“संकटसमयी” कोण वाचेल?
“जो कोणी परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] धावा करील, तो तरेल.”—योएल २:३२.
१. “संकटसमयी” होणाऱ्या तारणाच्या मालिकेत असणाऱ्यांबद्दलच्या कोणत्या गरजा दानीएल व मलाखी यांनी सांगितल्या आहेत?
आमच्या काळाकडे पुढे बघून दानीएल संदेष्ट्याने असे लिहिलेः “कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.” (दानीएल १२:१) खरेच, केवढे हे सांत्वनदायक शब्द! यहोवा त्याच्या संमतीच्या लोकांची जरुर आठवण ठेवील; हेच मलाखी ३:१६ मध्येही घोषित करण्यात आले होतेः “तेव्हा परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय बाळगणारे एकमेकांस बोलले ते परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] कान देऊन ऐकले; व परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यांजसमोर लिहिण्यात आली.”
२. यहोवाच्या नामाचे चिंतन केल्यामुळे कोणता परिणाम होतो?
२ यहोवाच्या नामाचे चिंतन त्याजबद्दल, त्याच्या ख्रिस्ताबद्दल आणि त्याच्या सर्व राज्य उद्देशांच्या अचूक ज्ञानाप्रत निरवते. यामुळे त्याचे लोक त्याला पूज्य मानतात, त्याच्यासोबत समर्पित नातेसंबंधाची जवळीक साधतात आणि ‘पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धिने व पूर्ण शक्तिने’ त्याजवर प्रीती करतात. (मार्क १२:३३; प्रकटीकरण ४:११) पृथ्वीतील नम्रजनांना सार्वकालिक जीवन मिळावे यासाठी यहोवाने येशू ख्रिस्ताच्या यज्ञार्पणाद्वारे दयाळू तरतूद पुरविली आहे. या कारणामुळे हेही, येशूच्या जन्माच्या वेळेस स्वर्गीय देवदूतांनी देवाची जी स्तुति गायिली तीच आपल्या शब्दात प्रतिध्वनित करतात की, “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, त्या मनुष्यांत शांती.”—लूक २:१४.
३. या पृथ्वीवर शांती येण्याआधी यहोवाचे कोणते कृत्य घडले पाहिजे?
३ ही शांती, पुष्कळ लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक जवळ आली आहे. पण याआधी भ्रष्ट जगावर यहोवाच्या न्यायदंडाची अमलबजावणी झाली पाहिजे. सफन्या सांगतोः “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] मोठा दिवस समीप आहे, तो येऊन ठेपला आहे. वेगाने येत आहे!” हा कशाप्रकारचा दिवस असेल? भविष्यवाद पुढे म्हणतोः “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस खूप दुःखदायक आहे. तेथे वीर दुःखाने ओरडत आहेत. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे. अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे. मी माणसांवर संकट आणीन. ते अंधळ्यासारखे चालतील. कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध [यहोवा, न्यू.व.] पाप केले आहे.”—सफन्या १:१४-१७; तसेच हबक्कुक २:३; ३:१-६, १६-१९ पहा.
४. देवास जाणून त्याची सेवा करण्याच्या निमंत्रणाचा आज कोण स्वीकार करीत आहेत?
४ देवास जाणून त्याची सेवा करण्याचे आमंत्रण आज लाखो स्वीकारीत आहेत हे आनंदाचे आहे. नव्या करारात घेतल्या जाणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या बाबतीत असे भाकित करण्यात आले होतेः “‘लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील,’ असे परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो.” (यिर्मया ३१:३४) यांनी आधुनिक काळातील साक्षीकार्यामध्ये नेतृत्व केले आहे. आत जसजसे अभिषिक्त शेष आपली पृथ्वीवरील जीवनयात्रा संपवीत आहे, तसतसे “दुसरी मेंढरे” याचा “मोठा लोकसमुदाय” पुढे येऊन मंदिर व्यवस्थेत ‘अहोरात्र देवाची पवित्र सेवा करीत आहेत.’ (प्रकटीकरण ७:९, १५; योहान १०:१६) अशा प्रकारच्या या अमूल्य हक्काचा आनंद तुम्ही घेत आहात का?
