यहोवाने शिकवल्याप्रमाणे चालत राहा
“हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तुझा मार्ग मला शिकीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन. तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे अंतःकरण एकाग्र कर.”—स्तोत्रसंहिता ८६:११, न्यू.व.
१, २. रक्त संक्रमणाचा नकार करण्याचे यहोवाच्या साक्षीदारांना कशामुळे सुचले?
“रक्ताची उत्पादने वापरण्यात नकार दर्शविण्यात यहोवाचे साक्षीदार बरोबर असले पाहिजेत. कारण या संक्रमित रक्तातून अनेक महत्त्वपूर्ण रोग घटक संक्रमित होतात हे खरे आहे.”—फ्रेंच मेडिकल दैनिक ले कोटीडिन ड्यु मेडिसिन, डिसेंबर १५, १९८७.
२ ज्या लोकांनी हे भाष्य वाचले असेल त्यांना, यहोवाच्या साक्षीदारांनी, रक्त हे केवढे धोकादायक इतकेच काय पण केवढे घातक असू शकते हे कळण्याच्या बऱ्याच आधीपासून रक्त संक्रमणास जो नकार दर्शविला होता तो आकस्मिक वाटला असावा. पण यहोवाच्या साक्षीदारांनी रक्तासंबंधाने घेतलेली ही भूमिका आकस्मिक स्वरुपाची नाही किंवा हा कोणा नवख्या पंथाने, रक्त सुरक्षित नाही अशी भीती वाटून घेतलेल्या भूमिकेचा नियम देखील नाही. परंतु, साक्षीदार रक्ताला नकार दर्शविण्याचे कारण म्हणजे त्यांच्या सर्वथोर शिक्षकासमोर, देवासमोर, आज्ञाधारकपणे चालण्याचा निश्चय हे आहे.
३. (अ) यहोवावर अवलंबून राहण्याबद्दल दाविदाला कसे वाटले? (ब) देवावर भिस्त ठेवण्यामुळे दाविदाने कोणत्या परिणामाची आशा धरली?
३ देवावर आपले अवलंबत्व आहे हे ओळखणाऱ्या दावीद राजाचा देवाकडून शिक्षण मिळवण्याचा व त्याच्या ‘सत्य मार्गाने चालण्याचा’ निश्चय होता. (स्तोत्रसंहिता ८६:११) दाविदाला एकदा सूचना मिळाली की, त्याने देवाच्या दृष्टीने रक्तदोषी होण्याचे टाळले तर त्याचा ‘जीव . . . परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याजपाशी जिवंतांच्या समूहात बांधलेला राहील.’ (१ शमुवेल २५:२१, २२, २५, २९) एखादी मूल्यवान वस्तु सुरक्षित तसेच राखून ठेवण्यासाठी जसे लोक गुंडाळून ठेवतात, तसे दाविदाचे जीवन देव सुरक्षित व राखून ठेवणार होता. या सूज्ञ सल्ल्याचा स्वीकार करून दाविद आपल्या व्यक्तीगत प्रयत्नाद्वारे स्वतःचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, तर जीवन ज्याच्या मालकीचे आहे त्याच्यावर पूर्ण भिस्त दाखवली. “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.”—स्तोत्रसंहिता १६:११.
४. यहोवापासून शिक्षण मिळावे अशी दाविदाची का इच्छा होती?
४ अशा प्रवृत्तीमुळेच दाविदाला असे वाटले नाही की, त्याला व्यक्तीशः कोणते ईश्वरी नियम ग्राह्य मानून निवडता येतील किंवा त्यांचे पालन करता येईल. त्याचा मनोदय तर असा होता की, “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] आपला मार्ग मला दाखीव. . . . मला सरळ मार्गाने ने.” “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तुझा मार्ग मला शिकीव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे अंतःकरण एकाग्र कर. हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगाण करतो.” (स्तोत्रसंहिता २७:११; ८६:११, १२) कधी कधी देवासमोर सत्यमार्गाने चालणे हे गैरसोयीचे किंवा मोठ्या त्यागाचे दिसले असेल, तरीही दावीद, आपल्याला योग्य मार्गाने चालण्याचे शिक्षण मिळावे व त्यानुरुप चालत राहावे अशी इच्छा बाळगून होता.
