान पूर्णपणे बंद करता येणार नसले तरी ते शब्द आपणामध्ये शोषले जात नाही याकडे निदान आपण जाणीवपूर्वक लक्ष घातले पाहिजे. अशा शब्दांना आमचे मन व मुख यात कसलीही जागा नाही.
५ पौलाने इशारा देताना जो ग्रीक शब्द वापरला त्यात नासके मासे वा सडलेले फळ याच्या विचारांचा अंतर्भाव आहे. याचे दृश्य आपणापुढे उभे कराः तुम्हाला एक माणूस अधीर बनल्याचे व अत्यंत क्रोधाविष्ट झाल्याचे दिसते. शेवटी त्याचा राग अनावर होऊन बाहेर पडतो, आणि तुम्हाला काय दिसते, एक कुजलेला मासा त्याच्या तोंडातून बाहेर पडला! पुढे एक सडलेले, नासके फळ बाहेर पडून ते सभोवार असणाऱ्यांवर जाऊन आदळते! हा माणूस कोण आहे? तो आमच्यापैकी एखादा असल्यास ते केवढे भयानक असेल! तरी, आपण ‘आपल्या तोंडावाटे असले कुजके भाषण करतो,’ तेव्हा आमची प्रतिमा अशीच बनते!
६. इफिसकर ४:२९ टिकात्मक व नकारार्थी भाषणास कसे लागू होते?
६ इफिसकर ४:२९ बद्दलचा दुसरा अवलंब असा की, आपण सतत टिका करीत राहण्याचे टाळावे. आम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत, किंवा ज्यांचा आम्हाला स्वीकार करवत नाही, अशा गोष्टींबद्दलच्या आपल्या विशिष्ट आवडीनिवडी किंवा मते असतात हे मान्य आहे. पण जो नेहमीच प्रत्येक व्यक्ती, जागा किंवा उल्लेखित अशा कोणत्याही गोष्टीबद्दल सतत कुरबुरीचे बोलणे करीत असतो अशाच्या सहवासात तुम्ही कधी राहिला आहात का? (पडताळा रोमकर १२:९; इब्रीयांस १:९.) त्याचे ते बोल मानहानी करते, निराश बनवते व हाणून पाडते. (स्तोत्रसंहिता १०:७; ६४:२-४; नीतिसूत्रें १६:२७; याकोब ४:११, १२) त्या माणसाला आपण मलाखीने वर्णिलेल्या टिकेखोरांसारखे कसे असतो याची कदाचित जाणीव नसेल. (मलाखी ३:१३-१५) यास्तव, जवळ उभे राहणाऱ्या एखाद्याने त्याला, त्याच्या तोंडातून कुजलेला मासा किंवा नासके फळ बाहेर पडले आहे असे म्हटले तर त्याला किती मोठा धक्का बसू शकेल!
७. आम्ही प्रत्येकाने स्वतःचे कोणते आत्मपरिक्षण केले पाहिजे?
७ दुसरा कोणी तरी सतत नकारात्मक किंवा टिकात्मक बोलणे करीत आहे हे आपल्याला कळते, तेव्हा आपण स्वतःला हे विचारावेः ‘मी देखील असाच वागू इच्छितो का? खरेच, तसा आहे का?’ आमचे भाष्य कसल्या प्रकारची प्रवृत्ती दाखवीत असते याबद्दल आपण वेळोवेळी पाहणी करणे हे सूज्ञतेचे आहे. आमचे बोल नेहमीच नकारार्थी, टिकात्मक असतात का? आपण ईयोबाच्या तीन भिकार सांत्वनकर्त्यांसारखे आहोत का? (ईयोब २:११; १३:४, ५; १६:२; १९:२) एखादा विधायक मुद्दा बोलून दाखवण्यासाठी का कल नेऊ नये? संभाषण एकंदरीत टिकात्मक होत असल्याचे दिसते तर ते उभारणीकारक गोष्टींकडे वळविण्यास आपण का पुढे होऊ नये?
८. मलाखी ३:१६ संभाषणाबद्दल कोणता धडा देते, आणि हा धडा आपण लागू करीत आहो हे कसे दाखवू शकतो?