“इष्ट गोष्टी” कशा येतात
५, ६. विनाश होण्यासाठी राष्ट्रांचे हलविणे होण्याआधी कोणते बचावाचे कार्य घडते?
५ आता आपण हाग्गय २:७ कडे वळू. येथे यहोवा आपल्या आध्यात्मिक भक्तिमंदिराविषयी बोलतो. तो म्हणतोः “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन.” ‘राष्ट्रांचे हलविणे’ ही गोष्ट राष्ट्रांवर दंडाज्ञा बजावण्याच्या यहोवाच्या कृतीला अनुलक्षून आहे असे पवित्र शास्त्रीय भविष्यवाद स्पष्ट करतात. (नहूम १:५, ६; प्रकटीकरण ६:१२-१७) यास्तव, हाग्गय २:७ मध्ये भाकित करण्यात आलेली यहोवाची कृति ही सर्व राष्ट्रांना हालवून अस्तित्वविरहीत करण्याच्या, नष्ट करण्याच्या कळसास गाठील. पण मग, “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” याविषयी काय? राष्ट्रांचे ते शेवटले विनाशकारी हलविणे होईपर्यंत यांना थांबून राहावे लागेल का? नाही.
६ योएल २:३२ म्हणते की, “जो कोणी परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] धावा करील तो तरेल. कारण परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरूशलेमात राहतील आणि यहोवाने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील.” यहोवा त्यांना स्वतःजवळ घेतो, आणि ते मोठ्या संकटात राष्ट्रांचे कळसाचे हादरविणे होण्याआधी येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर आपला विश्वास ठेवून यहोवाच्या नावाचा धावा करतात. (पडताळा योहान ६:४४; प्रे. कृत्ये २:३८, ३९) हे केवढ्या आनंदाचे आहे की हा इष्ट असा मोठा लोकसमुदाय जो आज चाळीस लाखांपेक्षा पुढे गेलेला आहे; हर्मगिदोनात ‘राष्ट्रांचे हलविणे होणार’ ही अपेक्षा राखून यहोवाच्या भक्तीमंदिरात ‘येत आहे.’—प्रकटीकरण ७:९, १०, १४.
७. ‘यहोवाच्या नावाचा धावा करण्यात’ कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
७ हे बचावणारे लोक यहोवाच्या नामाचा कसा धावा करीत आहेत? याकोब ४:८ याबद्दल माहिती देताना म्हणतेः “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.” हर्मगिदोनातून वाचणाऱ्या मोठ्या लोकसमुदायाचा भाग बनू इच्छिणाऱ्यांनी, नेतृत्व करणाऱ्या अभिषिक्त शेषांप्रमाणेच निश्चयी रुपाची हालचाल केली पाहिजे. तुम्हाला बचाव मिळविण्याची इच्छा आहे तर तुम्ही स्वतः शुद्ध करणाऱ्या यहोवाच्या वचनांचे खोल प्राशन करून त्याच्या नीतीमान दर्जांचा अवलंब आपल्या जीवनात केला पाहिजे. आपले जीवन यहोवास समर्पित करून त्याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याचा निर्धार केला पाहिजे. यहोवाचा विश्वासाने धावा करणे यात त्याच्याविषयी साक्ष देण्याचेही समाविष्ट आहे. याच कारणास्तव, रोमकरांस पत्र १० वा अध्याय ९ व १० वचनात पौल लिहितोः “येशू प्रभू आहे असे जर तू ‘आपल्या मुखाने कबूल करशील,’ आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतीमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” मग, १३ व्या वचनात प्रेषित योएलच्या भविष्यवादाचा उल्लेख करून यावर जोर देतो की, “जो कोणी परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”
‘शोध करा, अवलंबन करा’
८. (अ) सफन्या संदेष्ट्याच्या मते, तारणासाठी यहोवा कशाची अपेक्षा धरतो? (ब) सफन्या २:३ मधील “कदाचित” हा शब्द आम्हासाठी कोणता इशारा देतो?