रक्ताबद्दल शिकवण्यात आले होते
५. रक्ताबद्दल देवाची कोणती भूमिका आहे ते दाविदाला कसे कळले असावे?
५ दाविदाला रक्ताबद्दलचा देवाचा दृष्टीकोण युवकावस्थेपासूनच समजाविला होता हे लक्षात घेतले पाहिजे; हा दृष्टीकोण कोणतेही धार्मिक गूढ नव्हते. लोकांपुढे देवाचे नियमशास्त्र वाचले जात असता दाविदाने हे ऐकले असावे की, “शरीराचे जीवन रक्तात असते, आणि तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त व्हावे म्हणून ते तुम्हासाठी वेदीवर दिले आहे. कारण जिवाबद्दल प्रायश्चित्त रक्तानेच होते. ह्याकरता मी इस्राएल लोकांस आज्ञा केली आहे की, ‘तुमच्यातील कोणी रक्ताचे सेवन करू नये, तुमच्यात राहणाऱ्या उपऱ्यांनीही करू नये.’”—लेवीय १७:११, १२; अनुवाद ४:१०; ३१:११.
६. देवाच्या सेवकांनी रक्ताबद्दल शिक्षण घेण्याची गरज सतत कशी राहिली?
६ इस्राएल जोवर देवाचे संघटित लोक होते तोवर त्याला संतुष्ट करण्याची इच्छा राखणाऱ्यांनी रक्ताबद्दल त्याच्याकडून शिकून घेणे जरुरीचे होते. अशाप्रकारचे शिक्षण इस्राएली मुलामुलींना पिढ्यान्पिढ्या मिळत गेले. पण मग, देवाने ख्रिस्ती मंडळीचा स्वीकार करून तिचे “देवाचा इस्राएल” या नात्याने संघटन केले तेव्हा हे शिक्षण पुढे चालू राहणार होते का? (गलतीकर ६:१६) होय. निश्चितपणे. देवाचा रक्ताबद्दलचा दृष्टीकोण बदलला नाही. (मलाखी ३:६) रक्ताचा दुरुपयोग होऊ नये ही त्याने वदविलेली भूमिका नियमशास्त्र प्रचारात येण्याआधी अस्तित्वात होती व ती नियमशास्त्र संपुष्टात आल्यावर सुद्धा पुढे चालू राहिली.—उत्पत्ती ९:३, ४; प्रे. कृत्ये १५:२८, २९.
७. देवाकडून रक्ताबद्दल शिक्षण घेणे हे आम्हास का महत्त्वाचे आहे?
७ रक्ताबद्दलचा आदर ख्रिस्ती धर्माच्या केंद्रभागी आहे. ‘पण ही अतिशयोक्ती नव्हे का?’ असे कोणी विचारील. मग, येशूच्या यज्ञार्पणाशिवाय ख्रिस्ती धर्मात केंद्रस्थानी आहे तरी काय? प्रेषित पौलाने सुद्धा हेच लिहिलेः “त्याच्या [येशू] कृपेच्या विपुलतेप्रमाणे . . . त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे.” (इफिसकर १:७) फ्रँक सी. लौबॅक यांनी भाषांतरीत केलेल्या द इन्स्पायर्ड लेटर्समध्ये हे वचन असे आहेः “ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हासाठी किंमत दिली व आता आम्ही त्याचे आहोत.”
८. “मोठा लोकसमुदाय” जीवनप्राप्तीसाठी रक्तावर कसा अवलंबून आहे?
