१९१४ ची पिढी अर्थपूर्ण का?
“आमचे वाचक हे जाणून आहेत की, आज अनेक वर्षे आम्ही या युगाची समाप्ती संकटग्रस्त अशा अतिशय भयानक काळाने होण्याची अपेक्षा बाळगून आहोत, शिवाय तीही अचानक होणार व १९१४ मधील ऑक्टोबरपर्यंत जारी होईल.”—मे १५, १९११ चे द वॉचटावर ॲण्ड हेरल्ड ऑफ क्राईस्ट प्रेझेन्स मधून अवतरीत.
जेनियतकालिक १८७९ पासून द वॉचटवर ॲण्ड हेरल्ड ऑफ क्राईस्ट प्रेझेन्स या नामे त्या काळी (सध्या द वॉचटावर अनाऊसिंग जेहोवाझ किंगडम म्हणून) प्रकाशित होते, त्याने वेळोवेळी १९१४ या विशेष लक्षणीय वर्षाकडे अंगुली रोखून म्हटले की ते, पवित्र शास्त्रातील भविष्यवादित वर्ष आहे. जसेजसे वर्ष जवळ येत राहिले, वाचकांना ही आठवण दिली जाई की, “संकटग्रस्त अशा अतिशय भयानक काळा”ची अपेक्षा करावी.
ही माहिती ख्रिश्चनांनी, पवित्र शास्त्रात उल्लेख असलेल्या “सात काळ” व “विदेश्यांचे काळ” यावर आधारीत ठेऊन दूरवर जगभरात जाहीर केली.a त्यांनी ही समज मिळविली की, हा काळ २,५२० वर्षे मुदतीचा होता—ज्याची सुरवात यरुशलेममधील दाविदाच्या राज्यास उलटविण्यापासून ते ऑक्टोबर १९१४ मध्ये समाप्ति होते.b—दानीएल ४:१६, १७; लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन.
ऑक्टोबर २, १९१४ रोजी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे त्या काळचे अध्यक्ष चार्ल्स टेझ रसेल यांनी अगदी निर्भिडपणे घोषित केलेः “विदेश्यांच्या काळाची समाप्ती झाली; त्यांचे राजे अधिपतींचा काळ संपला! त्यांचे हे शब्द केवढे खरे ठरले बरे! मानवी दृष्टी जरी अदृश्य होती तरी, ऑक्टोबर १९१४ मध्ये स्वर्गात सबंध जगास धक्का देणारी एक घटना घडली. “दाविदाच्या सिंहासनाचा” कायमचा वारीस, येशू ख्रिस्ताने सबंध मानवजातीवर राजा म्हणून आपले अधिपत्य गाजविण्यास सुरवात केली.—लूक १:३२, ३३; प्रकटीकरण ११:१५.
‘पण,’ तुम्ही कदाचित म्हणाल, ‘जर ख्रिस्ताने १९१४ मध्ये अधिपत्य गाजविण्यास सुरवात केली तर पृथ्वीवरील परिस्थिती अधिकाधिक बिकट का होत आहे?’ कारण मनुष्यजातीचा आद्य शत्रू, सैतान, अद्याप हयात आहे. १९१४ पर्यंत सैतानास स्वर्गास जाण्यायेण्याची मुभा होती. मग, १९१४ मध्ये देवराज्याची स्थापना झाल्यावर परिस्थितीत बदल झाला. “तेव्हा स्वर्गात युद्ध झाले.” (प्रकटीकरण १२:७) सैतान व त्याच्या दुरात्म्यांचा पराभव करण्यात आला व त्यांना मनुष्यजातीवर आपत्तीकारक प्रभाव करण्यासह पृथ्वीवर टाकण्यात आले. पवित्र शास्त्राने भाकित केले होतेः “पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे. कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरुन तुम्हाकडे गेला आहे.”—प्रकटीकरण १२:१२.
सा. शकाचे पहिल्या शतकात, येशूने आधीच म्हटले होते की, पृथ्वीचा नवा राजा म्हणून त्याच्या उपस्थितीची चाहूल एका दृश्य चिन्हाद्वारे लागेल. त्याला विचारत होतेः “आपल्या येण्याचे [उपस्थितीचे] व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” त्याचे उत्तर? “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील; पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ होय.”—मत्तय २४:३, ७, ८.
याचे अनुरोधात १९१४ मध्ये ज्या युद्धास सुरवात झाली त्याने आपणासोबत भयानक दुष्काळ—अन्नटंचाई, चार वर्षांच्या धान्य उत्पादनातील कमतरतेमुळे—आणली. मग, “जागोजागी . . . भूमिकंप होतील” त्यांचेबाबत काय? १९१४ नंतरच्या दहा वर्षांनी, सुमारे दहा विध्वंसक भूमिकंपांनी ३,५०,००० लोकांचा बळी घेतला. (चौकोन पहा.) हे अगदी खरे की, १९१४ च्या पिढीने, “वेदनांचा हा प्रारंभ” पाहिला. तेव्हापासून वेदनांची तीव्रता, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व अशाच अनेक गोष्टीशिवाय युद्धे यांचेद्वारा, सतत वाढत आहे.