८ पवित्र शास्त्राच्या सफन्या पुस्तकाकडे वळून अध्याय २ व वचने २ व ३ काढल्यावर तेथे तारणासाठी यहोवाची कोणती गरज आहे ते कळतेः “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] भडकलेला क्रोध तुम्हावर येईल त्यापूर्वी, यहोवाचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी तुम्ही ताळ्यावर या. देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा शोध करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” येथे “कदाचित” या शब्दाकडे लक्ष द्या. हे काही, “एकदा तारण झाले म्हणजे सर्वदा झाले,” असे प्रकरण नाही. त्या दिवशी आमचे दृष्टीआड होणे हे त्या तीन गोष्टी सातत्याने करीत राहण्यावर अवलंबून आहे. आम्ही यहोवाचा शोध केला पाहिजे, धार्मिकता आचरली पाहिजे व नम्रतेचे अवलंबन केले पाहिजे.
९. नम्रतेचे अवलंबन करणाऱ्यांना कोणते प्रतिफळ आहे?
९ नम्रतेचे अवलंबन करण्याचे प्रतिफळ मोठे अद्भूत आहे! स्तोत्रसंहिता ३७ व्या अध्यायात ९ ते ११ वचनांत आम्ही असे वाचतोः “परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल, . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.” आणि ‘धार्मिकतेचे अवलंबन’ करण्याबद्दल काय? २९ वे वचन म्हणतेः “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील, तीत ते सर्वदा वास करतील.” यहोवाचा शोध घेण्यासंबंधाने ३९ व ४० वचने सांगतातः “धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून [यहोवा, न्यू.व.] होते. संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] त्यांना साहाय्य करील व तो त्यांना मुक्त करील; त्यांना दुर्जनापासून तो मुक्त करील व तारील. कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.”
१०. यहोवाचा शोध घेण्यामध्ये तसेच नम्रतेचा अवलंब करण्यात कोण लक्षणीयरित्या अपयशी ठरले आहेत?
१० ख्रिस्ती धर्मजगतातील पंथांनी यहोवाचा शोध घेण्यात अपयश दर्शविले आहे. त्यांचे पाळक तर मुद्दाम त्याचे मौल्यवान नाव घेण्याबद्दल तिटकारा दाखवतात आणि ते त्यांनी आपल्या पवित्र शास्त्राच्या भाषांतरामधून काढून टाकले आहे. ते नाव नसलेल्या प्रभूची किंवा देवाची भक्ति करू इच्छितात आणि मूर्तिपूजक त्र्यैक्याला पूज्य मानतात. याचप्रमाणे ख्रिस्तीधर्मजगत धार्मिकतेचे अवलंबन करीत नाही. त्याचे कित्येक सदस्य स्वैराचारी जीवन स्वीकारुन किंवा जोखीम उचलून आहेत. येशूप्रमाणे लीनता धारण करण्याऐवजी आपल्या चैनबाज व अनैतिक जीवनाचा, दूरदर्शनवर होतो तसा, दिखावा करतात. धर्मपुढारी त्यांच्या कळपाच्या खर्चावर आपल्याला पुष्ट करतात. याकोब ५:५ च्या शब्दात, त्यांनी “पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला” आहे. यहोवाचा दिवस समीप येत असता, यांना हे प्रेरित शब्द त्यांच्याबद्दल खरे होत असल्याचे नक्कीच जाणवेलः “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही.”—नीतीसूत्रे ११:४.
११. धर्मत्यागी पुरुष कोण आहेत व कोणी स्वतःवर प्रचंड रक्तदोष ओढवून घेतला आहे?