८ येणाऱ्या “मोठ्या संकटातून” बचावण्याची व नंदनवनमय पृथ्वीवर देवाच्या आशीर्वादांचा उपभोग घेण्याची ज्यांना आशा वाटते ती, येशूच्या सांडलेल्या रक्तावर आधारीत आहे. प्रकटीकरण ७:९-१४ यांचे वर्णन करून त्यांच्याबाबतीत हे घडल्याचे म्हणतेः “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” येथील भाषा लक्षात घ्या. ती, मोठ्या संकटातून वाचलेल्या लोकांनी ‘येशूचा स्वीकार केला,’ किंवा ‘त्याच्यावर विश्वास ठेवला’ असे म्हणत नाही; वस्तुतः हे जरुरीचे आहे. तरी ते एक पाऊल पुढे जाते व म्हणते, त्यांनी “आपले झगे [येशूच्या] रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” याचे कारण, त्याच्या रक्तात खंडणी पुरविण्याची शक्ती होती.
९. रक्ताबद्दल यहोवाचे आज्ञापालन करणे इतके गंभीर का आहे?
९ या मूल्याबद्दल रस बाळगल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांचा रक्ताचा दुरुपयोग घडू न देण्याचा निर्धार आहे. कदाचित कोणा वैद्याला संक्रमण जरुरीचे आहे असे प्रांजळपणे वाटत असले तरी साक्षीदारांचा तोच दृढ निश्चय आहे. वैद्याला कदाचित वाटेल की, संक्रमणामुळे आरोग्यास धोका संभवण्यापेक्षा संभाव्या लाभ मिळू शकतात. तरीपण ख्रिश्चनांना अधिक भयानक जोखीम, रक्ताचा गैरवापर करण्याचे सहमत दर्शविण्यामुळे देवाची मर्जी गमावण्याची जोखीम, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. “सत्याचे ज्ञान मिळाल्यावर . . . जाणूनबुजून पाप” करणाऱ्यांबद्दल पौलाने एकदा म्हटले होते. अशाप्रकारातील पाप इतके गंभीर का होते बरे? कारण अशा या माणसाने “देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले [व] जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते कराराचे रक्त हलक्या प्रतीचे मानले”ले असते.—इब्रीयांस ९:१६-२४; १०:२६-२९.
इतरांना शिक्षण मिळण्याची मदत देणे
१०. रक्तापासून दूर राहण्याच्या आमच्या निर्धारामागे काय आहे?
१० आम्हाला येशूच्या खंडणी यज्ञार्पणाची रस वाटत असल्यामुळे पापाचरण करीत राहण्याचे व त्याच्या रक्ताच्या जीवनदायी मूल्यास नाकारण्याचे धाडस होत नाही. याबद्दलचा विचार केल्यामुळेच आम्हाला याची समज मिळाली आहे की, देवाने दिलेल्या जीवनासाठी साधी कृतज्ञता, त्याच्या नीतीमान नियमांबद्दल कोणतीही हातमिळवणी करण्याचा नकार दर्शविण्यामध्ये प्रवर्तित होत राहावी. देवाचे ते नीतीमान नियम अंतःकरणापासून आमच्या कल्याणार्थ दिलेले आहेत, आमच्या चिरकालिक लाभास्तव दिले आहेत असा आमचा आत्मविश्वास आहे. (अनुवाद ६:२४; नीतीसूत्रे १४:२७; उपदेशक ८:१२) पण, आमच्या मुलांबद्दल काय?
११-१३. आपली मुले व रक्त याबद्दल काही पालकांनी कोणता चुकीचा ग्रह राखला आहे व का?