त्यातही, १९१४ मध्ये देवराज्याच्या स्थापनेची सुवार्ता ही खरेच सुवार्ता ठरली आहे, कारण तेच राज्य पृथ्वीस नाशापासून बचावून ठेवील. ते कसे? ते, सर्व प्रकारच्या खोट्या, फसव्या धर्मांना भ्रष्ट सरकारांना तसेच सैतानाच्या दुरात्मिक प्रभावास कायमचे काढून टाकील. (दानीएल २:४४; रोमकर १६:२०; प्रकटीकरण ११:१८; १८:४-८, २४) ओघाओघाने तेच एका अशा नवीन जगास उदयास आणील ज्यातः “धार्मिकता” बहरेल.—२ पेत्र ३:१३.
पहिल्या जागतिक महायुद्धानंतर लगेचच, मनापासून पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे, असे ज्यांची ओळख त्या काळी देत त्या यहोवाच्या साक्षीदारांनी, ही समज अनुसरली की, राजा म्हणून येशूच्या उपस्थितीचे दुसरे चिन्ह काय असेल. हे शोधणे त्यांचा हक्क आहे. येशू ख्रिस्ताने भाकित केले होते की, “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून रात्रयाची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील; तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.
१९१९ मधील लहानशा सुरवातीसह, यहोवाच्या साक्षीदारांनी “राज्याची ही सुवार्ता” कोणताही खंड पडू न देता प्रसारीत करण्याचे सतत चालूच ठेवलि. याचे परिणामात २०० पेक्षा अधिक देशात लक्षावधी लोकांस, देवाच्या राज्याची प्रजा म्हणून एकत्रित केले आहे. या प्रजेवर कोणकोणत्या आशीर्वादांचा वर्षाव होणार? ते राज्य युद्ध, दुष्काळ, गुन्हेगारी तसेच दडपशाहीसही नष्ट करील. एवढेच काय पण आजार तसेच मृत्युचेही उच्चाटण करील.—स्तोत्रसंहिता ४६:९; ७२:७, १२-१४, १६; नीतीसूत्रे २:२१, २२; प्रकटीकरण २१:३, ४.
१९१४ ची पिढी सरण्याआधी राज्या प्रचाराच्या सेवेने आपले उद्दिष्ट पुरे केलेले असणार. मग, येशूने आधीच भाकित केल्यानुसारः “जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही, असे मोठे संकट त्या काळी येईल; आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता.”—मत्तय २४:२१, २२.
जी चूक १९१४ आधीच्या पिढीने केली तशी तुम्ही करू नका. आज जशा सर्व गोष्टी चालत आहेत तशाच त्या चालत राहणार नाहीत. थक्क करणाऱ्या गोष्टी सामोऱ्या आहेत. पण तेच जे सूज्ञतेने वागतात अशांच्याकरिता विस्मयकारक आशीर्वाद राखले आहेत.
मग एका प्राचीन काळच्या भविष्यवाद्याच्या शब्दाकडे कान द्याः “देशातील [“पृथ्वीवरील,” न्यू.व.] सर्व नम्र जनांनो, . . . धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा. म्हणजे कदाचित परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” (सफन्या २:३) आम्ही हा उपदेश कसा लावून घ्यावा? पुढील लेख या प्रश्नाचे उत्तर देईल.
[तळटीपा]
a मुखपृष्ठावरील दृश्य, फोटोड्रामा ऑफ क्रिएशन, मधून, १९१४.
b अधिक माहितीकरता, पहाः वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीतर्फे प्रकाशितः तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातील १६ वा अध्याय पाहा.
[७ पानांवरील तक्ता]
भूमिकंप १९१४ नंतरच्या दहा वर्षात
तारीख: स्थळ: मृत्यु:
जानेवारी १३, १९१५ अवझानो, इटली ३२,६००
जानेवारी २१, १९१७ बाली, इंडोनेशिया १५,०००
फेब्रुवारी १३, १९१८ क्वागटन जिल, चीन १०,०००
ऑक्टोबर ११, १९१८ प्युर्टो रिको (पश्चिम) ११६
जानेवारी ३, १९२० वेराक्रुझ, मेक्सिको ६४८
सप्टेंबर ७, १९२० रिजीओ डी कॅलेब्री, इटली १,४००
डिसेंबर १६, १९२० निगंशिया प्रांत, चीन २,००,०००
मार्च २४, १९२३ शेजवान प्रांत, चीन ५,०००
मे २६, १९२३ इराण (इशान्येकडील विभाग) २,२००
सप्टेंबर १, १९२३ टोकियो-योकोहामा, जपान ९९,३००
“जगातील ठळक भूमिकंप” या यादीतून जी, जेम्स गर आणि हरेश सी. शाह यांच्या तेर नॉन फर्मा नामे पुस्तकातून प्रकाशित आहे.