११ प्रेषित पौलाने थेस्सलनीकाकरांस लिहिलेल्या पत्रात सांगितले त्याप्रमाणे पहिल्या शतकात काही ख्रिस्ती अधीर झाले होते; यहोवाचा दिवस तेव्हाच आला आहे असे त्यांना वाटू लागले होते. पण पौलाने हे बजावून सांगितले की, पहिल्यांदा मोठा धर्मत्याग प्रकट होऊन “धर्मत्यागी पुरुष” सामोरा आला पाहिजे. (२ थेस्सलनीकाकर २:१-३) आता या २०व्या शतकात त्या धर्मत्यागाचे विस्तारीत स्वरुप तसेच धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगतातील पुढारी देवाच्या दृष्टीने कसे आहेत ते आपल्याला कळू शकते. १९१४ पासून या शेवटल्या दिवसात धर्मपुढाऱ्यांनी ‘फाळ मोडून तरवारी’ करण्यास म्हणजेच युद्धास अधिक पाठबळ दिल्यामुळे प्रचंड रक्तदोष आपणावर ओढावून घेतला आहे. (योएल ३:१०) याखेरीज, मानवी जीवाचे अमरत्व, नरकाग्नीच्या यातना, बालकांचा बाप्तिस्मा, त्रैक्य, इत्यादि खोट्या तत्वांचे शिक्षण ते देत राहिले. यहोवा आपला न्यायी निर्णय बजावेल तेव्हा ते कोठे असतील? नीतीसूत्रे १९:५ म्हणतेः “लबाड बोलणारा सुटणार नाही.”
१२. (अ) ज्याचा नाश होणार ते मानवी “आकाश” व “पृथ्वी” काय आहे? (ब) या दुष्ट जगाच्या येणाऱ्या नाशापासून आपण काय शिकू शकतो?
१२ पेत्राचे दुसरे पत्र ३:१० मध्ये आपण असे वाचतोः “प्रभूचा [यहोवा, न्यू.व.] दिवस चोरासारखा येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल; सृष्टितत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिजवरील गोष्टी उघडकीस येतील.” मानवजातीवर आकाशाप्रमाणे असणारे भ्रष्ट शासन आणि आजचा अवनतीत मानवी समाज ज्या घटकांनी बनलेला आहे ते सर्व, देवाच्या या पृथ्वीवरुन झाडून स्वच्छ केले जाणार. विनाशाची शस्त्रे उत्पदन करणारे व ती विकणारे व्यापारी, ठक, भोंदू धर्माधिकारी आणि पाळक, दुराचरण, हिंसाचार आणि गुन्हेगारी वाढविणारे—सर्वच नष्ट होतील. हे सर्व यहोवाच्या क्रोधात वितळतील. तथापि, ११ व १२ व्या वचनात पेत्र पुढे ख्रिश्चनांना हा इशारा देतोः “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणूकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही सर्व कसे असले पाहिजे?”
मीखाएल हालचाल करतो!
१३, १४. यहोवाच्या अधिपत्याचा थोर समर्थक कोण आहे व तो १९१४ पासून केवढा क्रियाशील बनला आहे?
१३ “संकटसमयी” कोणाचा कसा बचाव करण्यात येईल? बचाव पुरविण्यामध्ये यहोवाचे माध्यम, आद्य देवदूत मीखाएल हा आहे. त्याच्या नावाचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?” हा होतो. तर मग, हाच देवाच्या नावाचे पवित्रीकरण घडवून आणणारा, आणि यहोवा हाच केवळ खरा देव असून सर्व विश्वाचा हक्कदार असा सार्वभौम प्रभू आहे असे समर्थन देणारा निश्चितपणे आहे.