११ आमची मुले ही लहान असली आणि त्यांना समज नसेल तर यहोवा देव त्यांना आमच्या भक्तीच्या आधारावर शुद्ध व स्वीकृत असे पाहू शकतो. (१ करिंथकर ७:१४) या कारणास्तव, एखाद्या ख्रिस्ती घरातील बालकाने देवाचा रक्ताबद्दल असणाऱ्या कायद्याची समज मिळवून घेतलेली नसेल किंवा त्याचे आज्ञापालन करण्याची निवड केली नसेल. तरीपण, आम्ही त्यांना या महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल सूचना देण्यात होता होईल तितके करीत आहोत का? ख्रिस्ती पालकांनी याबद्दल गंभीर विचार केला पाहिजे; कारण असे दिसते की, काही पालकांनी मुले व रक्त याबाबत काही चुकीची विचारधारा बाळगलेली आहे. आपल्या लहान मुलांना रक्त संक्रमित केले किंवा काय याबद्दल काही करण्याचा तितका ताबा नसतो असे त्यांना वाटत असते. पण हा असा चुकीचा दृष्टीकोण का जडला गेला बरे?
१२ कित्येक देशात दुर्लक्षित झालेल्या किंवा वाईट वागणूक मिळालेल्या मुलांना संरक्षण देण्याबद्दल कायदे करण्यात आले आहे किंवा सरकारी मंडळे आहेत. पण जेव्हा साक्षीदार कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी हिला रक्त न देण्याचा निर्णय त्यांचे पालक घेत असतात तेव्हा ती मुले उपेक्षित झालेली किंवा वाईट वागणूक मिळालेली आहेत असे म्हणता येणार नाही. कारण याच वेळेला ते आधुनिक औषधे पुरवू शकतील असा पर्यायी इलाजास ते आपली अनुमती देत असतात. वस्तुतः संक्रमण पद्धतीमुळे उद्भवणारे मान्यवर असे धोके लक्षात आणले तर वैद्यकीय दृष्टीकोणातून सुद्धा पालकांनी घेतलेल्या निर्णयाला उपेक्षा किंवा वाईट वागूणक म्हणता येणार नाही. संभाव्य जोखीमा तोलून पाहण्याचा व नंतर आपल्याला हवी असणारी उपचारपद्धत निवडण्याचा तो हक्क आहे.a असे असले तरी काही वैद्यकीय प्रतिनिधींनी अधिकाराच्या बळाचे साहाय्य घेऊन नको वाटणारे संक्रमण जबरदस्तीने लादण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा फायदा घेतला आहे.
१३ वैद्यकीय प्रतिनिधी अज्ञान बालकाला संक्रमित करण्याचे न्यायालयाचे पाठबळ सहजपणे मिळवू शकत असल्यामुळे हे प्रकरण आपल्या हाताबाहेर आहे असे काही पालकांना वाटते. यामुळे पालकाला काही करता येणार नाही व काही करण्याची गरज नाही असा त्यांचा समज बनला आहे. पण हा केवढा चुकीचा विचार आहे!—नीतीसूत्रे २२:३.
१४. दावीद व तीमथ्य यांना त्यांच्या युवकपणी कसे शिक्षण मिळाले होते?
१४ दाविदाला देवाच्या मार्गाचे शिक्षण आपल्या युवकावस्थेपासूनच मिळाले होते हे आपण पाहिले आहेच. यामुळे त्याला जीवन देवाकडील देणगी असून रक्त जीवनाचे प्रतिनिधित्व करते असे मानण्यास सिद्ध केले गेले. (पडताळा २ शमुवेल २३:१४-१७.) तीमथ्यालाही देवाच्या विचारांबद्दलच्या सूचना “बाळपणापासून” मिळाल्या होत्या. (२ तीमथ्य ३:१४, १५) तर मग, दाविद व तीमथ्य हे दोघेही, सध्याला आपण ज्याला सज्ञान असण्याचे जे वय मानतो त्यापेक्षा कमी वयाचे असताना, त्यांनी देवाच्या इच्छेशी निगडीत असणाऱ्या वादविषयाबद्दल स्वतःच चांगल्या प्रकारे वक्तव्य केले असते याबद्दल तुम्ही सहमत होणार नाही का? या कारणास्तव, वयात येण्याआधी ख्रिस्ती युवकांना देवाच्या मार्गाचे शिक्षण दिले जाण्यास हवे.
