वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ८/१ पृ. २३-२७
  • विवाह हीच केवळ सौख्यानंदाची किल्ली आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विवाह हीच केवळ सौख्यानंदाची किल्ली आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदी असण्याची कारणे
  • “केवळ प्रभूमध्ये”
  • “प्रभूमध्ये” विवाह करण्यास असमर्थ
  • खऱ्‍या सौख्यानंदाची किल्ली
  • “कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे” काही
  • विवाह हीच सौख्यानंदाची एकमेव किल्ली नाही
  • यहोवाची सेवा करण्यामधील खरा आनंद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सुज्ञ सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • लग्न करणं किंवा न करणं याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ८/१ पृ. २३-२७

विवाह हीच केवळ सौख्यानंदाची किल्ली आहे का?

“तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयाला ती मोकळी आहे; पण जर ती तशीच राहील तर . . . ती अधिक सुखी होईल.”—१ करिंथकर ७:३९, ४०.

१. शास्त्रवचने यहोवाचे कसे वर्णन देतात, आणि त्याने आपल्या प्राणीमात्रांसाठी काय काय केले आहे?

यहोवा “धन्यवादित [आनंदी] देव” आहे. (१ तीमथ्य १:११) तो “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” मुबलकपणे पुरविणारा असल्यामुळे त्याने आपल्या सर्व बुद्धीजिवी प्राणीमात्रांना, मनुष्य तसेच देवदूतांना, त्यांच्या सेवेत खासपणे ज्या गोष्टींची गरज आहे त्या पुरविल्या आहेत. (याकोब १:१७) या कारणामुळे गाणारा पक्षी, लोळणारे कुत्र्याचे पिल्लू किंवा जलविहार करणारा डॉल्फीन हे सर्व, यहोवाने प्राण्यांनाही आपल्या मूलस्थानात जीवनाचा आनंद लुटण्याकरता निर्मिले आहे याची साक्ष देतात. स्तोत्रकर्ता तर याच्या पुढे जाऊन काव्यमय भाषेत म्हणतोः “यहोवाचे वृक्ष [संतुष्ट आहेत], लबानोनावर त्याने लावलेले गंधसरु रसभरीत असतात.”—स्तोत्रसंहिता १०४:१६.

२. (अ) येशूला आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद वाटत असतो हे कशामुळे दिसते? (ब) येशूच्या शिष्यांना आनंदाची कोणकोणती कारणे होती?

२ येशू, प्रत्यक्षात, “यहोवाच्या गौरवाची हुबेहूब प्रतिमा” आहे. (इब्रीयांस १:३) मग यात नवल ते काय, की येशूला “धन्य [आनंदी] व एकच अधिपती” संबोधले गेले आहे. (१ तीमथ्य ६:१५) तो आम्हास, यहोवाच्या इच्छेनुरुप करीत राहिल्यास तेच आम्हासाठी अन्‍नापेक्षा अधिक समाधान देणारे, खरा आनंद उत्पादित करणारे कसे असू असते याबद्दलचे उत्तम उदाहरण पुरवितो. शिवाय यहोवाचे भय बाळगून चालल्यास त्यातही आनंद असतोच असे येशू दाखवून देतो. (स्तोत्रसंहिता ४०:८; यशया ११:३; योहान ४:३४) जेव्हा त्याचे ७० शिष्य, त्याने पाठविलेल्या कामगिरीहून, राज्याचा प्रचार करण्याच्या दौऱ्‍याहून “आनंदाने” परतले तेव्हा त्यांचा अहवाल ऐकून येशू “पवित्र आत्म्यात उल्लासित” झाला. मग, या आनंदाचा उल्लेख आपल्या पित्यास प्रार्थनेत करून तो आपल्या शिष्यांकडे वळाला व म्हणालाः “तुम्ही जे पाहता ते, जे डोळे पाहतात ते धन्य. मी तुम्हास सांगतो, जे तुम्ही पाहता ते पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी पहावयाची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही. आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी ऐकले नाही.”—लूक १०:१७-२४.