८ मलाखीने परस्परविरोधी वाटणारी ही गोष्ट प्रकट केलीः “तेव्हा परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय बाळगणारे एकमेकांस बोलले, ते परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] कान देऊन ऐकले, व परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” (मलाखी ३:१६) उभारणीकारक संभाषणाला देवाचा कसा प्रतिसाद असतो ते तुमच्या ध्यानात आले का? असेच संभाषण मित्रांमध्ये घडल्यास त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे? यामधून आपण जे दैनंदिन संभाषण करतो त्याबद्दल चांगला धडा शिकून घेऊ शकतो. आमचे व इतरांचे संभाषण “देवाला उपकारस्मरणरुपी यज्ञ” प्रवर्तित करणारे आहे असे दिसल्यास ते किती सुंदर असेल!—इब्रीयांस १३:१५.
दुसऱ्यांची उभारणी करण्यासाठी परिश्रम घेणे
९. ख्रिस्ती सभा ह्या इतरांची उभारणी करण्यासाठी चांगले प्रसंग का आहेत?
९ मंडळीच्या सभा ह्या “गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरता जे काही उपयुक्त तेच” बोलण्यासाठी चांगले प्रसंग आहेत. (इफिसकर ४:२९) हे आपण, पवित्र शास्त्र माहितीवर एखादे भाषण देताना, प्रात्यक्षिकात सहभागी होताना किंवा प्रश्नोत्तराच्या प्रसंगी आपले उत्तर देताना करू शकतो. याद्वारे, नीतिसूत्रें २०:१५ मधील गोष्टीस की, “ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे,” याला आपण पुष्टी देत असतो. आणि अशा वक्तव्याद्वारे आपण किती लोकांच्या अंतःकरणाची मजबूती किंवा उभारणी करू शकतो हे कोणास ठाऊक?
१०. आपण कोणासोबत नित्य बोलणी करीत असतो हे पडताळून पाहिल्यानंतर कोणती सुधारणा करणे योग्य असेल? (२ करिंथकर ६:१२, १३)
१० ऐकणाऱ्यास कृपादान मिळू शकेल असे संभाषण करण्यासाठी सभेच्या आधीचा व नंतरचा वेळ उपयुक्त ठरतो. आमच्या परिचित मित्रांशी आणि नातेवाईकांसोबत असा वेळ चांगले संभाषण करण्यात सहजपणे जाऊ शकतो. (योहान १३:२३; १९:२६) पण इफिसकर ४:२९च्या अनुषंगाने आपण इतरांसोबत देखील बोलण्याचा का प्रयत्न करू नये? (पडताळा लूक १४:१२-१४) अशा काही नव्या लोकांशी, वृद्धांशी आणि युवकांशी बोलणी करताना निव्वळ औपचारिकतेची बोलणी करण्याच्या व अशांना तुमचा दिवस चांगला जावो या म्हणण्याच्याही पुढे जाऊन आपण आणखी काही बोलू शकतो. विशेषतः युवकांसोबत खाली बसून, जणू त्यांच्या पातळीचे होऊन त्यांच्याबरोबर बोलणी करण्यात अधिक लाभ होतो. आपली खरी आस्था व उभारणीकारक बोलणी करण्याचा काळ हा इतरांना दावीदाने स्तोत्रसंहिता १२२:१ मध्ये मांडलेल्या विचाराचा प्रतिध्वनि उमटविण्यात मदत देईल.
११. (अ) बैठकीच्या बाबतीत काहींची काय सवय आहे? (ब) काहीजण मुद्दाम आपल्या बसण्याच्या जागा का बदलतात?
११ उभारणीकारक संभाषण होण्यास मदत मिळू शकेल असा आणखी एक मार्ग म्हणजे आपण सभेत ज्या ठिकाणी बसतो त्याच्या जागा बदलणे. लहान मुलाच्या मातेस मुलाची काळजी घेण्यासाठी साधारणपणे मागे बसावेसे वाटेल; तसेच कोणा अपंग व्यक्तीला दोन ओळींच्या अंतरामधील कडेची जागा पसंत असेल; पण आम्हाबाबतीत काय? जसे एखादा पक्षी उपजतपणे आपल्या स्थानाकडे परत जातो तसे आम्हाला कदाचित आम्ही बसतो त्याच जागेवर बसण्याची सवय असेल. (यशया १:३; मत्तय ८:२०) तरीपण, जर आपल्याला कोठेही बसण्याची मुभा आहे तर मग विविध लोकांशी परिचित होता येण्यासाठी आपल्या जागा का बदलू नये—कधी उजवीकडे, तर कधी डावीकडे, कधी पुढे तर कधी मागे? असे करावे हा नियम जरी नसला तरी वडील व इतर प्रौढ लोक आपल्या बसण्याच्या जागा बदलत आहेत व यामुळे मोजक्या लोकांपेक्षा अधिकांना कृपापात्र गोष्टींचे वक्तव्य करण्याचे त्यांना जमते.