१५, १६. (अ) बालकांच्या हक्काबद्दल काही ठिकाणी कोणता दृष्टीकोण बळावलेला आहे? (ब) कशामुळे एका तरुणाला रक्त दिले गेले?
१५ काही ठिकाणी प्रौढ समजल्या जाणाऱ्या बालकास प्रौढांसारखे हक्क दिले जातात. त्याचे वय किंवा प्रौढ विचारधारा किंवा दोन्ही गोष्टींच्या आधारावर त्या युवकाला वैद्यकीय उपचारासंबंधाने स्वतःचे व्यक्तीगत निर्णय घेण्यास प्रौढ समजले जाते. जेथे असा कायदा नाही तेथे न्यायाधीश किंवा अधिकारी रक्ताबद्दल आपले स्पष्ट मत सांगू शकणाऱ्या युवकाच्या इच्छेला प्राधान्य देण्यावर अधिक भर देतात. उलटपक्षी, जेथे कोणा युवकाला आपला विश्वास स्पष्टपणे व प्रौढतेने बोलून दाखवता येत नाही तेथे, काय सर्वोत्तम आहे हे जसे बाळाच्या बाबतीत ठरवतात तसे त्याच्यासाठी ठरवावे असे कोर्टाला वाटू लागेल.
१६ एका तरुणाने अधुनमधून अनेक वर्षे पवित्र शास्त्राचा अभ्यास केला होता पण त्याने बाप्तिस्मा घेतला नव्हता. “कसलीही वैद्यकीय उपचार पद्धती स्वतःसाठी नाकारण्याचा हक्क” मिळण्याचे वय होण्यास आता केवळ सात आठवड्यांचा अवधी असताना, त्याच्यावर कर्करोगाचा इलाज करणाऱ्या एका इस्पितळाने त्याची व त्याच्या पालकांची इच्छा डावलून त्याला रक्त संक्रमित करण्यासाठी कोर्टाचे पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न केला. सद्विवेकी न्यायाधिशाने त्याला रक्ताबद्दल त्याच्या विश्वासासंबंधाने प्रश्न केले आणि पवित्र शास्त्राची पहिली पाच पुस्तके कोणती यासारखीही माहिती विचारली. या तरुणाला हे सांगता आले नाही आणि आपण रक्त का नाकारतो हेही त्याला खात्रीशीरपणे सांगता आले नाही. त्यामुळे न्यायाधिशाने त्याला संक्रमण देण्याचे फर्मान काढले. याबद्दल म्हणताना ते म्हणालेः “रक्त संक्रमणास त्याने दिलेला नकार, त्याच्या स्वतःच्या धार्मिक विश्वासाच्या प्रौढ समजदारीवर आधारलेला नाही.”
१७. रक्त देण्याच्या प्रकाराबद्दल एका १४ वर्षाच्या मुलीने कोणती भूमिका घेतली व याचा काय परिणाम झाला?