आनंदी असण्याची कारणे

३. सौख्यानंदाची काही कारणे कोणती आहेत?

३ मग, आज यहोवाचे वचन व उद्देशांच्या संदर्भात ज्या सर्व गोष्टींची या शेवटल्या काळात पूर्णता होत असल्याचे आम्ही प्रत्यक्षात पाहात आहोत; तर आमचे डोळे धन्य म्हणू नयेत का? शिवाय जे भविष्यवाद प्राचीन काळचे यशया, दानीएल, दावीद यांच्यासारखे संदेष्टे व राजे समजू शकले नाहीत त्यांचीच आज आम्हास समज झालेली आहे तर आम्ही हर्षित होऊ नये का? आम्ही आमचा आनंदी देव यहोवा याची, त्याचा आनंदी अधिपती व आमचा राजा येशू ख्रिस्त याच्या वर्चस्वाखाली सेवा करण्यात आनंदी नाहीत का? होय, निश्‍चित आहोत!

४, ५. (अ) आपल्याला यहोवाच्या सेवेत आनंदी रहायचे आहे तर काय टाळले पाहिजे? (ब) सौख्यानंदाला हातभार लावणाऱ्‍या काही गोष्टी कोणत्या, आणि यामुळे कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

४ तथापि, आम्ही यहोवाच्या सेवेत आनंदी राहू इच्छितो तर आम्ही, सौख्यानंदाविषयी कोणत्या गोष्टी आवश्‍यक आहेत याची जगीक कल्पनेनुसार आमची विचारधारा बनवू नये. कारण यात भौतिक धन, भपकेबाज राहणीमान आणि इतर गोष्टीचा समावेश असल्यामुळे त्या आमच्या विचारांना अभ्राच्छादित करील. अशा गोष्टीवर आधारलेला कोणताही “सौख्यानंद” हा अल्पकालीनच राहणार, कारण हे जग आता लयास जात आहे.—१ योहान २:१५-१७.

५ जागतिक ध्येये गाठण्यामुळे खरा आनंद मिळू शकत नाही हे यहोवाच्या बहुतेक समर्पित सेवकांना ठाऊक आहे. आपल्या सेवकांच्या खऱ्‍या आनंदाला कारणीभूत ठरणाऱ्‍या आध्यात्मिक तसेच भौतिक गोष्टीची पुरवणूक केवळ आमचा स्वर्गीय पिता करू शकतो. तो आपल्या “विश्‍वासू व बुद्धिमान दास” याच्याद्वारे आम्हाला जे आध्यात्मिक अन्‍न देत आहे त्याच्याबद्दल आम्हाला केवढी कृतज्ञता वाटते! (मत्तय २४:४५-४७) याखेरीज देवाच्या प्रेमळ हातून आपल्याला जे शारीरिक अन्‍न व इतर भौतिक गोष्टी मिळतात त्याबद्दल देखील आम्ही त्याचे ऋणी आहोत. याचसोबत विवाहाची अद्‌भूत देणगी आणि कौटुंबिक जीवनाशी संलग्न असणारे आनंद देखील आहेत. नामीने आपल्या विधवा झालेल्या सुनांसंबंधाने ही जी इच्छा व्यक्‍त केली त्यात काही नवल नव्हते की, “यहोवा तुम्हाला वरदान देवो; आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” (रुथ १:९, न्यू.व.) अशाप्रकारे विवाह हा सौख्यानंदाचे दार उघडू शकेल अशी किल्ली आहे. पण तीच आनंदी जीवनप्राप्तीची एकमेव किल्ली आहे का? हे पडताळून बघण्यासाठी तरुणांनी खासपणे गंभीरपणे परिक्षण करण्याची गरज आहे.

६. विवाहाचा मूलभूत उद्देश कोणता होता हे उत्पत्तीच्या अहवालानुसार कसे कळते?