ईश्वरी मार्गाने उभारणी करा
१२. इतिहासभर कोणती अनिष्ट प्रवृत्ती दिसून आली?
१२ इतरांची उभारणी करावी अशी ख्रिश्चनाला वाटणारी इच्छा याबाबतीत मानवाचे अनुकरण करण्याऐवजी देवाचे अनुकरण करण्याची प्रेरणा लाभली पाहिजे. मानवाची प्रवृत्ती मोठमोठे नियम करण्याकडे सहसा वळलेली असते.a मानवाने आपणा सभोवताली असणाऱ्यांवर सत्ता करण्याची लालसा केली आहे आणि याला देवाचे काही सेवक देखील बळी पडले आहेत. (उत्पत्ती ३:१६; उपदेशक ८:९) येशूच्या काळी यहूदी नेते ‘जड व वाहवयास कठीण अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देत, पण ती सारण्यात स्वतःचे बोटही लावत नव्हते.’ (मत्तय २३:४) त्यांनी निरुपद्रवी प्रथांना हुकुमाच्या संप्रदायात बदलविले. मानवी सत्तेबाबत त्यांनी बाळगलेली लालसा त्यांना देव ज्या गोष्टींना मोठे असे जमेस धरतो त्याकडे दुर्लक्ष करावयास लावले. अशास्त्रीय अशी कायद्यांची बहुत नियमावली केल्यामुळे कोणाची उभारणी होऊ शकली नाही; कारण त्यांचे मार्गाक्रमण देवाच्या पद्धतीचे नव्हते.—मत्तय २३:२३, २४; मार्क ७:१-१३.
१३. आपल्या सह ख्रिश्चनांसाठी अनेक नियमांची उत्पत्ती करणे हे का अयोग्य आहे?
१३ ख्रिश्चनांची ईश्वरी कायद्याला जडून राहण्याची इच्छा असते. तरीदेखील आपण विविध आणि जड नियम करण्याच्या वृत्तीकडे झुकू शकण्याची शक्यता आहे. ते का? कारण आवडीनिवडी व प्राधान्यता यात फरक असतो, या कारणामुळे काहींना जे स्वीकृत वाटते ते इतरांना आवडत नसते व ते त्यांना नको असते. याप्रमाणे, आध्यात्मिक प्रौढतेकडे ख्रिश्चनांची होत असलेल्या वाढीची पातळी ही देखील भिन्न असते. पण मग, पुष्कळ नियम बनविणे हे इतरांना आध्यात्मिक प्रगति करण्याची मदत देण्याचा ईश्वरी मार्ग आहे का? (फिलिप्पैकर ३:१५; १ तीमथ्य १:१९; इब्रीयांस ५:१४) अवाजवी किंवा घातकी दिसणारा मार्ग एखादा चोखाळीत असल्यास मनाई करणारा कायदा हा त्याचा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो का? देवाचा मार्ग असा आहे की, लायक लोकांनी या चुकणाऱ्या व्यक्तीला, त्याच्याशी सौम्यभावाने कारणांची चर्चा करून त्याला ताळ्यावर आणणे.
१४. देवाने इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रामुळे कोणकोणते उद्देश साध्य झाले?
१४ देवाने इस्राएलांना त्याचे लोक म्हणून उपयोगात आणीत असता मंदिर उपासना, यज्ञार्पणे आणि आरोग्यविषयक देखील शेकडो नियम दिले होते हे खरे आहे. एका विशिष्ट राष्ट्रासाठी ते योग्यच होते, आणि पुष्कळ कायद्यांमध्ये भविष्यवादित पूर्णता सामावलेली होती व त्यांनी यहूद्यांना मशीहापर्यंत येण्याची मदत दिली. पौलाने लिहिलेः “आपण विश्वासाने नीतीमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते. आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षकाधीन नाही.” (गलतीकर ३:१९, २३-२५) नियमशास्त्र वधस्तंभावर खिळून रद्द करण्यात आल्यावर देवाने ख्रिश्चनांना त्यांच्या विश्वासाची उभारी राहावी म्हणून जीवनाच्या बहुतेक भागाबद्दल विस्तारीत स्वरुपाची नियमावली दिली नाही.