१७ पण जेव्हा एखाद्या बालकास देवाच्या मार्गांचे उत्तम शिक्षण मिळते व तो सत्याच्या मार्गात क्रियाशील असतो तेव्हा वेगळेच घडत असते. आणखी एका तरुण ख्रिश्चनाला असाच विरळ प्रकारचा एक कर्करोग झाला होता. त्या मुलीने तसेच तिच्या पालकांनी एका प्रसिद्ध इस्पितळातील तज्ञाकडून सुधारीत अशी विशिष्ट उपचारपद्धती समजून घेतली व स्वीकारली होती. तरीही हे प्रकरण कोर्टाकडे आले. न्यायाधिशांनी लिहिलेः “डी.पी.ने साक्ष दिली आहे की ती कोणत्याही प्रकारे रक्तसंक्रमणास नकार दाखवील. तिने संक्रमण म्हणजे तिच्या शरीरावर एक प्रकारचा हल्लाच आहे असे म्हटले व त्याची तुलना बलात्काराशी केली. तिने कोर्टाला म्हटले की, आम्ही तिच्या निवडीबद्दल सन्मान दाखवावा व रक्त संक्रमण करण्याचा कोर्टाने आदेश न देता तिला [इस्पितळात] उपचार घेत राहू द्यावे.” या मुलीला जो ख्रिस्ती उपदेश आधी मिळाला होता तो आता या कठीण काळात तिच्या कामी आला.—चौकट पहा.
१८. (अ) रक्त घेण्याबद्दल एका रोगग्रस्त मुलीने कोणती दृढ भूमिका घेतली? (ब) तिच्या उपचाराबद्दल न्यायाधिशांनी कोणता निर्णय दिला?
१८ बारा वर्षांची एक मुलगी रक्तकर्करोग (ल्युकेमिया) यावर उपचार घेत होती. एका बाल-कल्याण मंडळाने तिचे प्रकरण, तिला रक्त देण्याची सक्ती करता यावी यासाठी कोर्टाकडे नेले. न्यायाधिशांनी निर्वाळा दिलाः “एल. ने या कोर्टाला स्पष्ट व अस्खलितपणे म्हटले की, तिजवर कोणाही प्रकारे रक्त घेण्याची सक्ती केल्यास ती आपल्या सर्व शक्तीनिशी त्याविरुद्ध लढत देईल. ती आरडाओरडा व धडपड करील आणि आपल्या दंडावरील संक्रमणाच्या सुया काढून फेकून देईल व तिच्या खाटेवरील रक्ताच्या पिशवीची नासधूस करील. असा कोणताही प्रकार या बालकाकडून घडू नये यासाठी मी कोणतेही संक्रमण देण्याची आज्ञा नाकारतो. . . . या रुग्णाच्या बाबतीत इस्पितळ तिच्या रोगाचा इलाज केवळ शारीरिक दृष्ट्या करू पाहात आहे; ते तिच्या भावनिक तसेच धार्मिक गरजांना लक्षात घेत नाही.”
पालकहो—चांगले शिक्षण द्या
१९. पालकांनी आपल्या मुलांसंबंधाने कोणते खास कर्तव्य पूर्ण करावयास हवे?
१९ आपल्या कुटुंबातील सर्व जणांनी रक्ताबद्दल देवाच्या कायद्यानुरुप जगावे अशी इच्छा धरणाऱ्या पालकांना वर नमूद असणारे अनुभव सामर्थ्यशाली संदेश देतात. अब्राहाम हा देवाचा मित्र का होता याचे एक कारण म्हणजे, देवाला हे ठाऊक होते की, तो “आपल्या लेकरांस व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] मार्गाला लावून न्यायनीतीचे आचरण करावयाची आज्ञा” देणार होता. (उत्पत्ती १८:१९) हेच आज ख्रिस्ती पालकांबद्दल खरे व्हावयास नको का? तुम्ही पालक आहात तर तुम्ही आपल्या प्रिय मुलांना यहोवाच्या मार्गाने चालण्याची सूचना देता की, ते त्यांच्याठायी “जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येक इसमाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध [राहतील] व ते सौम्यतेने व भिडेने” देतील?—१ पेत्र ३:१५.