६ विवाहाच्या मूळारंभाचा अहवाल देताना पवित्र शास्त्र म्हणतेः “देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांस आशीर्वाद दिला. देव त्यांस म्हणालाः ‘फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.’” (उत्पत्ती १:२७, २८) यहोवाने विवाहाची प्रस्थापना करून आदामाचा अधिक मानवप्राणी अस्तित्वात आणण्यासाठी व त्याद्वारे मानवी वंश वृद्धींगत करण्यासाठी उपयोग केला. पण विवाहात यापेक्षाही अधिक सामावलेले आहे.

“केवळ प्रभूमध्ये”

७. एका विश्‍वासू कुलपित्याने कोणती वैवाहिक गरज पूर्ण करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले?

७ यहोवा देव विवाहाचा उत्पादक असल्यामुळे त्याने यामधून आपल्या सेवकांना आनंद मिळावा म्हणून वैवाहिक दर्जे नेमून देण्याची आम्ही अपेक्षा धरू शकतो. कुलपित्यांच्या काळात यहोवाचे भक्‍त नसणाऱ्‍यांसोबत विवाह करणे हे आग्रहाने टाळले जाई. अब्राहामाने आपला सेवक एलियेजर याला यहोवाची शपथ घालून म्हटले की, त्याने इसहाकाला कनान्यांपैकीची बायको आणू नये. एलियेजरने लांबचा प्रवास केला आणि ‘यहोवाने त्याच्या धन्याच्या मुलासाठी नेमिलेली स्त्री’ शोधून काढण्यासाठी अब्राहामाची सूचना तंतोतंत पाळली. (उत्पत्ती २४:३, ४४) अशाप्रकारे इसहाकाने रिबेकाशी विवाह केला. त्यांचा मुलगा एसाव याने आपणासाठी मूर्तिपूजक हित्ती लोकातून बायका केल्या, त्या “इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या.”—उत्पत्ती २६:३४, ३५; २७:४६; २८:१, ८.

८. नियमशास्त्र कराराने विवाहासंबंधाने कोणते निर्बंध घातले व का?

८ नियमशास्त्र वर्चस्वाखाली असताना खास उल्लेखित कनान राष्ट्राच्या पुरुष किंवा स्त्रियांशी विवाहबद्ध होण्यावर बंदी होती. यहोवाने आपल्या लोकांना सूचना दिली होतीः “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नको व त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नको; कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील; त्यामुळे तुमच्यावर परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.”

९. पवित्र शास्त्र ख्रिश्‍चनांना विवाहाबद्दल कोणता सल्ला देते?

९ तर मग, जे यहोवाचे भक्‍त नाहीत अशांसोबत विवाह करू नये हा निर्बंध ख्रिस्ती मंडळीला लागू होण्याजोगा आहे यात काही आश्‍चर्याचे नाही. प्रेषित पौलाने आपल्या समविश्‍वासूंना हा बोध केलाः “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्‍यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्‍वास ठेवणारा व विश्‍वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?” (२ करिंथकर ६:१४, १५) या सूचनेचा अवलंब बहुविध मार्गांनी होऊ शकतो व तो विवाहाला तर निश्‍चितपणे लागू होतो. पौलाची यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांना स्पष्ट शब्दात अशी सूचना आहे की, त्यांचा विवाह करायचा विचार आहेच तर मग तो “केवळ त्याजशी जो प्रभूशी एकात्मतेत असेल” अशासोबतच करावा.—१ करिंथकर ७:३९, तळटीप.

“प्रभूमध्ये” विवाह करण्यास असमर्थ

१०. कित्येक अविवाहीत ख्रिस्ती काय करीत आहेत, आणि कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