१४ १९१४ पासूनच्या “प्रभूच्या दिवसा”बद्दल प्रकटीकरणाचा १२ वा अध्याय ७ ते १७ वचने केवढ्या अप्रतिम घटना देतात! (प्रकटीकरण १:१०) आद्य देवदूत मीखाएल विश्वासघातकी सैतानाला स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकतो. नंतर, प्रकटीकरणाचा १९ वा अध्याय ११ ते १६ वचने सांगतात त्याप्रमाणे “विश्वासू व खरा” असणारा “सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरुपी द्राक्षारसाचे कुंड तुडवितो.” या प्रबळ स्वर्गीय योद्ध्याला “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू” असेही नाव आहे. शेवटी, प्रकटीकरण २० अध्यायातील १ व २ वचनात आपल्याला एक बलवान दूत सैतानाला अगाधकूपात टाकत असल्याचे व त्याला हजार वर्षे बंदिवान करून ठेवीत असल्याचे दिसते. ही सर्व शास्त्रवचने यहोवाचे सार्वभौमत्व उंचावनू धरणाऱ्या त्या एकाविषयीची माहिती देतात व तो प्रभु येशू ख्रिस्त आहे. यालाच यहोवाने त्याच्या स्वर्गीय सिंहासनावर १९१४ मध्ये विराजमान केले.
१५. मीखाएल हा कोणत्या खास अर्थी लवकरच ‘उठणार आहे’?
१५ दानीएल १२:१ मध्ये म्हटल्याप्रमाणे मीखाएल हा आमच्याखातर त्याला १९१४ मध्ये राजा म्हणून अधिष्ठित केल्यापासून ‘उठला आहे.’ पण लवकरच हा मीखाएल एका विशिष्ट अर्थी ‘उठणार आहे,’ ते म्हणजे तो यहोवाकडील प्रतिनिधी या नात्याने पृथ्वीवरील सर्व दुष्टतेला समूळ काढून टाकणार व देवाच्या लोकांच्या गोलार्धव्याप्त संस्थेचा मुक्तीदाता बनणार. तो “संकटसमय” केवढा भयानक असेल याविषयी येशूचे मत्तय २४:२१, २२ मधील शब्द हे सूचित करतातः “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; म्हणून निवडलेल्यांसाठी ते थोडे केले जातील.”
१६. मोठ्या संकटात कोणाचा निभाव लागेल?
१६ त्या काळी ‘काही जणांचा’ निभाव लागेल हे जाणून आम्हाला किती आनंद होतो! हे लोक, मागे इ. स. ७० मध्ये यरुशलेमात अडकून राहिलेल्या व ज्यांच्यापैकी काहींना रोममध्ये गुलाम बनवून नेण्यात आले त्या बंडखोर यहुद्यांसारखे नसणार. उलटपक्षी, “अंतसमया”त ज्यांचा निभाव लागले ते लोक, यरुशलेमास शेवटचा वेढा पडताना आधीच शहराबाहेर पळून गेलेल्या ख्रिस्ती मंडळीप्रमाणे असतील. ते देवाचे स्वतःचे लोक असतील, ज्यामध्ये मोठ्या लोकसमुदायाचे लाखो लोक जर पृथ्वीवर कोणी उरल्यास त्या अभिषिक्त जनांसोबत असतील. (दानीएल १२:४) मोठा लोकसमुदाय “मोठ्या संकटातून” येतो. ते का? कारण “ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” ते येशूच्या ओतण्यात आलेल्या रक्तातील खंडणीच्या सामर्थ्यावर आपला विश्वास ठेवतात व हा विश्वास देवाची निष्ठावंतपणे सेवा करण्याद्वारे प्रदर्शित करतात. आता देखील, “राजासनावर बसलेला” यहोवा देव आपल्या संरक्षणाचा मंडप यांच्यावर विस्तृत करीत आहे आणि कोकरा, ख्रिस्त येशू यांची मेंढपाळयुक्त देखरेख करतो व त्यांना जीवनाचा पाण्याच्या झऱ्याजवळ नेतो.—प्रकटीकरण ७:१४, १५.
१७. येणाऱ्या संकटसमयी बचावले जाण्यासाठी खासपणे मोठ्या लोकसमुदायाला काय करण्याचे उत्तेजन दिलेले आहे?