१५. देवाने ख्रिस्ती उपासकांना कोणते मार्गदर्शन दिले आहे?
१५ अर्थात, आपण नियम नसणारे लोक नाही. आपण मूर्तिपूजा, जारकर्म, व्यभिचार व रक्ताचा दुरुपयोग यापासून दूर राहावे अशी देव आज्ञा देतो. तो खून, खोटे बोलणे, भूतविद्या, आणि इतर पापांना खासपणे मनाई करतो. (प्रे. कृत्ये १५:२८, २९; १ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८) तसेच पुष्कळ गोष्टींबद्दल तो आपल्याला त्याच्या वचनाद्वारे स्पष्ट सूचना देतो. तरीही आपण इस्राएलांपेक्षा जास्त प्रमाणात पवित्र शास्त्रीय तत्वे शिकून घेऊन ती लागू करण्याच्या जबाबदारीखाली आहोत. वडील जन इतरांना, नियम शोधून किंवा त्यांना बनवून नव्हे तर ती विशिष्ट तत्त्वे शोधण्यास व त्याचा विचार करण्याची मदत देऊन उभारणी करतील.
उभारणी करणारे वडील
१६, १७. सह उपासकांच्या बाबतीत नियमावली बनविण्यासंबंधाने प्रेषितांनी कोणता सुंदर नमूना घालून दिला?
१६ पौलाने लिहिलेः “आपण ज्या नियमाने इतकी मजल मारिली त्याच नियमाने पुढे चालावे.” (फिलिप्पैकर ३:१६) या ईश्वरी दृष्टिकोणास अनुलक्षून प्रेषिताने इतरांना उभारणीकारक पद्धतीने वागविले. उदाहरणार्थ, मूर्तिपूजक मंदिरातून आलेले असावे असे मांस खावे की न खावे याबद्दल प्रश्न उद्भवला तेव्हा या वडीलाने सुसंगतता व साधेपणा राखावा म्हणून सर्व मंडळ्यांसाठी काही नियम लावून दिले का? नाही. त्याने हे कबूल केले की, ज्ञानप्राप्तीतील विविधता तसेच प्रौढतेप्रत झालेल्या प्रगतिच्या आधारावर ख्रिस्ती जन विविध निर्णय घेऊ शकतील. पण त्याच्या बाबतीत बघता, तो चांगले उदाहरण राखण्याचा निर्धार करून होता.—रोमकर १४:१-४; १ करिंथकर ८:४-१३.
१७ प्रेषितांनी वेशभूषा आणि केशभूषा यासारख्या व्यक्तिगत गोष्टींबद्दल साहाय्यक सल्ला दिला असे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने दाखवतात. तथापि, त्यांनी सर्व परिस्थितीला लागू होणारे नियम बनवण्याचा प्रयत्न केला नाही. आज हे कळपाची उभारणी करण्याचा मानस राखून असणाऱ्या ख्रिस्ती देखरेख्यांसाठी उत्तम उदाहरण आहे. आणि यात, देवाने प्राचीन इस्राएलात अनुसरला तसाच हाताळणीचा मूलभूत पवित्रा समाविष्ट आहे.
१८. यहोवाने इस्राएलांना वस्त्रांबद्दल कोणते नियम दिले होते?
१८ देवाने इस्राएलांना कपड्यांबद्दल बारीकसारीक नियम दिले नाही. पुरुष व स्त्रिया सारखी दिसणारी वस्त्रे वा बाह्यवस्त्रे घालीत; फक्त अपवाद हा होता की, स्त्रियांचे कपडे अधिक शिवणकामाची किंवा अधिक रंगीत असू शकत होती. दोघेही जण सा․दहीनʹ किंवा अंतर्वस्त्रे घालीत. (शास्ते १४:१२; नीतिसूत्रें ३१:२४; यशया ३:२३) मग, देवाने कपड्यांबद्दल कोणते नियम दिले होते? पुरुषांना किंवा स्त्रियांना, ते विपरीत लिंगाचे दिसतील अशी वस्त्रे घालण्याची मनाई करण्यात आली होती. ही मनाई पुरुषगामीपणा टाळावा या उद्देशाने होती. (अनुवाद २२:५) सभोवतालच्या राष्ट्रांपासून वेगळे आहोत असे दाखवण्याकरिता इस्राएलांनी आपल्या वस्त्राच्या काठावर झालर लावायची होती व या झालरीवर निळी फीत लावायची होती आणि वस्त्राच्या काठाला गोंडा लावायचा होता. (गणना १५:३८-४१) वस्त्रे कशा पद्धतीची असावीत याकरता एवढेच मार्गदर्शन नियमशास्त्रात देण्यात आले होते.