१० अनेक सड्या ख्रिश्‍चनांनी येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करून एकटे राहण्याच्या देणगीचा स्वीकार केला आहे. तसेच सध्या कोणी देवभिरु साथी मिळत नसल्यामुळे व म्हणून “प्रभूमध्ये” विवाह करता येत नसल्यामुळे पुष्कळ निष्ठावंत ख्रिश्‍चनांनी विश्‍वास न राखणाऱ्‍यांसोबत विवाहबद्ध न होता आपला भाव यहोवावर ठेवला आणि एकटे राहण्याचे निवडून घेतले. देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये आनंद, शांती, विश्‍वास व आत्मसंयमन हे गुण आणून त्यांना शुद्धतेने एकटेपणा आचरण्यासाठी मदत देतो. (गलतीकर ५:२२, २३) देवास दाखविलेल्या निष्ठेस यशस्वीरित्या तोंड देण्याच्या परिक्षेत आमच्या कित्येक ख्रिस्ती भगिनी आहेत, ज्यांच्याबद्दल आम्हाला मोठी आवड वाटते. कित्येक देशात बांधवांपेक्षा यांची संख्या अधिक आहे व त्यामुळे त्या प्रचारकार्यात अधिक सहभाग घेऊ शकतात. खरेच, “यहोवा अनुज्ञा देतो, ‘मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना’” आहे. (स्तोत्रसंहिता ६८:११) खरे म्हणजे, विवाह न झालेले यहोवा पुरुष व स्त्री सेवक “आपल्या अगदी मनापासून [“अंतःकरणापासून,” न्यू.व.] परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेवत’ असल्यामुळे ते आपली सचोटी राखून आहेत व तो ‘त्याचा मार्गदर्शक होत आहे.’ (नीतीसूत्रे ३:५, ६) मग, ज्यांना सध्या “प्रभूमध्ये” विवाह करण्याची शक्यता नाही असे आनंदी नाहीत का?

११. पवित्र शास्त्राच्या तत्त्वांसाठी जो सडे राहण्याचे निवडतो अशा ख्रिश्‍चनासाठी कोणती हमी आहे?

११ आम्हास याचा कधीच विसर पडू नये की, आम्ही आनंदी यहोवा देवाचे सेवक आहोत व त्याचा आनंदी अधिपती, ख्रिस्त येशू याच्या मस्तकपदाखाली सेवा करीत आहोत. मग, असा निष्कर्ष काढणे व्यवहार्य ठरेल का की, पवित्र शास्त्रात दिलेल्या निर्बंधांच्या आदरास्तव एखादा ख्रिस्ती पुरुष किंवा स्त्री “केवळ प्रभूमध्ये” विवाह करण्यास कोणी साजेसा मिळत नाही म्हणून सडे राहण्याचा निर्णय घेतो म्हणून यहोवा व ख्रिस्त हे त्या व्यक्‍तीला उदासावस्थेत सोडतील? निश्‍चितच नाही. यास्तव, अविवाहीत दशेत असताना देखील ख्रिस्ती या नात्याने आनंदी राहता येणे शक्य आहे असे समजू शकतो. आपण विवाहीत झालेलो असू किंवा सडे असू, यहोवा आपल्याला खरे आनंदी बनवू शकतो.

खऱ्‍या सौख्यानंदाची किल्ली

१२. आज्ञाभंजक देवदूतांचे प्रकरण विवाहासंबंधाने काय सूचित करते?

१२ देवाच्या सर्व सेवकांसाठी विवाह ही सौख्यानंदाची एकच किल्ली नाही. याचे उदाहरण म्हणून देवदूतांना विचारात घ्या. जलप्रलयाआधी काही दूतांनी आत्मिक प्राण्यांसाठी अस्वाभाविक असणारी इच्छा आपणामध्ये वाढवली. आपल्याला विवाहबद्ध होता येत नाही म्हणून ते अतृप्त झाले; त्यांनी स्त्रियांना आपल्या बायका करण्यासाठी रुपांतरीत शरीरे धारण केली. या देवदूतांनी “आपले वसतिस्थान सोडले” म्हणून देवाने “त्यांस . . . निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले.” (यहूदा ६; उत्पत्ती ६:१, २) देवाने देवदूतांना लग्न करण्याची प्रथा ठेवली नाही हे अगदी स्पष्ट आहे. या कारणास्तव, विवाह ही केवळ त्यांच्या सौख्यानंदाची किल्ली असू शकणार नाही.