२०. आमच्या मुलांनी रक्ताबद्दल मूलभूतपणे काय जाणावे व विश्वास बाळगावा अशी आम्ही इच्छा धरावी? (दानीएल १:३-१४)
२० रक्त संक्रमणापासून उद्भवणारे आजाराचे धोके तसेच इतर जोखीमा याबद्दल आमच्या मुलांना कळवणे हे उत्तम आहे तरी, रक्ताबद्दल देवाच्या परिपूर्ण नियमाचे आमच्या मुलांना शिक्षण देण्यामागील मूलभूत अर्थ, त्यांच्याठायी रक्ताबद्दल भय उभारावे हा नाही. समजा, कोणा न्यायाधिशाने एखाद्या मुलीला हे विचारले की, ती का रक्त नाकारते; आणि तिने जर म्हटले की ते खूपच जोखमीचे आहे किंवा त्यामुळे नैतिक किंवा भावनिक दुखापत घडते, तर कोणता परिणाम होऊ शकतो? न्यायाधीश कदाचित ठरवतील की, ती अप्रौढ व भयभीत झालेली आहे. अपेंडीजमध्ये झालेल्या आळ्या काढण्यास आईवडीलांची शस्त्रक्रियेला संमती आहे पण याची तिला भीती वाटते म्हणून ती रडते व प्रतिकार करते, त्यासारखी तिची स्थिती आहे असे ते ठरवतील. तथापि, आम्ही आधीच हे पाहिले आहे की, ख्रिश्चनांचा संक्रमणाला नकार, रक्त प्रदूषित आहे म्हणून नाही, तर ते देव व जीवनदाता याच्या दृष्टीने मोलवान असल्यामुळे आहे. हे आमच्या मुलांना माहीत असले पाहिजे, व यासोबत रक्ताद्वारे येणे शक्य अशा वैद्यकीय अडचणी यांनीही आमच्या धार्मिक पावित्र्यास अधिक आधार दिला पाहिजे.
२१. (अ) पालकांनी आपल्या मुलांबद्दल व रक्ताबद्दलचा पवित्र शास्त्रीय दृष्टीकोण याबाबत काय जाणून घेण्यास हवे? (ब) रक्ताबद्दल पालकांना आपल्या मुलांना कसली मदत करता येईल?
२१ तुम्हाला मुले आहेत तर ती संक्रमणाबद्दल पवित्र शास्त्रीय भूमिकेशी सहमत असून त्याची स्पष्टता करतील याची तुम्हास खात्री वाटते का? ही भूमिका देवाच्या इच्छेनुरुप आहे याचा ते खरेपणाने विश्वास ठेवतात का? देवाच्या कायद्याचे उल्लंघन करणे हे सार्वकालिक जीवनप्राप्तीचे ख्रिश्चनाचे भवितव्यही धोक्यात आणू शकते इतके गंभीर असल्याची त्यांची खात्री पटलेली आहे का? सूज्ञ पालक आपल्या मुलांसोबत, मग ती बालक असोत वा प्रौढ होण्यास आलेली असोत, या गोष्टींची उजळणी करीत राहतील. एखादा न्यायाधीश किंवा इस्पितळाचा अधिकारी प्रश्न विचारीत आहे तर याला आपल्या घरातील प्रत्येक युवक कसे उत्तर देईल याचे सरावाचे वर्ग पालक घेतील. या सरावात आधी ठरविलेली उत्तरे युवकाने पाठ म्हणून दाखवावी हा याचा हेतू नसावा. तर त्यांचा काय विश्वास आहे व तो तसा का आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे. अर्थात, कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी पालक किंवा इतर रक्ताबद्दलच्या जोखीमा आणि उपलब्ध असणारी पर्यायी उपचारपद्धती याबद्दलची माहिती देऊ शकतील. पण कोणी न्यायाधीश किंवा अधिकारी आमच्या मुलांकडून हे पाहण्याची अपेक्षा धरतील की, ते आपली भूमिका प्रौढपणे जाणून आहेत आणि याला ते स्वतःचे पाठबळ व खात्री जोडून आहेत का.—पडताळा २ राजे ५:१-४.
२२. रक्ताबद्दल देवाकडून प्रशिक्षित होण्यामुळे आम्हाला कोणते चिरस्थायी परिणाम मिळतील?