१७ यहोवाचा शोध धार्मिकता, नम्रता या गुणांनी करीत असता संख्येने लाखो असणाऱ्या मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांनी सत्याविषयीची आपली पहिली प्रीती कधीच थंडावू देऊ नये! तुम्ही या मेंढरासमान लोकांपैकीचे आहात तर मग, तुम्ही काय करण्यास हवे? कलस्सैकरांस पत्र ३रा अध्याय ५ ते १४ वचनात दाखवल्याप्रमाणे तुम्ही “जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह [संपूर्ण] काढून टाकले” पाहिजे. ईश्वरी मदतीचा शोध घेत राहून ‘पूर्ण ज्ञानात नवे केले जाणारे नवे मनुष्यत्व धारण कर’ण्याचा प्रयत्न ठेवा. यहोवाची स्तुती करण्यात व त्याचे भव्य उद्देश इतरांना कळविण्यात नम्रपणे आवेशाची वाढ करा व ती जतन करून ठेवा. यामुळे “संकट समयी,” “यहोवाच्या क्रोधदिनी” तुमचा कदाचित निभाव लागू शकेल.
१८, १९. तारणासाठी धीर हा कसा महत्त्वपूर्ण बनला आहे?
१८ तो दिवस जवळ आला आहे! पहा तो आपल्याकडे वेगाने येत आहे. मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांच्या एकत्रीकरणास आता ५७ वर्षे होत आलेली आहे. यापैकीच्या काहींना मृत्यु आला आहे व ते पुनरुत्थान मिळण्याची वाट पाहून आहेत. तरीपण प्रकटीकरणातील भविष्यवादाद्वारे आपल्याला ही खात्री मिळते की, एक गट या नात्याने मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून पार होईल व तो “नव्या पृथ्वी”तील समाजाचा केंद्रभाग असेल. (प्रकटीकरण २१:१) तुम्ही तेथे असाल का? ते शक्य आहे, कारण येशूने मत्तय २४:१३ मध्ये म्हटले की, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”
१९ यहोवाच्या लोकांना या जुन्या व्यवस्थीकरणात जो त्रास सहन करावा लागत आहे तो बहुधा वाढू शकतो. आणि जेव्हा त्रासदायक मोठे संकट कोसळेल तेव्हाही तुम्हाला कदाचित अडचणी सहन कराव्या लागतील. पण यहोवा व त्याच्या संस्थेला जडून राहा. जागृत राहा! “यहोवा म्हणतो, ‘मी लुटीसाठी उठेन, तोवर माझी वाट पाहा, कारण रा एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी, त्यांवर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्चय आहे. कारण माझ्या इर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.’”—सफन्या ३:८.
२०. “संकट समय” याचा कळस जवळ येत असता आपण काय करावे?
२० यहोवाने आपल्या लोकांचे संरक्षण व्हावे व उत्तेजन मिळावे यासाठी “शुद्ध वाणी” उदारपणे दिली आहे, या वाणीत त्याच्या येणाऱ्या राज्याचा भव्य संदेश समाविष्ट आहे. याद्वारेच, “परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा खांद्याला खांदा लावून करितील.” (सफन्या ३:९) “संकट समय” याचा कळस जवळ येत असता आपण आवेशाने सेवा करीत राहून या आणि इतर नम्र लोकांना ‘यहोवाच्या नामाचा धावा करुन’ तारण मिळविण्याची मदत देऊ या.
तुम्हाला आठवते का?
▫ पृथ्वीवर शांती आणण्याआधी यहोवाचे कोणते कार्य घडेल?
▫ निभाव लागण्यासाठी योएलच्या मते आपण काय करण्यास हवे?
▫ सफन्याच्या मते नम्र लोक यहोवाच्या क्रोधदिनी बचाव कसा मिळवू शकतील?
▫ “धर्मत्यागी पुरुष” कोण आहे, आणि त्याने रक्तदोष कसा ओढवून घेतला आहे?
▫ तारणाच्या बाबतीत धीर केवढा महत्त्वाचा आहे?