१३. पवित्र देवदूत का आनंदी आहेत, आणि हे देवाच्या सर्व सेवकांसाठी काय दर्शवते?

१३ तरीही, विश्‍वासू देवदूत आनंदी आहेत. यहोवाने पृथ्वीचा पाया “प्रभातेच्या पहाटताऱ्‍यांनी मिळून गायिलेल्या गायनाच्या कार्यक्रमाने व सर्व देवकुमारांनी उच्चस्वरात केलेल्या जयजयकारात” घातला. (इयोब ३८:७, जरुसलेम बायबल) हे पवित्र देवदूत का आनंदी आहेत? कारण ते यहोवापुढे नित्य उपस्थित आहेत व “त्याचे आज्ञावचन [सतत] ऐकतात,” आणि “त्याप्रमाणे [तत्काळ] करतात.” “त्याचा मनोदय सिद्धीस” नेल्याचा आनंद त्यांना मिळतो. (स्तोत्रसंहिता १०३:२०, २१, तळटीप) होय, पवित्र दिव्यदूतांचा आनंद हा त्यांना यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केल्यामुळे मिळतो. हीच मानवाला देखील सौख्यानंदाची खरी किल्ली आहे. याच कारणामुळे सध्या देवाची सेवा करीत असणारे विवाहीत अभिषिक्‍त ख्रिस्ती त्यांचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान झाल्यावर पुन्हा लग्न करणार नाहीत. तथापि, आत्मिक प्राणी या नात्याने ते ईश्‍वरी इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंदीत राहतील. यास्तव, यहोवाचे निष्ठावंत सेवक विवाहीत असोत की, सडे; ते सर्व आनंदी असू शकतात; कारण निर्मात्या देवाची विश्‍वासू सेवा करणे हाच सौख्यानंदाचा खरा आधार आहे.

“कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे” काही

१४. प्राचीन इस्राएलातील भक्‍तिमान षंढांना काय भविष्यवादित अभिवचन देण्यात आले, आणि ते का विचित्र वाटण्याजोगे आहे?

१४ निष्ठावंत ख्रिश्‍चनाने लग्न केले नाही तरी त्याला आनंद मिळत आहे याची खात्री देव करील. इस्राएलातील षंढांना सांत्वनपर भाष्य करताना भविष्यवादितपणे काढण्यात आलेल्या या शब्दांवरुन काही सांत्वन मिळवता येतेः “यहोवा म्हणतो, ‘जे षंढ माझे शब्बाथ पाळतात, मला आवडणाऱ्‍या गोष्टी पसंद करतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात, त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.” (यशया ५६:४, ५) एखाद्याला कदाचित असे वाटेल की, अशांना त्यांचे नाव अजरामर होण्यासाठी मागाहून पत्नी व मुले देण्यात येतील. त्यांना अभिवचन दिलेले आहे की, “कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे काही” त्यांना मिळले; म्हणजेच यहोवाच्या घरात त्यांचे नाव कायम टिकून राहील.

१५. यशया ५६:४, ५च्या पूर्णतेबद्दल काय सांगता येते?

१५ हे षंढ जर “देवाचे इस्राएल” यांचा समावेश असलेल्यांची भविष्यवादित प्रतिमा आहेत असे समजल्यास ते त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे प्रतिनिधित्व करतात; ज्यांना यहोवाचे आध्यात्मिक घर किंवा त्याचे मंदिर येथे चिरकालिक वस्तीस्थान मिळेल. (गलतीकर ६:१६) प्राचीन काळच्या इस्राएलातील त्या देवभिरु षंढांतही या भविष्यवादाची शब्दशः पूर्णता, त्यांच्या पुनरुत्थानाद्वारे होणार यात काही संशय नाही. यांनी जर ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाचा स्वीकार केला व यहोवास आवडणाऱ्‍या गोष्टी ते करीत राहिले तर यांना यहोवाच्या नवीन जगात “सर्वकाळ राहील असे नाव” प्राप्त होईल. तेच अवतरण, “दुसरी मेंढरे” यांजमधील त्यांनाही लागू होईल, ज्यांनी या शेवटल्या काळी यहोवाच्या सेवेत अधिक कार्यमग्न राहता यावे म्हणून विवाहाचे व पालकत्वाचे आपले सर्व हक्क सोडून दिले. (योहान १०:१६) यांच्यापैकी काही कदाचित अविवाहीत व विनासंतान मरतील. पण ते विश्‍वासू राहिले असल्यास ते पुनरुत्थानानंतर “कन्यापुत्राहून श्रेष्ठ असे” काही मिळवतील, म्हणजेच नवीन व्यवस्थीकरणात “त्यांचे नाव कायम टिकून राहील.”