१९, २०. (अ) वस्त्रे व केशभूषा याबद्दल पवित्र शास्त्र ख्रिश्चनांना कोणते मार्गदर्शन देते? (ब) व्यक्तिगत स्वरुपाच्या बाबतीत नियम बनविण्याबद्दल वडीलांनी कोणता दृष्टिकोण बाळगावा?
१९ आज ख्रिस्ती जरी नियमशास्त्राधीन नसले तरी पवित्र शास्त्रात आम्हाला वस्त्र व अलंकार याबाबतीत सविस्तर नियम आहेत का? बहुधा नाही. देवाने आम्हाला अवलंबनासाठी समतोल तत्त्वे दिली आहेत. पौलाने लिहिलेः “माझी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवाने वस्त्रे यांनी नव्हे.” (१ तीमथ्य २:९) पेत्राने देखील आर्जविले की, शारीरिक अलंकारावर भर देण्यापेक्षा, ख्रिस्ती स्त्रियांनी “जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती” आणावी. (१ पेत्र ३:३, ४) अशी ही सूचना लिखित करण्यात आली याचा अर्थ, पहिल्या शतकातील काही ख्रिश्चनांना वस्त्रे व केशरचनेच्या बाबतीत अधिक सभ्य व संयमी असण्याची गरज होती हे दिसते. अशाप्रकारे, विशिष्ट पद्धत असावी किंवा नसावी याऐवजी प्रेषितांनी उभारणीकारक सल्ला पुरविला.
२० यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभ्य स्वरुपाबद्दल आदरणीय असले पाहिजेत व तसे त्यांना बघितले जाते. असे असले तरी, पद्धती या विविध राष्ट्रात, मंडळ्यात किंवा जागेत वेगवेगळ्या असतात. अर्थात, एखाद्या वडीलाला वस्त्रे व केशरचना याबाबतीत काही विशिष्ट मत असले तर ते तो स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी ठरवू शकतो. पण कळपाच्या बाबतीत त्याने पौलाचा हा मुद्दा ध्यानात ठेवावाः “आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता करितो असे नाही, तर तुमच्या आनंदाचे सहकारी आहो, तुमची स्थिति आहे ती विश्वासाने आहे.” (२ करिंथकर १:२४) होय, मंडळीसाठी नियमावली करण्याची प्रेरणा नाकारुन वडील जन इतरांच्या विश्वासाची उभारणी करण्याच्या कामी लागतील.
२१. पेहरावाच्या बाबतीत कोणी अतिरेकीपणा करीत असला तर वडील उभारणीकारक मदत कशी देऊ शकतील?
२१ पहिल्या शतकात होते त्याप्रमाणे आजही काही नवे किंवा आध्यात्मिकरित्या अशक्त लोक वस्त्रे, किंवा सजावट किंवा अलंकाराच्या बाबतीत प्रश्नार्थक किंवा सूज्ञ नसणारा मार्ग घेतील. अशा वेळी काय? परत, गलतीकर ६:१ प्रामाणिक मदत देऊ इच्छिणाऱ्या ख्रिस्ती वडीलांसाठी मार्गदर्शन देते. काही सूचना देण्याचे ठरवण्याआधी हे वडील एका सहवडीलांबरोबर विचारविनिमय करतील. जे वडील नेहमीच त्यांच्या आवडीनिवडी व विचारांशी सहमत असतील अशांपेक्षा ते भिन्न असावेत. वस्त्रे आणि केशभूषा याबद्दल जागतिक पद्धतींची छाप मंडळीतील अनेकांवर पडत असल्याचे दिसत आहे तर वडीलवर्ग मदत चांगल्या प्रकाराने कशी देता येऊ शकेल ते ठरवतील. ते मंडळीत सभेत एक दयावंत व उभारणीकारक भाग ठेवतील किंवा वैयक्तिक साहाय्य देण्याचे ठरवतील. (नीतिसूत्रें २४:६; २७:१७) करिंथकरांस दुसरे पत्र ६:३ मध्ये जो दृष्टिकोण प्रवर्तित करण्यात आलेला आहे तोच घेण्याचे प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट त्यांचे असेल. तेथे म्हटले आहेः “आमच्या सेवेला दोष लागू नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होत नाही.”