२२ आम्ही सर्वांनीच देवाला रक्ताबद्दल वाटणाऱ्या दृष्टीकोणाची कदर करण्याची व तो उंचावून धरण्याची गरज आहे. प्रकटीकरण १:५ ख्रिस्ताचे वर्णन देऊन म्हणते की, ‘जो आपल्यावर प्रीती करतो व ज्याने स्वरुधिराने आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले.’ केवळ येशूच्या रक्ताच्या मूल्याचा स्वीकार करण्यामुळे आम्हाला आमच्या पापांची पूर्ण व कायमची क्षमा मिळू शकते. रोमकर ५:९ स्पष्टपणे म्हणतेः “आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतीमान ठरलो आहोत ते आपण विशेषेकरुन त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ.” तर मग, या प्रकरणाबाबतीत आम्ही व आमच्या मुलांनी यहोवाकडून शिकवलेले असे होणे आणि त्याच्या मार्गात सदासर्वदा चालण्याचा निश्चय करणे हे केवढे सूज्ञतेचे आहे!
[तळटीपा]
a रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीपत्रकातील पृष्ठ २१-२ व २८-३१ पहा.
सूचनात्मक असे प्रमुख मुद्दे
▫ यहोवाकडून शिकलेले होण्यासंबंधाने आपण कोणता दृष्टीकोण राखावा?
▫ रक्तासंबंधाने देवाच्या नियमाचे पालन करणे इतके महत्त्वाचे का आहे?
▫ रक्ताबद्दल आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्या युवकांनी स्पष्टपणे व दृढपणे विवेचीत करणे का महत्त्वाचे आहे?
▫ ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांना रक्ताबद्दल यहोवाच्या नियमांचे प्रशिक्षण देण्यामध्ये कशी मदत करता येईल?
[१४ पानांवरील चौकट]
न्यायालयावर मोठी छाप पडली
परिच्छेद १७ मध्ये उल्लेखिलेल्या डी. पी. बद्दल कोर्टाने दिलेला निर्णय काय म्हणतो?
“या साडे चौदा वर्षे वयाच्या युवतीने दाखविलेली बुद्धीमत्ता, तोल, सभ्यपणा, आणि नेट यामुळे कोर्टावर मोठी छाप पडली आहे. तिला घातक प्रकारातील कर्करोग जडला आहे हे समजून अस्वस्थ झाली असावी . . . तरीपण, तिने कोर्टासमोर साक्ष देऊन आपणाठायीचा प्रौढ दृष्टीकोण प्रकट केला. तिजसमोर जे अवघड काम होते त्यावर तिचे पूर्णपणे लक्ष केंद्रित होते असे दिसले. ती सर्व सत्रांना उपस्थित राहिली, उपचारपद्धती संमत केली, आणि हे वैद्यकीय आव्हान मानव या नात्याने कसे पेलता येईल त्याबद्दल सुसंगत मत ठरवले आणि मर्मभेदक विनंतीने ती कोर्टासमोर आलीः माझ्या निर्णयाचा आदर करा . . .
“आपल्या प्रौढतेसोबतच डी. पी.ने आपल्या निर्णयाबद्दल कोर्टाने आदर दाखवावा यासाठी पुरेशी कारणे दिली. जी उपचार योजना घेतली जाणार होती तिच्यातील रक्तसंक्रमणामुळे तिला आध्यात्मिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या इजा होणारी होती. या कारणास्तव तिने ठरविलेल्या उपचारपद्धतीचा हे कोर्ट आदर करीत आहे.”
[१३ पानांवरील चित्रं]
एखादा न्यायधीश किंवा इस्पितळाचा अधिकारी आमचे ख्रिस्ती युवक खरेपणाने काय विश्वास धरुन आहेत व का हे जाणून घेण्याची इच्छा धरुन असतात