विवाह हीच सौख्यानंदाची एकमेव किल्ली नाही

१६. विवाह हा नेहमीच सौख्यानंद आणू शकत नाही असे का म्हणता येते?

१६ काहींना सौख्यानंद हा विवाहासोबतच अतूटपणे जडलेला आहे असे वाटते. तरीपण हे कबूल करावे लागेल की, यहोवाच्या सेवकांमध्ये देखील, आजच्या काळात, विवाह हा सर्व प्रकारचा सौख्यानंद आणवितो असे नाही. विवाह कदाचित काही समस्या सोडवीत असेल, पण तोच वेळोवेळी अशाही काही समस्या निर्माण करतो की ज्या सोडविण्यात काही वेळा एवढ्या कठीणपणाचा अनुभव येतो, जो अविवाहीतास येत नाही; किंवा तेवढा कठीण वाटत नाही. पौल म्हणतो की, विवाह हा “संसारात संकट” आणतो. (१ करिंथकर ७:२८) काही असे प्रसंग असतात ज्यात विवाहीत व्यक्‍ती “चिंता”ग्रस्त, मत“भेद” अवस्थेत येते; त्याला किंवा तिला, वेळोवेळी, “प्रभूची सेवा” एकाग्रतेने सतत करीत राहणे अवघड होते.—१ करिंथकर ७:३३-३५.

१७, १८. (अ) काही फिरत्या देखरेख्यांनी काय कळवले आहे? (ब) पौलाने कोणता सल्ला दिला, व तो आचरणात आणणे का लाभदायक आहे?

१७ सडेपण किंवा विवाहीत होणे या दोन्ही गोष्टी देवाकडील वरदान आहेत. (रुथ १:९; मत्तय १९:१०-१२) पण, यापैकी कोणाही गोष्टीत यशप्राप्ती मिळविण्यासाठी योग्य तेच निर्णय घेतलेले असावेत. प्रवासी देखरेखे त्यांच्या अहवालात म्हणतात, अनेक साक्षीदार कोवळ्‌या वयात लग्न करीत आहेत आणि पालकांच्या जबाबदाऱ्‍या सांभाळण्यास तयार होण्याआधीच पालक बनत आहेत. असे काही विवाह मोडतात. इतर जोडपी लढा देत टिकून आहेत तरी विवाहाने त्यांना सौख्यानंद मिळवून दिलेला नसतो. विल्यम कॉनग्रीव्ह हे इंग्रजी नाटककार लिहितातः “जे घाईने विवाह करतात त्यांना दीर्घकाळ पस्तावत राहावे लागते.”

१८ विभागीय देखरेख्यांनी असाही अहवाल दिला आहे की, काही तरुण बांधव बेथेलसाठी अर्ज करण्यात तसेच स्वखुषीने मिनिस्ट्रीयल ट्रेनिंग स्कूलमध्ये सामील होण्यापासून स्वतःला, काही वर्षे कदाचित असेच सडे राहावे लागेल असे वाटून दूर ठेवतात. पण प्रेषित पौलाने तर कोणीही, ‘तरुणपणाचा बहर’ येऊन जाण्याआधीच विवाह न करण्याचा सल्ला दिलेला आहे. (१ करिंथकर ७:३६-३८) प्रौढावस्थेत पोहंचेपर्यंत घालविलेली वर्षे अनमोल अनुभव व दूरदृष्टी देत असतात. हे त्या व्यक्‍तीला एकतर चांगला विवाहसोबती निवडण्यात किंवा सडे राहण्याच्या निर्णयाचा अगदी बारकाईने विचार करण्यात मदत करतात.