२२. (अ) दृष्टिकोणाचे किरकोळ फरक असले तर त्यामुळे विचलीत होण्याची का जरुरी नाही? (ब) पौलाने कोणते सुंदर उदाहरण मांडले?
२२ ‘देवाच्या कळपाचे पालन करणाऱ्या’ ख्रिस्ती वडीलांनी पेत्राने म्हटले तसे ‘दिम्मतीच्या लोकांवर धनीपणा करणारे असे नव्हे’ असे असले पाहिजे. (१ पेत्र ५:२, ३) आपले काम प्रेमळपणे पार पाडीत असता काही प्रकरणाच्या बाबतीत प्रश्न उद्भवतील आणि त्याबद्दलची कदाचित विविध मते असतील. टेहळणी बुरुजच्या अभ्यासात उभे राहून परिच्छेद वाचण्याची स्थानिक प्रथा असेल. क्षेत्रकार्याच्या गटाच्या योजना तसेच सेवकपणाच्या इतर बाबी कदाचित स्थानिक प्रथांना अनुलक्षून पार पाडल्या जात असतील. पण तेच काहींनी काहीशा वेगळ्या पद्धतीने एखादी गोष्ट आचरली तर त्यामुळे विसंगती दिसून येते का? प्रेमळ देखरेख्यांची इच्छा “सर्व काही साजेल असे व व्यवस्थितपणे व्हावे” अशीच असते. पौलाने तो शब्दप्रयोग अद्भूत देणग्यांच्या बाबतीत वापरला होता. तथापि, संदर्भ दाखवतो की, सर्व काही “मंडळीच्या उन्नतीसाठी” व्हावे अशी पौलाची आस्था होती. (१ करिंथकर १४:१२, ४०) जणू अगदीच एकसूत्रीपणा हवा आहे किंवा पूर्ण रुपाचा मातब्बरपणा हवा म्हणून अगणित नियम करावे अशी काही इच्छा त्याने दर्शविली नाही. त्याने लिहिलेः “आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर वृद्धीसाठी आम्हास दिला” आहे.—२ करिंथकर १०:८.
२३. इतरांची उभारणी करण्याच्या बाबतीत आपल्याला पौलाचे उदाहरण कोणकोणत्या मार्गांनी अनुसरता येईल?
२३ पौलाने विधायक व प्रोत्साहनपर भाषणाने इतरांची निसंशये उभारणी करण्याचे कार्य केले. मित्रांच्या लहान वर्तुळात सहवास राखण्यापेक्षा त्याने पुढे होऊन आध्यात्मिकरित्या बळकट असणाऱ्या व ज्यांची उभारणी करण्याची आवश्यकता होती अशा सर्व बंधूभगिनींच्या भेटी घेतल्या. त्याने नियमांपेक्षा प्रीतीवर अधिक भर दिला, कारण “प्रीती वृद्धी करते.”—१ करिंथकर ८:१.
[तळटीपा]
a कुटुंबात परिस्थितीनुसार वेगवेगळे नियम चालू शकतील. आपल्या अज्ञान मुलांच्या बाबतीत काही गोष्टी ठरविण्याचा हक्क पवित्र शास्त्र पालकांना देते.—निर्गम २०:१२; नीतिसूत्रें ६:२०; इफिसकर ६:१-३.
उजळणीसाठी मुद्दे
◻ आपला नकारात्मक किंवा टिकात्मक भाषणाकडे कल असल्यास स्वतःमध्ये बदल करण्याची का गरज आहे?
◻ मंडळीत अधिक उभारणीकारक होण्यासाठी आपण काय करू शकतो?
◻ इतरांसाठी पुष्कळ नियम बनविण्याबद्दल ईश्वरी नमूना काय सांगतो?
◻ मंडळीसाठी मानवी नियम बनविण्याचे टाळण्यासाठी वडिलांना काय मदत देऊ शकेल?