१९. आपल्याला विवाहबद्ध होण्याची खरीच गरज नाही, तर एकंदरीत गोष्टींचा आपण कसा दृष्टिकोण राखू शकतो?

१९ आम्हापैकी काहींचा लैंगिक जवळीकीचा जोरदार इच्छा असणारा “तरुणपणाचा बहर” येऊन ओसरला आहे. आपण कदाचित कधीकधी विवाहामुळे केवढे आशीर्वाद मिळतात याचे मनन करीत असू; पण, प्रत्यक्षात सडेपणाच्या वरदानाचाही अनुभव घेत असतो. आपण सडे राहून चांगली सेवा करू शकतो आणि विवाहबद्ध होण्याची खरीच गरज नाही हे यहोवाला चांगले दिसत असेल. कदाचित विवाहबद्ध होण्यामुळे आपल्याला त्याच्या सेवेच्या काही हक्कांना मुकावे लागले असावे. विवाह ही जर आमची व्यक्‍तिगत गरज नाही आणि आपल्याला कोणा जीवनसाथीचा आशीर्वाद नाही तर कदाचित यहोवाच्या मनात आम्हाबद्दल काही वेगळेच असू शकेल. या कारणामुळे आम्हाला ज्याची गरज आहे अशा गोष्टींची तो पुरवणूक करील असा आपण विश्‍वास राखू या. देवाची आपणासाठी जी इच्छा असल्याचे आपल्याला दिसते तिचा नम्रपणे स्वीकार केल्यामुळे सर्वथोर सौख्यानंद परिणामित होतो. देवाने विदेश्‍यांना जीवनप्राप्तीसाठी पश्‍चातापबुद्धि दिली आहे हे बघून यहूदी बांधव ‘उगे राहिले व त्यांनी देवाचे गौरव केले.’—प्रे. कृत्ये ११:१-१८.

२०. (अ) येथे ख्रिस्ती तरुणांसाठी सडेपणाबद्दल कोणती सूचना करण्यात आली आहे? (ब) सौख्यानंदाबद्दलचा कोणता मूलभूत मुद्दा खरा राहतो?

२० तर मग, विवाह जरी सौख्यानंदाची गुरुकिल्ली असू शकतो तरी तोच समस्या आणणारे जणू भले मोठे द्वारही उघडतो. एक गोष्ट निश्‍चित की, विवाह हाच, सौख्यानंद प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग नाही. सर्व गोष्टी विचारात घेता, खासपणे तरुण ख्रिश्‍चनांनी, काही वर्षे सडेपणात राहण्यात घालविण्यासाठी जागा करण्याचा प्रयत्न ठेवावा हे सूज्ञपणाचे ठरेल. ही वर्षे यहोवाच्या सेवेत आणि आध्यात्मिक प्रगति करीत राहण्यात चांगली खर्च करता येऊ शकतील. तथापि, आपले वय किंवा आध्यात्मिक प्रगति कितीही असली तरी, देवाला आपले बिनशर्त समर्पण केलेल्या सर्वांसाठी शाश्‍वत असा मूलभूत मुद्दा तोच राहतो की, खरा सौख्यानंद यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करीत राहण्यामध्ये सापडत असतो.

तुमचा कोणता प्रतिसाद असेल?

▫ यहोवाचे सेवक का आनंदी आहेत?

▫ विवाह हा सर्वथोर सौख्यानंदाची किल्ली का असू शकत नाही?

▫ विवाहसोबती निवडताना यहोवाच्या लोकांसंबंधाने कोणती अपेक्षा असते?

▫ सडे राहणारे ख्रिस्ती आनंदी असू शकतात हे मानणे का व्यवहार्य आहे?

▫ विवाह आणि सौख्यानंद याबद्दल काय कबूल केलेच पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा